पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या गावी आजूबाजूला सगळे मारवाडी लोक होते, ते सत्तु मी सांगितल्या प्रमाणे खात आणि आणि आम्हीही त्यांनी दिलेले व ते आम्ही दिलेले सातूचे पीठ त्याच प्रकारे खात असु.

इथे हैद्राबादला 24 Letters Mantra या ऑर्गनिक कंपनीचे सत्तु पीठ मिळु लागले ते मी याच प्रमाणे खायचो.

त्यानुसार मी वरचा प्रतिसाद दिला.

सत्तु हे वेगवेगळ्या प्रकारे मिळते हे माहीत नव्हते. तेव्हा तुम्हाला नक्की कसले पीठ मिळाले यानुसार मी सांगितलेले प्रकार त्यास योग्य नसावेत.

Jadya लसूण पाकळ्या आहेत का? त्या तितक्याशा कुरकुरीत होत नाहीत. सालासकट लसूण कुरकुरीत होतो.

नाही जाड्या नाहीत. पण फोडणीत शिजल्याच त्या. कुर्कुरीत नाही झाल्या. लसूण सोलूनच फोडणीत टाकायचा ना, की पाकळ्या सालासकट ? मी लसूण नेहेमी सोलूनच वापरला आहे कशातही आज्पर्यंत (न सोलता असेल तर फारच छान, एक काम कमी! )

कढईत फक्त तेल तापवून सोललेला लसूण चिमट्याने किंचित क्रश करून घाला, मंद आचेवर ठेवा,छान सोनेरी रंग,आणि कुरकुरीत होतात, मगच फोडणीतील इतर साहित्य घाला

धन्यवाद तेजो आणि झंपी. मी फोडणी नेहेमीप्रमाणे करून मग लसूण टाकते. आता क्रम बदलून बघेन. झंपी, मीठाची आय्डिया भारी आहे. नक्की करुन बघेन.

फोडणीतले लसूण हमखास कुरकुरीत करण्याकरता काय करतात?
<<
बारीक चिरा. तेल भरपूर गरम करा अन मग त्यात लसूण घाला. पूर्ण पाकळी कडक कुरकुरीत करणे कठीण. आधी वाळवून वगैरे घेतलीत तर बरे.

सत्तू आटा नामक पीठ मागवले आहे , त्याचे काय करता येईल? विशेषतः लहान मुलांसाठी.>>>>>

सातू (सत्तू) हे हाय प्रोटीन, हाय फायबर , आयर्न-मॅग्नेशिअम युक्त , लो GI असलेलं सुपरफूड आहे.

मी नेहमी सत्तू मिल्कशेक करते. २-३ वेळा सातूचे लाडू पण केले होते. रोजच्या पोळीच्या कणकेत , थालीपीठ, पराठा वगैरे मध्ये पण दोन दोन चमचे टाकता येईल.

सातू मिल्कशेक ची रेसिपी :
२-३ चमचे सातूचे पीठ
दूध (अर्धा ते पाऊण कप)
बारीक केलेला गूळ किंवा गुळाची पावडर
केशर : २-३ काड्या
वेलदोडे पावडर
cacau पावडर - अर्धा ते एक चमचा (ऑप्शनल)

सगळे ब्लेंडर मध्ये मिक्स करायचे. झालं. अगदी झटपट आणि पौष्टीक होणार प्रकार.
सातू मिल्कशेक
122534403_3591032604250751_3485172808637957612_n.jpg

सातू पिठाचे लाडू
137564279_3802916349729041_7095120214744135346_n.jpg

सुपर्ब फोटो.

सत्तूमध्ये सात धान्य असतात का.

खूप वर्षांपूर्वी मी इथे गिरणीवर भाजणी दळायला नेलेली. दळण बघून तिथल्या माणसाने विचारलं कसे करता काय, मी सांगितलं तर म्हणे आमचं सत्तू ह्या typeचं असते.

मी विचारायला विसरले की तुम्ही भाजून करता का आणि किती धान्य प्रकार घालता.

थँक्यू अन्जु!
माझ्या माहिती प्रमाणे सातू हे फुटाण्याचे किंवा काळ्या हरभऱ्याचे पीठ असते.
कधी कधी त्या मध्ये अंकुरित गव्हाचे पीठ मिक्स केलेले असते.

Krisha, मस्त!
मिल्कशेकमधील सत्तू पीठ तसेच कच्चे घालायचे का?

माझी युपी भाषिक मैत्रीण सत्तु के पराठे बनवते. या पिठात तिखट, मिठ, धने जिरे पावडर, बारीक कांदा , ओवा असं काय काय भिजवून हे स्टफिंग
पुरणासारखं रेगुलर कणिक उंड्यामधे भरून लाटायचं.

आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ करतो ते मोड आलेले मूग व चिनी/कोरियन लोक आणतात तसे २-३ इंच लांब मोड आलेले मूग, या दोन्हींमध्ये जास्त पोषणमूल्य कशाला आहे कुणी सांगू शकेल का? की फारसा फरक नाही? अलिकडेच मांगची नावाच्या कोरियन बाईचे लांबच्यालांब मोड आलेल्या मुगाचे व्हिडिओ पाहिले. पाहून तरी भारी वाटत आहेत पणतेवढे वर्थ असतील तरच घरी तितके लांब मोड आणण्याचा खटाटोप करणार Wink

माबोवर (बहुधा दिनेशदांची) कमलकाकडीच्या चकत्या शॅलो फ्राय करून केलेली एक स्नॅक रेसिपी होती. कुणाला आठवतेय का ती? आठवत असेल तर प्लीज रेसिपी सांगा.

चटपटीत कमळ काकडी (चिप्स आणि मसाला क. का )
Submitted by मनिम्याऊ on 20 October, 2018 - 16:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कमळ काकडया ४-६
१ लहान कान्दा
हिरव्या मिरच्या - २
आलं-लसूण पेस्ट
टोमॅटो १ (छान पिकलेला) पेस्ट करून
आमचूर पावडर
जिरे १ लहान चमचा
हिंग १ लहान चमचा
हळद १ लहान चमचा
मीठ - चवीनुसार
धणेपूड - १ लहान चमचा
तेल - तळणासाठी
कोथिंबीर - सजावटीसाठी

क्रमवार पाककृती:
मागे माबो वर लिहिलेल्या कमळफुलाची चटणी या माझ्या पा.कृ. ला मिळालेल्या प्रतिसादांसाठी खूप खूप धन्यवाद.
https://www.maayboli.com/node/67167

तिथेच कबूल केल्याप्रमाणे कमळाच्या पा कृ चा हा दुसरा प्रकार इथे देत आहे. ही रेसिपीसुद्धा मध्यभारतातील 'बालाघाट' या भागाची एक खासियत आहे. बालाघाट हा तलावांचा प्रदेश. वैनगंगा नदीच्या वरच्या खोऱ्यात वसलेला हा प्रदेश प्राचीन दंडकारण्याचा एक भाग होता. भरपूर पाऊस आणि घनदाट जंगले असलेल्या या भागात पूर्वापार प्रामुख्याने देवगढच्या (म. प्र.) गोंड राजांची सत्ता होती तर पूर्व भाग राजगोंड वंशाच्या 'गढा - मण्डला' साम्राज्यात येत असे. कमळाच्या फुलांची भरपूर उपलब्धता असल्याने येथे आदिवासीच्या कुटीपासून ते शाही मुदपाकखान्यापर्यंत सर्वत्र या फुलाला स्थान होते.

तर मुख्य मुद्दा ही पाकृ. करायला एकदम सोप्पी, भरपूर पोषणमूल्ये असलेली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत चवदार.

पेश है चटपटीत कमळ काकडी

कमळ काकड्या स्वच्छ धुवून घ्याव्या. या खोल चिखलामधून काढाव्या लागत असल्याने ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. या साठी आपण रबरी नळी ज्याप्रमाणे नळाला लावतो तश्याच प्रकारे एक एक कमलकाकडी नळाच्या वाहत्या पाण्याखाली धरून साफ करून घ्यावी. आता त्यांच्या सालं काढून पातळ चकत्या करून घ्याव्या.

कढईत तळणासाठी तेल तापवून घ्यावे. ते कडकडीत गरम झाले की चकत्या लालसर रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्या. मीठ - चाट मसाला भुरभुरून घ्या. (गरम गरम मटकावयाला क.का. चिप्स तयार आहेत. )

आता चिप्स उरलेच असतील तर पुढे.

कांदा - मिरची भरड वाटून घ्या. टोमॅटोची पेस्ट करून घ्या.

एका फ्राईन्ग पॅन मध्ये तेल गरम करा. जिरे तडतडलं की आलं-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. आता कांदा मिरचीचे वाटण घालून २ मिनिटे हलवा आणि तय्यार टोमॅटो पेस्ट घाला. यामध्ये हिंग, हळद, मीठ आणि आमचूर पावडर घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या.
तेल सुटले कि क.का. चिप्स उर्फ तळलेल्या चकत्या घालून मसाल्यात व्यवस्थित माखून घ्या. आता पॅनमध्ये किंचित पाणी घालून एक वाफ येऊ द्या.

कोथिंबीरीने सजवून गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण:
2
अधिक टिपा:
क.का. चिप्स उपवासाला चालतात.

तिथेच कबूल केल्याप्रमाणे कमळाच्या पा कृ चा हा दुसरा प्रकार इथे देत आहे>>> तेजो, वेगळा धागा काढून तिथे लिहा. इथल्या पानांत मागे पडल्यावर हवी तेव्हा लगेच सापडणार नाही.

थँन्क्यू तेजो. ही मनिम्याऊची कृती मस्तच आहे. पण मी विचारत होते ती ही नव्हे.
ती कृती बहुधा दिनेशदांचीच होती. त्यात त्यांनी कणकेत कमलकाकडीच्या चकत्या घोळवून शॅलो फ्राय केल्या होत्या. मला अगदीच अंधूक आठवते आहे ही रेस्पी. मला मेन प्रश्न पडलाय तो हा की कणकेत घोळवण्याआधी त्यांनी त्या चकत्या वाफवून घेतल्या होत्या का?

माझ्या एका तमीळ कलीगच्या डब्यात मी नुसतेच तळलेले सांड गे असतात तश्या ह्या कमळ काकडीच्या चकत्या खाल्ल्या आहेत कधी तर १९९१ - ९४ मध्ये कधीतरी. खरपूस तळलेल्या. दही भाता बरोबर मस्त लागतील. हा एक वाळवणाचाच प्रकार वाटतो मला. एकदा करून बघितले पाहिजे.

कुणाल कपूरच्या या पाककृतीत त्या वाफवलेल्या नाहीत. >>> बरोबर. पण त्याने डीप फ्राय केल्यात. आणि शिवाय त्याच्याकडे ताजी कमलकाकडी आहे. माझ्याकडे फ्रोजन आहे.
असो. पण तरीही इतक्या लगोलग मदत केल्याबद्दल धन्यवाद तेजो आणि सोनाली.

मला वाटते जाड असतील तर वाफवाव्या लागतील आणि पातळ काप असतील तर शॅलोफ्राय करताना शिजतील.

मला वाटते जाड असतील तर वाफवाव्या लागतील आणि पातळ काप असतील तर शॅलोफ्राय करताना शिजतील. >>> हे बरोबर वाटतंय. थँक्स सोनाली.

चिंचेचे पाणी १०-१५ दिवस टिकण्यासाठी काय करावे? फ्रीज मध्ये ठेवलं तरी ६-७ दिवसांनंतर चव आणि वास बदलतो.. बुरशी चा layer पण येतो कधी कधी.
चिंच गूळ एकत्र उकळून पाणी करते.

चिंचगुळाची चटणी का? माझी शेजारीण ४-४ महिने ठेवते. चिंच भिजवलेले पाणीच फक्त वापरायचे.जास्त पाणी घालायचे नाही.चिंचेच्या रेषा(धागे) काढून दाट चटणी करून बरणीत भरून ठेवायचे.माझे महिनाभर राहिले.
आधी तुम्ही म्हणता तसा बुरशीचा तवंग आला होता.

हो चिंचगूळाची चटणी च.
मीठ, गूळ घालून उकळायचे ना? फक्त वरून पाणी नको असं का?

मी भिजवलेली चिंच आणि खजूर वाटते. १-२ चमचे तेल तापवून त्यात धने-जीरे पूड मग हे वाटण, चाट मसाला घालते. ते खदखदायला लागल्यावर अजून गोड हवे असेल तर गूळ घालते. गूळ विरघळेपर्यंत पुन्हा गरम करते. ही चटणी महीनाभर टिकते. जास्त प्रमाणात केली तर आईस ट्रे मधे फ्रिझरमधे ठेवते.

Pages