क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा तरी बोलल्यासारखे कर की मनुष्या. नुसतेच आपले अगं अगं म्हशी सुरू असते>>> मी ठरवलं होतं काही लिहायचं नाही आणि क्रिकेट पाहणं सोडून द्यायचं. पण दुपारी झोपलो होतो तेव्हा धोनी माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला क्रिकेट पाहणे आणि मायबोलीवर लिहिणे थांबवू नको. तुझ्या पोस्टीं वाचून अनेक जागतिक दर्जाचे क्रिकेटवीर घडणार आहेत. नियतीने तुझ्या हातून एक महान कार्य करण्याचे योजिले आहे. अजून बरंच काही बोलत होता. आठवेल तसं लिहितो इथे. इथे लिहू की विपु करू तुम्हाला? तुम्ही म्हणाल तसं.

मी ठरवलं होतं काही लिहायचं नाही आणि क्रिकेट पाहणं सोडून द्यायचं. >> ह्या बाबती मधे तुम्ही नि र्‍ह्ण्म्या दोघे एकदम सेम आहात हे खरं Lol

क्रिकेटमध्ये राजकारण होत नाही
फक्त धोनी तेवढे सिनिअरचा पत्ता कट करतो
हेच ज्यांचे फॅक्ट आहे त्यांना बाकी सारे थिअरीजच वाटणार Happy

आज चा सामनावीर रो हिट मॅन शर्माने दाखवून दिले की बाप कोण आहे.
२०१७ की १८ पासून शर्माने आजची खेळी मिळून १५ वेळा ५०+ धावांची खेळी केली आहे.
भारत १५ च्या १५ वेळा जिंकला आहे.
हे आहे फॅक्ट

या वर्ल्डकपनंतर आपल्याला कोच द्रविड आणि कर्णधार शर्मा हे कॉम्बिनेशन लिमिटेडच्या दोन्ही फॉर्मेटला दिसेल

पंतसोबत पांड्याची फटकेबाजी देखील आज धमाल होती. पुढे मोठ्या फरकाने जे सामने जिंकयचे आहेत त्यासाठी पांड्या आपल्याला गरजेचा आहे हे देखील त्याने दाखवून दिले.

बाकी आज शर्माचा स्टान्स भारीच होता. मी अंडर आर्म असे खेळायचो. आज त्याचे शतक होईलच असे वाटलेले. हुकले. पण अजून दोन सामने आहेत त्याच्यकडे...

“ हेच ज्यांचे फॅक्ट आहे त्यांना बाकी सारे थिअरीजच वाटणार” - स्ट्रॉमन आर्ग्युमेंट्स आणि व्हॉटअबाऊट्री सोडून काही मुद्दे असतील तर बघ मित्रा. Happy

क्रिकेटच्या अस्सल चाहत्यांना आणि या क्रिकेटकट्ट्ट्याच्या निमित्ताने रेग्युलर भेटणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

कालच्या दणकेबाज विजयानंतर आपण आपल्यातील आणि अफगाणमधील रनरेटचा फरक बराच कमी केल्याने आता विश्वचषकात ईंटरेस्ट कायम राहिला आहे. आता तो न्यूझीलंड अफगाण सामना म्हणजे सेकंडलास्ट दिवसापर्यंत राहील. त्यात अफगाणने न्यूझीलंडला हरवले तर मग काय मज्जाच. आणि अफगाणला ती संधी ३०-३५ टक्के तरी नक्कीच आहे.

*...न्यूझीलंडला हरवले तर मग काय मज्जाच. ..* - कोणाच्याही कोंबड्याने कां होईना, ( आपलं नशीब ) उजाडलं कीं झालं ! Wink

मी तर नामिबियाने न्यूझीलंडला धक्का द्यायचीही आशा बाळगून आहे.
नामिबिया लढतेय यावेळी. आणि न्यूझीलंड स्कॉटलंडशीही काही दिमाखात जिंकली नव्हती. गप्टिलच्या खेळीने त्यांना वाचवलेले.

इंडियन क्रिकेटला महासाडेसाती लागले. कधी संपणार ही महासाडेसाती? कोहलीला कॅप्टन पदावरून बाजूला काढणार ही गुड न्यूज येते न येते तोवर द्रविड कोच झाल्याची न्यूज आली. आता टी20 मध्ये भारताची पहिल्या दहा ओव्हरमध्ये एकही विकेट जाणार नाही पण रन्स असतील 5. वीस ओव्हरमध्ये जेमतेम एक विकेट जाऊन आपण 30-40 रन्स करू.

*...तोवर द्रविड कोच झाल्याची न्यूज आली. ...* - द्रविडच्या पूर्वीच्या प्रतिमेवर जावूं नका ! आतां तो भयंकर आक्रमक झाला आहे. आत्ताच भर ट्रॅफिकमधे बॅट उगारून इतरांच्या अंगावर बेफामपणे ओरडताना पाहिला त्याला एका जाहिरातीत !! Wink

>>आत्ताच भर ट्रॅफिकमधे बॅट उगारून इतरांच्या अंगावर बेफामपणे ओरडताना पाहिला त्याला एका जाहिरातीत !! Wink

Happy

बाय द वे म्हणजे आत्ताची भारतीय टीम रवी शास्त्रीसारखी खेळत होती का काय?

<<धोनी ऐवजी एखादा मानसतज्ञ असता तर बर झाल असत.>>
ऐवजी कशाला, त्यालाहि ठेवा नि मानसशास्त्रज्ञहि ठेवा - आपल्याला काय पैशाची कमी आहे?
टेड लॅसो नावाची एक सिरियल मध्यंतरी इथे बर्‍याच जणांनी पाहिली, त्यात असेच एका मानसशास्त्रज्ञ बाईलटीनोकरी देतात, नि नंतर सगळे खेळाडू चांगले खेळू लागतात.

*आत्ताची भारतीय टीम रवी शास्त्रीसारखी खेळत होती का काय* - द्रविड कोच असला कीं तो कोचिंग करणारच व त्यामुळे टीम त्याच्यासारखी खेळेल अशी आतां शक्यता. शास्त्रीच्या बाबतीत ती शक्यता नव्हतीच ना ! Wink

द्रविड कोच म्हणजे कोहलीची वन डे कप्तानीही गेली.
तसेही २०-२० आणि एकदिवसीय संघात फार फरक नसल्याने दोघांचा कर्णधार एकच हवा.
कसोटीसाठी द्रविड कोहली जोडी एकत्र काम कसे करतेय हे बघणे रोचक. द्रविड तसा शांत समजूतदार असला तरी तत्वांसाठी हट्टी माणूस आहे. जो सचिनला १९४ वर थांबवू शकतो तो काहीही करू शकतो.

द्रविड आणि गांगुली यांनी मिळून तो निर्णय घेतला होता. दोघेही सचिनवर जळायचे. जास्त कोण जळायचा माहीत नाही.

द्रविड कोच असला कीं तो कोचिंग करणारच व त्यामुळे टीम त्याच्यासारखी खेळेल अशी आतां शक्यता. शास्त्रीच्या बाबतीत ती शक्यता नव्हतीच ना ! >> ह्या लॉजिक ने तेंडूलकर आपला कोच नि लारा वेस्ट इंडीज चा कोच हवा Wink

क्रिकेटच्या अस्सल चाहत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

ह्या लॉजिक ने तेंडूलकर आपला कोच नि लारा वेस्ट इंडीज चा कोच हवा Wink
>>>

आपल्याला वैयक्तिक विक्रम नकोत नुसते Happy

द्रविड आणि गांगुली यांनी मिळून तो निर्णय घेतला होता.
>>>>

हो, दादाने द्रविडच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी मारलेली असे मलाही वाटते. मी तो सामना लाईव्ह पाहिलेला. डाव घोषित करायच्या दोनेक ओवर आधी दादाने द्रविडजवळ जात त्याला काहीतरी सांगत ईशारा केलेला. पण अर्थात नेमके काय बोलला हे माहीत नसल्याने तो पुरावा नाही झाला. म्हणून द्रविडनेच ते काम केले असे बोलणे उत्तम.

सचिनने मात्र हा वाद जास्त चिघळवला नाही. तसेच त्या सामन्यातही पुर्ण निष्ठेने खेळला. या बाबतीत तो खरेच एक पुरुषोत्तम होता. ९९ वर चुकीचा बाद देऊनही तो अंपायरवर चिडून जात नाही, हे त्याला स्पेशल आणि क्रिकेटचा देव बनवते. कोहली म्हणून त्याचे विक्रम मोडू शकतो. त्याची जागा घेऊ शकत नाही.

*ह्या लॉजिक ने तेंडूलकर आपला कोच नि लारा वेस्ट इंडीज चा कोच हवा * - हो, पण ते दोघेही द्रविडसारखंकोचिंग करतील का ? Coaching is a different cup of tea !
*कोहली म्हणून त्याचे विक्रम मोडू शकतो. त्याची जागा घेऊ शकत नाही.* +1

सचिन कप्तान म्हणून साधारण होता. कोच म्हणून काही वेगळे करणार नाही. मेंटर म्हणून उत्तम आहे. पण ॲक्चुअली तो फार मोठा माणूस झाला आहे असे त्याचा ऑरा बघून वाटते. एक विआयपी वाटतो जे पुर्णवेळ खेळाडूंसोबत काम करणार नाही. पण त्याच्या काही टिप्स सुद्धा एखाद्या फॉर्म गेलेल्या वा तंत्रात गडबडलेल्या फलंदाजांच्या कामी येऊ शकतात.

जर श्रीमंत खेळाडूंचा विचार केल्यास धोनीचा नंबर त्यानंतर असेल. पण तरीही तो खेळाडूंमधीलच एक वाटतो. त्याला पुढे मागे कोच झालेले बघताना आवडेल. पण ईतक्यात नाही. जर अजून चारेक वर्ष आपल्याला कुठले आयसीसी चषक जिंकण्यात अपयश आले तर पुढे धोनीला हिरोच्या एंट्रीत कोच म्हणून बघायला आवडेल.
पण त्याने भारतीय क्रिकेटशी जोडलेले राहावे. आणि त्याची जी खेळाबद्दलची अफाट समज आहे ते ज्ञान युवा पिढीत झिरपू द्यावे. एखाद्या ऋषभ पंतला त्याने किपिंग, फलंदाजी, कप्तानी अश्या तिन्ही आघाड्यांवर ग्रूम करावे. कारण शर्मानंतर या राहुल, अय्यर वगैरे लोकांच्या कप्तानीत मला काही विशेष दम वा तसा एक्स फॅक्टर वाटत नाही.
येणारा काळ हा दादा द्रविड लक्ष्मण सचिन या सिनिअर खेळाडूंचा आहे. यांच्या हातात भारतीय क्रिकेटची सत्ता राहणार आहे. ऋषभ पंत हा दादाच्या गूडबूकमधील खेळाडू असल्याने त्याला पुढे भारताचा कप्तान झालेले बघू शकतो.

पण तो ओपनिंगला तर येऊ शकत नाही. पुन्हा शर्मा राहुलने १४ ओवर खेळल्या तर त्याला गेल्या सामन्यासारखेच पंत पांड्या पाठवावे लागतील जे फारच यशस्वी झालेले.

Pages