पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ढोकळ्यासाठी तांदूळ, उडीद अन चना डाळ भिजत घातली आहे, मायक्रोवेव्ह मध्ये तुनळीवर पाच मिनिटांत शिजतो तसा होईल का?
किंवा जर कन्व्हेकशन मध्ये करायचा असेल तर साधारण काय टेम्परेचर अन किती वेळ लागेल?

https://www.maayboli.com/node/10641

या रेसिपी ने करणार आहे, पण कुकरमध्ये नको वाटतेय.

कुकरमध्ये ( शिटी काढून) किंवा ढोकळा पात्रात मस्त होतो.
मायक्रोवेव्ह मध्ये माझा तरी सेंटरला पातळ राहतो आणि ते शिजेपर्यंत कडेचा कडक होतो.
कन्व्हेक्शन बेकि़ंगसाठी वापरतात. वाफवण्यासाठी नव्हे.

थँक्स भरत

माझ्या एका मैत्रिणीने सांगितले होते की जर बिन सोड्याचा करायचा असेल तर केकसारखा बेक करायचा म्हणून कन्व्हेकशन बद्दल विचारले.

मायक्रो मध्ये सगळे इन्स्टंट ढोकळे बघितले.
कुकरमध्येच बनवावा लागेल वाटते.
जर इडलीच्या भांड्यात स्टँड ठेवून त्यावर भांडे ठेवून वाफवले तर जमेल का विचार करतेय.

जर इडलीच्या भांड्यात स्टँड ठेवून त्यावर भांडे ठेवून वाफवले तर जमेल का विचार करतेय.>> हो जमेल की
कढईत सुद्धा जमेल, कढईत पाणि घालून त्यात स्टॅन्ड ठेवा पाणी उकळले की त्यावर ढोकळ्याची ताटली ठेवा वरुन एखादी कढई बसणारी ताटली ठेवा

वांगी मध्ये एक मसाला भरुन ती कुकर मध्ये उकडतात आणी नंतर लसणावर फोडणी ला टाकतात . पेडणावर ची वांगी असे म्हणतात त्याला त्या मसाल्या ची रेसिपी महीती आहे का कोणाला?

धन्यवाद Blackcat . ही रेसिपी चांगली वाटत आहे.
माझी आजी आमच्या लहानपणी नेहमी बनवायची पण ती मसाला कशी करायची ते आठवत नव्हते.

गोडा मसाला
कोथिंबीर
लसूण
कांदा
तिखट
मीठ

गुळ
चिंच कोळ

खोबर्याचा किस , दाण्याचा कूट, तीळ
धने जिरे पूड
बडीशेप कुटून
तेलकट कमी वाटले तर चमचाभर तेल

इतके घेऊन मळले की कशातही भरता येते

ब्लॅककॅट फारच छान फोटो आहे.

कोणाला विकतचा गोडा मसाला घ्यायचा असेल तर काटदरेंचाच घ्या.( सांगलीचे ) तो अस्सल चवीचा आहे. केप्रचा ( पुणे ) अजीबात घेऊ नका. अंबारी व प्रकाशचा चांगला आहे, पण काटदरेला तोड नाही. प्रकाश वाल्याने गोडा म्हणता म्हणता त्यात तिखट पण मिक्स केलेय सवयीनुसार. केप्रचा खवट कुबट लागतो.

भरली वांगी, खिचडी, चिंच गुळाची आमटीत गोडा मसाला मस्ट.

काटदरेंची बहुतेक प्रॉडक्ट चांगली असतात.
ते सांगली चे आहेत माहित नव्हतं>
आमच्याकडून दुकानात गेल्यावर अनकॉन्शसली बरीच काटदरे उत्पादनेच उचलली जातात.
अर्थात केप्र चे खवट कुबट वगैरे त्या स्पेसिफिक बॅच चे असू शकेल.

सॉरी प्राची, लक्षात नाही आले ते. धन्यवाद !

नाही अनू, असे दोन दा झालेय. आधी मी तारीख वगैरे पाहुनच माहेरी एक पाकिट दिले. नंतर परत दुसर्‍या वेळी घरी घेतले तेव्हा तसाच कुबट वास व चव होती.

ओह.
त्यांना हा फीडबॅक इमेल ने पोहचवायला हवा.
परदेशात मसाले जात असतील तर मराठी आणि भारतीय ब्रँड चे नाव खराब.
त्यांचे पॅकेजिंग चुकतेय किंवा मसाल्यात दमटपणा राहतोय.
मी एकदा छोटे पाकिट घेऊन पाहून फीडबॅक लिहेन.

मी केप्र चा गोडा मसाला वापरला आहे 2 दा मीडियम पाकिट आणले होते. माझा तर चांगला लागला . मी पाकिट फोडल्या वर fridge मध्ये ठेवले होते.

हम्म
मग एका बॅच चे असेल किंवा ज्या एरियात तो जातो तिथे गोडाऊन मध्ये दमटपणा असे काही असेल.
परवा आम्ही गन्नापन्ना मागवले होते(उसाचा रस साखरे ऐवजी टाकून पन्हे ड्रिंक.आमच्याच कंपनी तल्या मित्रांचे व्हेंचर आहे.)
तर एक्सपायरी डेट ला 15 दिवस असून, झाकण सील उघडलेले किंवा सैल नसून आत दारू बनली होती.
यात एकच शक्यता आहे.प्रॉडक्ट ट्रक किंवा उघड्या टेम्पो मधून खूप उन्हात इथून तिथे आणली असल्यास प्रक्रिया होत असेल.
केनबॉट चा आमचा अनुभव चांगला आहे.त्यामुळे त्या एका बाटलीला संशयाचा फायदा देऊन कंपोस्ट मध्ये उपडे केले.
परत अनुभव आल्यास फीडबॅक कळवू.

सॉरी प्राची, लक्षात नाही आले ते. धन्यवाद !>>
सॉरी काय त्यात.
सातारकर असले तरी सासुरवाशीण आहे त्यामुळे एवढ्या काही दुखावल्या गेल्या नाहीत.‌ Proud
सहज सांगितले.

सातारकर असले तरी सासुरवाशीण आहे त्यामुळे एवढ्या काही दुखावल्या गेल्या नाहीत.‌>> मी सांगली सासुरवाशीण त्या मुळे हे नाव तर कधी
आमच्या इथे सर्व बेस्ट मिळते असे थोरल्या नणंद बाई कडून ऐकलेले नाही. असे वाटून गेले. Wink

थॅन्क्स प्राची, समजून घेतल्या बद्दल व भावना दुखावल्या न गेल्या बद्दल. Proud

अनू, ही पण शक्यता असेल. मागे वार्षापूर्वी मी डिसेंबर मध्ये कोथरुड ला एका घरगुती वस्तु विकणार्‍या दुकानात आमरसाची बाटली घेतली. तेव्हा माझ्या मुलीला व भाचीला तो रस छान वाटला. पण तेच जेव्हा मार्च मध्ये घेतली तेव्हा मात्र रसाची चव उतरल्यासारखी लागली.

Pages