क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

एकदिवसीय क्रिकेट आणि *काही द्विशतके*

▪️आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या ईतिहासात केवळ ८ द्विशतके झाली!

▪️पहिले द्विशतक क्रिकेटच्या देवाने मारले

▪️८ पैकी ५ शतके तीन दिग्गज भारतीय फलंदजांनी मारली.
देव, वीरू आणि शर्मा द बॉस

▪️पाचही सामन्यात भारताने विजय मिळवला.

▪️ उरलेली ३ शतके ज्या परदेशी खेळाडूंनी मारली त्यातील दोन झिम्ब्वाब्वेसोबत आली.

▪️ शर्मा द बॉस हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एकापेक्षा जास्त द्विशतके मारली.

▪️शर्मा द बॉस ने एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ३ द्विशतके मारली.

▪️बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या संघांसमोर द्विशतक मारायचा पराक्रम देवाने आणि शर्मा द बॉसनेच केला आहे.

▪️ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकात शर्मा द बॉस ने तब्बल १६ गगनचुंबी षटकार मारले होते जो एक विश्वविक्रम आहे.

▪️सर्व द्विशतकांमध्ये शर्मा द बॉस ने फटकावलेल्या २६४ धावा या सर्वोच्च आहेत.

▪️सर्व द्विशतकांमध्ये शर्मा द बॉसच्या या द्विशतकाचा स्ट्राईकरेट सर्वाधिक आहे.

▪️ देव हा असा एकमेव फलंदाज आहे ज्याने द्विशतकात फक्त ३ षटकार मारलेत. यावरून देवाच्या फलंदाजीचा क्लास कळतो

असो. प्रश्न भाऊंना होता.

हो. पण...

की इथलं मायबोलीवरचं एक मत फक्त ?

हे माझ्यासाठी होते Happy

भारताची अश्वासक सुरुवात! मयांक लवकर बाद झाला पण पुजाराने नांगर टाकलायं बघुया कधी तो पळवतो धावफलक. दुसर्‍या सत्रात त्याच्याकडून थोड्या जलद धावा यायला हव्यात. खेळपट्टीवर लवकर चेंडू फिरायला आणि उडायला लागणार असे वाटतेय. नाणेफेकीचा महत्वाचा कौल तर रहाणेने मिळविला. अश्विन, जडेजा, आणि अक्षर महत्वाचे ठरतील.

कुणी काहीही म्हटले तरी आमच्या गाववाल्या अजिंक्य रहाणेला माझा कायम पाठींबा!! Wink

दुसर्‍या सत्रात त्याच्याकडून थोड्या जलद धावा यायला हव्यात. खेळपट्टीवर लवकर चेंडू फिरायला आणि उडायला लागणार असे वाटतेय.
>>>>

+७८६
म्हणून हे सतत संथ खेळणारे प्लेअर काही वेळा नकोसेही वाटतात. जेव्हा धावा काढणे सोपे असते तेव्हा त्या जास्तीत जास्त जमवताही यायला हव्यात.

रहाणेचा फॉर्म परत यावा याला माझ्याही शुभेच्छा आहेत. त्याचा खेळ बघायला बरे वाटते. जरी तो अपयशी ठरून बाहेर गेला तरी त्यावर कायमची फुल्ली मारू नये.

पंत मात्र शर्मासारखा दिलखुलास आहे. सगळ्यांशी जुळवून घेणारा. हा स्वभावच असतो ज्यामुळे हे प्लेअर आवडीचे होतात
>>
हे स्वभाव कसे कळतात?
त्यांच्यासोबत कधी संवाद झाला होता का? की ड्रेसिंग रूम मधून कुणी खास विश्वासू सूत्रांनी टिप्स दिल्या?

की नेहमीप्रमाणे मेरे मन को भाया...???

पण काहीही म्हणा ऋन्मेष जे लिहितो ते मनाला पटण्यासारखं असतं. एखादया खेळाडूच्या भक्तिभावाने आंधळा होऊन तो काहीही लिहीत नाही.

बोकलत धन्यवाद.. चाहते असावे.. भक्त असू नये Happy

हे स्वभाव कसे कळतात?
>>>>
ईथे लोकं ज्याचा चेहराही पाहिला नाही त्याचा स्वभाव ओळखतात. मग ज्या खेळाडूंना खेळताना बघतो जवळपास रोजच त्यांचे स्वभाव कळणे अवघड आहे का?
पंतचे म्हणाल तर कधी प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दलही त्याच्या मनात आकस, राग, चीडचीड, खुन्नस दिसली नाही. सतत हसतानाच दिसतो.
हेच शर्मालाही लागू..
बाकी ईथे ईतर खेळाडूंच्या स्वभाव ॲटीट्यूडबद्दलही अनेकांच्या कैक पोस्ट सापडतील. मीच काही पहिला नाही एखाद्या खेळाडूच्या स्वभाव, ॲटीट्यूड, व्यक्तीमत्वावर भाष्य करणारा .. फक्त माझे याबाबतचे निरीक्षण जरा जास्त चोख आहे ईतकेच Happy

सामना ' लो स्कोअरींग ' होण्याची दाट शक्यता.>>
बाद झालेले चौघेही जलदगती गोलंदाजांचे बळी. फिरकी अजून वळायची आहे!

ह्या सामन्यातील आपल्या संघात ९ व्या क्रमांकापर्यंत बर्‍यापैकी फलंदाजी करणारे खेळाडू आहेत!

बाद झालेले चौघेही जलदगती गोलंदाजांचे बळी
>>>
ते देखील अनावश्यक.. चुकीचे शॉट, फॉर्म याचे बळी ...
४०० सहज व्हावेत अशी खेळपट्टी मला वाटते..

जेमिसन ला भारताचा ऑफिशियल नेमेसिस जाहीर करावा असं वाटायला लागेल इतपत चांगली बॉलिंग केलीय त्याने.

श्रेयस अय्यरचे सुरूवातीचे रणजीमधले दिवस कुणाला आठवतात का? त्याची खूप मोठी बॅकलिफ्ट होती असं मला आठवतंय. आत्ताचा त्याचा स्टान्स खूप वेगळा वाटतो. मस्त खेळलाय डेब्यू मॅचला. जडेजाची बॅटींगमधली प्रगती आणि कन्सिस्टन्सी पहाता तो ऑफिशियल सहावा बॅट्समन म्हणून टेस्ट टीममधे खेळू शकतो.

४- २५८ बर्‍यापैकी धावसंख्या आहे! अजून १०० ते १५० धावा जोडल्यास पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी मिळेल.. जडेजा/अश्विन/अक्षर ह्यांची फिरकी चालू शकते अर्थात. विल्यमसन आणि टेलर हे दोघेही फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकतात. बघुयात काय होते ते.

आज भारताच्या पहिल्या चार विकेट बघून एक जाणवलं. रहाणे शाॅट मारताना बाद झाला तर इतर तिघे बचावात्मक खेळतांना. पण चौघेही चेंडू स्विंग होतोय याबाबत सतर्क होते व बाद झाले तो चेंडू खेळतांनाही व्यवस्थित पोझिशनमधेही होते. फक्त, चेंडूची Lateral movement खेळतानाचं तंत्र घोटवून न घेतल्याने कुठेतरी जराशी कमतरता रहाते व तें हेरूनच किवी गोलंदाजांनी नेमका फायदा उठवला. द्रविड हया कमतरतेवर लक्ष केंद्रित करेलच व त्याचा सकारात्मक परिणाम लवकरच पहायला मिळेल ही रास्त अपेक्षा.
उद्या सकाळचं पाहिलं सत्र नीट पार पाडलं तर भारताला 400+ ची मजल मारणं शक्य आहे.

आत्ताचा त्याचा स्टान्स खूप वेगळा वाटतो. मस्त खेळलाय डेब्यू मॅचला. जडेजाची बॅटींगमधली प्रगती आणि कन्सिस्टन्सी पहाता तो ऑफिशियल सहावा बॅट्समन म्हणून टेस्ट टीममधे खेळू शकतो. >> त्याने स्टान्स बदलला ह्याबद्दल त्याने सांगितले होते. दिल्ली साठी कुजका अय्यर २-३ वर येऊ लागला तेंव्हा त्याने बदल केला मोठे शॉट्स खेळता यावेत म्हणून.

154-4 ! सामना ' लो स्कोअरींग ' होण्याची दाट शक्यता. >> लो माहित नाही पण पिच एकंदर लव़अरच रसातळा ला जाणार असे वाटतेय. बुमरा असता तर मस्त शॉर्ट पिच बॉलिंग बघायला मिळाली असती. बॉल रिव्ह्रस होत होता त्यामूळे उमेश खूश असेल. "रहाणे शाॅट मारताना बाद झाला" राहाणे मस्त टचमधे वाटत होता Sad

आतां अचानक तो एक संकुचित वृत्तीचा, खास गुणवत्ता नसणारा खेळाडू असल्याची प्रतिमा त्याच्यावर लादली जातेय किंवा ती उघडकीस येतेय >>>>> हे असं बाहेरही कोणी म्हणातय का? की इथलं मायबोलीवरचं एक मत फक्त ? >> काल ह्या मताच्या समर्थनासाठी दिल्ली कॅपीटल ने कसे श्रेयस ला रिलीज केले असे सांगण्यात आले. ह्यात तो दुसरा चॉईस होता पण अय्यर ने ऑप्ट आऊट केले हा भाग संभावीत पणे वगळला गेला होता. चालायचच. हे मुद्दामहून न करता फक्त सोर्स कोट् केला होता ही मखलाशी वाचायलाही तयार राहा आता.

त्यांच्यासोबत कधी संवाद झाला होता का? की ड्रेसिंग रूम मधून कुणी खास विश्वासू सूत्रांनी टिप्स दिल्या? >> अँकी अजून असले प्रश्न कसे काय पडतात बाबा तुला ? अरे प्लेयर्स काय घेऊन बसलास, इथे लोकांना अंबानी नि शाहरुख मॅच फिक्स कशा करतात हे कळवतात. एखाद्या प्लेयर ने ' आपण असे का केले' ह्याचे दिलेल्या उत्तरा पलीकडे त्याने तसे का केले हे त्यालाही माहित नसलेले समजते . पॅव्हिलीयन मधले हावभाव बघून डिक्लेअर करण्याचे आदेश कसे दिले गेले हे समजते. अय्यर तर किस झाड की पत्ती रे !! पाँटींग स्वतः रोज फोन करून अपडेट देतच असणार ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. अय्यर चे दिवस भरले आहेत त्या फडतूस कोहली चे भरले आहेत तसे. (हि बातमी कदाचित अनुष्का ने सांगितली असावी बहुधा)

कोणी काही बोला. माझे तीर निशाणेपे लागत आहेत. अंदाज बरोबरच येत आहेत. Happy
अय्यरच्या गुणवत्तेबाबतही जे म्हटलेले तेच. भारतातल्या कंडीशनमध्ये तो खेळणार असे म्हटलेले आणि खेळलाच.
आफ्रिकेच्या दौऱ्यावर त्याला नेले आणि खेळायची संधी मिळाली तर त्याचा खरा कस लागणार आहे. कारण त्याला दर्जेदार वेगवान माऱ्यासमोर कम्फर्टेबल पाहिले नाहीये.

आजची अय्यरची खेळी मात्र गरजेची होती ते पुजारा आणि रहाणेची झोप उडवायला. जर हे दोघे भारतातही चमक दाखवत नसतील तर चटकन बाहेर पडतील. पुजारा गेला तरी चालेल. बिलकुल मजा येत नाही त्याचा खेळ बघायला. भले रन्स करेल, जिंकवून देईल, पण डोळ्यांना सुखावणारे क्रिकेट हि सुद्धा प्रेक्षकांची एक गरज असते. द्रविड संथ का असेना मस्त वाटायचे त्याचे शॉट बघायला.

श्रेयसचे शतक !! जबरीच.
अश्विनने आत्ता मारलेले दोन्ही चौकार पण भारी होते.

रच्याकने,
रोहीत, शॉ, सुर्या, रहाणे, श्रेयस, शार्दुल आणि शेवटी बुमराह* असा लाईन-अप बघितला की मी सुडोमि Proud
(*बुमराह मुंबईचा नाहीये पण मुंबई इंडियन्सचा असल्याने अपवाद Happy )

असा लाईन-अप बघितला की मी सुडोमि Proud>>>

एकदा सुनिल गावस्कर कर्णाधार असताना ८-९ मुंबईकर होते संघात.

आणि बेदी कर्णधार असताना ५-६ दिल्लीकर!

कालच चार विकेट गेल्या तेव्हा म्हटलेले. सहज चारशे व्हावेत अशी खेळपट्टी आहे. आपलीच फलंदाजी गंडलीय. आता न्यूझीलंडच्या शतकी सलामीने दाखवून दिले खेळपट्टी हे दोन दिवस तरी चांगलीच होती. प्रमुख फलंदाजांपैकी फॉर्मात असलेले विश्रांती घेत आहेत आणि फॉर्म नसलेले रहाणे पुजारा खेळत आहेत.. जर पहिल्या डावात लीड नाही मिळाला तर अवघड होईल आपले.

*आता न्यूझीलंडच्या शतकी सलामीने दाखवून दिले खेळपट्टी हे दोन दिवस तरी चांगलीच .होती * - उद्या पहिल्या सत्रातील त्यांची फलंदाजी बघूनच हें नक्की होईल.

हे एक्सक्यूज झाले..
आपल्याला पहिल्या दिवसातील दुसरे सत्र वाईट गेलेले Happy

*हे एक्सक्यूज झाले*-..गैरसमज ! त्यांच्या फलंदाजीला मानलंच. पण ' आपलीच फलंदाजी गंडलीय ' ती फक्त स्विंग होणार्या चेंडूंवर . म्हणून, तुलना करताना ते स्विंग आपल्यापेक्षा किती चांगला खेळतात हेंही पहायला नको ? तें मुख्यतः उद्या सकाळीं निश्चितपणे कळेल, इतकंच.

विराट कर्णधार असता तर आतापर्यंत खूप टीका झाली असती पण आवडता रहाणे असल्याने कोणी काही बोलणार नाही

पण ' आपलीच फलंदाजी गंडलीय ' ती फक्त स्विंग होणार्या चेंडूंवर >>> दोन दिवसात जो काही होत होता त्या स्विंगला खेळणे अवघड म्हटले तर आपली फलंदाजी खरेच गंडलेली आहे Happy
आणि आपल्या जास्त विकेट पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रातच गेल्याने पहिल्या सत्रातच काय ते स्विंगबाबत कळेल हे गैरलागू होते ईतकेच.

असो, आता स्पिनर आलेत गेममध्ये...

न्यूझीलंड 270-8 .
*साऊदीच्या नावापुढे...एकूण ५ बळी ह्या डावात!* -अक्षर पटेलच्या नांवावर 5 बळी हया डावात !
* आपलीच फलंदाजी गंडलीय. * - आपली गंडली स्विंगविरूद्ध, त्यांची स्पीन विरूद्ध ! ( आतां पीचबद्दल कुणी काही म्हटलं तर ' हे एक्सक्यूज झाले ' म्हणायचं कीं नाहीं हें प्रत्येकाने ठरवावे !)
चेंडू खूप खालीं रहातोय ( Low bounce ). कुणाचीही मोठी धांवसंख्या होणं आतां कठीणच !

296 सर्वबाद !
फक्त 1 विकेट तेज गोलंदाजीला ! ( स्पीन इतकी भेदक ठरत असतांना 9 विकेट गेल्यावर अचानक उमेश यादवला गोलंदाजी देण्याचं कारण कळलं नाहीं).
साहाने छान यष्टीरक्षण केलं. किपर म्हणून तोही अव्वल दर्जाचा आहे, हया जाणकारांच्या मताला दुजोरा मिळाला.

Pages