पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सांगा अमेरिकेत काहीच महिन्यांसाठी आलेल्या एका नातेवाईकांना easy lunch options for 4 year old असा काही धागा आहे का? मला फक्त कॅसिडियाज सुचवता आले. भारतीय पर्यायही चालतील. फक्त खूप रांधा वाढा प्रकार नकोत ते त्यांना माहित आहेत. धन्यवाद

मला प्रश्न कळला नाही निटसा, ते म्हणजे एल्डर्स काही महिन्यासाठी काय खाणार आहेत? कारण ४ वर्षाच मुल बर्‍यापैकी आपण खातो ते खावु शकतात, तिखट वैगरेची सवय नसेल तरच प्रश्न आहे.
अभारतिय पर्याय हवे आहेत का?

4 वर्षाचा मुलगा आपण जे खातो ते सगळं खात असावा (माझा 2 वर्षाचा मुलगा बरंचसं खातो) . तरी पण ऑप्शन सांगते

1.लेमन राईस , भाताची खिचडी अथवा पुलाव
2.मुगाचे डोसे/ अडई/ डोसे (बॅटर बनवून ठेवलं तर आठवडा भर रहातं नीट)
3. सगळ्या प्रकारचे ठेपले (कोणतीही पालेभाजी चिरून/ फळभाजी खिसून कणके मध्ये ओवा, लाल तिखट, धने जिरे पावडर, मीठ घालून भिजवून पोळ्या लाटायच्या) ही कणिक पण आठवडा भर टिकते फ्रीज मध्ये
4. उकड
5. Mac and चीज आवडत असेल तर बाहेर मिळतं विकत किड्स मेन्यू मध्ये सो नो रंधा वाढा at all
6. केसडीया चा भारतीय भाऊ म्हणजे रोल
7. थालीपीठ
8. वरण भात
9. तूप मेतकूट भात
10 नूडल्स / शेवयाचं उपिट
5.

मॅक आणि चीज
पीनट बटर व जेली सॅण्डविच
भाज्या/ फळे कापून सलाड
बारके चीले/ इथे पनीर चिला स्टफ्ड ची चांगली रेसीपी आहे.

दोशे इडली - साखर. / चटणी.
फोडणीचा भात.
मेथी/ पालक पराठे.
मिश्र कडधान्याची उसळ व डिनर रोल.
ग्रिल्ड चिकन/ आमलेट तुपात बनवलेलेफ/ फ्रेंच टोस्ट/ केक पॉप्स / बारके पॅन केक्स व जॅम/ मेपल सिरप. ( शुगर कंटेंट बघून घ्या)

रिया आणि अमानी आलमोस्ट सगळ कव्हर केलय तरी

चिकन नगेट,मॅक आणि चिझ,टकिटोज,दहि-भात, वेगवेगळे पराठे,पुर्‍या,
योगर्ट राइस्,उकड्पेन्डी,उपमा,शिरा, एग सॅन्डविच्,ग्रिल चिझ सॅन्डविच
पास्ता.

तिखट मिठाची पुरी
पालक प्युरे घातलेली पुरी.
बीट किसून केलेले पराठे. इथे आहेत जागूचे गुलाबी नक्षिदार पराठे

काहीच करायचे नसेल तर टार्गेट मध्ये जे रेडीमेड मील्स मिळ तात ते घरी आणून ठेवणे
फ्रोझन / मायक्रोवेव्हेबल बेबी मील्स, हॅपी मील्स. ( बरोबर खेळणे वाल्या)

घरी स्प्रेड्स आणून ठेवले व व्हाइट/ मल्टिग्रेन ब्रेड आणून ठेवले तर
नटेला बनाना सँडविच
इतर अनेक प्रकारचे सँडविच

रेडीमेड सूप्स ( सजेस्ट केले कारण त्यांना घरी हाताने काही करायचे नाही. पण हे पदार्थ कमी कटकटीत घरी सुद्धा बनवून फ्रीज करून ठेवता येतील)

उकडलेला बटाटा व उकडलेले अंडे, मीठ मिरेपूड अगदी थोडा मिक्स स्पाइस घातला व मायो तर चांगले सलाड होते. ह्यात बॉइल्ड चिकन पण घालता येते.

ग्रिल्ड फिश. एकदम पाच मिनिटात होते. ( आधी मॅरि नेट करून ठेवल तर सोपे जाईल)

चालत असल्यास मूग दाळ / तूर दाळ खिचडी. गिरगिट शिजवायची व तूप मीठ घालून भरवायची. तूप भारतातून अमूल चे मागवा चांगले असते.

हर प्रकारचे लाडू व चकल्या.( रेडी मेड मिक्स पासून ( किंवा आई साबा झिन्दा बाद)

स्नॅकी पू म्हणून कापलेली फळे/ फिंगर साइज बाइट साइज काकडी गाजर .

मला सध्या १२ तास काम आहे पण आय वुड लव्ह टू फीड धिस लिटिल वन प्रॉपरली. मला हौसच आहे मुलांना खायला प्यायला करायची. आता सुद्धा ज्युस काढून फ्रिजात ठेवुन दिला आहे रंगीत ग्लासात Happy

अमा, किती छान पोस्ट आहेत. अगदी मनापासुन भरभरून लिहिल्या आहेत. मलासुद्धा ते पदार्थ लिस्ट करून बनवुन खायला आवडतील. Happy

छान पर्याय दिले आहेत. पालक आदल्या दिवसाच उरलेल व्गेरे खाऊ शकतात. त्यांना मुल आजारी वगैरे पडायला नको म्हणून सोपे पटकन होणारे पदार्थ हवे होते. भारतात स्वतः फार घरकाम न केलेलं जोडपं इथे आल्यावर जे होतं तेच Wink
मी “फ” वर्गात असल्याने इथे मदत मागितली. धन्य्वाद Happy

दही आणि नो अ‍ॅडेड शुगर म्युसली हाही एका छोट्या जेवणाला छान पर्याय आहे (वर कोणी आधीच सुचवला असेल तर सॉरी.)
तिथल्या दुकानात मखाणे आणि तूप मिळत असल्यास तूप मीठ मखाणे मिक्स करुन मायक्रोवेव्ह ला ३० सेकंद वगैरे गरम करुन.
खारी बुंदी मिळत असल्यास दही बुंदी.
दही जिरा पावडर चाट मसाला कॉर्न फ्लोअर चे घट्ट भजी टाईप बॅटर बनवून त्यात पनीर तुकडे घोळवून पनिनि मेकर किंवा ग्रिलर मध्ये ग्रिल करणे.८-१० वर्षाच्या मुलांना बॅटर बनवून देऊन हे काम दिल्यास आवडीने करतात.
)माझी कल्पनाशक्ती आज दह्याच्या पुढे जातच नाहीये Happy )
चिपोटले सॉस आणि ऑलिव्ह आणि टॉमेटो चकती घालून सँडविच
छोले भिजवून उकडून छोले, स्पॅनिश टॉमेटो, ऑलिव्ह, मिरपूड, लिंबू, मीठ असे सॅलड.
उरलेल्या पोळीची थोडे तेल तिखट मीठ घालून सँडविच मेकर्/तव्यात/पनिनी मेकर मध्ये कुरकुरीत करुन खाकरा पोळी.
पिझ्झा बेस असल्यास सन ड्राईड टॉमेटो, ऑलिव्ह, चीज स्लाइस चे तुकडे तुकडे )किंवा आयते किसायला लागणार नाही असे मोझरेल्ला असल्यास ते ) घालून १ मिनीट गरम करुन पिझ्झा
चीज स्लाईस, मिरची तुकडे, टॉमेटो वापरुन ते सँडविच मेकर मध्ये खरपूस सोनेरी तपकिरी भाजून ब्रुस्केत्ता आणि चीज चिली टोस्ट मधला काहीतरी प्रकार

"राळं" या वरी तांदूळ सदृश धान्याची खिचडी कशी करतात? शिजायला वेळ लागतो हे गृहीत धरून बेबीकुकरात करणार आहे, पण आधी भिजवून घ्यावे लागते का? किंवा भाजून मग भिजवून वगैरे? पेशंट साठी करायची आहे त्यामुळे मऊभातासारखी जरा पातळ झाली तरी चालेल. त्या हिशोबाने पाणी किती लागेल?

दूध साखर घालून खिरी एवढे पातळ करून तसेच खायचे (तोंडी लावणे म्हणून नव्हे).

गूळ किंवा साखर आणि पाणी घालुन लाडू वळून खायचे.
त्यात सुकामेवा तुकडेही घालता येतील.

सत्तू म्हणजे आपल्याला वाटतो तसा सातू धान्य नसून तांदूळ आणि काही डाळींचे मिक्स पीठ असावे ज्याचे लाडू होतात बेसन टाईप
काही मारवाडी लोकांकडून सत्तू म्हणून लाडू सदृश प्रकार घरी आला त्यामुळं वाटतेय.

सात्तु किंवा सातु म्हणजे जव / यव. हे जनरली उत्तर भारतात खातात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून. पण आपल्याकडे जे सातुचे पीठ केले जाते त्यात हा सात्तु नसतोच. प्रमाण घेतले तर अर्धा किलो गहु + आतपाव किंवा थोडी जास्त चणा/ हरबरा डाळ असे भाजुन किंवा चणा डाळी ऐवजी फुटाण्याचे म्हणजे चिवड्यातले डाळे दळुन वापरतात. हे डाळे वापरले तर ते भाजायचे. दळतांना त्यात ( जर घरी दळणार असाल तर ) वेळदोडा घालतात. हेच सातुचे पीठ दूध + साखर किंवा पाणी + गुळ अश्या मिश्रणात कालवुन खातात.

Ok. मी हे.D Mart मधून मागवलेले आहे.
नाव हिंदी मध्ये लिहिलंय.
त्याच्या उगमाबद्दल साशंक असल्याने मीच कमी कष्टाची मानव यांनी सांगितले ली खीर करून खाते

लिट्टी चोखा मध्ये लिट्टी बनवताना सत्तू पीठ वापरतात सारण म्हणून .
खीर , लाडू , वड्या बनवता येतात
खुप पौष्टिक असतं

लिटी चोखा बनते , लाडू बनतात

मिक्सर मधून थोडे तिखट मीठ घालून फिरवून कोरडी चटणी होईल

सतू , मीठ , साखर , लिंबू फिळून थंड पाणी , आईस क्यूब घालून मिक्सर मधून काढल्यास सतु सरबत होते,

https://www.mylittlemoppet.com/sattu-sherbet/

Pages