क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

+७८६
व्हाईटवॉश दिला
मालिकावीर झाला
कॅप्टन लीडींग फ्रॉम द फ्रंट !

विक्रमांवर विक्रम करत सुटला आहे. हिटमॅन शर्मा लिजंड आहे !

सामना बघता आला नाही. क्षणचित्रे पाहिली. आजही सुरुवातीपासूनच शर्माचा ॲप्रोच बदल पुन्हा एकदा जाणवला. पुन्हा एकदा त्याने तुटून पडल्यासारखीच सुरुवात केली आणि पॉवरप्ले स्वबळावर कॅश केली.
त्यानंतर विकेट पडल्यावरही थांबला नाही. त्याची विकेट गेल्यावरही मागचे थांबले नाहीत. बॅट फिरवतच होते. फार आश्वासक आहे हा बदल. आज यश मिळाले. मिळत राहील. कारण हाच योग्य ॲप्रोच आहे. त्यामुळे अध्येमध्ये अपयश आले तरी आता बदलू नये.

या सर्वात, रोहीत शर्माचे २०-२० ईंटरनॅशनलमध्ये १५० सिक्स झाले.
असे करणारा तो जगातला दुसरा फलंदाज आहे.
गप्टील १६५ सिक्स मारून पहिल्या क्रमांकावर आहे.

*..त्याची विकेट गेल्यावरही मागचे थांबले नाहीत. * - ही गोष्ट रोहितच्या व्यक्तिगत कामगिरीपेक्षाही अधिक महत्वाची आहे व त्याचं श्रेयही रोहितसाठी व्यक्तिगत विक्रमांपेक्षा अधिक असावं.

ही गोष्ट रोहितच्या व्यक्तिगत कामगिरीपेक्षाही अधिक महत्वाची आहे व त्याचं श्रेयही रोहितसाठी व्यक्तिगत विक्रमांपेक्षा अधिक असावं.
>>
येस्स

चहरची बॅटींग आश्वासक होती. बॉलिंग सुधारली तर खरच ७-८ साठी सेट होईल. भारतातल्या पिचेस वर ते इफेक्टीव्ह आहेत ह्यात आश्चर्य वाटत नाही. ऑस्ट्रेलिया मधे चहर नि हर्शल पटेल कसे खेळू शकतील (बॉलिंग नि बॅटींग दोन्ही ) हे बघायला मजा येईल.

ही गोष्ट रोहितच्या व्यक्तिगत कामगिरीपेक्षाही अधिक महत्वाची आहे व त्याचं श्रेयही रोहितसाठी व्यक्तिगत विक्रमांपेक्षा अधिक असावं. >> +१.

नक्कीच !
किंबहुना मलाही रोहीतच्या बदललेल्या अ‍ॅप्रोचबद्दल त्याच्यातील फलंदाजाचे नाही तर कप्तानाचेच कौतुक जास्त आहे.
ज्याने एकदिवसीयमध्ये तीन द्विशतके, आणि २०-२० मध्येही चार शतके केली आहेत, आणि हे दोन्हीही पराक्रम करणारा जो जगात एकमेवच आहे. त्याच्या फलंदाजीच्या आणि फटकेबाजीच्या क्षमतेवर शंका घ्यायचा प्रश्नच उदभवत नाही.
जे मी पहिल्या सामन्यापासून बोलतोय, रोहीतचा फलंदाजीचा अ‍ॅप्रोच बदलला आहे. त्याने कप्तान होताच स्वतःच पहिले अ‍ॅप्रोच बदलून ईतरांसमोर उदाहरण ठेवले. आणि ते काल मिडल ऑर्डर ते लोअर मिडलऑर्डरमध्ये झिरपलेले दिसले. ज्याला कॅप्टन लीडींग फ्रॉम द फ्रंट म्हणतात Happy

आता मला अ‍ॅक्चुअली असे वाटते की शर्मा-कोहली या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये आपसात सामंजस्याने एक डिल व्हावे. शर्माला व्हाईट बॉलची पुर्ण कप्तानी द्यावी. कोहलीने क्लासिकल क्रिकेट बघावे. या दोन्ही कप्तानांनी एकमेकांच्या कप्तानीत कसलाही राग लोभ मत्सर न ठेवता शंभर टक्के जिंकायला योगदान द्यावे. येत्या दोन वर्षात जे तिन्ही फॉर्मेटचे एकेक वर्ल्डकप होतील त्यातील एक ते दोन चषक हा संघ नक्कीच जिंकायची क्षमता राखतो.

त्याने कप्तान होताच स्वतःच पहिले अ‍ॅप्रोच बदलून ईतरांसमोर उदाहरण ठेवले. >> तू असे म्हणतोयस का कि त्याने हा चेंज स्वतः कप्तान झालयावरच केला नि आधी नाही ? कारण तो ओपन कप्तान झाल्यावर नाही तर आधीपासून करतो आहे. वर हे म्हणतोयस बघ तू " या दोन्ही कप्तानांनी एकमेकांच्या कप्तानीत कसलाही राग लोभ मत्सर न ठेवता शंभर टक्के जिंकायला योगदान द्यावे." हे असे करत नाहीत हे तुला का वाटते ? म्हणजे कोहली कप्तान होता तेंव्हा to 110% देत असणारच. म्हणजे रोहित १००% करत नव्हता होय ! Lol

म्हणजे कोहली कप्तान होता तेंव्हा to 110% देत असणारच. म्हणजे रोहित १००% करत नव्हता होय ! >>>> एकीकडे श्रयस अय्यरवर बिनबुडाचे आरोप. नंतर रोहित शर्मा कॅप्टन नसताना १००% देत नव्हता अश्या अर्थाची पोस्ट...
असाम्या मला आता असं वाटतय की काळाला सोकावू द्यावं ! म्हणजे चर्चा न होता ती फक्त स्वगत रहातील आणि इगोर करता येतील.

म्हणजे चर्चा न होता ती फक्त स्वगत रहातील आणि इगोर करता येतील. >> खरय तुझे ! मीही तेच करणार होतो रे फक्त साळसूदपणे दर दिवसा आड हे असे सडके - किडके पोस्ट्स बघून वैताग येतो. पण ठीक आहे तू म्हणतोस ते करून बघू.

ये कप्तानी बडी कुत्ती चीज होती है असामीबाबू.. ये अच्छो अच्चोंको बदल देती है..
त्यात भारतीय कप्तानी म्हणजे नुसती ईज्जत नाही तर एक ब्रांड वॅल्यू सुद्धा असते जी मोक्काट पैसा घेऊन येते. या मानमरातब पैश्याची सवय लागली तर फिरून निव्वळ एक खेळाडू म्हणून परफॉर्म करणे तितके सोपे नाही. कोहलीचा स्वभाव पाहता ते आणखी अवघड.
अरे ते दिल्लीचे कर्णधारपद गेले तर अय्यरभाऊ नाराज झाले. हे तर भारतीय क्रिकेटचे सर्वोच्च पद आहे..
हुमायुन नेचर आहे हे. यात कोणाला दोष नाही देणार मी.
अर्थात हे मी सांगून तुम्हाला पटणार नाही. एखाद्या एक्स्पर्टने कुठे सांगितले असेल तर लेख शोधावा लागेल Happy

नंतर रोहित शर्मा कॅप्टन नसताना १००% देत नव्हता अश्या अर्थाची पोस्ट...
>>>

आई ग्ग.. हे वाचलेच नाही.. मी माझ्या लाडक्या रोहीतबद्दल असे बोलेन.. काहीही आपल्या मनाचे अर्थ Proud
अहो आधी कोहलीच कप्तान असताना प्रश्न नव्हता. आता त्याला बदलून रोहीत झाल्यावर हे प्रश्न उदभवणार आहेत. त्याचा फटका संघाला बसू नये हिच ईच्छा. तसे होत असेल तर माझा कोणी लाडका नाही. संघहित पहिले.

दिल्लीचे कर्णधारपद गेले तर अय्यरभाऊ नाराज झाले
IPL तर फिक्स असतय ना? कदाचित पंतनेच सांगितले असेल की चांगलं खेळू नको म्हणून. पॉंटिंग पण सांगू शकतो. नाहींयर सिनियर म्हणून धवन ने अय्यरभाऊला आऊट व्हायचा सल्ला दिला असेल. पण दोष एकट्या अय्यरभाऊलाच का?

राहुल बाहेर गेल्यामूळे बिचार्‍या गिलला परत ओपन करावे लागेल असे दिसतेय. मधल्या फळीत अय्यर किंवा सूर्या येणार. कीपर म्हणून साहा परत येतो कि नविन रक्ताला वाव देऊन भरत येतो ह्याची उत्सुकता आहे. साहा ची कारकीर्द कुठल्या दिशेने जाईल ह्याचे इंडिकेशन मिळेल. चुकीच्या काळात जन्माला आल्यामूळे पहिल्या पाच भारतीय किपर्स मधे बसू शकला असता असा कीपर फुकट गेला Sad गोयल, शिवलकर, मुजुमदार ह्या यादीमधे अजून एक भर !

अहो रात्रीचे चांदणे, त्या दिवशीच्या सामन्यातही अय्यरची नाराजी स्पष्ट दिसली जिथे तो आणि पंत दोघे फलंदाजीला होते आणि अय्यर त्याकडे फारसे बघायला तयार नव्हता. आता सोडेल तो दिल्ली. आणि दिल्लीवालेही त्याला संघाचे वातावरण बिघडवायला ठेवणार नाहीत असे वाटते. पंत मात्र शर्मासारखा दिलखुलास आहे. सगळ्यांशी जुळवून घेणारा. हा स्वभावच असतो ज्यामुळे हे प्लेअर आवडीचे होतात Happy

वर साहाचा विषय निघालाय. त्याला मुजुमदारच्या पंक्तीत बसवू नका. त्याला संधी मिळाली आहे खूप. त्याने कीपिंगसोबत फलंदाजीत काही चमकदार केले असते तर त्याला स्थान असते संघात. पण मुजुमदारला चमकायची संधीही नाकारण्यात आली. कदाचित मिडल ऑर्डरच्या खेळाडूंच्या जागेला धोका ठेवायचा नव्हता त्यात बिचाऱ्याचा गेम झाला. युवराजसिंग हा बॅक अप मिडल ऑर्डर प्लेअर राहिला. दर वर्षाला एखाद दुसरी टेस्ट खेळायचा. पण मुजुमदारला संधी शेवटपर्यंत नाकारली गेली Sad

Most times Top Scoring for a Team

In Test - Sachin Tendulkar (78)
In ODI - Sachin Tendulkar (129)
In T20I - Rohit Sharma (30)*

वैय्यक्तिक माईलस्टोन्स हे काही टीम स्कोअरकार्डमधून वेगळे काढून पाहिले जात नाहीत. त्या रन्स आणि विकेट्स चा टीम ला च फायदा होतो आणि म्हणून ते स्पृहणीयच असतात. पण एकीकडे वैय्यक्तिक रेकॉर्ड्स वर टीका करायची आणि दुसरीकडे - कुठल्याही कारणाने - त्याची भलामण करायची - हे दुटप्पी धोरण अनाकलनीय आहे.

साहा ची कारकीर्द कुठल्या दिशेने जाईल ह्याचे इंडिकेशन मिळेल” - मला नाही वाटत कि विकेटकिपींग मधे लगेच काही बदल घडेल. तसंही पंत फर्स्ट चॉईस आणि साहा बॅकप असा प्रेसिडेन्स ठरलाय. ह्यात अजून एखाद-दोन वर्षांत साहा ची जागा कदाचित किशन घेईल असा माझा अंदाज आहे.

मनाचे श्लोकः
“ ते दिल्लीचे कर्णधारपद गेले तर अय्यरभाऊ नाराज झाले.”
“ त्या दिवशीच्या सामन्यातही अय्यरची नाराजी स्पष्ट दिसली जिथे तो आणि पंत दोघे फलंदाजीला होते आणि अय्यर त्याकडे फारसे बघायला तयार नव्हता.”
“ कदाचित मिडल ऑर्डरच्या खेळाडूंच्या जागेला धोका ठेवायचा नव्हता त्यात बिचाऱ्याचा गेम झाला. ”

जय जय ‘अभि’वीर समर्थ!! Happy

पण एकीकडे वैय्यक्तिक रेकॉर्ड्स वर टीका करायची
>>>>
गलत ! टिका वैयक्तिक रेकॉर्डवर नाही तर त्या करायच्या नादात कोणी संघहित विसरत असेल तर त्यावरच करतो. आणि अश्या विक्रमांचे मग कौतुकही राहत नाही.
ईथे जे विक्रम टाकतो त्यातून ओवरऑल प्लेअर कसा आहे ते कळतो. त्याचे ते ओवरऑल कौतुक असते.

उदाहरणार्थ सचिनच्या शंभराव्या शतकाच्या चक्करमध्ये बांग्लादेशशी पराभव पत्करावा लागला त्यावर टिका करतो भले मी सचिनला क्रिकेटचा देवच का मानत असेना.
पण याचा अर्थ त्याच्या उरलेल्या ९९ वा शंभराच्या शंभर शतकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतो असे नाही. त्यातल्या कित्येक खेळींनी अमाप आनंद दिलाय त्याचे कौतुक करायचे नाही का?
आणि हो, सचिनच्या किती शतकांनी जिंकवून दिलेय असा बावळट प्रश्न विचारून मी कधीच सचिनवर टिका करणार नाही. त्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३५० चेस करतानाच्या झुंझार १७५ धावांच्या खेळीला कोणी त्यात आपण जिंकलो नाही म्हणून कोणी सचिनद्वेष्टा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असेल तर ते हास्यास्पद ठरेल.

@ अय्यर विरुद्ध पंत,
माझे निरीक्षण कडक असते. हुमायुन नेचरचा माझा गाढा अभ्यास आहे. जे मी आज ईथे लिहिले आहे ते काही दिवसांनी न्यूजमध्ये असेल बघा Happy

आताच ही न्यूज वाचली.
बातमी पक्की असेल तर अय्यर गेला दिल्लीबाहेर Happy

टीमों द्वारा रिटेन खिलाड़ी

चेन्नई सुपरकिंग्स- महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज गायकवाड़, रविन्द्र जडेजा

मुंबई इंडियंस- रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरोन पोलार्ड (इशान किशन के भी आसार हैं)

दिल्ली कैपिटल्स- ऋषभ पन्त, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे

आरसीबी- विराट कोहली और ग्लेन मैक्सवेल

ह्यात अजून एखाद-दोन वर्षांत साहा ची जागा कदाचित किशन घेईल असा माझा अंदाज आहे. >> शक्य आहे. अ टीम मधे त्याला आधी घेतला नव्हते. एकच कोणि तरी नवखा कीपर होता. मग पश्चातबुद्धी झाली नि किशन ला घेतले नि तो थेट पहिला कीपर झाला. सगळीच गम्मत आहे.

टेस्ट मधे साहा असेल कि नाही हे सात, आठ वर येणारे कितपत बॅटींग करतील ह्या भरोशावर ठरेल असे वाटते. किवीज ची टीम जास्त बॅलॅन्सड वाटतेय. बॅटींग मधे आपण कमकुवत वाटतोय. - विशेशतः टेस्ट मॅच प्रॅक्टीस नसल्यामूळे.

गेल्या आयपीएल पर्यंत बरेच जाणकार श्रेयस अय्यरकडे भारताचा भविष्यातील संभाव्य परिपक्व कर्णधार म्हणून पहात असत. आतां अचानक तो एक संकुचित वृत्तीचा, खास गुणवत्ता नसणारा खेळाडू असल्याची प्रतिमा त्याच्यावर लादली जातेय किंवा ती उघडकीस येतेय. खरं, खोटं देवच जाणे !

अचानक तो एक संकुचित वृत्तीचा, खास गुणवत्ता नसणारा खेळाडू असल्याची प्रतिमा...
>>>>

गुणवत्ता आहे. भारतात वा सिमिलर कंडीशनमध्ये खेळताना हमखास धावा टाकणार. बाहेरचे माहीत नाही. ऑस्ट्रेलियात शॉर्ट बॉलला अडखळताना पाहिलेले. जास्त खेळेल तसे समजेल.

संकुचित वृत्ती म्हणाल तर कर्णधार झाल्यास वेगळा स्वभावही दिसेल. पण माणसाचा खरा स्वभाव, खरे रूप त्याच्या मनाजोगते जेव्हा होत नाही तेव्हा समजते.. आणि ते जाणवलेय.
कोहली शर्मानंतर आधी राहुल पंत हेच दोघे कप्तान उपकप्तान म्हणून बघायला आवडतील. कसोटीचे मात्र कळत नाहीये..

अपेक्षित टीम
तीन स्पिनर
स्पेशली जडेजा आणि अक्षरला बॅटींग येत असताना...
आता फक्त फलंदाजांनी धावा करणे गरजेचे.. मग हे तीन स्पिनर नाचवणार..

आतां अचानक तो एक संकुचित वृत्तीचा, खास गुणवत्ता नसणारा खेळाडू असल्याची प्रतिमा त्याच्यावर लादली जातेय किंवा ती उघडकीस येतेय >>>>> हे असं बाहेरही कोणी म्हणातय का? की इथलं मायबोलीवरचं एक मत फक्त ?

अय्यर, रहाणे, आश्विन, अक्षर, उमेश, ईशांत..
आजच्या अकराच्या टीममध्ये सहा प्लेअर दिल्लीचे कॅपिटलचे आहेत. पंतही असता तर ७ असते. धवनला पुन्हा संधी दिली असती तर ८ असते..

हे असं बाहेरही कोणी म्हणातय का? >>> बाहेरची लोकं आयपीएलबद्दलही बरेच उलटसुलट बोलतात. बाहेरच्यांना ईथे विचारतेय कोण Happy

Pages