क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

जास्त रन्स काढत नाही म्हणून प्रतिस्पर्धीच त्याला आऊट करायचे नाहीत.
>>>
द्रविडच्या काही वा बरेच अफलातून टेस्ट इनिंग असल्या तरी हे काही बाबतीत मान्य. म्हणजे बरेचदा तो स्वत:सह आपल्या संघालाही शेलमध्ये घेऊन जायचा. तो डॉमिनेट न करता टुकटुक खेळायचा त्यामुळे बॉलर्सना वाटायचे की आपली बॉलिंग चालतेय. पिचमध्ये जान आहे. आणि सेहवागने त्यांचे पाडलेले खांदे पुन्हा वर उचलले जायचे. क्षेत्ररक्षकही फलंदाजाला घेराव घालून ऊभे राहायचे. यात तो मात्र आपल्या क्लासमुळे तरून जायचा. पण समोरच्यांचे वांदे व्हायचे. अर्थात समोर सचिन असल्यामुळे बरेचदा तो सुद्धा यातून तरून जायचा ते वेगळे.
हल्ली मध्यंतरी पुजारा हेच मोठ्या प्रमाणावर करायचा. कसोटी ही वन डे पेक्षा वेगळी असली तरी त्यातही एक मोमेंटम असतेच. पुजारा ते आपल्याकडून घालवून प्रतिस्पर्ध्यांना बहाल करायचा.

द्रविडने या संघाला तंत्राचे धडे द्यावेत. पण सध्या जी वृत्ती जो ॲटीट्यूड संघात दिसतेय त्याला फारसा धक्का न पोहोचवता. परदेशात जिंकायला तो ॲटीट्यूड गरजेचा आहे.

कुठलेही उथळ स्टेटमेंट करण्याआधी द्रवीडच्या कप्तानीत परदेशात मिळवलेले विजय आणि चेस करताना जिंकल्याचे रेकॉर्ड एकदा नजरेखालून घालावे Happy

धोनी काल पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये नेहमीप्रमाणे आवडून गेला..... Still I haven't left behind वाला डायलॉग तर भारीच!
CSK फक्त एक टीम नसून एक मोठी फॅमिली आहे असे काल त्यांनी कप जिंकल्यानंतर जाणवत होते..... धोनी ज्या अगत्याने आणि आपलेपणाने सगळ्यांशी बोलत होता ते खुप आवडले!
आणि नेहमीप्रमाणेच त्याने सरळ करंडक दुसऱ्या खेळाडूंच्या (या वेळी चहर) हाती देवून तो शांतपणे मागे जाउन उभा राहिला Happy

द्रविडच्या फलंदाजी शैलीमुळे होणाऱ्या साईड ईफेक्टबद्दल लिहिले आहे. त्याच्या अनेक अफलातून इनिंग आहेत असे वर उल्लेखले आहेच. ते रेकॉर्ड कोणी एकमेकांना सांगायची गरज नाही.
सध्याही आपण आधीच्या तुलनेत छान परदेश विजय मिळवत आहोतच.
चेस करताना जे जिंकलो ते सामने पुन्हा चेक करावे लागतील. धोनी युवराज शो असावा बहुतेक त्यात. किंवा पुढचेही खेळले असावेत. एकूणातच धोनी मागे आहे फिनिश करायला हा विश्वास आल्यामुळे चेसिंग बाबत भारतीय क्रिकेटच बदलून गेले. त्याचे श्रेय ईतर कोणापेक्षाही धोनीलाच आधी जायला हवे.
त्या आधीच्या संघात कितीही दिग्गज असले तरी तो मोक्याच्या क्षणी आणि अंतिम सामन्यात कच खाणारा होता. आपण सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलो होतो. शोधले तर एक्झॅक्ट रेकॉर्ड मिळेल.

According to me he is better bet with younger lot >> माझे थोडे वेगळे मत आहे. द्रविड कोच म्हणून जबरदस्त असला तरी त्याचे प्ल्स पॉईंट्स जे आहेत ते खालच्या लेव्हलवर खेळाडूंमधे र्बाणावले तर अधिक उत्तम. शेवटी आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या खेळाडूंमधे दौर्‍या दरम्यान मोठे बदल कठीण असतात ह्याउलट ग्रास रूटपासून फंडामेंटल्स , अ‍ॅटीट्युड अचूक बनलेले असतील तर फक्त ट्युनिंग करायला लागेल जी करणे सोपे असते. सध्या परफेक्ट बॅकप प्लेयर्स नि सुपर्ब अ टीम हे द्रविड चे कर्तुत्त्व.

आपण सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलो होतो. शोधले तर एक्झॅक्ट रेकॉर्ड मिळेल. > > द्रविड असताना सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलेल्या सामन्यांचे रेकॉर्ड तू शोधून देतोस का ? तेव्हढे दोन पोस्ट्स कमी टाक हव तर.

"त्यामुळे बॉलर्सना वाटायचे की आपली बॉलिंग चालतेय. पिचमध्ये जान आहे. आणि सेहवागने त्यांचे पाडलेले खांदे पुन्हा वर उचलले जायचे. क्षेत्ररक्षकही फलंदाजाला घेराव घालून ऊभे राहायचे. यात तो मात्र आपल्या क्लासमुळे तरून जायचा. पण समोरच्यांचे वांदे व्हायचे. अर्थात समोर सचिन असल्यामुळे बरेचदा तो सुद्धा यातून तरून जायचा ते वेगळे." - काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली तर उपकार होतील महाराजा.

द्रविडही तरून जायचा, सचिन ही तरून जायचा. सेहवाग ने तर ऑलरेडी प्रतिस्पर्ध्यांचे खांदे पाडलेले च असायचे. मग प्रॉब्लेम व्हायचा तरी कुणाला?

ते बॉलर्स ना काय 'वाटायचं', हे कसं कळतं बुवा? कारण मॅक्ग्राथ, वॉर्न वगैरे बॉलर्स ची ऑफिशियल वक्तव्य ह्याच्या उलट परिस्थिती दाखवतात.

तू सेहवाग च्या ओपनिंग चा दाखला दिला आहेस. सेहवाग ने टेस्टमधे ओपन करायला २००२ मधे सुरूवात केली. त्याआधी द्रविड ७ वर्षं भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळलाय. कधीतरी 'अभ्यासोनी प्रकटावे' ह्या समर्थांच्या उक्तीचा मान ठेव रे.

>>According to me he is better bet with younger lot >> माझे थोडे वेगळे मत आहे.

अरे मग तेच म्हणतोय ना मी की तो अंडर-१९ किंवा NCA head म्हणून जास्त चांगला आहे!

फे फ च्या पोस्ट मुळॅ नीट वाचले तर हे दिसले "अर्थात समोर सचिन असल्यामुळे बरेचदा तो सुद्धा यातून तरून जायचा ते वेगळे." Happy

अरे मग तेच म्हणतोय ना मी की तो अंडर-१९ किंवा NCA head म्हणून जास्त चांगला आहे! >> अरे हो मी काय अर्थ लावला देव जाणे !

@ फेरफटका
मग प्रॉब्लेम व्हायचा तरी कुणाला?
>>>>
दादा आणि लक्ष्मण या फॅब फोर मधील तंत्रात कमजोर कडीला. तसेच सेहवागच्या जोडीदार सलामीवीराला, वा सेहवागच्या पदार्पणाच्या आधी जे कोणी असेल त्यांना. एकूणातच जर समोरचा फलंदाज सचिनसारखा सॉलिड नसेल वा सेहवागसारखा स्फोटक नसेल तर द्रविड-पुजारा टाईप्स फलंदाज शेलमध्ये जाण्याने फटका संघाला बसतो. याचा अर्थ तो कायम शेलमध्ये जाऊनच खेळायचा असेही नाही. त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही ऐतिहासिक खेळी कलकत्ता आणि अ‍ॅडलेड या सकारात्मकच होत्या. अर्थात दोन्ही वेळा सुरुवातीचे सगळे बाद होत लक्ष्मणच शेवटचा फलंदाज शिल्लक आहे जोडीला यामुळेही ती मेंटेलिटी बदलली असावी. कारण तिथून शेलमध्ये जात सामना कुठेच जाणार नव्हता. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना द्रविडचे हे रूप कधीच नको असणार, त्यामुळे ते निव्वळ बॉल थोपवायचा खेळ करणार्‍या द्रविडचेच कौतुक करणे स्वाभाविक आहे Happy
.

तू सेहवाग च्या ओपनिंग चा दाखला दिला आहेस. सेहवाग ने टेस्टमधे ओपन करायला २००२ मधे सुरूवात केली. त्याआधी द्रविड ७ वर्षं भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळलाय. कधीतरी 'अभ्यासोनी प्रकटावे' ह्या समर्थांच्या उक्तीचा मान ठेव रे.
>>>>
यात द्रविड हा सेहवागच्या ६ वर्षे आधी आलाय याचा संबंध कुठे आला. उलट सेहवाग काळात द्रविडच्या या संथपणाचा फटका सेहवागला नाही ईतकाच अर्थ होतो. तो नसताना ६ वर्षे आधी त्याच्या जागी असलेल्यालाही फटका असा त्याचा अर्थ झाला.

@ असामी
द्रविड असताना सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलेल्या सामन्यांचे रेकॉर्ड तू शोधून देतोस का ?
>>>>>
आधी काही गैरसमज असेल तर दूर करा. म्हणजे हे जर द्रविड कर्णधार असताना असे म्हणायचे असेल तर त्या आधी माझी पोस्ट पुन्हा वाचा.

चेस करताना जे जिंकलो ते सामने पुन्हा चेक करावे लागतील. धोनी युवराज शो असावा बहुतेक त्यात. किंवा पुढचेही खेळले असावेत. एकूणातच धोनी मागे आहे फिनिश करायला हा विश्वास आल्यामुळे चेसिंग बाबत भारतीय क्रिकेटच बदलून गेले. त्याचे श्रेय ईतर कोणापेक्षाही धोनीलाच आधी जायला हवे.
त्या आधीच्या संघात कितीही दिग्गज असले तरी तो मोक्याच्या क्षणी आणि अंतिम सामन्यात कच खाणारा होता. आपण सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलो होतो. शोधले तर एक्झॅक्ट रेकॉर्ड मिळेल.

द्रविड कर्णधार असताना त्याला धोनी होता सोबत. मी म्हटलेय धोनी यायच्या आधीच्या दिग्गजांच्या संघात, म्हणजे दादा कर्णधार असताना, ज्यात द्रविड खेळाडू म्हणून असावा. तेव्हा आपण सलग कित्येक फायनल हरलो आहोत.
थोडेसे गूगल करताच हे मिळाले
02-Aug-2004
'We cannot lose so many finals' - Ganguly

After the Asia Cup final, Sourav Ganguly admitted that India's performances in grand finals bordered on the unacceptable
For Ganguly, it was a ninth loss - against a solitary win - in 13 finals under his stewardship,

https://www.espncricinfo.com/story/we-cannot-lose-so-many-finals-ganguly...

आणि हो, वर ज्या एका विजयाचा उल्लेख केला आहे ते देखील नेटवेस्ट ट्रॉफी असावी. त्यातही टॉप ऑर्डर सेंच्युरी प्लेअर ऐन मोक्याला गळपटल्यावर तो सामनाही जातोय अशी स्थिती झाल्यावर मागे युवराज-कैफ जोडीनेच जिंकवून दिलेले. पुढे धोनी आला युवराजच्या जोडीला आणि त्यामुळे फिनिशिंग टचची जी कन्सिस्टन्सी आली त्याने भारतीय क्रिकेटच बदलले.

असो, या चर्चा चालत राहतील.. जगाच्या अंतापर्यंत....
वर्ल्डकपसाठी वेगळा धागा ईथे काढला आहे.

क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी-२०
https://www.maayboli.com/node/80364

आधी काही गैरसमज असेल तर दूर करा. म्हणजे हे जर द्रविड कर्णधार असताना असे म्हणायचे असेल तर त्या आधी माझी पोस्ट पुन्हा वाचा. >> "द्रविड असताना सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलेल्या सामन्यांचे रेकॉर्ड तू शोधून देतोस का ?" ह्या वाक्यात कर्णधार शब्द कुठे दिसला तुला बाबा ? तू एक विधान ठोकून दिलेस नि आता त्यात एक एक क्लॉज जोडून ते कसे बरोबर होते हे जस्टिफाय करायचा प्रयत्न करतोयस ? वरची लिंक माझ्यासाठी तरी चालत नाही पण मला तू सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे द्रविड हा महान टेस्ट बॅटसमन - त्याला धोनीच्या वन डे च्या कामगिरीशी तुलना करून काय सिद्ध होणार आहे नक्की ? "द्रविडच्या काही वा बरेच अफलातून टेस्ट इनिंग असल्या तरी हे काही बाबतीत मान्य." इथे सुरू करून पुढच्या पोस्ट मधे "चेस करताना जे जिंकलो ते सामने पुन्हा चेक करावे लागतील. धोनी युवराज शो असावा बहुतेक त्यात." इथे आणण्याचा काय संबंध ? स्वरुप द्रविडच्या वन डे चेस बद्दल नसून टेस्ट नि लिमिटेड वन डे चेसेस बद्दल बोलतोय असे मी धरले. तू सलग अंतिम सामने द्रविड च्या कचखाऊ फलंदाजीमूळे हरलो असे म्हणतोयस असे धरून विचारतोय की अशा सलग अंतिम सामन्याम्मधे हरलेल्या सामन्यंची लिस्ट देतोस का ? मला फक्त २००४ चा वर्ल्ड कप आठवतोय. - माझ्या वयाचा दोष असू शकतो. ( खर तर तो ही सामना द्रविडच्या कचखाऊ फलंदाजी मुळे हरलो म्हणायला मन धजत नाही)

"दादा आणि लक्ष्मण या फॅब फोर मधील तंत्रात कमजोर कडीला" - लक्ष्मण चं नाव 'कमजोर तंत्र' ह्या यादीत आल्यावर, माझं बोलणंच खुंटलं. आजवर जे काही लीग क्रिकेट खेळलो, पाहिलं, त्या सगळ्यात लक्ष्मण चं तंत्र कमजोर असल्याचं लक्षातच आलं नव्हतं. बाकी तुझ्या प्रतिसादात नेहेमीप्रमाणे थियरीज, हायपोथिसीस आणि 'अ‍ॅड सॉल्ट टू टेस्ट' वालं लॉजिक असल्यामुळे इतर खेळाडूंच्या रेप्युटेशन चे धिंडवडे निघण्याआधी हा विषय इथेच थांबवू

"द्रविड कर्णधार असताना त्याला धोनी होता सोबत. मी म्हटलेय धोनी यायच्या आधीच्या दिग्गजांच्या संघात, म्हणजे दादा कर्णधार असताना, ज्यात द्रविड खेळाडू म्हणून असावा. तेव्हा आपण सलग कित्येक फायनल हरलो आहोत." - ही प्रोसेस असते. एका रात्रीत गोष्टी घडत नाहीत. धोनी - युवराज जोडीला फिनिशर चा रोल देणं, एक स्ट्रॅटेजी म्हणून टॉस जिंकून चेस करायला सुरूवात करणं ही प्रोसेस कशी सुरू झाली आणि कशी डेव्हलप होत गेली हा प्रवास amazing आहे. २००३ च्या वर्ल्डकपमधे युवराज, कैफ जोडीला बरोबर घेऊन द्रविड ने पाकिस्तान आणि न्यूझिलंड विरूद्ध च्या मॅचेस जिंकून दिल्या होत्या. त्या काळातल्या bi-lateral series मधे सुद्धा हा प्रयोग यशस्वी रित्या राबवला गेला होता. धोनी हा अत्युच्च दर्जाचा फिनिशर झाला. मला वाटतं. ग्रेग चॅपेल ने त्याला त्यासाठी earmark केलं होतं. त्याने ती स्ट्रॅटेजी यशस्वीरित्या राबवली. पण म्हणून आधी च्या सगळ्या पायर्यांचं महत्व कमी होत नाही.

वरील काही निवडकर प्रतिसादातून असे दिसून आले की!
द्रविड्च काय तर सुनिल गावस्कर हा देखिल क्रिकेट खेळण्याच्या योग्यतेचा नव्हता! त्याच्या पेक्षा पंत, पंड्या, युवराज आदी करमणूक करणारे खेळाडू जास्त योग्य! शेवटी सामन्यात करमणूक नसेल तर तंत्र आणि तासन तास फलंदाजी करणे काय चाटायचे? रॉबर्ट, होल्डर, मार्शल, अक्रम, इम्रान, वकार, लीली, थॉम्सन,शोएब, अंडरसन ह्या गोलंदाजाना तर आमच्या पंत वैगेरे आक्रमक फलंदाजानी पहिल्या ५-१० सामन्यात रिटायर्मेंट घ्यायला लावली असती. वाचले बिचारे त्यांना गुच,गावस्कर, गॅटींग. बायकॉट, वेंगसरकर, द्रवीड, लक्ष्मण, रिचर्डसन, वैगेरे तास न तास संथ खेळणारे फलंदाज मिळाले समोर.

८७ चा कप गावस्कर मुळे हरलो. ९२ चा कप विचित्र नियम. ९६ चा कप तेंडूलकर मुळे हरलो. २००० मध्ये द्रविड सर्वोच्च धावा होत्या तरी सुपर सिक्स मध्ये पाकीस्तानला हरविले तेही द्रविडच सर्वोच्च धावा आणि पाकिस्तान ला हरविले आमचे काम संपले मग बाकी ४ सामने हरलो आपण. २००३ जहिरखानने पहिल्या षटकात ११ चेंडू टाकून बर्‍याच धावा दिल्या त्यांनतर गोलंदाजही भांबावले आणि फलंदाज तर आधीच दुकान बंद करून हजेरी लवायला आलेले. २००७ मध्ये तर कळलेच नाही भारतीय संघ होता कि नव्हता हे ही आठवत नाही भारत प्रार्थमिक फेरीतच केवळ बर्मुडा घालून माघारी, लंका आणि बांग्लाने हरविलेले. एकंदरीत हे मोठे खेळाडू काही कामाचे नाही. Wink

तू सलग अंतिम सामने द्रविड च्या कचखाऊ फलंदाजीमूळे हरलो असे म्हणतोयस असे धरून विचारतोय की अशा सलग अंतिम सामन्याम्मधे हरलेल्या सामन्यंची लिस्ट देतोस का ?
>>>>>
चुकीचे धराल तर चुकीचे मागाल.
द्रविडच्या कप्तानीत सलग चेस करून पंधरा सोळा वगैरे सामने जिंकलेलो त्याचा विषय निघाला. त्यातून फिनिशर धोनीचा विषय निघाला. त्यातून धोनी पूर्व काळात आपण कसे बरेच स्पर्धांच्या अंतिम सामन्यात कच खाल्लेली हा विषय निघाला. एकट्या द्रविडचा काही संबंध नाही त्यात.
जे वर रेकॉर्ड दिले आहे. लिंक चालत नसेल तर त्यातील कॉपीपेस्ट केलेले आहे तेवढेच वाचा. नॅटवेस्ट एक नावाला जिंकलेलो आणि ९ अंतिम सामने हरलेलो. फ्रस्टेट झालेलो.
खुद्द दादाही काही वर्षांनी म्हणालेला तेव्हा माझ्याकडे धोनी हवा होता. स्पेशली २००३ वर्ल्डकप फायनलला हवा होता.

@ फेरफटका,
ही प्रोसेस असते. एका रात्रीत गोष्टी घडत नाहीत.
>>>>>
ईतक्या स्पर्धा हरल्या तेव्हा धोनी नव्हताच. प्रोसेस कुठली घेऊन बसला आहात. धोनी नावाचा खेळाडूच भारतीय संघात आला नसता तर तितक्याच स्पर्धा याच प्रोसेसमध्ये अजून हरलो असतो.
धोनी द ग्रेट फिनिशरचे श्रेय ईतरांसोबत वाटायचे असल्यास हरकत नाही. त्याचे स्वतःचेच डोके काय चालायचे हे त्याने जगाला पुढे दाखवून दिले आहेच.

असो, एकीकडे रोहीत शर्मा हा कन्सिस्टन्स नाही. लिमिटेडमध्येही त्याची जागा बनत नाही असे म्हणायचे. याऊलट द्रविड मात्र एकदिवसीयमधील चांगला फलंदाज होता हे आवर्जून दाखवायचे. मागे एकदा मी म्हटलेले लक्ष्मण हा एकदिवसीयचा प्लेअर नव्हता, तर त्यालाही ईथे काही जणांनी तावाने खोडलेले. कदाचित आताही खोडतील. मला वाटते हे सर्व वैयक्तिक आवडी आहेत. नाईंटीजच्या काळासोबत आणि त्या प्लेअरसोबत आपल्या ईमोशन जरा जास्तच जोडल्या गेल्या आहेत.

आणि हो, वर लक्ष्मण आणि दादाच्या तंत्रावर भाष्य केले आहे ते फॅब फोरमधील द्रविड आणि सचिनच्या तुलनेत जे जगभरात कुठेही खेळू शकायचे पण तेच बॉल उसळू लागला की दादा आणि ईंग्लिश कंडीशनमध्ये लॅटरली हलू लागला की लक्ष्मण हे जरा गडबडून जायचे. रेकॉर्ड शोधले तर तसे मिळतीलही. जर हे अमान्य असेल तर शोधतो. बाकी त्या चौघांना मिळून फॅब फोर म्हटले आहेच.

वरील काही निवडकर प्रतिसादातून असे दिसून आले की!
द्रविड्च काय तर सुनिल गावस्कर हा देखिल क्रिकेट खेळण्याच्या योग्यतेचा नव्हता! त्याच्या पेक्षा पंत, युवराज आदी करमणूक करणारे खेळाडू जास्त योग्य! शेवटी सामन्यात करमणूक नसेल तर तंत्र आणि तासन तास फलंदाजी करणे काय चाटायचे?
>>>>>

दोन टेस्टमधील लिजंड फलंदाजांना लिमिटेड फॉर्मेटमधील प्लेअरसोबत घ्यायचेच कश्याला तुलनेला.
आणि ते करताना वर्ल्डकप विनर युवराजला करमणूकीपुरता म्हणून हलके का लेखायचे?

बाकी गावस्करचे तर वेगळेच स्थान आहे. तिथे द्रविडही नको. त्या काळात ज्या गोलंदाजांना विदाऊट हेल्मेट फेस करत जे परफॉर्म केलेय त्याला तोड नाही. तसे ईतर कोणी केल्याशिवाय तुलना नाही. त्यामुळे कोणी जुन्याजाणत्या क्रिकेटप्रेमीने मला म्हटले की गावस्कर हा तुमच्या सचिनपेक्षाही ग्रेट फलंदाज होता तर मी वाद घालायला जाणार नाही.

१९९९-२००० च्या वेळी द्रविडच्या सर्वोच्च धावा होत्या सर्व संघातील खेळाडूत दोन नंबर वर सतिश वाघ होता ऑस्ट्रेलियाचा. ३रा गांगुली तर ४था मकरंद वाघ होता(सतीश चा भाऊ), तर ५ वा पाकीस्तानचा सईद अन्वर.

त्यामुळे मर्यादित षटकात द्रविड उपयोगी नाही हे कसे ठरविणार!?

१९९९-२००० च्या वेळी द्रविडच्या सर्वोच्च धावा होत्या सर्व संघातील खेळाडूत
त्यामुळे मर्यादित षटकात द्रविड उपयोगी नाही हे कसे ठरविणार!?
>>>

ती भारत पाक ऑस्ट्रेलिया तिरंगी स्पर्धा का? तीन फायनल वाली. त्यात भारत फायनललाही नव्हता.
असो, माझ्या आठवणीप्रमाणे त्यात आपल्यातर्फे फक्त दादाचे दोन शतक होते. एक पाकिस्तानविरुद्ध १३५ की १३७ धावांची वन मॅन शो टाईप खेळी. दादाची एक आवडती इनिंग. आणि एक ऑस्ट्रेलियाशीच चेस करताना आलेले शतक. त्यात द्रविडशी भागीदारी चालू होती दादाची. पण दादा शतकानंतर बाद (बहुधा धावबाद) होताच द्रविड वाढलेली धावगती सांभाळेल असे बिलकुल वाटले नव्हते. तो सामना अर्थातच हरलेलो. किंबहुना सचिन चौथ्या क्रमांकावर येत दुसरी धाव चोरताना धावबाद झालेला आजून आठवते. तिथेच सामना हरलो असे वाटलेले. एक त्रासदायक सामना.
असो, त्या स्पर्धेत नक्की द्रविड सर्वाधिक होता का? ते सुद्धा ऑस्ट्रेलियन्सनाही मागे टाकत? आपल्यातर्फे तरी दोन शतके मारणारा दादा असावा असे वाटते. एकदा चेक कराल का?

ती भारत पाक ऑस्ट्रेलिया तिरंगी स्पर्धा का? तीन फायनल वाली. >>> 1999 च्या इंग्लडमधल्या वर्ल्डकपबद्दल चालू आहे!

चुकीचे धराल तर चुकीचे मागाल.
द्रविडच्या कप्तानीत सलग चेस करून पंधरा सोळा वगैरे सामने जिंकलेलो त्याचा विषय निघाला. त्यातून फिनिशर धोनीचा विषय निघाला. त्यातून धोनी पूर्व काळात आपण कसे बरेच स्पर्धांच्या अंतिम सामन्यात कच खाल्लेली हा विषय निघाला. एकट्या द्रविडचा काही संबंध नाही त्यात.
>> तू द्रविडच्या कप्तानीच्या संदर्भात विषय निघाला आहे असे म्हणतो आहेस म्हणून परत विचारत होतो की तू हे म्हणाला आहेस "आपण सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलो होतो. शोधले तर एक्झॅक्ट रेकॉर्ड मिळेल." त्याचा रेफरन्स देतोस का ? कुठले सामने ? मला उत्सुकता आहे. द्रविड २००६ च्या आसपास कप्तान होता पण तो एव्हढा कालावधी वन डे कप्तान असल्याचे आठवत नाही की सलग कित्येक स्पर्धांचे अंतिम फायनल्स हरलो असू. स्वरुप जे चेस बद्दल बोललाय तो रेकॉर्ड होता १६ सामन्यांचा ते आठवतेय पण ते टूर मधले सामने होते, १-२ फायनल असतील त्यात फार तर. तू एकंदर २००३ पासून जनरल म्हणत असशील तर खरच त्या मुद्द्याचा द्रविडशी संबंध कळला नाही. द्रविड वन डे बॅट्समन पण ईवॉल्ह होत गेला नि १९९९ च्या वर्ल्ड कप पासून तो ज्या जागेवर खेळत असे त्या जागेसाठी योग्य स्ट्राईक रेट ठेवत असे, त्यामूळे परत अंतिम सामने हरणे नि द्रविड ची स्लो बॅटींग नि त्यातून धोनी बेस्ट फिनिशर असणे हे सगळे मुद्दे एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत कळत नाही.

1999 च्या इंग्लडमधल्या वर्ल्डकपबद्दल चालू आहे!>>> अरे मग १९९९ ईतकेच लिहायचे होते. १९९९-२००० च्या वेळी लिहिले, आणि नावेही भारत पाक ऑस्ट्रेलिया आली. काय तो योगायोग Happy

असो,
वनडेमध्ये नुसते धावा करणे कामाचे नाही. त्या काय सिच्युएशनला काय स्ट्राईकरेटने बनवत आहात हे महत्वाचे. अन्यथा द्रविडच्या एकदिवसीयमध्ये दहा अकरा हजार धावा आहेत. एखाद्याला धावा बघूनच महान ठरवायचे असेल तर हे पुरेसे आहे. पण त्याचे मूल्यमापन खेळाच्या परीस्थितीनुसार विश्लेषण केल्यावरच समजू शकेल.
उदाहरणार्थ त्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात काय घडलेले हे व्यवस्थित आठवतेय. आफ्रिकेशी होता. द्रविडचे अर्धशतक वगैरे झाले असावे आणि दादाचे शतक नव्वदीत हुकलेले. पण दोघे आरामात ४० व्या ओवरपर्यंत खेळत बसले होते. सेट झाल्यावर टेंपो वाढवता आला नाही. मागे अझर, जडेजा रॉबिन वगैरे यांना पुरेशी मारायची संधी न मिळाल्याने आपण जे पावणेतीनशे मारायला हवे होते ते अडीचशेला थांबलो आणि आफ्रिकेने कसलीही चुरस घडू न देता दोनतीन ओवर राखून चेस केले होते. हा सामना आठवणीत राहिला कारण आमच्याघरी स्टेडीयमसारखे सगळे मित्र जमून सामना बघायचे. आणि आम्ही त्यांना मारा नाहीतर आऊट व्हा म्हणून ओरडत होतो हे आठवणीत आहे. असो, सांगायचा मुद्दा हा, पुढच्यांनी धावा बनवल्या, आपला एवरेज वाढवला. पण फायदा काय त्यांचा?

त्यानंतर श्रीलंकेला अदभुत चोपले होते. केनयाचा पालापाचोळा केला होता. पाकिस्तानलाही सालाबादाप्रमाणे हरवले होते. मात्र ज्यांच्याशी जिंकायला हवे त्या आफ्रिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि सचिनच्या अनुपस्थितीत झिम्ब्वाब्वेशी हरल्याने त्या वर्ल्डकपमध्ये आपण सुपरसिक्सलाच बाहेर पडलेलो हे बोलके आहे.

त्यामूळे परत अंतिम सामने हरणे नि द्रविड ची स्लो बॅटींग नि त्यातून धोनी बेस्ट फिनिशर असणे हे सगळे मुद्दे एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत कळत नाही.
>>>>
अरे देवा, अहो हे वेगळेच मुद्दे आहेत हेच तर केव्हापासून सांगतोय.
नऊ अंतिम सामने हरलो आणि एकच जिंकलो त्याचा द्रविडशी आणि त्याच्या कप्तानीशी काही संबंध नाही. असल्यास त्या हरणार्‍या संघाचा एक खेळाडू म्हणूनच असेल. ते धोनीच्या कौतुकात लिहिलेले. धोनीच्या आधी आपण कसे मोक्याला कच खायचो आणि नंतर कसे बदललो.

जर धोनीने कप्तान झाल्यावर वन डे मध्ये वन डाऊन खेळायचे ठरवले असते तर त्याच्या धावा किमान ३० टक्के जास्त असत्या. पण आपण धावांच्या मागे गेलो तर कदाचित आपले जिंकलेले सामने ५-१० टक्यांनी कमी झाले असते या भितीपोटी त्याने फिनिशरचीच भुमिका घेणे योग्य समजले असावे. हा खरे तर एक वैयक्तिक विक्रमांचा त्याग आहे. फक्त आता याचा संबंध द्रविडशी काय म्हणून जोडू नका. वा बुद्धीला खाद्य म्हणून जोडूही शकता Happy

अरे देवा, अहो हे वेगळेच मुद्दे आहेत हेच तर केव्हापासून सांगतोय. >> एरवी एका पोस्ट ला एक पोस्ट लिहून उत्तर देतोस नि इथे सगळे एका पोस्ट मधे घातले आहेस नि वरती म्हणतोस संबंध नाही Happy असो.

"द्रविडच्या फलंदाजी शैलीमुळे होणाऱ्या साईड ईफेक्टबद्दल लिहिले आहे. त्याच्या अनेक अफलातून इनिंग आहेत असे वर उल्लेखले आहेच. ते रेकॉर्ड कोणी एकमेकांना सांगायची गरज नाही.
सध्याही आपण आधीच्या तुलनेत छान परदेश विजय मिळवत आहोतच.
चेस करताना जे जिंकलो ते सामने पुन्हा चेक करावे लागतील. धोनी युवराज शो असावा बहुतेक त्यात. किंवा पुढचेही खेळले असावेत. एकूणातच धोनी मागे आहे फिनिश करायला हा विश्वास आल्यामुळे चेसिंग बाबत भारतीय क्रिकेटच बदलून गेले. त्याचे श्रेय ईतर कोणापेक्षाही धोनीलाच आधी जायला हवे.
त्या आधीच्या संघात कितीही दिग्गज असले तरी तो मोक्याच्या क्षणी आणि अंतिम सामन्यात कच खाणारा होता. आपण सलग कित्येक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात हरलो होतो. शोधले तर एक्झॅक्ट रेकॉर्ड मिळेल."

माझ्या पोस्टसोबत त्या आधीची समोरच्याची पोस्टही कोट करा. ज्यात द्रविडचे कौतुक करताना त्याच्या कप्तानीत चेस करताना सलग जिंकलो याचा उल्लेख होता. त्याबाबत म्हटलेले की कप्तानाच्या आधी हे श्रेय धोनी-युवराज या फिनिशर्सना जाते. मग ते कसे हे दाखवायला धोनी आल्यावर भारतीय क्रिकेट कसे बदलून गेले यासाठी धोनीपुर्व आणि आणि धोनीपश्चात काळाची तुलना केली. चेस कसे करावे हे कोणत्या कर्णधाराने स्ट्रॅटेजी आखून धोनीला शिकवले नाही तर धोनीने जगाला शिकवलेय.

Pages