पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासाने लिहिलंय तेच लिहिणार होते.

मी केळी नारळ हलवा म्हणते त्याला. थोडा गुळही घालते आणि एव्हरेस्ट मिल्क मसाला असेल तर किंवा काजू, बदाम, बेदाणे असतील तर घालते. नसले तरी चालतात. शेंगदाणे किंवा कुट घालून बघितलं नाही.

आता इथे इतके पर्याय आल्यावर त्या केळ्यांचं काय केलं याची रेसिपी आणि फोटो आलेच पाहिजेत. मायबोली वाँट्स टू नो Happy

मद्रासी टाईप केळ्याचा हलवा मस्त लागतो, चिवट दाताने ओढायला. उन असेल तर सुकव केळ्याचे काप.
नाहितर वडे आहेतच.

सनव, केळ्यांंचे घड आणलेत की केळ्यांंच्या फण्या? घड म्हणजे लोंगर. झाडावर मोठाच्या मोठा असतो तो. Happy दोन घड खरोखर पिकलेले असतील तर अव'घड' आहे Wink

50 बटाटे वडे ला साधारण3 kg बटाटे लागतील .
1.5 kg बेसन पिठ लागेल. पाव किलो लसुण पाव किलो मिरच्या आले 150 grm.

मला 2 माणसांचा स्वयंपाक करायची सवय असल्याने अजून 2 फ्रेंड्स आले तरी वाढत्या प्रमाणाचा स्वयंपाक करताना स्ट्रेस......खरं तर प्रचंड स्ट्रेस येतो. चव चुकेल का हे अजून एक टेन्शन. बरं हे सगळं रोजचं शिजवताना. खास काही डिश असेल तर आदल्या रात्री झोपही लागणार नाही.
आणि इथे लोक 50 जणांसाठी वडे बनवतात, दुसरी एक जण 5 मिनिटात प्रमाण सांगते. हे सगळं महाकौतुकास्पद आहे. दुसरं म्हणजे एवढी मोठी भांडी घरात असणं आणि तो पदार्थ स्टर करताना लागणारी शक्ती असणं हे पण मला अत्यंत आश्चर्यकारक वाटतं. फार भारी आहात तुम्ही लोक!

मीरा Happy
मी पण ही प्रमाण आईला विचारुन सांगितले..
आमच्यात पाहुणे रहायला आले की ते परत जाताना बटाटेवडे मेन्यू ठरलेला आहे. त्यावेळी ती 30 35 बटाटे वडे करते. पण तिचे सगळे अंदाजे असते. त्यामूळे वर लिहलेले प्रमाण थोडे पुढे मागे होऊ शकते. Proud
मी स्वतः 12 पेक्षा जास्त बटाटेवडे नाही केले.. Wink

Happy मीरा ... तिने ५० वडापाव विचारले. कुठे कुठे एका दिवसात ५० वडापाव ८-१० माणसात खपतात Wink वडापाव करणार म्हणल्यावर तळायला एक नि "असेंबल" करायला एक असे दोन धडधाकट गडी ही पुढे येतात. वडा-पाव, पावभाजी इ ह्या मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होणार्‍या योजना आहेत.
(अर्थात श्रद्धाचे, अमुपरीचे कौतुक आहे ह्यात दुमत नाही.)

हो सिमांतनी बटाटेवडे आणि पावभाजि मोठ्या प्रमाणावर करायला त्यातल्या त्यात सोपे पदार्थ आहेत. Wink बटाटेवडे तर खुप लोक अचानक येणार असतिल तर करायला बरे पडते .

>> वडा-पाव, पावभाजी इ ह्या मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होणार्‍या योजना आहेत.
वादळवारय्ात हे मेन्यू वाचण हे मोठ्ठ पााप आहे. आम्ही आज सब वे आणायला बाहेर पडलो तर मालक दुकान बंद ठेवून गेलाय. सप्लायर आला नसेल. स्टराबक पण बंद. एंजाॅय वडे लोक्स

मीरा ... तिने ५० वडापाव विचारले. कुठे कुठे एका दिवसात ५० वडापाव ८-१० माणसात खपतात Wink >> हेच म्हणायचे होते. म्हणजे जर जेवणाऐवजी असतील तर आम्हाला बरेचदा आठ - दहा माणसांकरिता करावे लागतात. जोडीला दहीबुत्ती असतेच.

50 बटाटेवडे कमी असतिल पण जे लोक नेहमी कमी प्रमाणात बनवतात. त्यानां प्रमाणाचे टेंशन येऊ शकते. किन्वा ज्याना इतके बनवायची सवय नहिये त्याना ते अवघड वाटू शकते. शेवटी अनुभवाने सरावाने सगळे जमते.

50 बटाटेवडे कमी असतिल पण जे लोक नेहमी कमी प्रमाणात बनवतात. त्यानां प्रमाणाचे टेंशन येऊ शकते. किन्वा ज्याना इतके बनवायची सवय नहिये त्याना ते अवघड वाटू शकते. शेवटी अनुभवाने सरावाने सगळे जमते >>>> Happy

मखाण्याचे फायदे वाचले आणी एक पाकिट आणलंय. कच्चे आहेत. काय करता येईल? ग्लासभर दुधात एक चमचा खसखस+खडीसाखर+थोडे मखाणे घालुन उकळवून प्यायची रेसिपी केली. पण मखाणे शिजून चिवट झाले. चवपण खास नव्हती.

सस्मित, मखाणे कढईत छोटा चमचाभर साजुक तुप टाकुन किंवा कोरडे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. उतरवुन मग मीठ शिंपडायचे. छान लागतात. ते तसेच खाल्ले तर चिवट व रबरी लागतात. पण भाजायचे म्हणजे खमंग होतात. लहानांपासुन सर्वांना चांगले.

ग्लासभर दुधात एक चमचा खसखस+खडीसाखर+थोडे मखाणे घालुन उकळवून प्यायची रेसिपी केली. पण मखाणे शिजून चिवट झाले. चवपण खास नव्हती.>>>>> खिरीच्या फंदात पडु नकोस.

भाजल्यावर पाहीजे तर वेगवेगळे मसाले म्हणजे पिरीपिरी पावडर वगैरे शिंपडुन बघ.

तूप तापवून त्यात अगदी थोडे मीठ आणि हळद इतकेच घालून थोडे भाजून छान लागतात.
आई गूळ तापवून त्यात मखाणे घालून चिक्की सारखा काहीतारी प्रकार करते.
काही लोक भडंग मसाला घालून चिवडा करतात.

मी कधी बनवले नाहीत पण खाल्ले आहेत रश्मी म्हणतात त्या पद्धतीने... मस्त लागतात..एक मैत्रीण बनवते ..शेंगदाणे पण आवडत असतील तर भाजून घेऊ शकता तेल/तुपात..
परवा एक रेसिपी पण पाहिली good times वर..असेच तुपात खरपूस परतलेले...

मखाणे तुपा वर परतवून त्यावर जीरे पुड मिठ मिरिपुड घालुन मस्त लागते. मखाण्याची भाजी पण करतात ना काही जण.
मी मखण्या ची रेसीपी बघितली त्यात मखाणे आधी रोस्ट करुन म भाजी च्या ग्रेव्ही मध्ये घातले होते. त्यामूळे चिवट पणा कमी होतो का?
सस्मित तुम्ही दूधात उकळवाय च्या आधी मखाणे रोस्ट केले होते का?
नाहितर मखाणे थोडे परतवून मिक्सर ला त्याची भरड करुन दुधात घालू शकता.

नुसत्या बटरवर परतून फुलवलेले मखाणेही मस्त लागतात.
पोह्या- कुरमुर्‍याच्या चिवड्यातही घालता येतात.

अल्पना - कॅरॅमलाइज्ड मखाणे. प्रतिसादांत आणखीही प्रकार आहेत.

50 बटाटेवडे कमी असतिल पण जे लोक नेहमी कमी प्रमाणात बनवतात. त्यानां प्रमाणाचे टेंशन येऊ शकते. किन्वा ज्याना इतके बनवायची सवय नहिये त्याना ते अवघड वाटू शकते. शेवटी अनुभवाने सरावाने सगळे जमते.>>अगदी खरंय.

वा shradddha मस्तच 100 बटाटेवडे केलेस. Happy
मी चुकून 100 बटाटेवडे चे प्रमाण संगितले का Wink Proud

जास्त लोक्स जरा जरा वेळानी येणार असतील तर पाभा, बव इ. आयटेम्स नेहेमीच हिट जातात.
तसही तळले प्रकार, भरपूर फॅट कंटेंट असलेले प्रकार (आठवा खेकडा भजी, साबु वडे, ब्रेड पकोडे, बव तर आहेतच सोबत तळल्या मिरच्या ह ह ह Wink )
मी तर या मता परेंत आहे की कुठलाही चविष्ट प्रकार हा फॅट इंड्यूस्ड असतोच, कुठल्याही प्रकार असो, तळला/न तळला, सेव्हरी, स्वीट इ.

Pages