क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

सलाम व शुभेच्छा !! >> नि बुमरा चे प्रॉडक्ट फिनेस्ड केल्याबद्दल धन्यवाद पण ! Happy

परत बदलले. बीसीसीआय ला खरच एक चांगला मिडिया मॅनेजर नेमायची गरज आहे. फक्त स्पर्धेनंतर करण्या ऐवजी अत्ताच व्हायला हवे होते.

एव्हडी वर्षे कॅप्टन पदावर अंडी घालून कोहलीने भारतीय क्रिकेटचं खूप मोठं नुकसान केलं आहे. Rcb चं पण केलंय पण त्यांचा मालक पळून गेला हे कोहलीचं नशीब म्हणावं लागेल नाहीतर दुसरा कोणी मालक असता तर जास्तीत जास्त दोन आयपीएल कॅप्टनशीप दिली असती.

पण पुन्हा कोहलीचीच पोस्ट ! बीसीसीआय कडून अधिकृत वृत्त कां नाहीं? कीं प्रतिक्रिया बघून मग आपला निर्णय ठरवायचा/ जाहीर करायचा !!

न्यूझीलंडचा पाक दौरा सुरूं होण्यापूर्वीच रद्द ! सुरक्षिततेचा मुद्दा पाक क्रिकेटच्या मुळावरच घाव घालतोय !!

उत्तम झाले, तेव्हढीच प्रॅक्टीस कमी होईल स्पर्धेसाठी. परत नवा कोच वगैरे ची पण गडबड आहेच Happy

भाऊ, बीसीसीआय चे अधिकृत वृत्त आले आहे कोहली बद्दल.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने संघ निवडकर्त्यांकडे प्रस्ताव दिला होता की, रोहित शर्माला मर्यादित संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवावे. कारण त्याचे वय ३४ वर्ष आहे. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलला केले गेले पाहिजे असे त्याचे मत होते. तसेच टी२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतला दिली जावी, असे मत त्याने बीसीसीआयपुढे मांडले होते.

कोहली रोहितविरुद्ध कसा षडयंत्र रचतोय आणि किती पाताळयंत्री आहे हे यातून सिद्ध होते.

कोहली रोहितविरुद्ध कसा षडयंत्र रचतोय आणि किती पाताळयंत्री आहे हे यातून सिद्ध होते.
>>>
बीसीसीआयने कोहलीचा हा डाव ओळखला की त्याला कप्तानीला एवढ्यात कोणी तुल्यबळ प्रतिस्पर्धी नकोय आणि त्याच्यावरच तलवार धरली. तसे याने लगेच निवृत्तीची घोषणा केली. आता अर्थात आयत्यावेळी कोहलीचे २०-२० कर्णधारपद कोणी घेणार नाही. पण बातमी अशी आहे की हा वर्ल्डकप हरलो तर २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या आधी वेळीच रोहीत शर्मा कर्णधार म्हणून पुढे येऊ शकतो. एकदा का आतल्या गोटातून कोणी गॉडफादर शर्माला भेटला तर ड्रेसिंग रूमचे वातावरणही त्याच्या फेव्हरमध्ये आहे.

पण काहीही झालं तरी वर्ल्ड कप आधी या अशा बातम्या नको यायला पाहिजे होत्या.
>>>

राजकारण भारतीय क्रिकेटला नवीन नाही. कर्णधारबदल ईथे असेच होतात. तुम्हाला आवडो न आवडो त्याने सत्यपरीस्थिती बदलत नाही. आपण आधीही काही वर्ल्डकपला हे फटके खाल्ले आहेत. आताही पडू शकतो जर हे प्रकरण वेळीच क्लीअर न झाल्यास.

मीं 'गुगल'वर आधी वाचलेल्या बातमीत तर म्हटलं होतं कीं गेल्या दोन वर्षात विराट व राहूल यांच्यात उभयपक्षी आदर व मैत्री खूपच वाढली असल्याने विराट त्याला सफेद चेंडू स्पर्धांत कर्णधार करावा अशी शिफारस करत आहे ! ! काय खरं, काय 'गाॅसिप'. देव जाणे.

कोहली क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर बॉलिवूडमध्ये जाणार आहे. राहुल सुनील शेट्टीचा होणार जावई आहे. त्यामुळे तो राहुलला फेव्हर करतोय.

https://mahasports.in/big-disclosure-team-india-players-and-coaches-are-...

भारताच्या ड्रेसिंग रूमची ‘इनसाईड स्टोरी’ सर्वांपुढे! कोहलीच्या वर्तणामुळे त्रासलेल्या प्रशिक्षक, खेळाडूंची बीसीसीआयकडे तक्रार

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने येत्या टी२० विश्वचषक २०२१ नंतर या स्वरुपातील नेतृत्त्वपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या घोषणेनंतर हळूहळू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. नुकताच कोहलीने रोहित शर्मा याला मर्यादित षटकांच्या संघाच्या उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडे मांडला होता, अशी माहिती पुढे आली होती. यानंतर आता कोहलीच्या व्यवहारामुळे संघ प्रशिक्षक आणि खेळाडू त्रस्त झाले असल्याची खळबळजनक माहिती समोर येते आहे. 

याचमुळे बीसीसीआय आता टी२० विश्वचषकानंतर टी२० प्रकारातील संघाची कमान रोहित शर्मा याच्या हाती सोपण्याचा विचारात आहे. रोहितविषयी बोलताना सूत्राने सांगितले की, “रोहित, ज्याला पुढे भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनवले गेले पाहिजे. अगदी अजिंक्य रहाणेप्रमाणे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये संघाचे नेतृत्त्व करताना अद्भुत कामगिरी केली होती. खरे तर, रोहित संघातील इतर खेळाडूंसाठी एका मोठ्या भावासारखा आहे. त्याचा युवा खेळाडूंवर विश्वास आहे. त्यामुळे तो या पदासाठी योग्य पर्याय ठरेल.”

√√√
कोहलीची साडेसाती सुरू झालीय वाटते. २०२३ वनडे वर्ल्डकपला हा कर्णधार राहील असे वाटत नाही.

*....रोहितविषयी बोलताना सूत्राने सांगितले की,..* - हें 'सूत्राने सांगितले ' यानेच घोळ होतोय, असं नाहीं वाटत ? प्रत्येक जण वेगवेगळं सांगत 'सूत्रां'चाच हवाला देतोय !! सोशल मिडीयावर वेगवेगळ्या वावड्यांचं पेंव फूटलःय तर बीसीसीआयची एवढीही जबाबदारी नाहीं का, अधिकृतपणे खरी माहिती काय आहे हें सांगण्याची !!!

*वेगळे कोणी आणि काय सांगितलेय...* -
*गुगल'वर आधी वाचलेल्या बातमीत तर म्हटलं होतं कीं गेल्या दोन वर्षात विराट व राहूल यांच्यात उभयपक्षी आदर व मैत्री खूपच वाढली असल्याने विराट त्याला सफेद चेंडू स्पर्धांत कर्णधार करावा अशी शिफारस करत आहे ! ! * हें मीं निश्चित वाचलंय त्यावर आधारित आहे पण मला शोधूनही लिंक सांपडत नाहींय. 'सूत्रां'चा हवाला देतांना जर 'सूत्र ' अज्ञात ' असुनही विश्वास ठेवतां, तर माझ्यावरही तैवढा विश्वास ठेवायला हरकत नसावी. अर्थात, निर्णय तुमचा.
शिवाय, वरच्या अजात नसलेल्या कोहलीचया टवीटमधे रोहितबद्दल बरा- वाईट ऊल्लेखही नाहीं तरी आपण त्याला रोहितबददल आदर/ मैत्री/ आकस आहे असं खात्रीने कशावरून म्हणूं शकतो ?

सूत्र अज्ञात कशी. नावाजलेल्या वृत्तपत्रांची बातमी असते ती.
लिंक दोन गोष्टींसाठी मागितली
१) ती नक्की कुठल्या न्यूज चॅनेलची बातमी होती का हे चेक करायला.
२) पुर्ण सविस्तर बातमी काय होती. खात्रीपूर्वक विधाने होती वा शंका होत्या वा काहीजण बातमीतच प्रश्नचिन्ह टाकून आपली जबाबदारी झटकतात तसले काही होते? हे मी स्वत: चेक करतो. कोणावर विश्वास ठेवत नाही Happy

असो,
धोनीला मध्येच सल्लागार केले तेव्हाच मी म्हटले काहीतरी गेम आहे या मागे. कोहलीला धोनीचा फायदा कमी आणि अडचणच जास्त होणार हे उघड असूनही असे केले म्हणजे कोहलीच्या डोक्यावरचे हात आता ऊठले आहेत हे तिथेच स्पष्ट झालेले.

द्रविड नसता तरी चालला असता. तो काही कामाचा नाही. कसोटी प्लेयर आहे तो. जास्त रन्स काढत नाही म्हणून प्रतिस्पर्धीच त्याला आऊट करायचे नाहीत. त्यामुळे वॉल वैगरे नाव मिळालं त्याला.

Pages