इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपवासाला चालणारे बटाटे सुद्धा परदेशीय आहेत. पण त्याविरुद्ध कोणी काही म्हणत नाहीत. स्वतः प्रसिद्धीत रहायचा सोस असणारी मंडळी त्यावर पण आक्षेप घेतील.

दिवाळी आधीच फटाके सुरू झाले म्हणा की... वादंगची लिंक कुठे मिळू शकेल? मी वाचलेले नाही त्यामुळे उत्सुकता आहे. म्हणणं तरी काय मंडळींचं?

कट्टर हिंदुत्त्ववाद्यांना उर्दूचा जितका तिटकारा आहे तितका इंग्रजीचा नाही. पण तेथेही जात्यात-सुपात लॉजिक आहे. हॅपी दिवाली म्हणण्यापेक्षा मराठीत शुभेच्छा द्या असाही एक सूर अनेक लोकांच्या फेबुवर दिसतो.

ईर्शाद नावात काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही.

शुद्ध मुर्खपणा आहे! फॅब इंडिया विरूद्ध, तनिष्क विरूद्ध, ते no bindi no business hash tags इतक्या क्षुल्लक गोष्टींतून धार्मिक वाद उत्पन्न करायचे.. उल्टे पाँव चलते जाना Sad
फहमिदा रियाझांची "तुम बिलकुल हम जैसे निकले" आठवते अशावेळी.
कौन है हिंदू कौन नहीं है, तुम भी करोगे फतवे जारी - असेच चालू आहे दुर्दैवाने.

वादंगाची लिंक ॲड केली आहे.
या सर्व प्रकरणाची सुरुवात फॅबइंडियाच्या जाहिरातीपासून (भरत यांनी लिंक दिली आहे) झाली असं कळलं.

तत्वांपेक्षा जास्त महत्व प्रतिकांना येत जातं यापरतं दुर्दैव काय?

बरं यात पुन्हा बायकांच्याच कपाळी बिंद्या हव्या आहेत असं दिसतंय. बिनगंधा-शेंड्यांचे सुरवारी-झब्बे घातलेले पुरुष चालतात बहुधा संस्कृतीला!

धन्यवाद. ह्म्म... काय पण ह्या लिंकेतल्या बाई... खाजवून खरूजच काढायची तर खरे-जोशींच्या कार्यक्रमात कशाला काढायची. मिळत आहेत त्यांना श्रोते-मानधन इ इ तर चालू दे की... भलत्या वादात मराठी माणसाचे आर्थिक नुकसान का करता?? का त्या दोघांनीच पब्लिसिटी स्टंट म्हणून बाईंना अशी पोस्ट करायला लावली?? हल्ली कलाकारांचेही काही सांगता येत नाही (सारा अली- कार्तिक आर्यन इ इ पब्लिसिटी).
मला प्रश्न जास्त, पोस्टीसाठी मजकूर कमी असं झालं...

पण हा वाद आत्ताच का? या आधीही दिवाळी पहाट म्हणून ‘ईर्शाद’ चा कार्यक्रम झाला होता की! अगदी नुकताच गणपती उत्सवासाठीही झाला होता. कार्यक्रम पत्रीकेचा दुवा
https://www.shrimantbhausahebrangariganpati.com/schedule.php

फॅब इंडियाच्या जाहिरातीवरुन वाद सुरु असल्यास त्यात 'ईर्शाद' ला का ओढत आहेत?

त्या लिंकवर गेलं की तिथल्या मेजॉरीटी कमेंट भरपूर काही सांगत आहेत. बरं हे आज आत्ता लगेच उठून झालेलं नाही. गेली पाच सात वर्षे सावकाश चालू आहे. तरीही मूळ पोस्ट आणि बऱ्याच प्रतिक्रिया वाचून आता जाग आली होय? असं म्हणावं वाटलं. जाऊद्या. चालुद्या. जरा अजून मोठ्याने आवाज येऊदे रडण्याचा. आणि हो, अजून भरपूर रडायचे आहे, सगळी आसवे संपवू नका एकदाच. Wink

Filmy +100

महान आहेत एकएक! बहुसंख्य भारतीय गुडघा गँगचे सदस्य आहेतच, आणि हे पाच सात वर्षे वगैरे बिलकुल नाही. कायमच असे आहे.
बहुसंख्य भारतीयांची अक्कल कायमच गुडघ्यात राहिली आहे. विचार करायची इच्छाच नाही, गोंधळ घालायला सगळ्यात पुढे.

दिवाळी पहाटला ईर्शाद म्हणणं हेसुद्धा deliberate attempt of abrahamisation of Hindu festivals, आहे की. त्याची economic cost त्यांनी चुकवलीच पाहिजे.
फेसबुकवरच्या कमेंट्स मध्येही हा economic costs चा सूर ऐकू येतोय .

अमितव + 1
काहीही चालू असते भारतात...

बर्‍याच हिन्दुत्ववादी ग्रुप्स आणि उजव्या मिडियाचा आव असा वाटला की फॅब इंडियावाले दिवाळीचेच नामकरण जश्न ए रिवाज असे करत आहेत. ते फक्त त्यांच्या त्या कलेक्शन चे नाव आहे ना. असू देत की मग, नाही आवडले तर घेऊ नका. संपला विषय Happy त्यापेक्षा जास्त दंगा करणार्‍यांमधे प्रत्येकाचा आपापला राजकीय अजेन्डा आहे. दुसरे काय.
ऑनेस्टली सांगायचे तर दिवाळी च्या ट्रॅडिशनल वेअर च्या जाहिरातीत ४-५ पैकी एकाही मॉडेल ने चुकूनही कुंकू न लावणे हे फॅबनेही एक प्रकारचे स्टेटमेन्टच केले आहे का? त्यांनाही काहीतरी वाद झालेला हवा आहे का ? असेही एक मनात येऊन गेले.

असं म्हटलं तर मग शलवार-कुर्ताही नको, साडीच हवी, तीही नऊवारीच हवी, किंवा साडीतरी का, वल्कलं हवीत असं करत करत कितीही मागे जाता येईल की. Proud
हिंदूंनी (त्यातही बायकांनी) कुंकवं लावायला कधी सुरुवात केली कोणाला कल्पना आहे का? भारतात सगळे हिंदू (बायका!!) कुंकू लावतातच का अ‍ॅज अ रूल? म्हणजे पंजाबात, काश्मीरमध्ये किंवा ईशान्य राज्यांतसुद्धा?
शिवाजी महाराज धोतर नेसण्याऐवजी सुरवार का घालत होते?
असं काहीबाही मनात येऊन गेलं.

ऑनेस्टली सांगायचे तर दिवाळी च्या ट्रॅडिशनल वेअर च्या जाहिरातीत ४-५ पैकी एकाही मॉडेल ने चुकूनही कुंकू न लावणे हे फॅबनेही एक प्रकारचे स्टेटमेन्टच केले आहे का? त्यांनाही काहीतरी वाद झालेला हवा आहे का ? असेही एक मनात येऊन गेले. >> +१

दिवाळी पहाटला ईर्शाद म्हणणं हेसुद्धा deliberate attempt of abrahamisation of Hindu festivals, आहे की. त्याची economic cost त्यांनी चुकवलीच पाहिजे.>>
च्च! ईर्शाद हे कार्यक्रमाचे नाव . या नावाला विरोध करणार्‍यांनी एकदा तो कार्यक्रम ऐकावाच.

च्रप्स, भारतातच कशाला? अमेरिकेत नाही का व्हाइट सुप्रिमसिस्ट्स सोकावले तात्याच्या कारकिर्दीत? सगळे सारखेच!

बाकी उर्दू भारतीय भाषाच आहे ना? की माझी माहिती चुकीची आहे?

{खाजवून खरूजच काढायची तर खरे-जोशींच्या कार्यक्रमात कशाला काढायची. }
खान कुरेशी नावावरून खाजवलं असतं तर चाललं असतं ना?
खाजवणाऱ्यांना पण व्हरायटी नको का?

बाकी उर्दू भारतीय भाषाच आहे ना? की माझी माहिती चुकीची आहे? >>> हो तो ही एक विनोद आहे. परदेशी इंग्रजी चालते, पण भारतीय उर्दू नाही.

>>> फॅबनेही एक प्रकारचे स्टेटमेन्टच केले आहे का?
फॅबच नाही, आता बरेच ब्रॅन्ड्स गोवले गेलेत यात. त्यांचा टार्गेट कस्टमर कुंकवं लावत नसावा/कुंकवाला महत्व देत नसावा इतकाच अर्थ लावला होता मी.
त्या 'नो बिंदी नो बिझनेस'बद्दल प्रथम वाचलं तेव्हा हास्यास्पद वाटलं होतं. शेफालीबाईंबद्दलही त्यामुळेच समजलं. पण वर दिलेल्या लिंकमधल्या कमेन्ट्स खरंच चिंताजनक आहेत.

रीया, चर्चाप्रस्तावात आणि प्रतिसादांत लिंक्स आहेत.

- मुसलमान लोकं मेन स्ट्रीम मध्ये आहेत का भारतात की ते स्वतःची वेगळी आयडेंटिटी जपतात? जर ते त्यांची वेगळी आयडेंटीटी कुरवाळत बसत नसतील, तर 'ईर्शाद' शब्द ठिकच आहे.
- पण जर ते अल्पसंख्यांक आहोत, मुस्लिम आहोत, वेगळे आहोत असे सतत दाखवुन देत असतील तर आपणही आपली अस्मिता जपली पाहीजे. सारखं त्यांना आपलं म्हणा रे - आपलं म्हणा रे चं सहिष्णु पालुपद हा बोटचेपेपणा होइल. आपलं म्हणा = दिवाळीतील, काव्यवाचनाला उर्दू नाव द्या. काही हरकत नाही. जरुर द्या. द्याच. मग किती का संस्कृत/प्राकृत शब्द असेना.

वरील २ मुद्दे प्रत्येकाने तपासून पहावे. कोणाचे एकाचेच उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे असे नाही. माझे स्वतःचे कन्फ्युजन आहे.

Pages