क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

आज रखडत जिंकलो एकदाचे. ओनामा तरी चांगला झाला. अय्यर ला बॉलिंग का दिली नसावी ? पाचच बॉलर्स ना द्यायची असा नियम आहे का ? मला स्वतःला अय्यर नि राहुल ह्यांचा स्वॅप बघायला आवडेल. राहुल वन डे मधे पण ४-५ वर मस्त खेळतोय त्यामूळे त्याच्यासाठी बदल सोपा आहे. अय्यर डावखुरा असल्यामूळे सलामीला फायदा होईल.

जर सगळे स्क्वाड उपलब्ध असेल तर चहर नि भुवी ह्यांच्यापैकी एकच कोणी तरी खेळवू म्हणून भुवी च्या जागी ह्या सिरीज मधे तरी आवेश खान किंवा सकारिया ह्यांना वापरायला हवे होते असे वाटते. इथून पुढचे सहा महिने पुढच्या वर्ल्ड कपच्या साठी वेगवेगळे खेळाडू चाचपून मग नंतरचे ३-४ महिने एक एक्स्टेंडेड स्क्वाड बनवणे हा आपला फोकस असेल अशी आशा करूया.

क्रिकेट वरचा एक दिवाळी अंक पाहायला मिळाला , चांगला वाटला , e-अंक आहे त्यामुळे लेखांबरोबर विडिओ पण आहेत. बऱ्याच मान्यवरांचा सहभाग आहे. www.crickatha.com

राहुल वन डे मधे पण ४-५ वर मस्त खेळतोय त्यामूळे त्याच्यासाठी बदल सोपा आहे.
>>>
वन डे मध्येही चटकन आठवणार्‍या खेळी पहिल्या डावातीलच आहे त्याच्या त्या नंबरवर. दुसर्‍या डावात स्पेशली फिनिशर म्हणून प्रेशर सिच्युएशनला टेस्ट झालेल्या खेळी आठवत नाहीत. वन डे असो वा ट्वेंटी-२०. तिथे धोनी आणि युवराजच्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. आज पंतही कसा गोंधळलेला पाहिले आपण. राहुल त्या भुमिकेला सूट होऊ शकतो का हे चेक करताही येईल. पण ट्वेंटीमध्ये तरी त्याच्या ओपनिंग स्लॉटला बिलकुल धक्का लाऊ नये. कोहलीपेक्षाही जास्त शॉट आहेत त्याच्याकडे आणि टॉप ऑर्डरला कोणापेक्षाही फास्ट खेळू शकतो तो. त्यामुळे त्याचा प्रत्येक सामन्याला मॅक्जिमम वापर झाला पाहिजे. आज व्यंकटेशला पंतच्या जागी पाठवून टेस्ट करता आले असते. संधी घालवली.

२०१९ पासून राहुल ४-५ वर सक्सेसफुली खेळतोय . तो सलामीला यायचा पण संघातली जागा गेल्यानंतर ४-५ वर यायला लागला नि मस्तच खेळून गेला होता.
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/422108.html?class=2;temp...

राहुल च्या बोलण्यात कोहलीला आणण्याचे कारण कळेल ? "कोहलीपेक्षाही जास्त शॉट आहेत त्याच्याकडे" ही अशी सरसकट विधाने करताना "तुला वाटते" हा क्रायटेरिया ह्यापलीकडे डेटा देऊ शकशील ?

*रोहीत शर्मा अश्यांना सामना हरल्यावर जेवायला घेऊन जातो असे मागे वाचलेले.* - ह्याला फिक्सींगचाही वास येवूं शकतो ! ( हाही जोकच आहे बरं , भाऊ ! )

"अय्यर ला बॉलिंग का दिली नसावी ?" - ह्याचं आश्चर्य वाटलं. व्यंकटेश अय्यर बॉलिंग करणार नसेल तर इशान किशन आणि त्याच्यात डावं - उजवं (pun intended) करणं अवघड आहे. कदाचित पुढे हे चित्र बदलेल आणि तो सहावा बॉलर म्हणून बॉलिंग करेल.

"भुवी च्या जागी ह्या सिरीज मधे तरी आवेश खान किंवा सकारिया ह्यांना वापरायला हवे होते असे वाटते." - बॉलर्स रोटेट होतील असं वाटतंय, बघू.

"मला स्वतःला अय्यर नि राहुल ह्यांचा स्वॅप बघायला आवडेल." - इंटरेस्टींग आयडिया! आणि त्याचे स्टॅट्स पहाता, नॉट अ बॅड वन.

इंटरेस्टींग आयडिया! आणि त्याचे स्टॅट्स पहाता, नॉट अ बॅड वन. >> डाऊन अंडर वर्ल्ड कपचा विचार करून बघा. बॉल बॅट वर येणार्‍या पिचेस वर पुल हुक सारखे फटके आनंदाने मारणार्‍या नि डावखुरे असल्यामूळे बॉलरची लय घालवू शकणार्‍या किशन किंवा वेंकटेश अय्यर सारख्या फलंदाजांना ओपन करू देण्यात फायदा दिसतो. राहुल टेम्पो नीट अ‍ॅडजस्ट करतो हा त्याला खाली आणण्याचा फायदा आहे. समजा पहिले २-३ पटकन गेले तर तो श्रेयस नि पंत बरोबर डाव सांभाळू ही शकतो हा दुहेरी फायदा.

. व्यंकटेश अय्यर बॉलिंग करणार नसेल तर इशान किशन आणि त्याच्यात डावं - उजवं (pun intended) करणं अवघड आहे >> +१ जर आपण रोहित, कोहली असे दोघे संघात असणारच असे करणार असू तर पहिल्या बॉलपासून क्लीन हिट करू शकणारे ( यशस्वी असे जरुरी नाही) अय्यर नि किशन असल्याने बॅलॅन्स येईल असे वाटते.

@ असामी, राहुल ४-५ वर खेळताना.
तुमचीच लिंक वापरतोय
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/422108.html?batting_posi...

पहिली फलंदाजी असेल तर एवरेज ७८, दुसरी फलंदाजी असेल तर २४
दोन्हीकडे ८ सामन्यांचा सँपल साईज. आता कुठच्या सामन्यात काय पिच काय परिस्थिती होती वगैरे सोडा. पण माझे निरीक्षणानुसारच हे आकडे आहेत. ४-५ वर चेस करताना अजूनही तो टेस्ट झालाच नाहीये.

बाकी कोहली ग्रेटेस्ट आहे म्हणून त्याला तुलनेला घेतला. ज्या फ्लोमध्ये राहुल खेळतो तो त्याच दर्ज्याचा प्लेअर वाटतो. पण हेच त्याला पाचव्या नंबरला प्रेशर सिच्युएशनमध्ये चेस करताना जमेल का, तो फ्लो तसाच राहील का हे जेव्हा टेस्ट होईल तेव्हाच समजेल.
फार कश्याला विचार करायचा, धोनी आणि कोहलीचेच उदाहारण घ्या. दोघे चेसमास्टर आहेत. दोघांची चेस करतानाची विजयी सामन्यातील वन डे सरासरी अनुक्रमे १०० / ९० वगैरेच्या घरात आहे. पण तेच त्यांच्या बॅटींग पोजिशन एकमेकांशी बदलल्या तर हे आकडे असेच राहतील का याची ग्यारंटी नाही.

आता कुठच्या सामन्यात काय पिच काय परिस्थिती होती वगैरे सोडा. निरीक्षणानुसारच हे आकडे आहेत. ४-५ वर चेस करताना अजूनही तो टेस्ट झालाच नाहीये. >> ह्यातल्या पहिल्या वाक्यानंतर मी फक्त "तुला पटत नाही, सोडून दे" एव्ह्ढेच म्हणून शकतो. मी मांडलेले मत तुला जनरल जर कॉमेंटरी कडे लक्ष दिले असतेस तर ऐकायला मिळाले असते. असो.

बाकी कोहली ग्रेटेस्ट आहे म्हणून त्याला तुलनेला घेतला. >> सॉरी मी ह्यावर काही बोलू इच्छित नाही. माझे कोहली ला मधे आण्यण्याबद्दलचे पोस्ट "कोहलीपेक्षाही जास्त शॉट आहेत त्याच्याकडे " ह्या काँटेक्स्ट मधे होते. परत आता तू धोनी ला मधे आणले आहेस त्या मुद्द्याचा संबंध काय तर जागा बदलल्या तर यशाची गॅरंटि नाही. जर हीच भूमिका असेल तर मुळात कोहलीला तरी कशाला मधे आणलेस ? "राहुल च्या ओपनिंग स्लॉट वरून ५-६ वर ढकलणे नि कोहली चे कायम ३-४ क्रमांकावर खेळणे " किंवा "कोहलीचे शॉट्स नि राहुलला फिनिशर म्हणून खाली आणयण्याचा मुद्दा" ह्यांचा एकमेकांशी काय संबंध तुला दिसतो तो तो माझ्या अल्पबुद्धीच्या पलीकडचा आहे. अमक्याकडे तमक्यापेक्षा अधिक शॉट्स आहेत म्हणून त्याला कितवा क्रमा़ंक द्यायचा ह्यापेक्षा एकूण संघाचे कंपोझिशन बघून ठरवलेले चांगले असे माझे मत.

एकूण संघाचे कंपोझिशन बघून ठरवलेले चांगले असे माझे मत. >> एकूण संघाचे कंपोझिशन बघूनच मी देखील ते लिहिले आहे. ओपनर्सच्या जागा नाही तर अ‍ॅप्रोच बदलणे गरजेचे आहे. अर्थात तो शर्माने बदलणे गरजेचे आहे, राहुल पर्रफेक्ट आहे. आणि शर्माही तो अ‍ॅप्रोच बदलताना जाणवतेय. या फॉर्मेटमध्ये ओपनर खूप महत्वाचे ठरतात. तिथे बेस्टच प्लेअर हवेत. राहुलला तिथून हलवणे पायावर धोंडा होईल. उदाहरणार्थ हैदराबादची मिडल ऑर्डर गडबडतेय म्हणून वॉर्नरला ओपनिंगवरून हटवून मिडलऑर्डरला टाका हे काही सोल्युशन होत नाही. मला तर वाटते की शर्माने तिन्ही सामने स्वतः राहुलसोबत ओपनिग करून एक सॉलिड स्टेटमेंट द्यावे की आमची ओपनरची पहिली पसंती हिच राहणार. आणि तसेही एखादा सुर्या वा ईशान किशन जर तीन नंबरवर खेळणार असेल तर कोहली चौथा होईल. मग राहुल कश्याला आणि पाचवा हवा.

वनडे मध्ये हा गोंधळ घालू शकतात. तिथे पंतला आराम देत राहुल कीपर म्हणूनही राहू शकतो. मग चौथा पाचवा कुठेही येऊ शकतो. पण बिचार्‍याची शतके होणार नाहीत..

कोहली चौथा होईल. मग राहुल कश्याला आणि पाचवा हवा. >> मी आधी लिहिलय तस शर्मा नि कोहली ह्यापैकी एकच कोणी तरी माझ्या टी २० संघात असेल. चौथा पाचवा का हवा ह्या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघात ४-५-६ वर कोण सातत्याने खेळू शकतो असे तुला वाटते ? मला राहुल एव्हढा फ्लेक्सिबल नि गुणी वाटतो तो हे सहज करू शकेल. तुला आठवत नाही ह्या पलीकडे जाऊन शोधलस तर इतर असे का म्हणाले आहेत ह्याचे ही उत्तर सापडेल.

तर इतर असे का म्हणाले आहेत ह्याचे ही उत्तर सापडेल >>>> मी ते क्रिकेट एक्स्पर्ट वगैरेंचे ऐकून ते प्रमाण मानून त्यावर मत बनवत नाही. मी कोणाची मते वाचत नाही. मी क्रिकेट बघतो आणि त्यावरून माझी मते बनवतो. त्या लोकांना पैसे मिळतात म्हणून वेगवेगळे पर्म्युटेशन कोम्बिनेशन चर्चेला घेत बसतात Happy

असो, फ्लेक्सिबल लोकांवर अन्याय होऊ नये हे एक झालेच,
पण मला वाटते बेस्ट प्लेअर्सना तुम्ही त्यांची बेस्ट जागा द्या, मग आजूबाजूला टीम बांधा. ते नाही जमले तर शेवटी त्यांची जागा बदलायचा विचार करा.
बाकी शर्माबद्दल वर नमूद केल्याप्रमाणे तो आपला अ‍ॅप्रोच बदलण्यात यशस्वी झाला तर शर्मा राहुल ओपनिंग जोडी हिट होईल. आणि त्यांच्यासोबत कोहलीलाही भारतीय संघात जागा देता येईल. आता कप्तानी सोडली आहे. एकालाच जागा द्यायची म्हटले तर कोहलीलाच काढावे लागेल. ऑस्ट्रेलियातला वर्ल्डकप बघता कोहली हवाच हवा. तो श्रेयस अय्यर पसरलेला मागच्या दौर्‍यात शॉर्ट बॉलवर.. शर्माचे महत्व त्यामुळेही वाढते.

असो. सौ बात की एक बात. राहुल क्लास प्लेअर आहे. जेव्हा त्याच्यावर फारसे प्रेशर नसते तेव्हा लय सापडल्यास तो नुसता सुटतो. पण त्याला प्रेशर ॲबसॉर्ब करून सहजपणे खेळता येत नाही हे माझे आजवरचे निरीक्षण आहे. आकड्यात ते कधी दिसणार नाही कारण जेव्हा प्रेशर नसताना असे प्लेअर सुसाट खेळतात तेव्हा ते सारे आकडे आपल्या फेव्हरमध्ये करून टाकतात. पण प्रेशर सिच्युएशनला गरजेला जे खेळायची गरज असते तेव्हा खेळायची कुवत असलेले कधी या कुठल्या क्रमांकावरचा एवरेज काय आहे या आकड्यात नाही शोधता येणार. ते उपजतच जमणारे प्लेअर शोधा आणि ग्रूम करा. जसे कालचीच मॅच फसत होती. अचानक प्रेशर आलेले. तेव्हाही आपला नैसर्गिक खेळ न घसरणारे किंबहुना अश्याच सिच्युएशनला नेमके उंचावणारे प्लेअरकडे ते टेंपरामेण्ट उपजतच असते. राहुल त्यातला कधी वाटला नाही. पण कोहली आजे तसा. बाकी ज्याचे त्याचे मत आणि निरीक्षण. सर्व एक्स्पर्टचा आदर आहे _/\_

मी कोणाची मते वाचत नाही. >> पूर्ण पोस्ट न वाचता एखादे मधले वाक्य वाचून रिप्लाय करतोस असे जे वाटत होते ते कंफर्म केल्याबद्दल धन्यवाद !

दोन सॉलिड ओपनर्स + नं ३ घेऊन बायलॅटरल सिरीज जिंकायच्या ही स्ट्रॅटेजी शॉर्ट टर्म साठी ठीक आहे. पण मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीनी संघ बांधणी करताना हा अप्रोच योग्य नाही. यामुळे मिड्ल ऑर्डर अन-एक्सपोज्ड राहुन क्रिटिकल प्रेशर सिच्युएशनला कोलॅप्स होते हे आता बरेचदा अनुभवून झालंय.

त्यामुळे तत्कालीन फायदा न बघता थोडा लांबचा विचार करण्याची गरज आहे. नुसते प्लेअर्स बदलून गेल्या आठ वर्षांमधे आयसीसी टायटल जिंकता आलं नाहिये. एकदा अ‍ॅप्रोच बदलून बघायला काही हरकत नसावी.

*यामुळे मिड्ल ऑर्डर अन-एक्सपोज्ड राहुन क्रिटिकल प्रेशर सिच्युएशनला कोलॅप्स होते हे आता बरेचदा अनुभवून झालंय.* +1. सलामीपासून लोअर मिडल ऑर्डर पर्यंत प्रत्येक फलंदाजाची मानसिकता ' हा सामना मलाच जिंकून द्यायचा आहे ' अशीच घडवली गेली पाहिजे. इतरांकडून अपेक्षा पूर्ण
होण्यावर आपला खेळ अवलंबून ठेवणयाची वृत्तीच खरं तर घातक ठरते.

*एबी डिविलियर्स सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.* सलाम व शुभेच्छा, या अफलातून खेळाडूला !

आज मनात आलं, फक्त टाॅसपुरता एक वेगळा कर्णधार नाहीं का नेमतां येत ? ( हाही विनोदच बरं का )

स्प्रिन्कलर्स लावून खेळल्यासारखं वाटावं इतकं दव आहे ग्राऊंडवर. आऊटफिल्डमधे प्लेयर्स घसरताहेत. क्रिकेटसाठी फारसं अनुकूल नाहीये हे.

पण रोहितची कप्तानी मला परत क्रिकेट पाहण्यास भाग पाडत आहे.
>>>
बोकलत +७८६..
मी तर म्हणतो शर्माची कप्तानी कमाल की त्याची फलंदाजी धमाल यावर एक पोल काढावा...

हि पोस्ट लिहितानाच त्याने ४९ वरून सिक्स मारून अर्धशतक केले..
शर्मा ३५ बॉल ५५.. भारत मालिका विजयाकडे...

वेंकटेशला गेल्या सामन्यात वर बघायला आवडले असते. आज औपचारीकता शिल्लक होती.
पण बहुधा पहिल्या सामन्यात टेंशन नको म्हणून तेव्हा त्याला ट्राय केले नसावे.
शर्माने केलेय काहीतरी योग्यच विचार केला असणार.
आता पुढच्या सामन्यात पुन्हा शर्म राहुल शो बघायची ईच्छा नाही.. किमान पहिली फलंदाजी तरी हवी

एकदमच शिस्तीत जिंकलो!!
त्यांचा पॉवरप्लेमधला स्कोअर बघता खुप मस्त रोखले त्यांना शेवटी..... सगळ्यांच जणांनी स्लोअरवनचा मस्त वापर केला!!
रोहित आणि राहुल तर कमालच खेळले!!

परिस्थिती पाहून व्यंकटेश अय्यरला वर खेळवून पहाणं हें आवडलं. >> मला त्याला बॉलिंग दिलेली पण बघायला आवडेल.

त्यामुळे तत्कालीन फायदा न बघता थोडा लांबचा विचार करण्याची गरज आहे. नुसते प्लेअर्स बदलून गेल्या आठ वर्षांमधे आयसीसी टायटल जिंकता आलं नाहिये. एकदा अ‍ॅप्रोच बदलून बघायला काही हरकत नसावी. >> +१ तू आधीचे पोस्ट्स वाचलेस ना ? शतके कसे होणार ह्यापलीकडे गाडी जायला तयार नाही.

*एबी डिविलियर्स सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.* सलाम व शुभेच्छा, या अफलातून खेळाडूला ! >> +१ नेहमी धडकी भरवणारा खेळाडू हा .... आमच्या कंपनी मधे काही साऊथ आफ्रिकन्स आहेत. अ‍ॅबे एकही ट्रॉफी जिंकून देऊ शकला नाही ह्याबद्दल ते नेहमीच खट्टू असतात त्याच्यावर. मी नेहमी आम्हाला चालला असता तो तसाही असे म्हणतो. इथले कोहली बद्दल काही जणांची मते वाचली की मला नेहमी हे आठवते.

नुसत्या रेप्युटेशनवर खेळवण्यापेक्षा करंट फॉर्म वर खेळवणे का जरुरी आहे ती -२० मधे हे आज हर्शद पटेल ने अधोरेखित केले.

माझ्या ॲप्रोच बदलाची स्पेलिंग वेगळी होती वाटते Happy

आजच्या सामन्यातही शर्माने चौथ्याच बॉलला षटकार ठोकून माझे त्याच्या ॲप्रोचमधील बदलाबाबतचे निरीक्षण योग्य असल्याचे दाखवून दिले. भले तो त्याचा आवडता बॉल होता..
तुर्तास तरी हे दोघे सलामीबदलाचा विचार करणार नाहीत. करूही नये...

रोहित शर्माने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात जर एक षटकार मारला तर त्याच्या नावे *४५० षटकारांची* नोंद होणार आहे. असा कारनामा करणारा तो *जगातील तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज* ठरू शकतो.

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकारांचा कारनामा केवळ २ फलंदाजांना करता आला आहे. ज्यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेल यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आतापर्यंत एकूण ५५३ षटकार मारले आहेत. तर शाहिद आफ्रिदीने ४७६ षटकार मारले आहेत.

माझ्या ॲप्रोच बदलाची स्पेलिंग वेगळी होती वाटते >> आम्ही टीम बिल्डींग चा ॲप्रोच बदलायला हवा असे म्हणतोय. तू "शर्माबद्दल वर नमूद केल्याप्रमाणे तो आपला अ‍ॅप्रोच बदलण्यात यशस्वी झाला " बोलतोअयस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

Pages