इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शवपेटिकावाल्या मास्तरांचा नातू सोसायटीच्या कमिटीवर नसेलच असे पुराव्यानिशी शाबीत करता येत नाही >>> Lol हे भारी आहे. एकूण पोस्टशीही सहमत.

अजबराव, नाही पटले. तुम्ही झुंडशाहीचे समर्थन करत अहात, आपण (आपला समाज) रिसिव्हिंग एंड ला नाही म्हणून.
'नो बिंदी नो बिझिनेस' सारखे वाक्य कोण म्हणते, त्या व्यक्ती चे उपद्रवमूल्य, एको सिस्टीम या सर्वाचाच विचार व्हावा. एखाद्या निरुपद्रवी व्यक्तीने असे काही म्हणले तर ते निदान पटण्यासारखे आहे. पण शेफाली वैद्य सारख्या व्यक्ती जेव्हा म्हणतात तेव्हा लोकांना काय समजायचे ते समजते. याला डॉग व्हिसल म्हणतात. त्यांच्या एका ट्वीट वर घाबरून कार्यक्रमाचे नाव बदलले गेले यातच काय ते आले. गल्लीतल्या नामचीन गुंडाने एखाद्या दुकानदाराला अगदी सौम्य शब्दात स्मित हास्य करत सांगितले 'तुम्ही गणपतीची वर्गणी दिली नाही तर आम्ही तुमच्याकडे खरेदी करणार नाही' , 'नो वर्गणी नो बिझिनेस' तर दुकानदार काय ते समजून घेइल.

नो बिंदी नो बिझनेस च्या बाबतीत शेफाली वैद्यांचा स्टॅन्ड समजण्यासारखा होता. त्यांनी "speaking for myself " असं म्हणून स्वतःची एक भूमिका मांडली की मला अशा प्रकारच्या जाहिराती आवडत नाहीत. >> हा स्टॅंड एवढा बाणेदार आणि स्वांतसुखाय असता तर फॅब ईंडियाचा अ‍ॅड मॅनेजर मुस्लीमच आहे, मॉडेलने हिरवाच रंग घातला आहे वगैरे कूजबूज मोहीम राबवण्याची ऊठाठेव करावी लागली नसती.

तुम्ही झुंडशाहीचे समर्थन करत अहात, आपण (आपला समाज) रिसिव्हिंग एंड ला नाही म्हणून. >>> विकु, This comment represents everything that's wrong about social comments from people who consider themselves liberals. नक्की कोठे समर्थन आहे झुंडशाहीचे? आणि पुढचे वाक्य तर अगदीच अननेसेसरी आणि जजमेंटल.

नो बिंदी मोहिमेचे (दुसरा सुचला नाही म्हणून जड शब्द) "प्रभावक्षेत्र" व न्यूसन्स व्हॅल्यू नक्की किती होती ते मला लक्षात नाही. त्यांनी याबाबतीत झुंडशाही केली असेल तर मी कधीच समर्थन करणार नाही. इर्शाद च्या बाबतीत माझा विरोधच होता. पण नो बिंदी च्या वेळी त्या कंपन्या या सगळ्या मोहिमेच्या मानाने बलाढ्य होत्या आणि त्यांना याने काही फरक पडला नसता असे मत झाल्याचे लक्षात आहे.

माझे स्वतःचे मत. त्या बिनबिंदीच्या अ‍ॅड मला भिकार वाटतात. त्या मला "दिवाळीच्या" जाहिराती वाटत नाहीत. ख्रिसमसचा एखादा मेजर मोटिफ वगळून ख्रिसमसची जाहिरात केल्यासारखे आहे ते. इतरांचे मत वेगळे असेल. त्याचा आदर वगैरे सगळे फाइन प्रिन्ट लागू.

इर्शादच्या वेळी ज्या लिबरलांनी खरेंना जोरदार सपोर्ट केला त्यांनी साहित्य संमेलनात खरे ट्रोल होऊ लागले तेव्हा एकतर तोंड बंद ठेवलं किंवा खरेंनी कार्यक्रमाची जुळवाजुळव करताना सहकलाकारांच्या टॅलेंटऐवजी जात, आडनाव, प्रतिनिधित्व हा प्रथम निकष ठेवावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.
खरेंच्याही लक्षात आलं असावं की शेवटी आपण आणि आपले सहकलाकार म्हणजे लिबरलांच्या दृष्टीने फक्त खरे, जोशी, कुलकर्णी अशी आडनावं. आपल्या कलेशी त्यांना काही देणंघेणं नाही. They will throw us under the bus without a moments hesitation.
I am sure वर्षभरात 'इर्शाद' ला मुस्लिम ब्रिगेडी पुरोगामी बांधवांनी एकही बुकिंग केलं नसेल.

इर्शादच्या वेळी ज्या लिबरलांनी खरेंना जोरदार सपोर्ट केला त्यांनी साहित्य संमेलनात खरे ट्रोल होऊ लागले तेव्हा एकतर तोंड बंद ठेवलं किंवा खरेंनी कार्यक्रमाची जुळवाजुळव करताना सहकलाकारांच्या टॅलेंटऐवजी जात, आडनाव, प्रतिनिधित्व हा प्रथम निकष ठेवावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. >>> हे कोण लिबरल्स माहीत नाही (खरे म्हणजे माहीत आहे Happy ) पण मी दोन्ही वेळेस विरोध केला होता Happy माबोवर आहेत पोस्ट्स.

त्या बिनबिंदीच्या अ‍ॅड मला भिकार वाटतात. त्या मला "दिवाळीच्या" जाहिराती वाटत नाहीत. ख्रिसमसचा एखादा मेजर मोटिफ वगळून ख्रिसमसची जाहिरात केल्यासारखे आहे ते. >>> +१००
त्या सगळ्या अ‍ॅड भन्गारच होत्या मुद्दामुन खोडी काढल्यासारखे भिकार रन्ग्,सुतकी चेहरे करुन मर्तिकाला निघाल्यासारख्या मॉडेल्स एकुणातच कालच परग्रहावरुन लॅन्ड झाल्याने दिवाळी म्हणजे काय तेच माहित नाहिये तरी जॉब असाइनमेन्ट आहे तर करतो अस काहितरी.

AU Small.Finance च्या जाहिरातीमध्ये खटकणारी बाब काय आहे? सुतकी चेहरे नाहीत, कपाळावर बिंदी पण आहे

) पण मी दोन्ही वेळेस विरोध केला होता Happy//

हाहा येस तुम्हाला उद्देशून नव्हतं. त्या लिबरलांना पण माहित आहे ते कोण आहेत ते.
वास्तविक कॅन्सल कल्चर हे लिबरलांचं खास राखीव कुरण. तिथे फक्त आपल्यालाच चरता यावं, इतरांना मज्जाव असावा इतकाच त्यांचा साधा हट्ट आहे. काश्मीर फाईल्स स्वतः न बघता चित्रपट खूप वाईट आहे ,कोणी बघू नये अशा पोस्ट्स लिहिणे - याचेही exhibit माबोवर आहेत.

कार्यक्रम जसा चालला असेल तसा असेल. कार्यक्रमातच खरे साहेब म्हणाले की कविता हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय करायचा विचार जर कोणी करत असेल तर नीट विचार करा.ते इतके सोपे नाही. कार्यक्रमाचं नाव अधिक सोपं आणि अर्थवाही केलं तर अधिक चांगला चालू शकेल म्हणून बदलणं हे सुद्धा सेन्सिबल आहे. धंद्यासाठी नव्या बाटलीत जुनी दारू विकणे हा प्रकार कॉमन आहे. काही लोकांनी गदारोळ केला हे बाजूला ठेवलं तर नाव बदलायची इतरही व्यावसायिक कारणं असू शकतात हा मुद्दा होता.

मध्यंतरी एका कमेडीअनचा (मला वाटतं केनी सबॅश्चिअन) व्हिडिओ बघितलेला. मला तो आणि त्याचे जोक्स आवडतात. तर त्यात तो भारतातील सद्य परिस्थिती/ पॉलिटिक्स/ इ. इ. वर फार बोलत नाही या आरोपाला उत्तर देत होता. त्याने स्पष्ट सांगितले मला माझा आणि माझ्या कुटुंबाचा जीव प्यारा आहे. रोज उठून धमक्या खाऊन त्या सावटात मला जगायचं नाही. त्यामुळे मी ते करत नाही.
इथेही नाव न बदलता बाणेदारपणा त्यांनी दाखवून बघितलं. पण किती वेळ? त्याला ही सीमा असतेच. परिस्थिती बदलत नसेल तर त्यातुन मार्ग काढणे वि. मोडेन पण वाकणार नाही असला बाणा यात वाकणार नाही माझ्या लेखी फक्त प्रिव्हलेज्ड (किंवा मूर्ख) करू शकतात. ते कोणी करू ही नये. सर्वायवल सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते परिस्थिती नुसार बदलणार्‍यांचंच होतं.
मला संदिप आणि वैभव बद्द्ल आदरच वाटतो. त्यांनी त्यांची लिमिट्स ट्राय केली आणि बदल केला. तुटेपर्यंत ताणू नये हे एकाच बाजूने किती काळ करायचं? काळ सोकावतो खरं आहे, पण तो सोकावणारच आहे. कडेलोट होणार असेल तर तो झालेलाच बरा. त्याशिवाय कोणी शिकेल ह्यावर माझा शून्य विश्वास आहे.
हुतात्म्यांबद्दल मला अजिबात प्रेम नाही. आदर मात्र जरुर आहे. पण लांबूनच. तसलं वागण्यात तुम्हाला आनंद मिळणार असेल तरच करा. पण पुन्हा विचार करा.

AU Small.Finance च्या जाहिरातीमध्ये खटकणारी बाब काय आहे? सुतकी चेहरे नाहीत, कपाळावर बिंदी पण आहे>>> काहिही नाही, मला आवडली जाहिरात( आमिर कियाराचा सन्तुर डॅडी वाटतो एवढच खटकल)

अमित - हसन मिन्हाजच्या नवीन शो मधे त्याने हा डायलेमा फार मस्त सांगितला आहे. नेफिवर आहे. एकच शो आहे. सिरीज नाही. बाकी शो नेहमीप्रमाणे मजेदार आहेच.

संतुर बाप लोल. एकदम चपखल.

अमितव +१.
त्या दोघांबद्दल राग नाही. आपणही हेच केले असते, शेवटी संसार असतो, घराचे हप्ते असतात, कार चे हप्ते असतात.
पण शेफाली सारख्या व्यक्तींना फ्री पास देणे चुकिचे आहे.

या बिनबिंदीच्या अ‍ॅड मला भिकार वाटतात. त्या मला "दिवाळीच्या" जाहिराती वाटत नाहीत
>>>
अरे मग त्या तुमच्यासाठी नाहीत अणि तुम्ही त्यांचे ग्राहक नाही आहात इतका साधा हिशेब आहे की नाही?
(फा, मला आता तुझीच पोस्ट जवळ दिसली म्हणून हे वाक्य पेस्ट केलं. बाकी अनेकांनी जवळजवळ अशा अर्थाचं लिहिलं आहे, त्यांनाही टॅग केलं, असं समजा).

हे लोक ब्रँडिंग आणि मार्केट रिसर्च साठी प्रचंड खर्च करतात. टेस्ट कँपेन्स, आल्टरनेटिव्ह कँपेन्स त्यांच्या तयार असतात. सोशल मेडियावर तर जास्तीत जास्त रिझल्ट देणारी कँपेन ही कंटेंट दुर्लक्षून आणि डोळे झाकून निवडली जाते.

नो बिंदी ची हाकाटी केल्यावर जाहिराती मागे घेतल्या म्हणून ज्यांनी जल्लोष केला, त्यांना हसावं की रडावं कळत नाही. लहान मूल रडून गोंधळ घालू लागल्यावर चॉकलेट दिल्यागत आहे हे. एक मागे घेऊन दुसरी कँपेन केली म्हणून धंदा वाढला असेल तर खुषच असतील ते. वरून बनिया नम्रपणा दाखवतीलच. आपणही खुष.

भांडवलशाही, नफेखोरी आणि आर्थिक महत्त्वाकांक्षा यांच्याशी परंपरा, संस्कृती आणि अस्मितेची लढाई म्हणजे फारच विषम आणि दयनीय लढाई आहे. साबण, कपडे आणि दागिने तुम्हाला विकणं सोडाच, पण तुमच्या देशातल्या विधानसभा आणि संसद पडद्याआडून जवळजवळ हेच लोक चालवतात हे विसरू नये म्हणजे झालं.

ही लढाई तुल्यबळ होण्यासाठी आपल्या परंपरा, संस्कृती, अस्मिता इ.ची नाळ आपल्या समाजमनाशी आणि आपल्या एकुणच सामाजिक वावराशी फार घट्ट आणि खोलवर जुळली गेलेली असावी लागते. आपली तशी ती नाही, हे स्वीकारायला हरकत नाही.

(या विषयावर भरपूर रवंथ इथं झालं आहे, आणि ते सगळं वाचलंही आहे. आता सहजच म्हणा किंवा बोलावंसं वाटलं म्हणून इथं लिहिलं. असो.)

अमितव, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण हा दबाव दोन्ही बाजूंनी आहे. उजवे विचार मांडणाऱ्या कलाकारांना भरपूर किंमत द्यावीच लागते आणि ते देतातही. अगदी लता मंगेशकर गेल्यावर त्यांना श्रद्धांजली देण्याऐवजी ब्रिगेडी-लिबरल-मविआ वाले गरळ ओकत होते कारण लताबाईंचे उजवे विचार. केतकी चितळे प्रकरण या इर्शाद इश्यूनंतर झालं ना. सत्ता आल्यावर लिबरल्स काय पातळीवर जातात ते दिसलं. त्या मानाने 'आम्ही नै तुमच्या दुकानात येणार' हे फारच सौम्य. जे के रोलिंग जी एकेकाळी लिबरल्सची लाडकी होती तिला फक्त ट्रान्स लॉबीसमोर मान तुकवली नाही म्हणून कॅन्सल करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
एरव्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून outrage होणारे लिबरल्स रश्दीवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत असे गप्प होते किंवा जपून जपून संयत प्रतिक्रिया देत होते जणू काही एक शब्द कडक बोलला तर लगेच टेररिस्ट यांच्या घरी सर तन से जूदा करायला येणार होते.

अच्छा. पु ना ओकांनी ताज महाल हा मुळात तेजो महालय आहे असं काहीतरी आधीच सांगितलं असल्यामुळे लोकांना ह्या महालयवर आक्षेप घ्यायला पंचाईत झाली असावी. Wink

अरे मग त्या तुमच्यासाठी नाहीत अणि तुम्ही त्यांचे ग्राहक नाही आहात इतका साधा हिशेब आहे की नाही? >>> असू शकेल. त्यांचा टार्गेट ऑडियन्स वेगळा असेल. मी प्रत्येक फाइन प्रिन्ट लिहीत बसलो नाही Happy

पण असेही होऊ शकते की मार्केटिंग वाले काही ग्राहकवर्ग गृहीत धरत आहेत, किंवा ते सेगमेण्ट तितके महत्त्वाचे नाही म्हणून दुर्लक्षित करत आहेत. अनेक जाहिरांतीमधले दरिद्री मराठी वाचले की हे जाणवते. अशा वेळेस त्या वर्गाने आपली नापसंती दाखवणेही साहजिक आहे.

इथे या एकाच अ‍ॅक्शनच्या विरोधात एकाच वेळी झुंडशाही म्हणून आउटरेज ही एक प्रतिक्रिया आहे, आणि एनीवे ते तुम्हाला विचारत नाहीत ही तु.क. वाली दुसरी Happy

ग्राहकवर्ग गृहीत धरत आहेत
>>>
एक्झॅ़टली. का गृहित धरत आहेत त्याचाही अंदाज लिहिला मी वरती.

दरिद्री मराठी
>>>
एक्झॅक्टली अगेन. नो-बिंदी सारखी कँपेन यासाठी आधी कधी झाली आहे का? किंवा आता कुणी एकत्र येऊन करायला तयार आहे का?

याबद्दल खूप बोलायचं आहे. पण जाहीर प्रतिवाद करायची सवय राहिली नाही. आता इथं करू शकेन असंही वाटत नाही. तरीही वाटलं तर जरूर लिहिन..

>>> तेजो महालय
तेजोमेघालय ना? की मला चुकीचं आठवतंय?

साजिरा, लॉन्ग टाइम! Happy
लिही नक्की!

Pages