Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महालय म्हणजे महाल आणि महालया
महालय म्हणजे महाल आणि महालया म्हणजे सर्वपित्री अमावस्या का? पूर्व भागात सर्वपित्री अमावस्येपेक्षा महालया हाच शब्द जास्त प्रचलित आहे. त्याचेच महाळ किंवा म्हाळ झाले असेल. पण ते पूर्ण पितृ पक्षासाठी जास्त वापरले जाते.
महालय ( महा आलय) असा शब्दच
महालय ( महा आलय) असा शब्दच मुळी अस्तित्वात नाही. ताज महाल हा एका संस्कृत शब्दावरून आलेला आहे हे दाखविण्याचा खताटोप आहे तो. ऑस्ट्रेलिया ला अस्त्रालय, वगैरे वगैरे !
महालय म्हणजे महाल आणि महालया
महालय म्हणजे महाल आणि महालया म्हणजे सर्वपित्री अमावस्या का? >>>> हो काही भागात सर्वपित्रीला "महालय "म्हणतात .काही ठिकाणी जे तर्पण करतात त्याला महालय म्हणतात, ज्या पितराची म्रुत्यु तिथी माहीती नाही त्याच्यासाठी करतात.खान्देश्,विदर्भात हा शब्द वापरला जातो.
विकु ह्यात झुंडशाहीचं समर्थन
विकु ह्यात झुंडशाहीचं समर्थन कुठे आहे? जर कोणी जाहिरातींमुळे दुकानांची तोडफोड केली तर त्यांना तात्काळ अटक व्हायला हवी. जर वैद्यबाईंनी तोडफोड करण्याचे आवाहन केले तर त्यांच्यावरसुद्धा कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला हवी. पण "मला जाहिरात पटली नाही. मी तुमच्याकडून खरेदी करणार नाही" हे सभ्य शब्दात सोशल मीडियावर सांगणे हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. कुठल्याही लिबरल democracy मध्ये dissent चे स्वातंत्र्य असायला हवे. आणि आपली नापसंती शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सनदशीर मार्ग आहे. ह्या जाहिरातींबद्दल बऱ्याच जणांच्या मनात नापसंती होती. त्याला वैद्यबाईंनी वाचा फोडली. खरंच आपल्या सणांचं अशी विचित्र representation केलेलं पाहून त्यावर बोलायचं सुद्धा नाही? इतकी गळचेपी? हे वाचून लोक तोडफोड करतील अशी भीती घालून आपले मत व्यक्त करायाला विरोध करणे आणि पुरुषांच्या भावना चाळवून ते बलात्कार करतील म्हणून मुलींनी जीन्स /शॉर्ट्स घालून बाहेर जाऊ नये असे म्हणणे ह्यात तत्वतः फरक नाही.
Fab India पॉवरफुल कंपनी आहे
Fab India पॉवरफुल कंपनी आहे आणि त्यांना शेफाली वैद्य टाइप लोकांकडून काही धोका नाही?. बरं.
https://www.indiatoday.in/india/story/tejasvi-surya-fabindia-ad-diwali-j...
अमीर खानला intolerance प्परकरणी कसा धडा शिकवला गेला हे पर्रिकरांनी व्यासपीठावरून वसांगितलं होतं.
पण गेल्या वर्षी कार्यक्रम न व्हायला आणि आता त्याचं नाव बदलायला जबाबदार कोण तर लिबरल्स.
आहे की नाही गंमत.
इर्शाद आणि जश्न एक रिवाज
इर्शाद आणि जश्न एक रिवाज खटकलेल्यांतल्या कोणी महालया खटकल्याचं लिहिलंय का?
तुम्ही टार्गेट ऑडिअन्स नाही
तुम्ही टार्गेट ऑडिअन्स नाही हे काही प्रमाणात खरं जरी असलं तरी मायबाप ग्राहकाला चुचकारुनच प्रत्येक शोमनने पुढे जाणे किती गरजेचे आहे ते आमिर खान, करीना बहुदा आता समजले असतील. कदाचित त्यांना आता त्याचा आर्थिक दृष्ट्या काही फरक पडत नसेल, पण कितीही चुकीची एक्सपेक्टेशन (सध्या जो मूर्खपणा चालू आहे त्याचं किंचितही समर्थन नाही) ग्राहकाची जरी असली तरी तुमची कला बघायला कोणी येणार नसेल तर तुमचा अॅटिट्युड खड्ड्यातच जातो. कितीही योग्य असला तरीही! त्या दृष्टीने दोन बोटं वर चालत असलेल्यांचा रथ जमिनीला टेकला तर काही वाईट नाही. चांगल्या नंतर वाईट लोकांची चलती होण्याचे चक्र येणारच. आणि यावंच. त्याशिवाय चांगल्याची किंमत कशी कळणार?
ही कला तुम्ही १००% स्वांतसुखाय करत जरी असलात तरी कुठलीही गोष्ट तुम्हा एकट्याने होत नाही. आर्थिक गणित यावर अवलंबुन असेल तर मग प्रवाहपतित होण्यास गत्यंतर नाही. आजचे वारे बघुनच पाय उचलले पाहिजेत. तत्त्व बासनात गुंडाळलेली बघायला मला एक ग्राहक म्हणून (मग ती तत्त्व उत्तम आणि जन्ता चुकीची का असेना) थोड्या गुदगुल्या झाल्याशिवाय रहावत नाही. प्रिव्हलेज्ड लोकांना दोन बोटं दक्षिणेला गेलेलं बघुन मध्यमवर्गीय इगो सुखावतोच. तत्त्वांपेक्षा कॅपिटॅलिझमचा विजय झालेलाही बघायला आवडतो.
त्याचीच री ओढत गांधी आणि कॉंग्रेसची धुळदाण उडालेली बघुनही मला कधीमधी गुदगुल्या होतातच. तशीच धुळदाण फडणवीस-शिंद्यांची झाली किंवा मोदी-शहांची झाली तरी आता गुदगुल्याच होतील. हे function at() { [native code] }यंत मराठी मध्यमवर्गीय आहे. पण हाच मध्यमवर्गीय माणूस झुंडशाही करुन तनिश्कला आणि फॅब इंडिआला अगदी दुप्पट लांब उडी मारायच्या आधी का होईना एक पाऊल मागे घ्यायला लावत असेल तर सरड्याची धाव कुंपणापर्यंत नियमात आनंद मानायला जागा आहे. हा स्लिपरी सोप आहे इ. इ. बद्दल दुमत बिलकुल नाही. पण तुम्हाला नाही बघायचं तर नका बघू, तुम्ही टार्गेट ऑडिअन्स नाही, तुम्ही बहिष्कार घालून हसावे का रडावे कळेना झालय अशा तु.क. प्रतिक्रिया येत असतील तर त्याचा राग कुठे तरी निघणारच. कुठे आणि किती प्रमाणात त्याच्यावर कुणाचं नियंत्रण नाही.
फा, हसन मिन्हाजचा नवा ब्रुकलिन मधला स्टँडअप बघितला. आणि आवडलाच. हसन मिन्हाज आवडतो त्यामुळे त्याचा शो आवडण्याशिवाय गत्यंतरच न्हवतं. 'तत्त्वं' आणि 'प्राण जाणे' डायलेमा जळजळीत प्रकारे त्याने सांगितला आहे. तो अमेरिकन सॉईलवर (टेक्निकली नाही) होता, वेळ आली न्हवती इ. इ. बाकी तत्त्वांसाठी जमाल कशोक्जी बनायचं आणि 'मरावे परि किर्तीरुपी उरावे' प्रकार करायचा हा प्रत्येकाचा चहाचा कप नसतोच. नसावाच.
महालया हा शब्द कर्नाटकातही
महालया हा शब्द कर्नाटकातही आहे. सर्वपित्रीसाठीच. 'य' आहे की 'या' हे नेमकं माहिती नाही.
अनेक वर्षांपूर्वी अंतर्नादमध्ये एक लेख वाचला होता. बहुतेक अवधूत परळकरांचा (खात्री नाही). 'आपण सारे अल्पसंख्य' असं नाव होतं. ज्यांना उत्सवांमधल्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो, मिरवणुकांमुळे(उत्सवातल्या किंवा राजकीय कारणांमुळे होणाऱ्या) रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीचा राग येतो, इत्यादी, ते अल्पसंख्य असतात. बहुसंख्य लोकांना हे चालत असावं कारण या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत असा काहीसा उद्वेग त्या लेखात होता.
खरोखरच अल्पसंख्य असतात का पण हे लोक? की आपलं मत मांडायला कचरत असतात? 'कशाला त्या भानगडीत पडा?' असा विचार करत असतात?
इर्शादच्या बाबतीत, कलाकारांनी 'हुतात्मा' व्हायला हवं असं अर्थातच माझंही मत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं करिअर आहे.
पण समाजात राहणारे आपण, ज्यांना पटतंय की इर्शाद या नावात काहीही वावगं नाही, पण ज्या माणसांचं उपद्रवमूल्य फारसं नाही, ते कृती करत नाहीत म्हणून झुंडशाहीचं फावतं असं नाही का वाटत?
इर्शादला विरोध त्या शब्दाचा
इर्शादला विरोध त्या शब्दाचा अर्थ माहीत नाही, म्हणून नाहीएत.
ज्यांना इर्शाद हा शब्द माहीत नाही, त्यांच्यासमोर कवितां सादर केल्या काय आणि नदीत डु़ंबणाऱ्या म्हशींच्या साक्षीने केल्या काय, सारखंच.
इर्शाद नको कारण तो उर्दू / फारसी शब्द. उर्दू भारतात जन्मलेली भाषा असली आणि मुन्शी प्रेमचंद यांनी उर्दूतून लेखन केलं असलं तरी ती मुसलमानांची च् भाषा. आमच्या दिवाळीतल्या कार्यक्रमाला हा शब्द का?
डिट्टो जश्न ए रिवाज. मला आठवतंय त्यानुसार इंग्रजी येणिणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा पोस्टरबॉय तेजस्वी सूर्याने अब्राहमिक भाषेतला शब्द म्हणून विरोध केला.
बरं. आता कार्यक्रमाच्या नावाचं शुद्धीकरण केलं. आता जायला हरकत नाही. दिवाळीचा कार्यक्रम म्हणजे नटूनथटून छान कपडे घालून जाणं आलंच. आजकाल विशेष प्रसंगाला कुर्ता सुरुवार घालतात ना? तोच घालायचा.
थांबा. कुर्ता हा प्रकार central Asia मधून आणि तो शब्द उर्दू, फारसीतून आलाय. चालणार नाही.
शर्ट पॅन्ट तर साफ बाद.
धोतर आणि त्यावर बंडी किंवा उपकरणं, - उत्तरीय.. लुंगी एकवेळ चालेल.
पण आत लंंगोटच हवा. टोपी, पगडी, फेटा यातलं आपल्या जातीनुसार जे असेल ते.
नाहीतर आपल्या संस्कृतीवरच्या आक्रमणाला मान्यता दिल्यासारखं होईल.
आता पु ना ओक स्कूलचे संशोधक बिर्याणी प्रमाणेच कुर्ता सुद्धा आपलाच असा दावा करतात. पण उगाच रिस्क कशाला घ्या
Happy diwali म्हणायचं नाही. मुळात शुभेच्छा देण़ंघेणं हेच आपल्या संस्कृतीत नाही. लहानांनी मोठ्यांच्या पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचे हीच आपली खरी संस्कृती.
आता बिंदीकडे वळूया. बिंदी,
आता बिंदीकडे वळूया. बिंदी, कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक. नवरा मेला की बाईचं कुंकू आजही रीतसर पुसलं जातं, बांगड्या फोडल्या जातात. विदेशी फारतर दिसेल , न दिसेल अशी काळी टिकली लावावी.
म्हणजे त्या नतद्रष्ट लिबरल, फेमिनिस्टा़ंच्या मते कुंकू, बिंदी हे पुरुषसत्ताक व्यवस्थेचं, patriarchy चं प्रतीक. ते असलंच पाहिजे.
By the way, आजच्या इ़डियन एक्स्प्रेस मध्ये HSBC bank. ची festive season ची पहिलं पानभरून जाहिरात आहे. झेंडूच्या माळा, मागे पणत्या, शोभेच्या दिव्यांचा उजेड. पण बाईच्या कपाळावर बिंदी नाही.
घाला बहिष्कार.
गेल्या वर्षी दागिन्यांच्याही एका ब्रॅंडवर नो बिंदी न बिझिनेस ची संक्रांत आली . तेव्हा पर्याय विचारल्यावर शेफाली बाईंनी वामन हरी पेठेंचं नाव सुचवलं. पण हाय रे दैवा. त्यांच्याच मंगळसूत्राच्या जाहिरातीत बिंदी नाही. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकांच्या निम्म्या तरी दागिन्यांच्या जाहिरातींचा बिंदी नव्हती. हे बरोबर नाही.more power to Shefali mam.
भरत
भरत
शेफाली बाईंना इतक्या थयथयाट
शेफाली बाईंना इतक्या थयथयाट करण्याचे किमान वामन हरी पेठेंकडून झैरात म्हणून पैसे मिळाले असतील अशी आशा. कुणाचे तरी भले होईल.
बिंदी असूनही सुतकी
बिंदी असूनही सुतकी चेहऱ्याच्या वाटल्या म्हणुन हॅशटॅग सुरू केल्याचे उदाहरण आहे का एखादे?
गेल्या वर्षी बिना बिंदीवाल्या त्याच जाहिराती एडिट करून त्यात केवळ बिंदी लावली मग त्या ओके झाल्या असे काही झालेय का? असे वाचल्याचे अंधुकसे आठवतेय.
काहिही नाही, मला आवडली
काहिही नाही, मला आवडली जाहिरात( आमिर कियाराचा सन्तुर डॅडी वाटतो एवढच खटकल) >> मध्य प्रदेशचे मंत्री महोदय नरोत्तम मिश्रा ह्यांना या जाहीरातीत आक्षेपार्ह बाब आढळली. 'आमीर खान (जाहिरातकर्ते नाही बरं !) हिंदू संस्कृती बदलायला निघाला असं त्यांचं म्हणणं आहे ह्या नरोत्तमाना विवेक अग्निहोत्री (का फा फेम) पण पाठिंबा दिला आहे
विवेक अग्निहोत्रीने आधी काडी
विवेक अग्निहोत्रीने आधी काडी टाकली. मग मंत्री उतरले असतील.
नरोत्तम उतरलेलेच असतात
नरोत्तम उतरलेलेच असतात
अजबराव, माफ करा, झुंडशाहीचे
अजबराव, माफ करा, झुंडशाहीचे समर्थन करणे हा तुमचा हेतू नसेल, पण unintended consequence नक्कीच. तुमच्या प्रतिसादातून असे ध्वनित होते की शेफालीताई चार चौघींसारख्या सामान्य गृहिणी आहेत आणी आपले मत व्यक्त करत आहेत. अमूक एक जाहिरात मला आवडली नाही आणी मी त्यांची उत्पादने घेणार नाही ही अगदीच योग्य भूमिका आहे. पण शेफाली ताई समान्य गृहिणी नहीत. त्यांच्या मागे व बरोबर एक मोठी एको सिस्टीम आहे. असा खोडसाळपणा त्या वारंवार करतात.
> हा स्टॅंड एवढा बाणेदार आणि स्वांतसुखाय असता तर फॅब ईंडियाचा अॅड मॅनेजर मुस्लीमच आहे, मॉडेलने हिरवाच रंग घातला आहे वगैरे कूजबूज मोहीम राबवण्याची ऊठाठेव करावी लागली नसती.
भरत (wry smileसाठी निराळी
भरत
(wry smileसाठी निराळी इमोजी हवी होती!)
वावे, अनुमोदन!
खरे/जोशी चित्रपटांसाठी/टीव्ही मालिकांसाठी गीतलेखन करतात. त्या ‘सूर नवा’सारख्या कार्यक्रमांचं संहितालेखन करतात. कितीतरी लोकप्रिय कलाकारांशी त्यानिमित्ताने त्यांचा जवळून संबंध येत असणार.
‘इर्शाद’ नावाला विरोध झाला, ‘कार्यक्रम कसा करता तेच बघतो’ म्हणून धमक्या आल्या, तेव्हा सामान्य प्रेक्षक तर सोडाच, पण हजारावारी फॉलोअर्स असणाऱ्या या कलाकारांपैकी किती जणांनी त्याबद्दल आपलं मत परखडपणे आणि जाहीररीत्या मांडलं?
म्हणजे एकतर त्यांचं शेफालीबाईंना अनुमोदन असणार, किंवा हा विषय बिनमहत्त्वाचा वाटत असणार, किंवा मग या ‘लफड्या’त पडणं सोयीचं नसणार, नाही का?
भरत यांनी या धाग्याच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या कवितेसारखाच प्रकार आहे हा!
तेव्हा पर्याय विचारल्यावर
तेव्हा पर्याय विचारल्यावर शेफाली बाईंनी वामन हरी पेठेंचं नाव सुचवलं. पण हाय रे दैवा. त्यांच्याच मंगळसूत्राच्या जाहिरातीत बिंदी नाही.

वो जो बेचते थे दवा ए दिल , वो दुकान अपनी बढा गये - बहादुर शहा जफर.
पण शेफाली ताई समान्य गृहिणी
पण शेफाली ताई समान्य गृहिणी नहीत. >>> ऑं ? म्हणजे फॅन फॉलोविंग असणाऱ्यांना मत व्यक्त करायला बंदी? This is a highly illiberal stand.
मॉडेलने हिरवाच रंग घातला आहे >> मग काय झालं ? हिरवाच का, अगदी मॉडेलने चौकडीचा पिवळा शर्ट, जरतारीच्या नाचऱ्या मोराच्या डिझाईन सहित घातलेला नसेल तर जाहिरात एकदम फॉग आहे असं एखाद्याचं मत असेल तर ते व्यक्त करायला आडकाठी का असावी?
फॅब ईंडियाचा अॅड मॅनेजर मुस्लीमच आहे >> इथेच कुणीतरी लिहिलंय की कुणीतरी एलियन ज्याला दिवाळीबद्दल काहीही माहिती नाही अशा कुणीतरी जाहिरात केलेली असल्यासारखं वाटतंय. तर जाहिरात अशी असण्यामागची कारणमीमांसा करताना जाहिरातकार अ-हिंदू असणं आणि (कदाचित) त्यामुळे त्याला दिवाळीची माहिती नसणं असा अंदाज कुणी मांडला असेल तर असो. वैद्यबाईंनी ऍड मॅनेजर मुस्लिम असण्याबद्दल लिहिलेले माझ्या वाचनात नाही. तरी एखाद्या ठिकाणी काम करणारे कुठल्या विशिष्ट जाती/धर्माचे आहेत/नाहीत ह्यावरून त्यांना सर्व्हिस देणे/न देणे किंवा त्यांची सर्व्हिस घेणे/न घेणे हे चुकीचे आहे असे माझे मत आहे. जर त्यांनी असे आवाहन केले असेल, आणि ते एखाद्या अँटी-डिस्क्रिमिनेशन कायद्याच्या विरुद्ध असेल तर त्यांच्यावर कायद्याप्रमाणे जरूर कारवाई व्हावी. जर त्यांनी असे काही म्हटले असेल आणि तो गुन्हा असेल, तर त्याबद्दल कुणी पोलिसात तक्रार का नाही केली? माझा मुद्दा हाच आहे जर कुणी गुन्हा केला तर गुन्ह्यासाठी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण सभ्यपणे मत मांडण्यावर बंदी का घालावी?
आणि माझे हेच मत हलाल फूड बद्दल सुद्धा आहे. एखाद्या अन्नपदार्थाचे उत्पादन करताना तेथे काम करणारे सगळे (किंवा काही प्रमाणात तरी) एका विशिष्ट धर्माचेच असले पाहिजेत असे discriminating निकष लावून हे सर्टिफिकेशन होते. "इथे अमुक धर्माचा व्यक्ती काम करतो - ह्यांची उत्पादने घेऊ नका" आणि "इथे अमुक धर्माचे लोकच काम करतात (इतर धर्माचे नाही) - ही उत्पादने घ्या" हे दोन्ही स्टॅन्ड चुकीचे आहेत असे माझे मत आहे. माफ करा, मॅनेजरच्या धर्माच्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे मत स्पष्ट केले. पण हे थोडे विषयांतर झाले.
पतंजली पण घेतो हो हलाल
पतंजली पण घेतो हो हलाल सर्टिफिकेट. त्यांचा तिथे काम करणाऱ्यांच्या धर्माशी काही संबंध असतो, हे पहिल्यांदाच वाचतोय.
https://www.amarujala.com/dehradun/patanjali-ceo-acharya-balkrishna-told...
अजूनही माहीत नसेल तर धाग्यातले प्रतिसाद वाचलेत तर कळेल की मुसलमान विकत असलेल्या वस्तूंवर, देत असलेल्या सेवांवर बहिष्कार घाला असं पद्धतशीर कॅंपेन चालू आहे.
कर्नाटकात हिंदुंच्या जत्रांत मुसलमान दुकानदारांना बंदी, इतकंच काय मुस्लिम वाहनचिलकांना बंदी प्रशासनाने केली. त्याविरोधात भाजपचाच एक मंत्री बोलला.
इर्शाद आणि जश्न एक रिवाज या दोहोंना विरोध ते उर्दू भाषेतले, तस्मात् मुस्लिम शब्द आहेत म्हणून आहे.
मत व्यक्त करायला बंदी असं
मत व्यक्त करायला बंदी असं म्हटलेलं नाही. त्यांचा त्या मत व्यक्त करण्यामागचा उद्देश स्पष्ट केलाय.
असो. यापेक्षा तुम्ही त्यांचं उघड आणि स्पष्ट समर्थन केलंय तर बरं होईल. हेपण चूक वगैरे नेटकं न लावता.
स्वाती , 'तुम भी हम जैसे
स्वाती , 'तुम भी हम जैसे निकले' कवितेची लिंक जिज्ञासा यांनी दिली होती.
मत व्यक्त करायला बंदी असं
मत व्यक्त करायला बंदी असं म्हटलेलं नाही. त्यांचा त्या मत व्यक्त करण्यामागचा उद्देश स्पष्ट केलाय.
>>>>प्रिसाईजली. +११११
बाकी माझ्या माहितीप्रमाणे
बाकी माझ्या माहितीप्रमाणे प्राणीजन्य पदार्थ आणि अल्कोहोल नसलेले सगळे पदार्थ बाय डिफॉल्ट हलालच असतात. तिथे "कोणत्या धर्माचे लोक काम करतायत" वैगेरे निकष येण्याचा दुरान्वये संबंध येत नाही.
१)
१)
"अजूनही माहीत नसेल तर धाग्यातले प्रतिसाद वाचलेत तर कळेल की मुसलमान विकत असलेल्या वस्तूंवर, देत असलेल्या सेवांवर बहिष्कार घाला असं पद्धतशीर कॅंपेन चालू आहे.
कर्नाटकात हिंदुंच्या जत्रांत मुसलमान दुकानदारांना बंदी, इतकंच काय मुस्लिम वाहनचिलकांना बंदी प्रशासनाने केली. त्याविरोधात भाजपचाच एक मंत्री बोलला."
>> Strawman . त्याचा इथे संबंध नाही. रस्त्यावर कुणी कायदा मोडत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला हवी. विषय शेफाली वैद्यांच्या नो बिंदी नो बिझनेस specific पोस्ट चा आहे.
सर्विस देणाऱ्याचा धर्म - त्यावर आधारित भेदभाव असू नये हेच मी म्हटले आहे. हलाल हे उदाहरण आहे. https://www.thekitchn.com/good-question-what-is-halal-me-60979 "These steps must be accomplished by a Muslim or the People of the Book (Christian or Jew). (Many observant Muslims find kosher meat acceptable.)". जर हलाल साठी employment मध्ये असे धार्मिक डिस्क्रिमिनेशन करत नसतील तर हरकत साहजिकच गैरलागू आहे. खुल्या बाजारात धार्मिक डिस्क्रिमिनेशन नसावे.
पुन्हा - माझ्या वाचनात हे आलेलं नाही, पण वैद्यबाईंनी जर म्हटलं असेल की फॅब इंडियाचा मॅनेजर अमुक धर्माचा आहे म्हणून त्याचे प्रॉडक्ट घेऊ नका तर त्या specific आवाहनासाठी कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हावी. जर त्या दोषी ठरल्या तर शिक्षा होईल. ह्या मुद्द्यावर तरी वाद नसावा.
२) दुसरा मुद्दा: शेफाली बाईंचे बरेच फॉलोवर्स आहेत, त्यांच्या मागे इकोसिस्टिम आहे. बरं मग? "जाहिरात आवडली नाही. मी तुमचं प्रॉडक्ट घेणार नाही" असं बोलण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे की नाही? मी तर म्हणतो ठणकावून बोलावं. त्यांच्या लाखो फॉलोवर्सना पटलं तर ते सुद्धा प्रॉडक्ट घेणार नाहीत. उत्पादकांना फीडबॅक मिळेल की आपलं प्रॉडक्ट ज्या पद्धतीने मार्केट केलं जातंय ते ग्राहकांना आवडत नाही. काय चुकीचं आहे त्यात? जर बाईंचे फॉलोवर्स हा टार्गेट सेगमेंट नसेल तर दुर्लक्ष करा बाईंकडे.
"त्यांचा त्या मत व्यक्त करण्यामागचा उद्देश स्पष्ट केलाय." - त्यांनी जे लिहिलंय, जे केलंय त्या बेसिस वर त्यांना जज करावं. वावगं लिहिलं असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करावी. त्यांचा उद्देश काय आहे ह्याबद्दल वेगवेगळी मते होतील. उद्देश extrapolate करणे व्यर्थ आहे. त्यांनी न लिहिलेला एखादा "उद्देश" interpret करून जर कोणी कायदा मोडला, तर त्या कायदा मोडणाऱ्यावर कारवाई व्हावी.
बॉरं.
बॉरं.
नाही, मी या कवितेबद्दल म्हणत
नाही, मी या कवितेबद्दल म्हणत होते.
आज बघितला 'आणि कविता'. छान
आज बघितला 'आणि कविता'. छान झाला. भरपूर गर्दी होती.

माझे हेच मत हलाल फूड बद्दल
माझे हेच मत हलाल फूड बद्दल सुद्धा आहे. एखाद्या अन्नपदार्थाचे उत्पादन करताना तेथे काम करणारे सगळे (किंवा काही प्रमाणात तरी) एका विशिष्ट धर्माचेच असले पाहिजेत असे discriminating निकष लावून हे सर्टिफिकेशन होते. +११११११११
(टीप: वरील screenshot सनातन प्रभात, ओपइंडिया, पांचजन्य, सामना, तरुण भारत इ. मधून घेतला नसूनwww.halalindia.co.in वर उपलब्ध असलेल्या pdf file मधून घेतला आहे. https://www.halalindia.co.in/downloads/certification%20process.zip)
बाकी माझ्या माहितीप्रमाणे प्राणीजन्य पदार्थ आणि अल्कोहोल नसलेले सगळे पदार्थ बाय डिफॉल्ट हलालच असतात>>> हो ना? मग त्यासाठी वेगळे 'certificate' कशाला हवे??? तेही वर्षाला प्रत्येक product मागे हजारो (होय, हजारो) रुपये 'जमियात उलेमा ए हिंद' सारख्या संघटनेच्या घशात घालून!
धाग्यातले प्रतिसाद वाचलेत तर कळेल की मुसलमान विकत असलेल्या वस्तूंवर, देत असलेल्या सेवांवर बहिष्कार घाला असं पद्धतशीर कॅंपेन चालू आहे.>>> कोणी असे जाहीर आवाहन करत असेल तर एखाद वेळेस त्याच्यावर कारवाई होईल, पण कोणी स्वयंस्फूर्तीने असे करत असेल तर त्यावर काय म्हणून कारवाई करणार??? कारण शेवटी तोसुद्धा एक ग्राहक आहे आणि 'ग्राहक कायद्यानुसार' त्याला 'निवडीचा अधिकार' आहे.
माझे वैयक्तिक स्तरावरील विचाराल तर आधी मी हे कटाक्षाने पाळत नव्हतो, पण केवळ कायद्याच्या रक्षकांना (पोलिसांना) मदत केली म्हणून काही दिवसांपूर्वी मला 'शांतीदूतांकडून' दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या धमक्या मिळाल्यापासून आता मीही कटाक्षाने त्यांच्याशी व्यवहार टाळतो. त्यासाठी काही पडताळणी चाचण्या मनात पक्क्या केल्या आहेत.
Pages