क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

आणि हे कोहलीच करू शकतो. राहुल त्याच्यापेक्षा छान वरती खेळू शकतो आणि कोहलीची प्रेशर ॲबसॉर्ब करायची क्षमता पाहता तो खाली खेळू शकतो.
कोहलीनेच आता चौथे यावे. तेच बेस्ट आहे. तसेच पंतला पाचवा नंबर कायम करा.
आपण सचिन तेंडुलकरलाही चौथ्या क्रमांकावर खेळवायचा वेडेपणा करून झालाय. सचिन जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण चेस करताना प्रेशर सिच्युएशनला तुम्ही त्याला चौथे आणाल तर तिथे तो सर्वोत्तम नाही. जर २००७ वर्ल्डकपला सचिन चौथा न येता ओपनर असता तर त्याचा निकाल वेगळा असता...

योगायोग बघा.. तेव्हा द्रविड कर्णधार होता.. आता कोच आहे. पुन्हा तीच चूक तो करणार नाही Happy

>>
वेंकटेशला गेल्या सामन्यात वर बघायला आवडले असते. आज औपचारीकता शिल्लक होती.
पण बहुधा पहिल्या सामन्यात टेंशन नको म्हणून तेव्हा त्याला ट्राय केले नसावे.
""शर्माने केलेय" काहीतरी योग्यच विचार केला असणार.

तेव्हा "द्रविड" कर्णधार होता.. आता कोच आहे. पुन्हा तीच चूक तो करणार नाही Happy

नक्की कोण ठरवते फलंदाजीची क्रमवारी? कोच की कॅप्टन? की आपापल्या मुद्द्याच्या सोयीसाठी ते बदलत राहते? म्हणजे योग्य विचार करुन पाठवले म्हणून शर्मा आणि चूक होती म्हणायचे असले की द्रवीड?

घडा पालथा आहे हे माहित असूनसुद्धा आज वीकेंड आणि रिकामा वेळ असल्यामुळे थोडे पाणी ओततोय Wink

कोहली समर्थकांना न्यूझीलँडचे दोन सलग पराभव आणि शर्माने जिंकलेले सलग टॉस हे खूपच जिव्हारी लागलेले दिसत आहेत Lol . सोशल मीडियावर रडखडत जिंकले, दव खूप होतं अशी कारणं देत सुटलेत. कोहली टॉस हारून पराभवाचे रतीबच्या रतीब टाकायचा ते चालायचं यांना. दोन वर्षांपूर्वीच शर्मा कॅप्टन झाला असता तर आता वर्ल्ड कप आपला असता.

खेळाडू व कर्णधार म्हणून रोहित मला खूप आवडत असला, तरीही त्याच्या टाॅस जिंकण्याचं मात्र मला फार कौतुक व्हावसं वाटत नाहीं. किंबहुना, संध्याकाळच्या टी20 सामन्यांचे निर्णय इतक्या सातत्याने फक्त टाॅसवरच अवलंबून रहाताहेत, हें मला खूपच खटकतं. (प्रमुख कारण - दंव ). अशा सामन्यांत, टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी घेणार्या संघाला मिळणारा ॲडव्हांटेज हा खूपच एकतर्फी व इतर सामन्यांपेक्षा खूपच निर्णायक ठरणारा असतो व त्याबद्दल विचार होणं आवश्यक वाटतं.

मी मागेच म्हटल्याप्रमाणे टॉस जिंकणं हे काही नशीब वैगरे नाही. शर्मा आणि टॉसची फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यामुळेच तो नेहमी टॉस जिंकतो.

काल सुरुवातीलाही दव होते.
ईनफॅक्ट दोन्ही सामन्यात मला नाही वाटत दवाचा काही एक्स्ट्रा ॲडवांटेज मिळाला आपल्याला.
पहिला सामना तर शेवटी फसलेला आपला. लास्ट ओवरला चांगला बॉलर नसल्याचा फटका बसला त्यांना. कालच्यातही शर्मा राहुल लवकर गेले असते तर तसेच झाले असते असे वाटले. अचानक पंतचे दोन सिक्स आले आणि अचानक गेम संपला.
आपण काल त्यांना रोखला मस्त. आश्विन मस्त टाकतच आहे. काल हर्षल पटेलचीही साथ मिळाली.
जर सोशल मिडीयावर कोणी शर्मा जिंकला म्हणून दव दव करत असेल तर ते अन्यायकारक ठरेल.

आपल्या इनिंगमध्ये फिल्डरकडे बॉल जमिनीवरून जाताना हायड्रोफॉईल बोटीसारखा दोन्ही बाजूंना सरासरा पाणी उडवताना दिसत होता, तसा आधी नव्हता. (बाऊंडरी हाय-डेफ कॅमे-याची कमाल!)

नक्की कोण ठरवते फलंदाजीची क्रमवारी? कोच की कॅप्टन? की आपापल्या मुद्द्याच्या सोयीसाठी ते बदलत राहते? म्हणजे योग्य विचार करुन पाठवले म्हणून शर्मा आणि चूक होती म्हणायचे असले की द्रवीड?

>>>>

स्वरुप माझी कोट केलेलीच पोस्ट पुन्हा वाचा.

आता शर्मा कर्णधार होता तर तेव्हा २००७ ला द्रविड कर्णधारच होता.
दोन्ही वेळा कर्णधारांनाच बॅटींग ऑर्डरबाबत जबाबदार धरलेय Happy

शर्मा द्रविड जोडी आल्याचा मलाही आनंद झालाय. पण म्हणून द्रविड चुकलाच नाही असे कसे म्हणू?
सचिनला चौथे पाठवणे असो वा १९४ ला घोषित करणे असो, जे चुकले ते चुकलेच !

वेंकटेश वगैरे नवीन लोकांना गेम 'क्लोज आऊट' करण्याच्या परिस्थितीमधलं ट्रेनिंग आणि एक्सपिरीअन्स मिळालं तर भारताला चांगला फायदा होईल पुढे. त्या कारणाने मला कालची मॅच आवडली.‌ १५ बॉल १५ हवी असलेली मॅच काढता यायला हवी, नाहीतर मुशफिकुर आणि महमदुल्ला होतात. Proud

>>
दोन्ही वेळा "कर्णधारांनाच" बॅटींग ऑर्डरबाबत जबाबदार धरलेय
आता "कोच" आहे. पुन्हा तीच चूक तो करणार नाही Happy

वाक्यावाक्यात विसंगतीतील सातत्य मात्र वाखाणण्याजोगे आहे Wink Wink

*प्रथम गोलंदाजी. नोबॉल पडला चुकून.* खरंय, साॅरी ! ( वयंम मोठ्ठं खोटंम ! Wink )

*जर सोशल मिडीयावर कोणी शर्मा जिंकला म्हणून दव दव करत असेल तर ते अन्यायकारक ठरेल.* -या दोन्ही मॅचेस गुणवत्तेवरच जिंकले, याबाबत दुमत नाहीं. पण 1) रोहित टाॅस जिंकतो, हें कर्णधार म्हणून त्याची विशेष ओळख होवूं नये, इतकंच. सर्वच खेळांत नशीबही स्वतंत्रपणे आपला खेळ खेळतच असतं ( उदा. मॅराडोनाचा ' हॅड ऑफ गाॅड ' गोल ) पण त्याची सांगड खेळाडूंच्या कौशल्याशी घालणं अयोग्य, असं मला वाटतं 2) संध्याकाळच्या टी20 सामन्यांत टाॅसला प्रमाणाबाहेर निर्णायक महत्व येतं, हा माझा सर्वसाधारण मुद्दा आहे, आत्तांच्या दोन सामन्यांबाबत नाहीं.

अहो स्वरुप,

जेव्हा एखादा शर्मासारखा सिनिअर खेळाडू कर्णधार होतो तेव्हा तो निर्णयांना जास्त जबाबदार असतो तर एखादा नवखा पंत कर्णधार झाला असता तर कोचच्या अनुभवाचे महत्व वाढते. बरेच महत्वाच्या निर्णयामागे कोच असतो.

पण याचा अर्थ असा नाही की शर्मा कर्णधार आहे म्हणून कोच नुसते कर्णधार बोलेल ते अमलात आणायला असेल. त्याचे स्वत:चेही ईनपुट असतेच. त्यात जर कोचही द्रविडसारखेच मोठे नाव असेल तर ईन्फ्लुअन्सही जास्त राहणार. जे निर्णय मैदानाबाहेरून घेतले जातात तिथे जोडीने काम होणार. द्रविडने स्वत: कर्णधार असताना त्याकडून जी चूक घडली ती आता तो कोच असताना करणार नाही ईतके सिंपल आहे हे.

आणि हो, उद्या चूक झाली तर पहिले नाव मी शर्माचेच घेणार. मग द्रविडचे. ईथे या मुद्द्याबाबत द्रविड सचिनचा जुना संदर्भ आला म्हणून त्याचेही नाव आले ईतकेच.

पण 1) रोहित टाॅस जिंकतो, हें कर्णधार म्हणून त्याची विशेष ओळख होवूं नये, इतकंच
>>>

जोक करतात ओ लोकं कोहलीला चिडवायला. का हे ईतके सिरीअसली घ्यायचे Happy

कोहली आणि टॉसची फ्रिक्वेन्सी मॅच नाही होत. तसंही कोहलीने आता निवृत्ती घ्यावी. वाटत नाही त्याच्यात क्रिकेट बाकी आहे.

ओक्के!
द्रवीड आणि शर्मा मिळूनच महत्त्वाचे निर्णय घेत असतील यात कुणालाही शंका नसावी फक्त इथे श्रेयवादासाठी शब्दांची सोयीस्कर फिरवाफिरव करु नये इतकी माफक (किंवा तुझ्या बाबतीत अवाजवी) अपेक्षा आहे Happy

मान्य करणार नाहीस हे माहितच होते पण असोच!!

*जोक करतात ओ लोकं कोहलीला चिडवायला* - साॅरी, कोहली हें सर्व वाचतो ( व चिडतो ) हें खरंच माहित नव्हतं मला ! Wink

भाऊ Lol

भाऊ, Happy

स्वरूप, यू टू? Wink

उद्या डेड रबर. इंडिया ऑलरेडी इतक्या नविन प्लेयर्स ना घेऊन खेळतायत कि अजून काही बदल करतील असं वाटत नाही. पण द्रविड चा पूर्वानुभव पहाता कदाचित आवेश खान किंवा गायकवाड ला संधी मिळाली तर फार आश्चर्यही वाटणार नाही.

श्रेयवादासाठी शब्दांची सोयीस्कर फिरवाफिरव करु नये
>>>

शर्माही कर्णधार आहे आणि द्रविडने जेव्हा सचिनला चौथे पाठवले तेव्हा तो देखील कर्णधारच होता.
आता कोच या भुमिकेत त्याने तीच चूक करू नये.
सारे स्पष्ट आहे.
फक्त द्रविड, सचिन यांच्या चुका दाखवल्या की ईथे लोकांना आवडत नाही याची कल्पना असल्याने वाद ताणत नाही Happy

द्रविड चा पूर्वानुभव पहाता कदाचित आवेश खान किंवा गायकवाड ला संधी मिळाली तर फार आश्चर्यही वाटणार नाही.
>>>>

@ स्वरूप, हे बघा. यांनीही फक्त द्रविडचेच नाव घेतले. यांनाही विचारा. कोणाला खेळवायचे कोणाला नाही हे कर्णधार ठरवतो की कोच? Happy

@ फेरफटका, आपली पोस्ट योग्यच आहे. फक्त उदाहरणासाठी वापरली आहे Happy

बापरे! सहज काही लिहायची सोयच राहिली नाहीये मायबोलीवर. इथून पुढे ‘टीम मॅनेजमेंट‘ असं सर्वनाम वापरावं म्हणजे शब्दच्छलापुढे चर्चा होईल.
पूर्वीच्या ‘टीम मॅनेजमेंट्स‘ चा सहसा टीम न बदलण्याकडे कल असायचा. नविन टीम मॅनेजमेंट अधिक प्रयोगशील (हॉर्सेस फॉर कोर्सेस, संधी असल्यास बेंच स्ट्रेंथ आजमावणे ई.) असेल का ह्याचं मला कुतूहल आहे.

संघबदल खरेतर एकाचवेळी जास्त करू नये. जिंकणे देखील गरजेचे आहे. विनिंग मोमेंटम कायम राहू द्या. शर्माच्या कप्तानीत व्हाईटवॉश येऊ द्या..
तसेही शर्मा आणि पंत टेस्टला नसल्याने त्यांना आराम मिळेलच.
पण अर्थात दोनेक बदलांनी हा संघ कमकुवतही होणार नाही त्यामुळे बदल संभवतात.
जसे चहलला सहज संधी देता येईल. तो बेस्ट बॉलर आहे. आश्विनला तेवढाच आराम. टेस्टला सारी मदार त्याच्यावरच असते.
राहुलच्या जागी गायकवाडला संधी देतात का हे बघणे रोचक राहील. दिली तर बरे. अन्यथा हे शर्मा राहुल पुन्हा सामना बोअर करून टाकतील..

बापरे! सहज काही लिहायची सोयच राहिली नाहीये मायबोलीवर. इथून पुढे ‘टीम मॅनेजमेंट‘ असं सर्वनाम वापरावं म्हणजे शब्दच्छलापुढे चर्चा होईल.
>>>

+७८६ Happy

*इथून पुढे ‘टीम मॅनेजमेंट‘ असं सर्वनाम वापरावं म्हणजे शब्दच्छलापुढे चर्चा होईल.* +1. शिवाय, अनेक चांगले नवनवीन पर्याय उपलब्ध असणे, ही देखील निवडसमिती व 'टीम मॅनेजमेंट'साठी एक डोकेदुखीच म्हणावी लागेल. थोडं सहानुभूतीने त्यांच्या कठीण कामाकडे पहाणंच योग्य.

*रोहित शर्मा की आंधी में उड़ गए बाबर आजम, कोहली-धोनी भी छूटे पीछे, बना डाले 6 महा रिकॉर्ड*

*पहला रिकॉर्ड*
रोहित शर्मा ने इस मैच में 29वीं बार 50 से अधिक का स्कोर बनाया है । मैच में रोहित शर्मा ने अर्धशतक लगाया । यह एक रिकॉर्ड है, इससे पहले विराट कोहली भी सबसे अधिक यानी 29 बार यह कारनामा कर चुके हैं । रोहित ने 4 शतक और 25 अर्धशतक लगाए हैं, हालांकि  कोहली अब तक शतक नहीं लगा सके हैं । टी20 इंटरनेशनल में सबसे ज्‍यादा शतक लगाने का वर्ल्ड रिकॉर्ड रोहित के ही नाम है ।

*दूसरा रिकॉर्ड*
रांची के मैदान में रोहित शर्मा और केएल राहुल ने न्‍यूजीलैंड के खिलाफ शतकीय साझेदारी की । दोनों की यह टी20 इंटरनेशनल की 5वीं शतकीय साझेदारी है, दोनों ने कुल 117 रन बनाए । यह भी यह रिकॉर्ड है । इससे पहले ये रिकॉर्ड पाकिस्तान के बाबर आजम और मोहम्मद रिजवान के नाम था ।

*तीसरा रकॉर्ड*
रोहित शर्मा ने मैच में 5 छक्के लगाए, इसी के साथ उनके इंटरनेशनल क्रिकेट में 454 छक्के हो गए हैं । वे इंटरनेशनल क्रिकेट में 450 छक्के लगाने वाले पहले भारतीय बन गए हैं । अभी दुनिया के सिर्फ तीन खिलाड़ी ही ऐसा कर सके हैं, रोहित से पहले क्रिस गेल और पाकिस्तान के शाहिद अफरीदी भी ऐसा कर चुके हैं।

*चौथा रिकॉर्ड*
रोहित शर्मा टी20 इंटरनेशनल में 25वीं बार 50 से अधिक रन बनाकर टीम को जीत दिलाने वाले पहले खिलाड़ी बन गए हैं, उन्‍होंने तीन बार शतक और 22 बार अर्धशतक लगाकर ऐसा किया है । विराट कोहली 20 बार यह कारनामा करके दूसरे नंबर पर हैं।

*पांचवां रिकॉर्ड*
रोहित शर्मा ने बतौर खिलाड़ी टी20 इंटरनेशनल में 13 बार 100 से अधिक रनों  की साझेदारी की है, यह भी एक रिकॉर्ड है । शर्मा ने केएल राहुल के साथ 5 बार, शिखर धवन के साथ 4 बार, विराट कोहली के साथ 3 बार और सुरेश रैना के साथ एक बार 100 से अधिक रन जोड़े हैं ।

*छठा रिकॉर्ड*
रोहित शर्मा ने बतौर कप्तान घर में सबसे कम मैचों में 10 जीत हासिल करने वाले भारतीय कप्तान बन गए हैं । रोहित ने अपनी कप्तानी में टीम इंडिया को घरेलु मैदान में 11 में से 10 टी20 मैच में जीत दिलाई है । विराट कोहली और एमएस धोनी ने यहां तक पहुंचने के लिए 15 से अधिक मैच लिए थे ।

Pages