इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही पाने मागेच शांत माणूस यांनी त्यांचा शाईफेकीला विरोध आहे हे स्पष्ट केल्यावर परत इथे तेच तेच लिहण्यात आणि वाचण्यात फारसा इंटरेस्ट नव्हता पण इथे कुणाला तरी माझ्या नावाची उचकी लागल्याचे एका मायबोलीकर मित्राने मेसेजवर कळवले.
नवीन निश्चेट इतकेच म्हणू शकतो..... grow up buddy Happy

छान लेख आहे. वावे - धन्यवाद शेअर केल्याबद्दल.

गेली काही वर्षे महाराष्ट्रात, भारतात अपमानांचे पेव फुटले आहे. पुतळ्यावर शाई ओतण्यासारखी जाणूनबुजून केलेली कृत्ये तर आहेतच. त्याचा लोकांना राग येइल हे समजू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या जनरल बोलण्यानेही उठसूठ कोणाना कोणाचे अपमान होत असतात. कोणी व्यक्ती नसेल तर डायरेक्ट महाराष्ट्राचा अपमान होतो. नेतेमंडळी सुद्धा पब्लिकला समजावण्यापेक्षा आणखी पेटवतात.

अमेरिकेत असल्या बहुतेक प्रकारांना कोणी विचारत नाही. मग ते एखाद्या पिक्चर मधे लिंकनचे डोके उघडून त्यातून कुकीज काढू दे, किंवा एखाद्या सिरीज मधे जॉर्ज वॉशिंग्टन बद्दल "आपल्याकडे दंगल होउ शकेल अशा" शब्दांत टीका करू दे (इथे "tight" वर सर्च करा), किंवा कोणी कोणते माजी राष्ट्राध्यक्ष **बल होते यावर चर्चा करू दे. कोणाचे अपमान बिपमान होत नाहीत.

आणि कोणी दखल घेत नाहीत म्हंटले की आवर्जून कोणाचे अपमान कोणी करण्याच्या फंदात पडत नाही.

आम्ही अजूनही ट्रायबल म्हणजे टोळ्या टोळ्यांच्या अवस्थेत आहोत. एक मुखिया, सरदार किंवा ठाकूर ह्यांच्या शब्दावर अख्खी टोळी चालते. मुखियाला वश केलं की अख्खी टोळी आणि संपूर्ण clan वश झाला. गावकी, भावकी, खाप, इतर अनेक पंचायती, उचापती ह्यांनी आपली समाजव्यवस्था भरलेली किंवा किडलेली आहे.
हे बरं की वाईट हे सापेक्ष आहे. एक समूह घट्ट विणीचा असतो पण असे अनेक समूह एकत्रितपणे एक घट्ट विणीचे वस्त्र बनवू शकत नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्याचासुद्धा थोड्याफार प्रमाणात संकोच होतो.

अमेरिकेत असल्या बहुतेक प्रकारांना कोणी विचारत नाही. मग ते एखाद्या पिक्चर मधे लिंकनचे डोके उघडून त्यातून कुकीज काढू दे, किंवा एखाद्या सिरीज मधे जॉर्ज वॉशिंग्टन बद्दल "आपल्याकडे दंगल होउ शकेल अशा" शब्दांत टीका करू दे (इथे "tight" वर सर्च करा), किंवा कोणी कोणते माजी राष्ट्राध्यक्ष **बल होते यावर चर्चा करू दे. कोणाचे अपमान बिपमान होत नाहीत.

आणि कोणी दखल घेत नाहीत म्हंटले की आवर्जून कोणाचे अपमान कोणी करण्याच्या फंदात पडत नाही. >>>

अमेरिकेत गेलेले जे भारतीय पब्लिक आहे त्यांचा या समाजाच्या जडणीघडणीशी सुतरामही संबंध नाही. उलट ऑस्ट्रेलियातल्या एकाने लिहीलेली पोस्ट काही वर्षांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यात ऑस्ट्रेलियन्स मुलाखतकारच त्याला विचारत होते की भारतातले ब्राह्मण आमच्या पेक्षा हुषार असतात तर देशाची प्रगती का होत नाही ? त्यावर त्याने आरक्षणामुळे नोकर्या मि़ळत नाहीत. आमच्यावर अन्याय होतो म्हणून आम्हाला बाहेर यावे लागते असे म्हटले होते.

भारतात जी काही सामाजिक घुसळण झाली त्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सर्व शिकायला इंग्लंड अमेरिकेला आले होते. कारण भारतात उच्चशिक्षणाची व्यवस्थाच नव्हती. पण शिकल्यानंतर ते भारतात परतले. आपल्या जबाबदार्‍या उचलल्या. भारतात अमूक परिस्थिती आहे असे गळे काढत बसले नाहीत. या सर्वांना आपल्या त्या काळच्या शिक्षणाच्या जोरावर इंग्लंड अमेरिकेत स्थायिक होऊन भारतातल्या परिस्थितीवर कोरडे ओढण्याचा शॉर्टकट उपलब्ध नव्हता का ?

ज्यांना इथे राहून बदल घडवायचेत त्यांची काळजी आणि इथून सोडून जाऊन आयत्या बदललेल्या परिस्थितीचे दाखले देण्यातला फरक आपण कधी लक्षात घेणार ? ज्यांना भारतात परिस्थिती बदलावयची आहे त्यांची मते प्रामाणिक आहेत असे समजून एक प्रश्न विचारतो, इथे राहून तुम्ही ते कसे केले असते याचा व्यवहार्य रोड मॅप द्या.

परदेशात शिकून आलेल्या या नेत्यांनी परदेशातला उदार मतवाद इथे प्रमोट केलाच. शिवाय तसे कायदेही केले. नेहरू उदारमतवादी होते म्हणून संघासारख्या विषारी संघटना फोफावल्या. या संघटना दुही माजवत असताना नकली पुरोगामी माध्यमे या संघटनेवर खोटी टीका करून तिला नकारात्मक प्रसिद्धी देत होते. ते मुस्लिमांना सांगायचे की तुम्ही असे वागलात तर हिंदुत्ववाद्यांना आयतेच मुद्दे मिळतील. ते दलितांना सांगायचे की जास्त आग्रही राहू नका नाहीतर संघाचा फायदा होतो. पण संघाला त्यांनी हे धंदे करू नका हे सांगितले नाही. या त्यांच्या प्रचारात संघ आणि तत्सम संघटना हिंसा करणारच हे गृहीत धरलेले असायचे. ती तुम्ही करू नका नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय असे सांगितले जायचे. त्यामुळे दंगली घडत गेल्या. संघ मोठा होत गेला. हिंसेचे आकर्षण वाटेल अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या जायच्या. शिवसेनेला प्रसिद्धी दिली गेली.

आता वातावरण असे आहे की दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या विवेकवादी वाटेने कुणी जाणारच नाही. भारताचे इस्लामिक स्टेट चे भगवे वर्जन केले आहे.

<< त्यात ऑस्ट्रेलियन्स मुलाखतकारच त्याला विचारत होते की भारतातले ब्राह्मण आमच्या पेक्षा हुषार असतात तर देशाची प्रगती का होत नाही ? त्यावर त्याने आरक्षणामुळे नोकर्या मि़ळत नाहीत. आमच्यावर अन्याय होतो म्हणून आम्हाला बाहेर यावे लागते असे म्हटले होते. >>

------ जातीच्या आधारावर आरक्षण हे देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर सुरु झाले. हे आरक्षण नसतांना देश कुठे होता, किती प्रगत होता? विज्ञानातले किती शोध त्या प्रगत भारतात लागले? (रामन यांच्या सारखे तुरलक अपवाद असतील).

<< आता वातावरण असे आहे की दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या विवेकवादी वाटेने कुणी जाणारच नाही. भारताचे इस्लामिक स्टेट चे भगवे वर्जन केले आहे. >>
------ सहमत... धार्मिक कट्टरतावाद देशाचे भयानक नुकसान करत आहे.

अमेरिकेत असल्या बहुतेक प्रकारांना कोणी विचारत नाही>>>> तेथेच काय इतरत्र म्हणजे पाश्चात्य देशात नेत्यान्च्या झालेल्या अपमानाबद्दल किम्वा त्यान्च्या विधानन्ची जी टिन्गल केली जाते त्याबद्दल पण नेते किम्वा त्यान्चे चेले काही दखल घेत नाहीत. इन्ग्लन्ड्मधे तर चक्क राणीची पण टर उडवली जाते. तरी कोणाच्या विरुद्ध FIR काढला जात नाही वा पोलीस त्याची दखल घेत नाहीत. जसे काही महिन्यापूर्वी सोनिया गान्धीन्चे पूर्वाश्रमीचे नाव घेतल्याने पोलिसानी अर्णब गोस्वामीला पकडून तुरुन्गात टाकले होते. रिकामटेकड्याना काही उद्योग नसल्याने आपल्याकडे नेत्यान्चे अपमान वा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचा अपमान या कारणास्तव दन्गली होत असाव्यात. हे कधी सम्पेल की सम्पणारच नाही?

लंडन ओलिंपिकवेळी मिस्टर बीन चं एक नाटुकलं ठेवलं होतं. त्या नाटुकल्यात मिस्टर बीन महाराणी एलिझाबेथला आणायला हेलिकॉप्टरने बकिंगहम पॅलेसला जातो असं दाखवलं. महाराणीचा रोल करणारी अ‍ॅक्टर कोणीतरी इनोदी कॅटेगरी मधली होती. मिस्टर बीन महाराणीला पळवून हेलिकॉप्टरमधे बसवतो अन हेलिकॉप्तर लंडन ओलिंपिक च्या स्टेडियम कडे येऊ लागते असा सीन दाखवला जात होता. मिस्टर बीनच्या करामतीमुळे महाराणींसहीत ते दोघे हेलिकॉप्टर मधून उल्टा-पुल्टा होत थेट स्टेडियम मधे पडताना दाखवले गेले... अचानक लाईटचा फोकस त्या दोघांवरून पॅव्हेलियन मधे येऊन बसणार्‍या खर्‍या-खुर्‍या महाराणी एलिझाबेथ वर येऊन थांबला अन त्या स्किट मधल्या महाराणीने जो वेष अन केषभुषा केली होती तशीच वेषभुषा / केशभुषा खर्‍या महाराणीची होती हे बघून सगळीकडे एकच हास्यकल्लोळ उडाला.

आपल्या इथे असं धाडस कोणी करणार नाही. मोदीची नक्कल केली म्हणुन कालच विधानसभा सभागृह भाजप्यांनी कोकलून कोकलुन डोक्यावर घेतले अन त्यानंतर नक्कल करणार्‍या भास्कर जाधवांना सर्वांसमक्ष माफी मागावी लागली.

पंजाबात गुरुद्वारात sacrilege करण्याचा प्रयत्न करण्यावरून 2 जणांचं lynching करण्यात आलं. 2 dead.
Sacrilege- treating a religious object or place without the respect that it deserves
याआधी शेतकरी आंदोलनात असंच एका दलिताचं शिखांनी sacrilege च्या कारणावरून lynching करून ठार मारलं होतं.
एरवी lynching बद्दल आपल्याला फारच concern असल्याचं नाटक करणारे पुरोगामी आता एकदम चिडीचूप आहेत. काँग्रेस शासित राज्यात नॉन हिंदू समुदायाने हा प्रकार केला आहे. So the double standards are self explanatory.
काँग्रेसच्या पंजाबातल्या उपमुख्यमंत्र्याने sacrilege हा जन्मठेपेचा गुन्हा करावा अशी मागणी केली आहे. तर काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धूने sacrilege करणाऱ्यांना publicly hang करावं अशी मागणी केली आहे.
आणि लिबरल्स पावसात भिजून गारठलेल्या चिमण्यांसारखे चिडीचूप गप्प आहेत.
For liberals, insulting Islam is blasphemy, insulting Sikhism is sacrilege but insulting Hinduism is मुनव्वरचे जोक्स.

<< ज्यांना भारतात परिस्थिती बदलावयची आहे त्यांची मते प्रामाणिक आहेत असे समजून एक प्रश्न विचारतो, इथे राहून तुम्ही ते कसे केले असते याचा व्यवहार्य रोड मॅप द्या.>>
मला नाही वाटत जे परदेशी स्थायिक आहेत ते भारतातली परिस्थिती बदलू शकतील. ते स्वतःच्या सोयीसाठी परदेशी गेले. शिवाय ज्यांना खरोखर शिक्षणच जास्त महत्वाचे आहे ते इकडेच येतात कारण इथला दर्जा, सुविधा जास्त आहेत. त्यांना भारताची परिस्थिती सुधारण्याची इच्छा असती नि तसे करता येत असते तर ते तिथेच राहिले असते. आरक्षण हे कारण असेल,. पण तसे इथेहि वर्णद्वेष आहेच.
माझ्या मते परदेशी गेलेले वा न गेलेले यांच्यात काही फरक नाही. काही लोक केवळ तक्रारच करत बसतात. हे खरे की अमेरिकेचे रोजचे आयुष्य जरा जास्त सुखकर आहे, तक्रारीला जागा कमी. पण भारतात भारतातल्या पद्धतीप्रमाणे गोष्टी होतात. तसे आवडत नसेल तर भारतात जाउ नका, पण उगाच तक्रार कशाला? हजारोपटीने जास्त भारतीय आज सुखाने जगताहेतच ना?
मी आजकाल कायम सांगत असतो - परदेशी गेलेल्यांची संख्या फार थोडी आहे. त्यांच्यापेक्षा जास्त हुषार कर्तबगार लोक हजारपटीने अधिक भारतात आहेत. ते काय करतात तिकडे लक्ष द्या. परदेशी गेलेल्यांनी भारताबद्दल बोलू नये असे वाटत असेल तर भारतीय तरी कशाला परदेशी लोकांची उठाठेव करतात?

तेथेच काय इतरत्र म्हणजे पाश्चात्य देशात नेत्यान्च्या झालेल्या अपमानाबद्दल किम्वा त्यान्च्या विधानन्ची जी टिन्गल केली जाते त्याबद्दल पण नेते किम्वा त्यान्चे चेले काही दखल घेत नाहीत. इन्ग्लन्ड्मधे तर चक्क राणीची पण टर उडवली जाते. तरी कोणाच्या विरुद्ध FIR काढला जात नाही वा पोलीस त्याची दखल घेत नाहीत. >>> तुम्ही मागच्या पोस्टी वाचायची तसदी घेत नाहीत का हो ? इंग्लंडच्या राणीने एखाद्या प्रांताचा इतिहास बदललेला नाही. छत्रपतींनी मुघलांच्या/ आदिलशाहीच्या तावडीतून स्वराज्य उभे केले. आज मराठी माणसाच्या त्यामुळे कृतज्ञतेच्या भावना आहेत. ब्रिटीश कोणत्या गुलामगिरीत खितपत पडले होते ? पिंगाच्या वेळी पुण्यात कुणी दंगा केला गाण्यावरून ? त्यांच्या का भावना दुखावल्या ?

इंग्लंड अमेरोकेची उदाहरणे का देता असे मी मागच्या पानावर विचारले आहे. तुम्ही तो देश सुधारला आहे का ? तुम्ही जाण्याच्या आधी तिकडे सामाजिक वातावरण खराब होते आणि तुमच्यामुळे ते प्रगल्भ झाले का ? नसेल तर फुकटची त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. तुम्हाला देश सुधारण्याची आयती संधी आहे. तिकडे जाऊन तुम्ही हुषार झालात. इकडे या आणि देशात सुधारणा घडवा. उगीच पोटासाठी देश सोडून जायचं आणि आम्हाला भारतातलं वातावरण माहितीच नाही, आम्ही जन्मतःच वेगळे असला आव आणून पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे धंदे थांबवा. इंग्लंड अमेरिकेत काय होते हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. तिथे कसे छान चालते त्यासाठी आख्ख्या भारताने देश सोडून तिकडे स्थायिक झाले तर ?

जसे काही महिन्यापूर्वी सोनिया गान्धीन्चे पूर्वाश्रमीचे नाव घेतल्याने पोलिसानी अर्णब गोस्वामीला पकडून तुरुन्गात टाकले होते. रिकामटेकड्याना काही उद्योग नसल्याने आपल्याकडे नेत्यान्चे अपमान वा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचा अपमान या कारणास्तव दन्गली होत असाव्यात. हे कधी सम्पेल की सम्पणारच नाही? ही बातमी तुम्ही पूर्ण शुद्धीत असताना वाचलेली /ऐकलेली असेल असे समजून चालूयात. या समजुतीवर विचारतो, अर्णब गोस्वामीला अटक केल्याचे अधिकृत कारण इथे संदर्भासहीत देणार का ? संघाच्या लिंका नका देऊ.

रश्मी ठाकरे यांचा उल्लेख मराठी राबडी देवी केल्याने भाजप नेते जितेन गजारिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा फोटो ट्विट करून मराठीत राबडी देवी असा उल्लेख केला होता.

https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bjp...

A former BJP corporator from Navi Mumbai in neighbouring Thane district was arrested for allegedly making an objectionable remark against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Twitter, a police official said.
He identified the former corporator as Sandeep Mhatre and said the case was taken on the complaint of some Shiv Sena supporters. Mhatre is in police custody, he added.

https://www.mid-day.com/mumbai/mumbai-news/article/navi-mumbai-former-bj...

तथाकथित हिंदुत्ववादी किती मूर्ख आणी विघ्नसंतोषी असतात याचे अजून एक उदाहरण. मुनव्वर फारुकी बरोबरच नलिन यादव लाही अटक झाली होती. मुनव्वर च्या अटकेला निदान लंगडी का होईना सबब तरी होती, नलिन ला विनाकारण ५८ दिवस ( मुनव्वर पेक्षा १० दिवस जास्त) तुरुंगात काढावे लागले. आज मुनव्वर चे शो विविध शहरात सोल्ड आउट होत आहेत. बिचार्‍या नलिन ने गेल्या वर्षभरात एकही पैसा कमवलेला नाही.

हे इर्शाद चे प्रकरण सुरू करण्यार्‍या शेफाली वैद्य सुल्ली डील प्रकरणात ( कितव्यांदा तरी) तोंडावर पडल्या.

यती नरसिंगानंद यांनी मुस्लीम महिलंबाबत अगदी खालच्या पातळीवर उद्गार काढले. Par for the course. त्यांनी भाजप च्या महिला नेत्यांबद्दलही किळसवाणे उद्गार काढले होते पण दुभत्या गईच्या लाथा गोड या म्हणीप्रमाणे भाजपा च्या एकाही महिला नेत्याने जाब विचरला नाही.

Happy लक्षा इन रिक्षा मोड : स्ट्रॅपची गोष्ट वाचली वाट्टं...
नाव बदलावे लागले पण पुन्हा दर्जेदार कार्यक्रम लोकांना पहायला/ऐकायला मिळेल हे चांगलेच झाले.

काय करणार सर्वायवल साठी करावे लागते. इथे भारतात बघितलेत तर एका विशिष्ट राज्याचा अनुनय जोरात चालू आहे. फूड ब्लॉगर्स, शेफ,
कॉमिक्स, ट्रॅवल ब्लॉगर्स सर्व त्या जागांचे गुणगान करणे करून आपल्या टाइम लाइन वर सेफ स्पेसेस तयार करत आहेत. सांस्कृतिक स्पेसेस वर
आक्रमण चालु आहे. हळू हळू का होईना कल्चरल स्पेस बदलत आहे.

धार्मिक भावना दुखावण्याचा ज्वर मात्र उतरलेला नाही.
https://youtu.be/PQuE5Ss6Zc0
या जाहिरातीमुळे भावना दुखावल्यात.
----
या नावात कोणाला काही खटकलं नाही याचं मात्र नवल वाटलं
https://youtu.be/ld9NTyp2tec
_----+

या नावात कोणाला काही खटकलं नाही याचं मात्र नवल वाटलं >> मी वाचलं तेव्हाच मनात आलं होतं Happy नरोत्तम मिश्रांनी वचलं नसावं किंव त्यात आमिर/सैफ नाही म्हणुन सेफ असेल

नो बिंदी नो बिझनेस च्या बाबतीत शेफाली वैद्यांचा स्टॅन्ड समजण्यासारखा होता. त्यांनी "speaking for myself " असं म्हणून स्वतःची एक भूमिका मांडली की मला अशा प्रकारच्या जाहिराती आवडत नाहीत. जर एखादी कंपनी अशा जाहिराती करत असेल तर मी त्यांचे प्रॉडक्ट घेणार नाही. फॅब इंडिया च्या जाहिरातीत सुतकी चेहऱ्यांनी बसलेल्या, मलूल वातावरणातल्या, एकीनेही चुकूनही कुंकू लावलेले नाही अशा स्त्रिया बघून ही खरंच दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसातली जाहिरात अशी कशी असा प्रश्न पडला तर त्यात वावगे नाही. तरीही कंपन्यांना हव्या तशा जाहिराती करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांनी जाहिरातीत अगदी बुरखे घातलेल्या किंवा लिरिलच्या जाहिरातीसारख्या धबधब्यात आंघोळ करणाऱ्या बायका दाखवल्या तरी तो त्यांचा prerogative आहे. जाहिरात आवडली नाही तर त्याबद्दल नापसंती व्यक्त करण्याचे आणि प्रॉडक्ट विकत न घेण्याचे स्वातंत्र्य लोकांना सुद्धा आहे. अगदी एखादा म्हणाला की जाहिरातीत हिरवी पॅन्ट आणि चौकडीचा पिवळा शर्ट घातलेला बाप्या चकली खाताना दाखवला नाही तर मी ते प्रॉडक्ट घेणार नाही तर तो त्याचा prerogative आहे.
इर्शाद कार्यक्रमाच्या बाबतीत मात्र वैद्य बाई स्टंप आऊट झाल्या. तो कार्यक्रम काय आहे हे त्यांना माहित होते असे वाटत नाही. नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि विषय फार वाढवला नाही.
मला स्वतःला इर्शाद नाव चांगलं वाटलं पण कार्यक्रमाचे नाव बदलण्याबद्दलचा एक वेगळा मुद्दा: मी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला आहे. सुरुवातीलाच संदीप खरेने हे नाव काय आहे हे काही मिनिटे घेऊन सांगितले. तो म्हणाला की मुशायऱ्यांमध्ये कविता ऐकवताना, साधारणपणे "आता ऐकवा" अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. त्यांनी ह्याला मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला, पण चपखल शब्द नाही मिळाला. म्हणून मग तोच शब्द ठेवला.
कवितेतले दर्दी लोक, ज्यांना ह्या शब्दामागचा भाव माहित आहे त्यांच्या दृष्टीने हे छान नाव आहे. पण कार्यक्रमाचा व्यवसाय करायचा तर मोठ्या जनसमूहापर्यंत पोहोचावे लागते. उदाहरणार्थ एखाद्या हौसिंग सोसायटीत गणपतीला कार्यक्रम करायचा असेल, तर निर्णय घेणाऱ्या सेक्रेटरी वगैरे लोकांकडून खालीलप्रमाणे प्रश्न येणे सहज शक्य आहे:
"इर्शाद? म्हणजे काय ? मराठी आहे कि हिंदी?"
"गजलांचा कार्यक्रम आहे का? "
"कव्वाली का? "
"मुसलमानांमध्ये आत्म्याला शांती मिळावी म्हणून इर्शाद म्हणतात" [... शवपेटिकावाल्या मास्तरांचा नातू सोसायटीच्या कमिटीवर नसेलच असे पुराव्यानिशी शाबीत करता येत नाही]
"नाही, ते सगळ्यांना समजेल असं काहीतरी हवं आपल्याला"
अशा अनवट नावामुळे धंदा हातातून जाऊ शकतो. नवीन नाव साधं सोपं आहे आणि कार्यक्रम कशाबद्दल आहे हे सांगावं लागत नाही. तर हा सुद्धा एक फॅक्टर असू शकतो.
समजा एखाद्याला मच्छी खायला आणि खिलवायला अगदी मनापासून आवडतं. त्याने आपल्यासारख्याच खाण्यासाठी जगणाऱ्या लोकांसाठी लालबाग, परळ किंवा पार्ल्याला मालवणी रेस्टॉरंट काढलं आणि त्याला "Raison d'être" नाव द्यावंसं त्याला कितीही वाटत असलं तरी धंद्यासाठी गपगुमान "मालवण कट्टा" किंवा "कोकण दरबार" वगैरेच नाव देणं परवडतं.

>>> काय करणार सर्वायवल साठी करावे लागते.
खरं आहे. गेल्या वर्षीचा बाणेदार स्टान्स टिकला नाही याचं वाईट वाटलं मात्र.

अजबराव, नवीन कार्यक्रमाचं नाव ठरवताना हा सगळा विचार करावा, केला जातो हे खरं आहे, पण हा कार्यक्रम इर्शाद नावाने त्यापूर्वीही पाचेक वर्षं होत होता आणि माझ्या माहितीनुसार उत्तम चालला होता.

भरत, 'महालय'चा अर्थ काहीही असो, शब्द संस्कृतोद्भव आहे ना? मग झालं तर! Proud

आमिरचे ग्रह फिरलेच आहेत एकूण. काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे याला महत्त्व आलं आहे.

अशाने भारतात फक्त पौराणिक आणि (सोयीनुसार फेरफार केलेली) ऐतिहासिक हिंदूधर्मगौरवपर नाटकंसिनेमेच दाखवत आणि बघत राहातील बहुतेक यापुढे.
आणि फक्त धार्मिक साहित्य!

Pages