पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समारंभाच्या ठिकाणी एक स्वीट डिश असते. दिसायला हिरव्या पिवळसर रंगाची घट्ट लिक्विड असते. त्याला नक्की काय नाव आहे?

हे असं असतं . काजू बदाम नसतात फक्त त्यावर. पायनॅपल पायसम कि काहीतरी नाव आहे तेच असतं का? कि दुसरी काहीतरी डिश आहे ती कारण लग्नाच्या ठिकाणी एव्हडे अननस आणून मेहनत कशाला करतील.
Capture_1.JPG

ऊडूपी हॉटेलांत इडली दोस्यांबरोबर मिळते तशी नारळची पांढरी शुभ्र चटणी कशी करायची? 》त्यापेक्षा आपली को+मी+ नारळाची जास्त चविष्ट लागते

हा साधा केशर बाथ(असं साऊथ हॉटेलमध्ये म्हणतात तो) म्हणजे रव्याचा केशर घातलेला शिरा वाटतो आहे मला

कांजी करायला मोहरी भिजवायची व बारीक वाटून फेटून/घुसळून घ्यायची पाणी घालून. उडीद डाळीचे वडे त्यात सोडायचे.... असे वडे आमचे शेजारी नवरात्राच्या अष्टमीला करायचे.

ऊडूपी हॉटेलांत इडली दोस्यांबरोबर मिळते तशी नारळची पांढरी शुभ्र चटणी कशी करायची? >>> १ वाटि ओला नारळ साधारण २ चमचे डाळं, आल्याचा लहानसा (अर्धा इन्च) तुकडा अन हि. मिरची, मीठ घालून मिक्सर मधे वाटणे. एकदम सेम टु सेम उडपी रेस्टॉ सारख्या चवीची होते चटणी.

इकडे आम्ही फ्रोझन नारळ आणतो. त्यांच्या पाठी काळ्या की गोर्‍या कळायला मार्ग नाही. पण मैच्या प्रमाणानं करून बघते.

इकडे आम्ही फ्रोझन नारळ आणतो.
<<
हो का?

आम्हा दुर्दैवी लोकांना ताजे नारळ आणून फोडून खोवावे लागतात. पुण्यात १० रुपयांत नारळ खोवून मिळतो. (१० रुपये मजूरी)

पांढरे खोबरे तुकडे coconut meat या नावाने फ्रोझन मिळतात म्हणे.

उद्यापासुन आपणपण खोबर्‍याचे ३ रुपयाचे मटण मागायचे.

फक्त ३ रुपयाचा तुकडा अख्ख्या स्वयपाकात वापरला तरीही डोक्यातुन तेल पाझरेल का अशी भिति वाटत रहाते

इथे पांढरे खवलेले खोबरं दुकानात मिळतं सहज पण महाग असतं, कधीतरी आणते. नवरा नारळ प्रदेशातला असून मी फार खोबरं वापरते असं नाही. नारळ आणून नवऱ्याकडून खवून घेतलेलं जास्त स्वस्त पडते, फक्त नारळाला पैसे पडतात, हाहाहा. पांढरे नसले तरी चालते. कधी कधी दीर येऊ शकले पुण्यात तर सर्वांसाठी नारळ आणतात मग फ्रीच मिळतो, असं क्वचित होतं मात्र.

मला खालिल प्रकारातिल भारतिय /अभारतिय फुड ऑप्शन सुचवा प्लिज.
फ्रिजशिवाय काहि दिवस टिकतिल
फ्रिजमधे जरा जास्त टिकु शकतिल असेही
मायक्रोव्हेव मधे करता येतिल असे ऑप्शन सुचवा.

वाटण किंवा कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी करतात? कोणाकडे केलेली आठवत नाही, पण फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट टाकून केलेली. नक्की आठवत नाहिये.

Pages