Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेक ते उडीद असते
बहुतेक ते उडीद असते
कोणी घरी शेजवान साॅस / चटणी
कोणी घरी शेजवान साॅस / चटणी बनवले आहे का?
कृती द्या ना. .
माबोवर आहे धागा याचा.
माबोवर आहे धागा याचा.
ऊडूपी हॉटेलांत इडली
ऊडूपी हॉटेलांत इडली दोस्यांबरोबर मिळते तशी नारळची पांढरी शुभ्र चटणी कशी करायची?
हेब्बर किचन ची रेस्पी
त्यांचीच यूट्यूब लिंक.
समारंभाच्या ठिकाणी एक स्वीट
समारंभाच्या ठिकाणी एक स्वीट डिश असते. दिसायला हिरव्या पिवळसर रंगाची घट्ट लिक्विड असते. त्याला नक्की काय नाव आहे?
ते कस्टर्ड पुडिंग असतं बहुधा
ते कस्टर्ड पुडिंग असतं बहुधा
हे असं असतं . काजू बदाम नसतात
हे असं असतं . काजू बदाम नसतात फक्त त्यावर. पायनॅपल पायसम कि काहीतरी नाव आहे तेच असतं का? कि दुसरी काहीतरी डिश आहे ती कारण लग्नाच्या ठिकाणी एव्हडे अननस आणून मेहनत कशाला करतील.
ऊडूपी हॉटेलांत इडली
ऊडूपी हॉटेलांत इडली दोस्यांबरोबर मिळते तशी नारळची पांढरी शुभ्र चटणी कशी करायची? 》त्यापेक्षा आपली को+मी+ नारळाची जास्त चविष्ट लागते
हा साधा केशर बाथ(असं साऊथ
हा साधा केशर बाथ(असं साऊथ हॉटेलमध्ये म्हणतात तो) म्हणजे रव्याचा केशर घातलेला शिरा वाटतो आहे मला
अनु तुम्ही बोलताय ते बरोबर
अनु तुम्ही बोलताय ते बरोबर वाटतंय. कस्टर्ड पायनॅपल पावडर टाकून करत असावेत तो पदार्थ.
कांजी वडे कसे करतात?मधुरा
कांजी वडे कसे करतात? मथुरा साईड ला मिळतात ते..
कांजी करायला मोहरी भिजवायची व
कांजी करायला मोहरी भिजवायची व बारीक वाटून फेटून/घुसळून घ्यायची पाणी घालून. उडीद डाळीचे वडे त्यात सोडायचे.... असे वडे आमचे शेजारी नवरात्राच्या अष्टमीला करायचे.
ऊडूपी हॉटेलांत इडली
ऊडूपी हॉटेलांत इडली दोस्यांबरोबर मिळते तशी नारळची पांढरी शुभ्र चटणी कशी करायची? >>> १ वाटि ओला नारळ साधारण २ चमचे डाळं, आल्याचा लहानसा (अर्धा इन्च) तुकडा अन हि. मिरची, मीठ घालून मिक्सर मधे वाटणे. एकदम सेम टु सेम उडपी रेस्टॉ सारख्या चवीची होते चटणी.
काळी मोहरी का ?
काळी मोहरी का ?
खोबरं खोवताना खोबर्यात काळी
खोबरं खोवताना खोबर्यात काळी पाठ अजिबात येऊ द्यायची नाही. मगच चटणी गोरीपान होते.
इकडे आम्ही फ्रोझन नारळ आणतो.
इकडे आम्ही फ्रोझन नारळ आणतो. त्यांच्या पाठी काळ्या की गोर्या कळायला मार्ग नाही. पण मैच्या प्रमाणानं करून बघते.
काळी पाठ घेऊ नये म्हणजे तो
काळी पाठ घेऊ नये म्हणजे तो भाग घेऊ नये
नुसते पांढरे तेवढे खवणावे
इथे दोन हजाराच्यावर प्रतिसाद
इथे दोन हजाराच्यावर प्रतिसाद झाल्याने नवा धागा उघडला आहे. पुढची प्रश्नोत्तरे तिथे होउ द्या
https://www.maayboli.com/node/80900
काळी पाठ घेऊ नये म्हणजे तो
काळी पाठ घेऊ नये म्हणजे तो भाग घेऊ नये >> हे काळ्यापाठीच्या मांजरा कडुनच ऐकायचं राहिलं होतं!
(No subject)
इकडे आम्ही फ्रोझन नारळ आणतो.
इकडे आम्ही फ्रोझन नारळ आणतो.
<<
हो का?
आम्हा दुर्दैवी लोकांना ताजे नारळ आणून फोडून खोवावे लागतात. पुण्यात १० रुपयांत नारळ खोवून मिळतो. (१० रुपये मजूरी)
पांढरे खोबरे तुकडे coconut
पांढरे खोबरे तुकडे coconut meat या नावाने फ्रोझन मिळतात म्हणे.
उद्यापासुन आपणपण खोबर्याचे ३ रुपयाचे मटण मागायचे.
फक्त ३ रुपयाचा तुकडा अख्ख्या स्वयपाकात वापरला तरीही डोक्यातुन तेल पाझरेल का अशी भिति वाटत रहाते
इथे पांढरे खवलेले खोबरं
इथे पांढरे खवलेले खोबरं दुकानात मिळतं सहज पण महाग असतं, कधीतरी आणते. नवरा नारळ प्रदेशातला असून मी फार खोबरं वापरते असं नाही. नारळ आणून नवऱ्याकडून खवून घेतलेलं जास्त स्वस्त पडते, फक्त नारळाला पैसे पडतात, हाहाहा. पांढरे नसले तरी चालते. कधी कधी दीर येऊ शकले पुण्यात तर सर्वांसाठी नारळ आणतात मग फ्रीच मिळतो, असं क्वचित होतं मात्र.
इडलीच्या ओल्या पिठात ब्रेड
इडलीच्या ओल्या पिठात ब्रेड बुडवून करण्याची काही पाककृती मायबोलीवर होती का?
मला खालिल प्रकारातिल भारतिय
मला खालिल प्रकारातिल भारतिय /अभारतिय फुड ऑप्शन सुचवा प्लिज.
फ्रिजशिवाय काहि दिवस टिकतिल
फ्रिजमधे जरा जास्त टिकु शकतिल असेही
मायक्रोव्हेव मधे करता येतिल असे ऑप्शन सुचवा.
इथे दोन हजाराच्यावर प्रतिसाद
इथे दोन हजाराच्यावर प्रतिसाद झाल्याने नवा धागा उघडला आहे. पुढची प्रश्नोत्तरे तिथे होउ द्या
https://www.maayboli.com/node/80900
वाटण किंवा कांदा लसूण न
वाटण किंवा कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी करतात? कोणाकडे केलेली आठवत नाही, पण फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट टाकून केलेली. नक्की आठवत नाहिये.
त्या दुसर्या धाग्यावर लिहिली
त्या दुसर्या धाग्यावर लिहिली आता मी रेसिपी.
भावनगरी मिरची आणली आहे. काय
भावनगरी मिरची आणली आहे. काय काय करता येईल ? तळणीची मिरची सोडून, कारण वाळवायला फारसे ऊन पडत नाहीये.
सावन, बटाट्याची सारण भरून
सावन, बटाट्याची सारण भरून मिर्ची भजी
Pages