इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

की कुठल्या सोनार / शिंपी / वाणी / सुतार/ मराठा/ कुंभार / न्हावीच्या घरात संत ज्ञानेश्वर किंवा एकनाथ महाराज किंवा संत चोखामेळा यांचे फोटो वा प्रतिके दिसली का? >>> रश्मीताई . हा प्रश्न आवडला. बहुजन समा़जाच्या घरात यच्चयावत दैवते असतात. महापुरूषांच्या विचारांशी त्यांना घेणे देणे नसते. ते खूप मोठे होते इतकेच त्यांना माहिती असते. तुम्हाला महाराष्ट्राची वारी परंपरा माहिती नाही का ? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या पालख्यांसोबत बारा बलुतेदार समाज पंढरीच्या वारीला जात असतो. या शिवाय जे देव तुम्हाला माहिती नाहीत, जी दैवते (कोंबडं, बकरं मागणारी ) या सर्वांचे फोटो एका फळीवर लावलेले असायचे. आमच्या गावाकडच्या घराला एकच एक हॉल २२ फूट बाय १५ फुटाचा आहे. त्याच्या दोन्ही भिंतींवर सर्व दैवतं बसलेली आहेत. कोनाड्यात काळूबाई आहे. याशिवाय खोलीत काही उपदैवतं आहेत. अजून एक फोटो आहे ज्यात सोळा देवदेवता आहेत. हे आजोबांचे काम होते. जवळपास सर्वांच्याच घरी हीच परिस्थिती आहे.

जातीचा एकही माणूस कामाला येत नाही. पण जातीसाठी काहीतरी केलं पाहीजे असं लोक भेटले कि एकमेकांना म्हणतात. आम्हाला व्यवसाय धंद्यात इतर जातीच्या लोकांकडूनच काम करून घेणे सोयीचे गेले. भावकीतली मुलं ठेवली तर माज करतात. कष्टाची सवय नसते. करायला सांगितले तर आईवडीलांना सांगत जातात त्रास दिला. व्यवसाय धंदा करायचा त्याने जात बाजूला ठेवूनच वावरावे. जातीतली घुसमट मान्य असेल तर जातीत रहावे. जात ही निम्न आर्थिक वर्गातल्या लोकांना संरक्षण वाटते. पण सगळेच सारखे असल्याने जातीच्या आधारे कुणी प्रगती करू शकत नाही. अपवाद परराज्यातून आलेल्या जातींचा. त्याबद्दल नंतर कधीतरी. (पोस्टी लै मोठ्या होतात. मग वाचत नाहीत. न वाचता मग त्यावर पुन्हा प्रश्न येतात). Lol

शां मा, उतर व प्रतीसाद दोन्ही आवडले. मग मला पण हेच म्हणायचे आहे ना की फोटो लावला तरच प्रेम व्यक्त होते का? एकमेकाला सुख दु:खात साथ देऊन शेजारधर्म निभाऊन हे करता येते ना? ते मी व माझ्या आई वडलांनी, आमच्या शेजार्‍यांनी निश्चीत केलेय व करत आहोत.

बाकी गडबडीत आहे, सविस्तर नंतर लिहीते. मी गावाकडेच राहीलेय. पण माझे वरचे आधीच्या पोस्ट मधले उत्तर नवीन यांना उद्देशुन होते. वेळ मिळाला की नीट लिहीन. विकेंडला माझ्या हातात पिसी नसतो आणी मोबाईल वरुन मला लिहीता येत नाही.

ब्राह्मण खूप ठिकाणी चुकलेत. हो, मान्य आहे, म्हणून त्यांचे काम व मदत नाकारायची? कुठला न्याय आहे हा? बोलायला व लिहायला खूप आहे हो. >> वैनी, तुमच्या प्रतिसादात ब्राह्मण च्या ऐवजी मुसलमान हा शब्द घालून पुन्हा एकदा वाचून बघा बरं. तुम्हाला स्वतःला जो न्याय पाहीजे, तो मुसलमानांना नाकारताना कसं काय हे आठवत नाही ?

तुम्हाला स्वतःला जो न्याय पाहीजे, तो मुसलमानांना नाकारताना कसं काय हे आठवत नाही ?>> आता वैनींच यावर काय मत आहे हे वाचायला आवडेल.

मग मला पण हेच म्हणायचे आहे ना की फोटो लावला तरच प्रेम व्यक्त होते का? >>>> महापुरूषांना जातीत बंद केले अशी कोल्हेकुई कोण करतं ? या प्रश्नाला प्रतिप्रश्न म्हणून तुम्हाला विचारलं आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावला म्हणून अनाजी पंतुकड्यांना मारहाण झाली असे उदाहरण आहे का ? शिवजयंतीत अनाजी पंतुकड्यांच्या वंशजांनी सहभाग घेतला म्हणून कुणी हुसकावून लावले आहे का ? या प्रश्नाला फोटो लावला तरच प्रेम व्यक्त होते का हे उत्तर कसे होईल ? बायपास काढण्यात तुम्ही तर पीएचडीच केलीय वैनी.

जातीत बंद केले म्हणजे काय हे जरा समजावून सांगा. तुम्हाला कुणीच बंदी केलेली नसताना तुमच्या घरात छत्रपतींचा फोटो नाही, ना तुम्ही शिवजयंतीत सहभागी होता तरी पण महापुरूषांना जातीत बंद केले असे का विव्हळता ?
आता मुसलमानांच्या विरोधात छत्रपतींचा वापर करता येत नाही म्हणून असे विव्हळता का ? म्हणून पानसरेंना मारले का ?
शिवचरित्र मुसलमानांच्या विरोधातच असलं पाहीजे नाहीतर त्यांना जातीत बंद केले असा अर्थ काढायचा का ? हीच विकृती कुबेराची पण आहे. म्हणून त्याला बुक्का लावला. यात सर्व ४५ अंशवाल्यांनी एकत्र येऊन अरण्यरुदन सोहळा करायची काय गरज आहे ?

आता वैनी काय येणार नाहीत. खरा पुणेकर, स्वरुप, बिग बॉस येतील. रोज तीन आयडी तयार होत आहेत. ते राखीव पांडव आहेत. Lol

कीआता वैनी काय येणार नाहीत. खरा पुणेकर, स्वरुप, बिग बॉस येतील. रोज तीन आयडी तयार होत आहेत. ते राखीव पांडव आहेत. Lol

Submitted by नवीन निश्चेट on 18 December, 2021 - 12:41
वैनीचा पुढचा आयडी नवीन निपचित>>>>> बाळ नवीन, तुझी भाषा सेम डिजे सारखी आहे, मग तुच कशावरुन डिजेचा ड्यु आय नाही? म्हणू का मी असे? चालेल का? का हो डिजे, हा बाबाजी सेम तुमच्यावानी बोलतोय, तुम्हीच ते नाही कशावरुन. आणी हो इतकीच शंका असेल प्रशासकांना विचारा. एकदम फ्री मध्ये उत्तर आहे, पैसे पडणार नाहीत.

स्वरुप हा आय डी खूप जुना आहे. मी मायबोली सोडली २००४ साली, त्या नंतर मी स्वरुप यांना एकदा बघीतले होते पुणे की मुंबई बाफावर. त्यांना या वादातुन दूर ठेवा. खरा पुणेकर व बिग बॉस पण वेगळे. तुमच्यात बाई व बाप्ये एकत्र आय डी घेत असतील, आमच्यात नाही.

वैनीचा पुढचा आयडी नवीन निपचित
Submitted by BLACKCAT on 18 December, 2021 - 12:45>>>> काळी माऊ, तुमचे अवतार किती धारातिर्थी पडले हो? जामोप्या, कु कमला सोनटक्के, नर्मदा बारटक्के, लबाड कोल्हा, धीरज काटकर आता कामा, अजून बरेच आहेत हो. आता हा गेला की काळा बोका असा आय घ्या.

नवीन बाळा, मी बाई आहे. माझ्या मागे शंभर कामे आहेत. एक दिवस नाही लिहीले तर लगेच रडु नका. तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेल. तू जर डिजे यांचा आय डी नसशील तर पेशन्स ठेव. मी उत्तर देईन.

का हो डिजे, हा बाबाजी सेम तुमच्यावानी बोलतोय, तुम्हीच ते नाही कशावरुन>> अहो वैनी, मला आहे तोच आयडी चालवायला वेळ मिळत नाही. ड्यू कशाला काढू..? बादवे, गेली अनेक वर्ष मी अनाजी पंतूकड्या विखारी विचारधारेला खस्सकन ओढून बाहेर काढल्यामुळे बऱ्याच जणांना / जणींना अशा विखारी मनोवृत्तीला कसे ठेचायचे याचे बाळकडू मिळाले आहे हे जाणवत आहे. त्यामुळे इतर आयडींची भाषा माझ्या प्रमाणे वाटत असावी. या उपर काय बोलावे..!!

इथे गेल्या एक दोन दिवसांत जे लिहीले गेले आहे, त्यातले माझ्या मतांबद्दल किती आहे ते वेचून काढून प्रतिवाद करण्यात इंटरेस्ट नाही. थोडेफारतरी माझ्या पोस्ट्स बद्दल असावे, तेव्हा या विषयावर अफगाणिस्तानच्या धाग्यावर लिहीलेली माझी पोस्ट इथे तीच पुन्हा लिहीतो, कारण माझे मत तेव्हाही तेच होते आणि आत्ताही. माबोवर जेव्हा अशा विषयांवर चर्चा झालेली आहे तेव्हा प्रत्येक वेळेस माझी मते कन्सिस्टंट आहेत. सगळे धागे पब्लिक आहेत. कोणालाही सहज बघता येतील, तितकी तसदी घेण्यात इण्टरेस्ट असेल तर. मुळात ही पोस्ट सुद्धा माझ्या मतांमधे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्याकरताच आहे.

ही ती पोस्ट. कंसातील वाक्यही तेव्हाचेच आहे.
तालिबानचा विरोध करणार्‍या किती जणांना भारत सेक्युलर राहावा, भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे हे मान्य आहे? त्यांनाच तालिबानला विरोध करायचा नैतिक अधिकार आहे. मथुरेतील मांस विक्री वर बंदी, गोहत्याबंदी रँडम लोकांनी राबवणे, एखादा मुस्लिम अगदी गाय कापून नेताना दिसला तरी त्यांच्या मारहाणीचे समर्थन न करणे, सावरकर, शिवाजी महाराज, धार्मिक बाबी/सण/श्रद्धास्थाने, ब्राह्मण, मराठा, बहुजन, राजपूत ईं ना सन्माननीय असलेले नेते यांचे उल्लेख असलेले स्टॅण्ड अप कॉमेडी वाल्यांचे विनोद, त्यापुढेही जाउन त्यांच्यावरही केलेले विनोद - याबद्दल तोडफोड, मारहाण करणे, भांडारकर मधली तोडफोड - अशा असंख्य घटनांबद्दल ज्यांची मते ठामपणे विचारस्वातंत्र्याच्या, आहारस्वातंत्र्याच्या व कायदा कोणीही हातात न घेण्याच्या बाजूला आहेत त्यांनाच तो नैतिक अधिकार आहे. (विचारस्वातंत्र्याच्या मर्यादा मला माहीत आहेत. त्या कोणी शिकवण्याची गरज नाही. पण त्या व्यक्तिनिहाय, धर्म/जातनिहाय बदलत नाहीत हे नक्की).

इथे गेल्या एक दोन दिवसांत जे लिहीले गेले आहे, त्यातले माझ्या मतांबद्दल किती आहे >>> गेल्या दोन दिवसात म्हणजे मी का ? तुमच्याच मतांबद्दल का लिहावे ? आम्हाला आमची स्वतःची मतं नाहीत का ?

तालिबानचा विरोध करणार्‍या किती जणांना भारत सेक्युलर राहावा, भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे हे मान्य आहे? त्यांनाच तालिबानला विरोध करायचा नैतिक अधिकार आहे. >>> भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे यावर विश्वास नसणारे जज्जेस आहेत. मनूचा पुतळा न्यायालयात बसवणारे आहेत. त्यांनी तालिबान्यांच्याआ विरोधात निर्णय दिले तर नैतिक अनैतिक बघणार कि त्यांचा अधिकार महत्वाचा ? मनूचा पुतळा बसवला तरी त्यांना मनूच्या राज्यघटनेप्रमाणे निकाल देता येत नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरी. तुम्हाला काय निकाल द्यायचा तो राज्यघटना मान्य असो वा नसो, त्याप्रमाणेच द्यावा लागतो.

मथुरेतील मांस विक्री वर बंदी, गोहत्याबंदी रँडम लोकांनी राबवणे, एखादा मुस्लिम अगदी गाय कापून नेताना दिसला तरी त्यांच्या मारहाणीचे समर्थन न करणे, सावरकर, शिवाजी महाराज, धार्मिक बाबी/सण/श्रद्धास्थाने, ब्राह्मण, मराठा, बहुजन, राजपूत ईं ना सन्माननीय असलेले नेते यांचे उल्लेख असलेले स्टॅण्ड अप कॉमेडी वाल्यांचे विनोद, त्यापुढेही जाउन त्यांच्यावरही केलेले विनोद - याबद्दल तोडफोड, मारहाण करणे, भांडारकर मधली तोडफोड - अशा असंख्य घटनांबद्दल ज्यांची मते ठामपणे विचारस्वातंत्र्याच्या, आहारस्वातंत्र्याच्या व कायदा कोणीही हातात न घेण्याच्या बाजूला आहेत त्यांनाच तो नैतिक अधिकार आहे. >>>> या सर्वांचा इथे काय संबंध आहे ? ठीक आहे ही मतं आहेत. माझे पण हेच मत आहे. पुढे ?
उद्याच तुम्ही देवदेवतांची /महापुरूषांची टर उडवणारा करणारा धागा मायबोली वर काढा. फक्त भारतात येऊन काढा. काय होते ते समजेल. त्यातून आपण धडा घेऊयात.

त्या भिडेंना पण त्रास झाला होता. जशी काळी बाजू मांडता तशी दुसरी प्रकाशाची पण मांडा की. >>> वैनी, तुमचे हे म्हणणे त्या कोल्हेकुईच्या धाग्यावर का मांडले नाही. तिथे अमूक एक केले मग हे का नाही हे मांडायचे आहे. तुमचे म्हणणे त्याच कॅटेगरीतले आहे. आणि तुम्हाला दुसरी बाजू मांडायचा सोसच असेल तर कोल्हेकुईचा धागा हा एखाद्या गुन्हेगाराने आपला गुन्हा उघडकीला यायला लागला कि केलेला कांङावा म्हणावा का ?

तुम्ही शाईफेक शाईफेक करत आहात. पण कुबेराने काय केले हे बोलत नाहीत. कुबेराच्या हलकटपणावर, विकृतपणावर बोलले तर शाईफेक सौम्य वाटेल ही भीती का वाटते ? त्याची ही पहिली वेळ पण नाही. हिंदुत्ववाद्यांनी कल्ला केल्यावर अग्रलेख मागे घेतो तो. ब्राह्मण शिवाजीचे मावले नाहीत का ? त्यांना संभाजी फक्त औरंग्याच्या विरोधातच प्रिय आहे का ? कुबेराने केलेल्या विकृतपणावर पण बोलावे की. लोक आपोआप भिडेंना त्रास झाला हे बोलती.

अनाजी पंतुकडेंचे वारस गेली कित्येक शतके, दशके अशी सोयीची ढोलकी वाजवत आहेत. हे लक्षात आल्याने आता लोक तेव्हां तुम्ही का नाही बोलले हे व्चारू लागले आहेत. याला सारासार विचार म्हणतात. मुसलमान विरोधी भावना भडकवायला तुम्हाला शिवाजी महाराज , संभाजी महाराज पाहीजेत फक्त. हे लक्षात आले आहे. हे अनाजी पंतुकड्यांना कळाल्यामुळे आता ते व्हॉट अबाऊटरीचं लेबलिंग करून कोल्हेकुई करताहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कर्नाटकात शाईफेक झाली. या बातम्या लोकसत्ता छापते. कर्नाटकात भाजप म्हणजे संघोट्यांचे सरकार आहे. आणि सगळे अनाजी पंतुकडे आता शाईफेक म्हणून कोकलत नाहीत. याचा एकमेकांशी संबंध लागत नाही का ?

उद्या पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाल, तुम्ही गुन्हेगारांना असे का विचारता, तू त्या वेळी तसे केले होतेस मग आत्ता गप कसा काय ? पोलीस एक तर मस्तपैकी सत्कार करतील नाहीतर ठाण्याला पाठवतील. कुठं पण व्हॉट अबाऊटरीचं गाणं आळवता ? गुन्हेगाराचा एक पॅटर्न असतो. म्हणून असा प्रश्न विचारतात.

लोकसत्ता मधे आलेली बातमी
https://www.loksatta.com/desh-videsh/man-beaten-to-death-amritsar-golden...

अमृतसर येथील सुवर्णमंदीरात रेलिंगवरून उडी मारून गुरू गोविंदसिंग यांच्या आसनासमोरील हात लावून ती अपवित्र केल्याबद्दल तरूणाची जमावाकडून मारहाण करत हत्या. या तरूणाला तलवारीला हात लावायचे स्वातंत्र्य आहे का ? इथल्या अभिव्यक्ती वाल्या एक्सपर्ट्सने सांगावे.
असेल तरी ते कुठे वापरावे याचा सेन्स सोडावा का ?
कशाचा परिणाम काय होतो हे भारतातूनच अमेरिकेत गेलेल्यांना माहीत नसते का ? जन्माने अमेरिकन पण थोडा काळ भारतात येऊन गेलेल्यांना ज्या गोष्टी ठाऊक असतात त्या इथूनच तिकडे गेलेल्यांना माहिती नाहीत असा आव का आणला जातो ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शाई फेकून विटंबना करण्याचा पहिलाच प्रसंग परवा घडला आहे. गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकीच्या प्रसंगानंतर लगेचच हा प्रसंग घडला. नेमकी शाईच का ? महाराजांनी कुबेरांची बदनामी केली होती का ? कि अनाजी पंतुकड्यांना कोकणातून आणून स्वराज्यात मानाची पदे दिली म्हणून रागातून शाईफेक झाली ?
या शाईफेकीचा निषेध होत नाही म्हणजे तसं करावंस वाटत नाही. महाराजांशी वेव्हलेंग्थ जुळलेल्या नसतील. कुबेरांशी जुळलेल्या असतील.

वर एकाने लिहीले आहे कि समजा कुबेरांनी चुकीचे लिहीले, समजा त्यांनी बदनामी केली तरी शाईफेक समर्थन होऊ शकत नाही.

आता हेच कुबेर संपादक असलेले लोकसत्ता काय बातम्या छापते ? वाचा.
लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं
https://www.loksatta.com/trending/viral-the-bridegroom-was-beaten-before...

शीर्षकातच म्हटलेय कि कारण जाणून तुम्हीही म्हणाल बरोबर केलं. म्हणजे चुकीचे केले तर धुलाई केली याचे समर्थन हे वृत्तपत्र करते. संपादकाला हे माहिती नसेल कि भांग पिऊन कामकाज बघत असतील ? मारहाण समर्थनीय पण बदनामी केली म्हणून शाईफेक समर्थनीय नाही.
अनाजी पंत्युकड्यांची ही न्यायाची भाषा आम्हाला कळत नाही. समजावून सांगा.

कुबेराच्या तोंडावर बुक्का फेकला म्हणून कोकलणारे इथले अनाजीपंत पणतू आता छत्रपतींच्या पुतळ्यावर शाईफेक झाली तरी तोंडात मिठाची गुळणी धरून शांत बसले यातच सर्व काही आले.

अमेरिकेत सुद्धा बदनामीमुळे कोर्टात केसेस दाखल होतात. बदनामीचे कायदे आणि फ्रीडम ऑफ स्पीच यात बदनामीच्या कायद्यांना प्राधान्य मिळते.
https://www.alllaw.com/articles/nolo/civil-litigation/defamation-charact...

जगात सर्वात जास्त केसेस या गुन्हेगारी स्वरूपाच्या बदनामीबद्दल दाखल झाल्या आहेत.
https://www.theguardian.com/commentisfree/libertycentral/2009/dec/08/glo...

फक्त भारतात असे होते म्हणून भारत मागासलेल्या विचारांचा आहे असे काहीही नाही. जगात कुठेच बदनामी सहन करून घेतली जात नाही. बदनामीच्या विरोधात दाद मागणे सहज शक्य आहे. अमेरिकेत सर्वात जास्त रकमेचे दावे दाखल होतात कारण ते निकाली निघण्याचा वेग जास्त आहे आणि प्रक्रिया सुटसुटीत आहे. याउलट भारतात बदनामीच्या केसेस मधे निकालांचा वेह समाधानकारक नाही. मोठ्या रकमेचे दावे निकाली निघत नाहीत.

मला पण खूप वाटतं हो, आपल्याकडे पैसे नाहीत. मला घटनेने आचार, विचार आणि संचाराचे स्वातंत्र्य दिले आहे तर अँटिलिया मधे जाऊन रहावे. अंबानीच्या कारमधून फिरावे. कॅटरिना कैफबरोबर रहावे. कुठल्याही वस्तीत जाऊन भिंतीवर काहीही लिहावे. वाटेल ते पिवळ्या पानांचे पुस्तक छापावे. त्यात मनाला येईल तो मजकूर छापावा. वर्तमानपत्र काढावे. त्यात ऐकिवात असलेली सर्व लफडी छापावीत. धमाल उडवून द्यावी. माझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना या जास्त व्यापक आणि सर्वांच्या कल्पनेपलिकडच्या आहेत.

मला हा समाज माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्य घेऊ देईल काय ? माझ्या या अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी मायबोलीकर माझ्या बाजूने उभे राहतील काय ? हा एकच प्रश्न आहे. तू बी आणि मी बी .....

ही वलची कमेन्त आहे ना, हा माजा वलिजनल मोड. पन नाई का, मला वातलं कि भालि भालि लोक इतं सिरीयसली लिवतात तल आपन नलो आपला मोड ऑन कलायला. नाहितल आयडी राहिल जाईल काय सान्गता एत नाय. म्हनुन सिरीयस मोद मधे लिवलं व्हतं. पन असं वात्तंय कि आपल्यच पिच मधे गानं गावं मानसानं. एतो हं. वदे तलायला जायचंय.

Pages