इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज वाचले प्रतिसाद... किती छान लिहिता तुम्ही सगळेच... मराठी निबंधात मस्त गुण मिळाले असतील तुम्हा सर्वाना...

बाग मे खिलेंगा एक गुलाब
पिलाते पिलाते दो ग्लास ***

ईर्शाद ! ईर्शाद !!ईर्शाद !!!

कवी - धर्मेंद्र खोटे / केश्तो कुलकर्णी
चुपके चुपके बोलू काही

मामी..... जबरदस्त व्हिडीओ!!
अरे कॉपी करुन पण पास होता येईना यांना Wink पुस्तकाचे नाव नाही माहित, काय लिहलेय नाही माहित!!
माध्यमांसमोर जाताना जरा तरी प्राथमिक तयारी करुन जावी राव!!

गिरीश कुबेरांच्या त्या पुस्तकाची आजच्या हिंदूमध्ये लिटररी रिव्ह्यू या सदरात सूरज येंगडे यांनी करून दिलेली ओळख आली आहे. सूरज येंगडे यांच्या इतरत्र वाचलेल्या/ पाहिलेल्या मुलाखती आणि एकदोन लेख यांप्रमाणेच या रिव्ह्यूमध्येही त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे (अधलीमधली चमकदार वाक्यं वगळता) ते मला तरी नीट समजलं नाही. पुस्तकाबद्दलची (कमी) भाष्यं आणि त्यांची स्वतःची (जास्त) मतं एकत्रितपणे लिहिल्यामुळे असं होत असावं!

हा लेख नाही वाचला पण सूरज येंगडेबद्दल माझेही असेच काही मत आहे. मध्ये neo dalitism ही टर्म आणि त्या सम्बंधाने काही वाचन झाले त्यावेळी त्याचेच नाव डोळ्यासमोर येत होते.

वावे +१. रिव्ह्यू मध्ये पुस्तकात काय आहे आणि वाचून झाल्यावर लेखकाची मतं काय झाली असं ढोबळपणे असतं. इथे सगळी सरमिसळ करून तीन वाक्यांचे १० परिच्छेद लिहायचे टार्गेट पूर्ण केल्यागत झालंय. शब्द मर्यादा असेल कदाचित पण रिव्ह्यू काय झेपला नाही.

खरे तर मला कुबेरांच्या शर्टावर शाई फेकल्याचे फारसे काही वाटले नाही. त्यांना शर्ट पुरवण्याची मोहीम निघाली असती तर त्यात भाग घेण्याचे मी मनोमन ठरवले होते. पण वस्त्रहरण असे तितकेसे झालेच नाहीसे दिसतेय.

ब्रिगेडीनांही शाई लागलीच तर पुरवण्याची तयारी ठेवली होती. आता शाई इथे तिथे अशी मिळत नाही म्हणून मसजिदला जाऊन दौतींचे सुंदर सुंदर नमुने बघून ठेवले होते. पण ब्रिगेडींचेही हाताशी होती तितक्या शाईतच भागलेले दिसतेय.

हो मलाही तो रिव्यू पुस्तकाबद्दल कमी व "बिटिंग अराउण्ड द बुश" जास्त वाटला. एखादा दहा-बारा पानी लेख लिहीताना ज्या विषयावर आहे त्याच्या एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दलच एखादे पान खर्ची घालतात तशी सुरूवात करून बाकीचा लेख आटोपता घेतला आहे. एकतर महा-राष्ट्र हे नंतर ठाकून ठोकून बसवेलेले वाटते. महार किंवा मराठा शब्दांमधून ते आलेले असण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वी मराठा शब्द इंग्रजीत लिहीताना "एच" त्यात असे. त्यामुळे "महा" हे प्रिफिक्स नसावे.

बाकी कुबेर हे देशस्थ ब्राह्मण आहेत वगैरे म्हैस मधल्या पंचनाम्यासारखी अनावश्यक माहिती आहेच Happy

मुख्य म्हणजे रिव्यू मधे असे काहीच आलेले नाही की ज्यावरून हा वाद कसला आहे ते समजेल.

थोडक्यात कुबेरांचं समर्थन करणार्‍यांनीही त्यांचे पुस्तक वाचलेले नाही असेच दिसतेय सगळ्या प्रकरणावरून.

महार जिथपर्यंत पोचले तो महाराष्ट्र अशी थिअरी इरावती कर्व्यांच्या लेखातही वाचली आहे.

म्हैसमधल्या पंचनाम्यासारखी अनावश्यक माहिती >> Lol अगदीच!

लिंकसाठी धन्यवाद अमित. हिंदूचे सगळेच लेख फ्री उपलब्ध नसतात त्यामुळे मी बघितलंच नव्हतं लिंक देता येतेय की नाही हे. Happy

महारठ्ठ रठ्ठ हे शब्द प्राकृत भाषांत आणि अपभ्रंश भाषेत अनेकदा सापडतात.
इरावतीबाईंचे बरेचसे निष्कर्ष सुधारले गेले आहेत.
महार हा शब्द महा रठ्ठ वरून आलेला असण्याचीसुद्धा शक्यता आहे.

कुबेरांनी काय लिहीले आहे आणि ते कसे अनैतिहासिक आहे याबद्दलचे असीम सरोदे, नरके आणि इतरांचे लेख वाचले आहेत.
त्यांना इंद्रजित सावंत यांनी पत्र लिहून पुरावे दिले होते. जयसिंगराव पवार यांनी चुका दाखवल्या होत्या. पण त्यांनी लोकसत्तामधून वादाची दुसरी बाजू छापण्याचे टाळले असा त्यांच्यावर आरोप आहे. फोनवर त्यांनी काय करायचे ते करा असे म्हटले असेही वाचनात आले.
याची खातरजमा या मंडळींना समोरासमोर बसवून होऊ शकते.

मात्र त्यांनी लिहीले ते इतिहास कि नाही हे पडताळून पाहणे सहज शक्य आहे. तसे ते नसेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती.
अग्रलेख मागे घेण्याचा दांडगा अनुभव पाठिशी आहेच. यात अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली असे कुणाला वाटत असेल तर नाईलाज आहे.

म्हैसमधल्या पंचनाम्यासारखी अनावश्यक माहिती >> Lol हो. मूळ पुस्तकात काय आहे, सध्याचा वाद काय आहे काहीही समजलं नाही. सगळा लेख पुस्तकाचं नाव आणि लेखकांचं नाव आणि त्याची फोड यातच खर्च केलाय. खरेच पुस्तक वाचलंय का नाही प्रश्न पडावा.

कुबेरांनी जे लिहीले, त्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रियांची दखल घेतली किंवा नाही घेतली - ही सगळी त्यांची मर्जी आहे. शाई वगैरे १००% अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे. कितीही सौम्य असली तरी.

त्याचा निषेध करायला पुस्तकाचे समर्थन करण्याची किंवा ते वाचलेले असण्याची गरज नाही. कारण त्यात काहीही लिहीले असले तरी ही प्रतिक्रिया बरोबर होत नाही.

कुबेर असोत, मुनव्वर राणा असो, खरे असोत, एम एफ हुसैन, किंवा माबोवर देवदेवतांबद्दल लिहीणारे आयडी. प्रत्येक बाबतीत आपले मत विचारस्वातंत्र्यालाच. मग ती मते न पटोत, खोटी माहिती लिहीली आहे असे वाटो, किंवा अगदी सिद्ध होवो, किंवा बदनामीच्या कटाचा भाग वगैरे असो. त्याबद्दल दुर्लक्ष किंवा प्रतिवाद हेच फक्त दोन उपाय आहेत.

याला एकदा "पण" लावला, जस्टिफिकेशन्स शोधली की ती निसरडी वाट आहे.

कुबेरांनी जे लिहीले, त्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रियांची दखल घेतली किंवा नाही घेतली - ही सगळी त्यांची मर्जी आहे. >> कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सावत्र आईचा खून केला असे लिहीले. वास्तविक हे बेंद्रेंपासून खोटे आहे असे सांगत आले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना सुद्धा फिरतेय अलिकडे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य याला म्हणत असतील तर कठीणच आहे एकंदर.

जे लिहीलेय ते चुकीचे आहे हे दाखवून देणारे पुरावे न छापणे ही मर्जी होत असेल तर शाईफेक सुद्धा होईल ( निषेध करूनही). जर एखादी गोष्ट चुकीची आहे हे दाखवून देऊनही ती मान्य/ अमान्य करणे सोडा दखलच न घेणे हे निषेधार्ह नसेल तर.

कुबेर हे एका मोठ्या समूहातल्या एका प्रतिष्ठीत दैनिकाचे संपादक आहेत. त्यांना अनेक गोष्टींचे भान असणार. इतिहासातली अद्ययावत माहीती याबाबत ते अनभिज्ञ असतील का ? त्यात वाद कोणते आहेत हे त्यांना ठाऊक नसेल का ? असे असताना ते एका विशिष्ट संघटनेच्या मान्यतेप्रमाणे इतिहासातल्या अद्ययावत संशोधनाला फाट्यावर मारून जुनेच दाखले हेतूपुरस्सर देत असतील तर त्यातून वाद होणार कि नाही हे किमान त्यांना तरी नक्कीच ठाऊक असेल. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आलेले लेख जरी छापले नाहीत तरी त्यांची दखल घेत लोकसत्ताच्या दुस-या एखाद्या उपसंपादकाला गिरीश कुबेर यांच्या पुस्तकातील वादग्रस्त भागाची दुसरी बाजू असा लेख पाडायला सांगणे अशक्य नव्हते. लेखक चुकू शकतो. पण इथे गोची अशी आहे की हाच लेखक संपादक पण आहे. आणि तो दुसरी बाजू ऐकायला तयार नाही.

गंमत म्हणजे तो अशा पक्षाचा भाट आहे ज्या पक्षावर संभाजी ब्रिगेडचे आश्रयदाते असा आरोप होत आलेला आहे. महापुरूषांबद्दलची भावनिकता हा एक मुद्दा आहेच. भावनिकतेपोटी तथ्ये स्विकारता न येणे हा ही वादाचा मुद्दा आहे. हे ही चुकीचे आहे. पण इथे हा मुद्दा उपस्थित होत नाही. गिरीश कुबेरांनी ज्या ऐतिहासिक संदर्भांचा उल्लेख केला आहे ते बेंद्रे यांनी चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. त्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आता वाद संपायला हरकत नाही असे प्रस्तावनेत म्हटले आहे. संपादक कुबेरांना ही गोष्ट माहीत नाही असे समजता येईल का ?

मला आजवर असे वाटत होते की ऐतिहासिक कादंबर्‍यात दोन पात्रं एकमेकांशी काय बोलली याचे स्वातंत्र्य घेता येते. पण माधवराव पेशवे चीनमधे राज्य करत होते याला म्हणत नसावेत. स्वतः कुबेरांनी सुद्धा हे पुस्तक ऐतिहासिक तथ्ये न तपासता लिहीले असे म्हटलेले आहे.
यावर जास्त प्रतिक्रिया द्याव्यात असे वाटत नाही. चालू द्या.

स्वतः कुबेर हे संपादक आहेत. त्यामुळे आपल्या पुस्तकाबाबत येणारी दुसरी बाजू लोकांसमोर आणणे ही संपादक, प त्रकार म्हणून त्यांची जबाबदारी ठरते. यात मर्जीचा भाग कुठे आला ? म्हणजे पत्रकार बेजबाबदार असून ते मर्जीप्रमाणे काहीही लिहू शकतात असे समजायला हरकत नाही.

वादाकरता एक मिनीट असे समजा की कुबेरांनी हे पूर्णपणे खोटे व बदनामी करण्याकरताच लिहीलेले आहे. तरीही ते अभिव्यक्तीस्वातंत्र्यातच येते.

याचा अर्थ ते लोकांनी स्वीकारावे, पटवून घ्यावे असा अजिबात नाही. प्रतिवाद जरूर करावा. लोकसत्तेने छापला नाही, तर स्वतः पुस्तक लिहावे. जे केले जातेच.

ज्याला राज्यघटनेचा आदर आहे त्याने/तिने त्यातून लोकांना दिलेल्या हक्कांचे समर्थन करणे अपेक्षित आहे. लोक, संघटना ते हक्क कधी लागू होतात याबद्दल काही निकष स्वतः लावू शकत नाहीत. उद्या माधवराव पेशवे, सावरकर वा टिळक हे इंग्रजांचे हस्तक होते म्हणून कोणी पुस्तकात लिहीले तरी त्याला हेच लागू होईल.

२ + २ = १९ हा माझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असेल का ? असेल तर तो शाळेत शिकवायचा का ?
एकीकडे म्हणायचं प्रतिवाद करावा. विचारांची लढाई विचाराने केली पाहीजे. दुसरीकडे कुबेरांची मतं चुकीची आहेत हे दाखवून दिल्यावर कुबेर म्हैसकर नावाच्या सरकारी अधिकार्‍याचा कौतुक करणारा लेख छापतात.
प्रामाणिकपणा आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यात गल्लत होतेय असे वाटत नाही ?

लोकशाही जबाबदार व्यक्तींमुळेच चालू शकते. पत्रकार जबाबदार असतात असा एक समज आहे.

कुबेरांना लोकमान्य टिळक हेच रेनेसाँ साठी योग्य व्यक्ती वाटणे ही त्यांची अभिव्यक्ती आहे असे मला तरी वाटते. भले ती चुकीची असेल. तुमचे हे मत मागे घ्या असे म्हणता येत नाही. किंवा सावरकर हेच महाराष्ट्राची पुनर्जागराची चळवळ चालवत होते असे त्यांना वाटत असेल. त्यांच्या लेखी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कर्तृत्व शून्य असेल. ते महात्मा फुलेंचा उल्लेख एका वाक्यात करू इच्छित असतील. हा त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा किंवा विचारसरणीचा भाग आहे.

पण इतिहास हा काही कादंबरी नव्हे. तो तथ्यांची मोडतोड करून मांडता येऊ शकत नाही. त्यामुळे जे उल्लेख त्यांनी इतिहासाचे आधुनिक संदर्भ न पाहता दिले आहेत ती अभिव्यक्ती कशी काय ?
त्यांच्या आधीच्या पुस्तकात त्यांनी लेटेस्ट संशोधनाचा आधार घेतलेला आहे. युरोपात जाऊन संशोधन केलेले आहे. म्हणजे त्यांना ही शिस्त माहीत असावी.
मला वाटते अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय यावर च नीट चर्चा व्हायला हवी.

पु ल देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व आहे. त्यांची तथ्यांवर आधारीत नसलेली बदनामी अभिव्यक्तीस्वातंत्र्यात मोडते का ? अशाने कुणीही काहीही बेताल बडबड करेल.
स्वातंत्र्यासोबत जबाबदारी पण यायला हवी.

राज्यघटनेचा आधार आहे म्हणून तेलगीने स्टँपपेपर छापलेले चालतात का ?
तुमचे म्हणणे योग्य असेल तर ते मांडायला तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहे की काहीही बरळायला ?

जितेंद्र राऊत नावाची एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती डोक्यावर परिणाम झालेली आहे. गाव तिथे दारू या घोषणेवर त्यांनी पक्ष काढला. निवडणुका लढवल्या. या माणसाने शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला म्हणून त्याला मारहाण झाली होती. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, संघ परिवार सगळेच होते. कितीही व्हॉट अबाऊटरी होते असे म्हटले तरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा त्या वेळी कुणालाही सुचला नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य सिलेक्टीव्ह असू शकते का ?
खरे तर अडाणी, गावातल्या माणसाने एकेरी उल्लेख करणे ही गोष्ट दुर्लक्षणीय ठरायला पाहीजे. आज त्या मारहाण करणा-या संघटनांच्या नेत्यांनी शाईफेकीचा निषेध केला आहे हे पाहून गंमत वाटतेय.

मला वाटते कुठल्याही निषेधाच्या प्रकटीकरणात झुंडशाही आणि उथळ धर्म - देशाभिमान शिरू नये. आणि कुठल्याही सेना - फौज - ब्रिगेड ह्यांच्या सारख्यांच्या हातांत तथ्य ठरवण्याचे अधिकार पडू दिले जाऊ नयेत.
पण झुंडशाही आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे जणू. प्रेतयात्रा काढणे, लुटूपुटीचे प्रेतदहन करणे, गाढवावरून पुतळ्याची धिंड काढणे, गळ्यात चपलांचा हार घालणे, शेण फेकणे, थुंकणे वगैरे.
त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आधुनिक संशोधनानुसार सद्यकालीन सत्य काय ते ठरवावे. उगीच विखार माजवला जाऊ नये.

पु ल देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व आहे. त्यांची तथ्यांवर आधारीत नसलेली बदनामी अभिव्यक्तीस्वातंत्र्यात मोडते का ? >>> हो

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा त्या वेळी कुणालाही सुचला नाही >>> कोणालाही म्हणजे त्या संघटनांना असे तुम्हाला म्हणायचे असेल असे समजतो. पक्ष, संघटना आपापल्या अजेंड्याप्रमाणे प्रतिक्रिया बदलणार. त्या व्यक्तीलाही तितकेच विचारस्वातंत्र्य आहे.

एखादी व्यक्ती जर कायद्याच्या विरूद्ध जाउन काही बोलत असेल, लिहीत असेल तर त्या व्यक्तीविरूद्ध तक्रार करणे हे ही बरोबर आहे. पण कोणीही उठावे आणि आम्ही <कोणीही थोर व्यक्ती>प्रेमी आहोत हे जाहीर करत कोणालाही मारहाण करावी - हे त्यात येत नाही.

२ + २ = १९ हा माझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असेल का ? असेल तर तो शाळेत शिकवायचा का ? >>> तुम्हाला किंवा कोणालाही २ + २ = १९ होतात असे पुस्तकात लिहायला काही बंदी नाही. शालेय पुस्तकात काय निवडावे याबद्दल ही चर्चा नाही.

स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीपण यायला हवी हे १००% बरोबर आहे पण कोणी जर ती पाळली नाही, तर बाकीच्यांना काय पाहिजे ती अ‍ॅक्शन घेण्याची मुभा नाही.

उगीच विखार माजवला जाऊ नये. >> सहमत.
त्याच बरोबर ज्या गोष्टी निकाली निघाल्या आहेत त्यांना चिकटून आपल्या हातातल्या सत्तेचा दुरूपयोग करत उद्दामपणाही करू नये. हा उद्दामपणा झुंडशाहीला प्रोत्साहन देत असतो. झुंडशाही आपली आणि त्यांची कधीच परवडत नसते.

मुद्दा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आहे. पुल देशपांडे हे काही विनोदी लेखक नाहीत हे मत झाले. ते मांडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.
पण पुल देशपांडेंना दारू पिल्याशिवाय भाषण देता येत नव्हते असे म्हटले तर लोक पुरावे मागणारच.

Pages