Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फे फ ला अनुमोदन.
फे फ ला अनुमोदन.
ओपनर म्हणून संधी का नाही मिळाली कधी? यावरून आपल्याला समजतं की त्याच्यासोबत पॉलिटिक्स खेळलं गेलं. तेच तर मी सांगतोय. >> मी एव्हढेच म्हणेन कि तुम्हाला रोहित सुरूवातीला टेस्ट मधे काय क्रमांकावार खेळू इच्छीत होता नि डोमेस्टिक मधे कुठे खेळत होता हे बघण्याची नितातंत गरज आहे असे बेछूट आरोप करण्याअगोदर. असो, तुम्ही तुमचे ठाम मत बनवून ठेवून 'हर समस्या का एकही अक्सीर इलाज' ह्या भूमिकेमधे असल्यामूळे ह्यात पुढे बोलण्यात काही स्वारस्य नाही.
तो उतरणीला लागलाय हे दिसतंय या आकडेवारीतून. संघनिवडीचा विचार करताना संपूर्ण कारकीर्द विचारात घ्यायची की सध्याची कामगिरी?
रोहित अजूनही टेस्टला फिट नाही, असं वारंवार लिहिलं जातं म्हणून ही तुलना.>> भरत कोहली कडे बोटे दाखवताना त्या आधी तो किती वेळा बाहेर खेळला आहे नि किती ईफेक्टिव्हली खेळला आहे हे बघणे जरुरी आहे. त्याशिवाय हा पॅच बॅड पॅच आहे कि खेळाडू संपला आहे (माझ्याकडे असे बघायचा आरसा नाही पण इथे बर्या जणांकडे आहे असे दिसतेय) हे ठरवणे जरुरी आहे. तुम्ही आकडे डकवता आहात नि वर एक्स्पोनेंशियल अॅव्हरेज अचा उल्लेख आला आहे म्हणून हे सुचवतो.
https://www.espncricinfo.com/story/kartikeya-date-are-kohli-and-pujara-i...
राहता राहिला रोहितचा प्रश्न तर रोहित ने स्वतः ह्या आयुष्याच्या इनिंगमधे ओपनर होण्यासाठी काय बदल केले हे नमूद केले आहे. आधीच्या ईनिंग्स का फ्लॉप झाल्या, स्वतःच्या फेल्युअर ची जाणीव नि कुठे अॅडजस्ट्मेंट ची जरुरी होती हे त्यानेच प्रामाणिकपणे नमूद केले आहे.
आकडेवारी तर काय ओढूनताणून
आकडेवारी तर काय ओढूनताणून कशीही आणता येते. आणि संघ हारत असेल तर हे पर्सनल रेकॉर्ड काय कामाचे? रोहित कोहलीपेक्षा कितीतरी पटीने चांगला कॅप्टन आहे हेच अंतिम सत्य आहे.
बोकलत, क्या बात है!! तुम्ही
बोकलत, क्या बात है!! तुम्ही तर भारतीय क्रिकेटच्या समस्येचं रूट-कॉज अॅनलिसिस करून, अक्सीर रामबाण उपायच शोधलेला आहे. (बोकलत ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात इथे). किंबहूना, १९८७ साली जन्माला आल्या आल्या रोहित ला भारताचा कप्तान केला असता तर त्यापुढचे सगळे (८७ चा धरून), आठही वर्ल्डकप्स भारतानं पोत्यात भरून आणून बीसीसीआयच्या कपाटात रचून ठेवले असते.
खरं तर इतक्याने भागणारं नाही. ‘मैं ऑम्लेट भी बेचूंगा, और वह खाने के लिये ब्रेडभी मैं ही बनाऊंगा‘ ह्या तत्त्वानुसार रोहित ला निवडसमितीचं अध्यक्षपद (एक-सदस्यीय समिती हे आलंच ओघाओघानं) देऊन, त्यालाच कॅप्टन करून, टीम बनवावी. किंबहूना त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी भारतीय क्रिकेटमधे ‘शर्मा आरक्षण‘ असावं. बॉलिंग कोच - चेतन शर्मा, बॅटींग कोच - अभय शर्मा, फिल्डींग कोच - गोपाल शर्मा. रोहित, इशांत च्या जोडीला कमी पडलाच तर कपिल शर्मालाही टीममधे खेळवावं.
हे व्रत केले असता, भारतीय संघ क्रिकेटमधे सदैव अपराजित राहून, विश्वविजेता ठरेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण. श्री बोकलत प्रसन्न!!
रोहीत शर्मा एकदिवसीय कप्तान
रोहीत शर्मा एकदिवसीय कप्तान
सामने - १०
विजय - ८
विनिंग रेशिओ - ८० %
आशिया कप विजेता
फलंदाजीतली कामगिरी
धावा - ५४३
सरासरी - ७७.५७
स्ट्राईकरेट - ९७.३१
शतके - २
रोहीत शर्मा २०-२० कप्तान
सामने - १९
विजय - १५
विनिंग रेशिओ - ७९ %
फलंदाजीतली कामगिरी
धावा - ७१२
सरासरी - ४१.८८
स्ट्राईकरेट - १६०.००
शतके - २
अर्धशतके - ५
आता यात आयपीएल जोडल्यास ८ पैकी ५ वेळा विजेता
कसोटीची कल्पना नाही, पण लिमिटेडमध्ये भारत एका चांगल्या कर्णधाराला मुकतोय जो धोनीनंतर आपल्याला आयसीसी स्पर्धा जिंकवून देऊ शकत होता.
ता.क. - ज्या सामन्यात रोहीत शर्मा कप्तान होता त्या सामन्यात जगातला सर्वोत्तम फलंदाज कोहली त्याच्या संघात नव्हता हे विशेष.
कसोटीची कल्पना नाही, पण
कसोटीची कल्पना नाही, पण लिमिटेडमध्ये भारत एका चांगल्या कर्णधाराला मुकतोय जो धोनीनंतर आपल्याला आयसीसी स्पर्धा जिंकवून देऊ शकत होता. >> हे असे "कसोटीची कल्पना नाही" टाकून पळायचे नाही. कसोटी सामने सुरू असताना कसोटी संघाचा कप्तान रोहितच हवा, कोहली नाही ह्या अकारण सुरू असलेल्या वादामधे "कसोटीची कल्पना नाही" लिहून टाकलेल्या पोस्ट चाय उपयोग ?
जी व्यक्ती टेस्ट मधल्या दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर वयाची तिशी ओलांडल्यावर टेस्ट मधे अनोळ्कही जागेवर तिसरी इनिंग यशस्वी होण्याचा जीवतोड प्रयत्न करतेय , तिला सेट्ल व्ह्यायला वेळही न देता, कप्तान करून अजून गळ्यात दोरखंड बांधायला सांगताय ?
हे असे "कसोटीची कल्पना नाही"
हे असे "कसोटीची कल्पना नाही" टाकून पळायचे नाही. कसोटी सामने सुरू असताना कसोटी संघाचा कप्तान रोहितच हवा, कोहली नाही ह्या अकारण सुरू असलेल्या वादामधे "कसोटीची कल्पना नाही" लिहून टाकलेल्या पोस्ट चाय उपयोग ?
>>>>
उपयोग? कसला ऊपयोग? कोणाला ऊपयोग?

कसोटीची कल्पना नाही म्हणजे मला त्या वरच्या वादात वा चर्चेत पडायचे नाहीये. तुम्हीच लिहिताय वाद अकारण आहे, मग मला कश्याला त्यात ओढताय
कोणालाही करा कसोटीचा कर्णधार मला चालेल
पण त्या चर्चेवरून मला आठवले की शर्मा लिमिटेडमध्ये भारताचा कर्णधार झाला नाही याचे मला दुख आहे, आणि अजूनही झाला तर आवडेल हे नमूद करू ईच्छितो. माझ्या वाटण्याला आधार म्हणून वरचे आकडे दिले आहेत. जे दर्शवतात की लिमिटेडमध्ये कर्णधार शर्मा की कोहली हा वाद अकारण नाही
आता कसोटी सामने चालू असताना लिमिटेडबद्दल बोलायचेच नाही, किंवा तोंडावर २०-२० वर्ल्डकप वा त्याहीनंतर २०२३ च्या वर्ल्डकपबद्दल एवढ्यात काही लिहायचे नाही असे जरूरी नाही ना. की त्यासाठी हि कसोटी मालिका संपायची वाट बघायला हवी होती
तुमची कसोटी कर्णधार कोण याची चर्चा साईड बाय साईड चालू द्या.
पण कोणाला शर्मा लिमिटेडमध्येही कर्णधार म्हणून लायकीचा वाटत नसेल तर त्याने खुशाल तसे लिहावे. मग मी त्याच्यासोबत चर्चा करेन
शर्मा सध्या कसोटीत ओपनर म्हणून भारतासोबत बाहेरही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवतोय याचा मात्र मला फार आनंद झाला आहे, कारण मला तो कायम विश्वास होता
असो, पंत जसे या सामन्यात
असो, पंत जसे या सामन्यात दोन्ही इनिंगला बाद झाला त्याने मी आधीच व्यथित आहे. किंबहुना पुढचे दोन्ही सामने चारही डाव (जर त्याला खेळवल्यास) तो असाच बाद होण्याचीही शक्यता आता खूप वाटतेय. त्याच्या डोक्यात अजूनही कन्फ्यूजन आहे म्हणून त्याचे तंत्र गंडतेय असे वाटले. हे शास्त्री-कोहली जोडगोळी त्याची वाट लावणार आहेत. पंत चमकलेला ते सुद्धा रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात. कोहलीसोबत तो थोडा कन्फ्यूजनमध्येच राहणार असे वाटते.
रोहित हा कोहलीपेक्षा कितीतरी
रोहित हा कोहलीपेक्षा कितीतरी पटीने चांगला कॅप्टन आहे हे ढळढळीत सत्य समोर दिसत असूनही काही लोक्स मानायला तयार नाहीत. उलट कोहलीचं अपयश झाकता यावं म्हणून रोहितवरच टीका करत आहेत. बरं झालं मुंबई इंडियन्सने त्याला कॅप्टन केलंय. त्यानिमित्ताने रोहितला आपले कॅप्टनशीप स्किल्स दाखवता आले. दुःख फक्त याचं वाटतंय की ज्याप्रमाणे रोहितने मुंबईला पाच वेळा ट्रॉफी जिंकवून दिली आणि मुंबई फॅन्सना आनंद दिला त्या आनंदाला भारतीय फॅन्स कोहलीच्या कॅप्टनशीपमुळे मुकले. कोहली समर्थकांनी कितीपण सवरासावर केली तरी कोहलीच्या इगोमुळे रोहितचे कॅप्टनशीप स्किल्स झाकोळले गेले हे सत्य आहे. आणि याचा फटका भारतीय क्रिकेटला बसला. खराब फिल्डिंग, बॉलिंग केली की आपल्याच संघातल्या खेळाडूंना अपशब्द वापरायचे , प्रतिस्पर्धी खेळाडू चांगली बॅटिंग करत असला की अपशब्द वापरून त्याच्या अंगावर धावून जायचं, प्रेक्षकांना अश्लील हातवारे करायचे( मागे आयपीएल सामन्यात कोहलीने प्रेक्षकांना मिडल फिंगर दाखवले होते) हे सगळे याचे कारनामे आहेत, ही सगळी स्पोर्टिंग स्पिरिट नसल्याची आणि मानसिक संतुलन ढासळण्याची लक्षणं आहेत. कोहली फॅन्स या कृत्यांसाठी त्याचं कौतुक पण करतात. दुसरीकडे रोहित आहे. त्याला मी मुंबईची कॅप्टनशीप करताना कधीच कुठल्या खेळाडूला अपशब्द वापरताना पाहिले नाहीत. महत्वाचा कॅच सुटला, मिसफिल्ड झाली की तो फक्त निराश होऊन एकदा आकाशाकडे पाहतो आणि खेळाडूला नेहमी प्रोत्साहन देतो. बरं झालं मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. त्यानिमित्ताने का होईना रोहितच्या कॅप्टनशीपखाली पाच(& counting...)वेळा मुंबईला आयपीएल ट्रॉफी उचलताना पाहिलं.
कोहली फलंदाज उत्तम आहे यात
कोहली फलंदाज उत्तम आहे यात वादच नाही पण कर्णधार म्हणून कधीच आवडला नाही.
रोहित हा कोहलीपेक्षा कितीतरी
रोहित हा कोहलीपेक्षा कितीतरी पटीने चांगला कॅप्टन आहे हे ढळढळीत सत्य समोर दिसत असूनही काही लोक्स मानायला तयार नाहीत. उलट कोहलीचं अपयश झाकता यावं म्हणून रोहितवरच टीका करत आहेत. >> प्रश्न रोहित कोहलीपेक्षा टेस्ट कॅप्टन कसा चांगला आहे हा आहे. संपूर्ण वाद त्यावरून सुरू झाला. त्यात रोहितची लिमिटेड ओव्हर्स ची पाच टायटल हा आकडा धरायची नि कोहलीचा कॅप्टन म्हणूण टेस्ट रेकॉर्ड धरायाचा नाही हा अट्टहास का ? पाच टायटल्स हे समर्थन चालते तर सर्वात यशस्वी भारतीत टेस्ट कर्णधार हि आकडेवारी दुर्ल्क्षित करून कशी चालेल ?
कसोटीची कल्पना नाही म्हणजे मला त्या वरच्या वादात वा चर्चेत पडायचे नाहीये. तुम्हीच लिहिताय वाद अकारण आहे, मग मला कश्याला त्यात ओढताय >> मग असंबंद्ध मुद्दे कशाला मांडतोयस सुरू असलेल्या वादामधे नक्की ? लिमिटेड क्रिकेटच्या कप्तान शिप बद्दल होईल तेंव्हा आकडेवारी लिही. की नवा वाद सुरू करायचा प्रयत्न करतोयस ?
पाच टायटल धरायला लागतात कारण
पाच टायटल धरायला लागतात कारण रोहितला टेस्टमधून मुद्दाम बाहेर ठेवलं. मग तुलना आयपीएल मध्ये दोघांना असणाऱ्या समान प्लॅटफॉर्मचीच होणार ना?
असामी, रोहीतला कधीच बदली
असामी, रोहीतला कधीच बदली कर्णधार म्हणून कसोटीत कप्तानीची संधी मिळाली नाही तर मी त्याची कसोटी कप्तानी नक्की कशी जोखणार?
तुम्ही लोकं कसे जोखत आहात तुम्हालाच ठाऊक. मला जोखता येत नाही असे म्हणून नो कॉमेण्टस.
त्याची कप्तानी मी लिमिटेडमध्ये पाहिली आहे. आणि ती कोहलीपेक्षा जास्त चांगली आहे.
आता गंमत अशी आहे की याची तुम्हालाही कल्पना आहे की लिमिटेडमध्ये शर्मा हा कोहलीपेक्षा जास्त चांगला कप्तान आहे म्हणून तुम्हाला आता हा विषय नकोय
{जी व्यक्ती टेस्ट मधल्या दोन
{जी व्यक्ती टेस्ट मधल्या दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर वयाची तिशी ओलांडल्यावर टेस्ट मधे अनोळ्कही जागेवर तिसरी इनिंग यशस्वी होण्याचा जीवतोड प्रयत्न करतेय , तिला सेट्ल व्ह्यायला वेळही न देता, कप्तान करून अजून गळ्यात दोरखंड बांधायला सांगताय ?}
तीच व्यक्ती कधी चुकतेय आणि आम्ही कधी तिच्या गळ्यावरून सुरी फिरवतो यासाठी इथे अनेक जण टपून बसलेले असतात. त्यांच्यासाठी मी ती आकडेवारी दिली.
पहिल्या डावात रोहित लवकर बाद झाला असता तर इथे त्यावर तीन-चार प्रतिसाद नक्कीच पडले असते. पण बाकीचे पाच भरवशाचे, सातत्यपूर्ण कामगिरी करणारे, गुणवान, टेस्ट टेंपरामेंटचे फलंदाज त्यांच्या आधी बाद झाले त्यामुळे कीबोर्डांना आराम मिळाला.
पेपरात सुद्धा रोहित विचित्र फटका मारत बाद झाला यावर वेगळी बातमी. अर्थात त्या पेपरने रोहितचं , अगदी त्याच्या एका विशिष्ट फटक्यांचंही, कौतुक करणारे लेख आणि अगदी संपादकीयही लिहिलंय. त्यामुळे त्यांना रोहित कडून विशेष अपेक्षा आहेत असं मी समजतो.
बरं रोहित सलामीला का येतोय? मला मधल्या फळीत जागा नाही तर मी सलामीला जातो , पण संघात घ्या असं म्हणत की संघाला सलामीवीर हवा म्हणून?
सर्वात यशस्वी भारतीत टेस्ट
सर्वात यशस्वी भारतीत टेस्ट कर्णधार हि आकडेवारी दुर्ल्क्षित करून कशी चालेल ?
>>>>
रहाणे हा अजिंक्य आहे कसोटी कप्तान म्हणून.. जास्त यशस्वी तो म्हणायला हवे.
असो,
कोहलीचे लिमिटेडमधील कप्तानीचे आकडेही सरस आहेत.
भले आयसीसी चषक नसेल पण विनिण्ग रेशिओ चांगलाच असेल. कदाचित धोनीपेक्षाही जास्तच असेल. चांगला संघ मिळाला तर ते आकडे चांगले दिसतातच. पण जिथे कप्तान म्हणून कस लागतो त्या सिच्युएशनला तो कमी पडतोच हे फॅक्ट आहे. जसे की कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये कर्णधार कोहली आणि कर्णधार विल्यमसन यातील फरक स्पष्ट झाला. आपल्याला पुर्णत: डावपेचांमध्ये मात दिली त्यांनी..
सौ टके कि बात
.
१००
सौ टके कि बात
(No subject)
अरे, हया वयांत झेपणार आहे का आपल्याला इतक्या टेन्शनवाल्या विराट वि. रोहित मॅचचं अंपायरींग करायला !!!
भाऊ, पंचगिरी नका करु पण
भाऊ, पंचगिरी नका करु पण समलोचन तरी करा सामन्याचे आनि अधुन मधून तज्ञ समिक्षा.
आणि तज्ञ समिक्षा तर आजकाल कुणीही करु शकते....
.*..आणि तज्ञ समिक्षा तर आजकाल
.*..आणि तज्ञ समिक्षा तर आजकाल कुणीही करु शकते....* -
हें उमजल्यापासूनच तर तें बंद केलं ना मीं !!!
पण सिरीयसली - मला कोहलीचं मैदानावरील एकंदर हावभाव फार खटकतात कारण ते माझ्या खेळाचा आनंद घेण्यात बाधा आणतात ( हें मीं पूर्वी पासून सांगतोय ) पण तो माझां वैयक्तीक आवडी-नावडीचा व तेंही एक प्रेक्षक म्हणून पवित्रा. खरा निकष आहे कीं संघ सहकार्याना तो कर्णधार म्हणून संघाची कामगिरी उंचावणयाबाबत कसा वाटतो. मला तरी याची निश्चिंत माहिती नाहीं.
दुसरं , कुणाच्या नेतृत्वाखालीं किती स्पर्धा जिंकल्या हाही निकष फार निर्णायक नाहीं. नेतृत्वाशिवाय इतर अनेक घटक यांत महत्वाचे असतात. The captain is as good as the team he leads,हेंही आहेच. त्यामुळे, कोहलीने कांहीं भयानक चूका केल्या असं स्पष्ट असल्याशिवाय मीं तरी त्याच्या विरोधात मत देणार नाहीं, ( खेळाडू व कर्णधार म्हणून मला रोहित प्रचंड आवडत असूनही).
पुढच्या कसोटीत भारताने
पुढच्या कसोटीत भारताने पुढीलप्रमाणे टीम खेळवावी आणि याच फलंदाजी च्या क्रमाने
1 रोहित
2 राहुल
3 पुजारा
4 विराट
5 जडेजा
6 विहारी
7 पंत
8 अश्विन
9 उमेश
10 शमी
11 बुमराह
रहाणे ला ब्रेक दयावा, तो परत येऊ शकतो, जडेजा ला 5 व्या क्रमांकावर खेळवून डावखोरा असल्याचा उपयोग करून घ्यावा. उमेश यादव इंग्लंड मध्ये उपयोगी ठरेल
वासू परांजपे यांचं निधन.
वासू परांजपे यांचं निधन.
*वासू परांजपे यांचं निधन*
*वासू परांजपे यांचं निधन* श्रद्धांजली !!
मुंबई क्रिकेटमधे कित्येक तपं आदराचं स्थान टिकवून असणारा अत्यंत गुणी क्रिकेटपटू !!!
वासू परांजपे यांचं निधन>>>>
वासू परांजपे यांचं निधन>>>>
भावपूर्ण श्रद्धांजली...
वासू परांजपे यांचं निधन: गुणी
वासू परांजपे यांचं निधन: गुणी, प्रतिभावान खेळाडूंची प्रतिभा ओळखून त्यांना पैलू पाडणार्या एका आदरणीय प्रशिक्षकाला श्रद्धांजली!
सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर, संदिप पाटील, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, रोहित शर्मा, सनथ जयसुर्या अशा कितीतरी गुणी खेळाडूंना त्यांचं मार्गदर्शन लाभलं.
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली...
बरं रोहित सलामीला का येतोय?
बरं रोहित सलामीला का येतोय? मला मधल्या फळीत जागा नाही तर मी सलामीला जातो , पण संघात घ्या असं म्हणत की संघाला सलामीवीर हवा म्हणून? >> भरत ह्या प्रश्नाचे उत्तर र्हुन्मेश किंवा बोकलत ला विचारावेत.
भले आयसीसी चषक नसेल पण विनिण्ग रेशिओ चांगलाच असेल. कदाचित धोनीपेक्षाही जास्तच असेल. चांगला संघ मिळाला तर ते आकडे चांगले दिसतातच. >> बोकलत च्या अचाट पोस्ट वर उत्तर देताना मी एक लिंक दिली होती कोहलीच्या टेस्ट कॅप्टन्सी ची. खंडिभर असंबद्ध रीप्लाय लिहिण्या आधी समोरचा काय लिहून गेलाय किमान हे एकदा तरी बघितले असते तर ... असो
वासू परांजपे यांचं निधन: गुणी, प्रतिभावान खेळाडूंची प्रतिभा ओळखून त्यांना पैलू पाडणार्या एका आदरणीय प्रशिक्षकाला श्रद्धांजली! >> तेंडूलकरने त्यांच्याबद्दल सांगितले ला किस्सा जबरदस्त होता. भाऊंना माहित असेलच/ जयसुर्या चे नाव पण आहे हो त्या लिस्ट मधे. त्यांचा मुलगा पण एकदम जिगरी खेळाडू होता. सध्या काय करतो माहित नाही.
साधा माणूस तुम्ही दिली तशी टीम असेल असे वाटते फक्त अश्विन च्या जागी जाडेजाच राहील असे वाटते कारण मूळात कमकुवत असली फलंदाजी अजून कमकुवत करतील असे वाटत नाही.
"त्यांचा मुलगा पण एकदम जिगरी
"त्यांचा मुलगा पण एकदम जिगरी खेळाडू होता. सध्या काय करतो माहित नाही." - जतिन परांजपे. कॉमनवेल्थ गेम्स मधे क्रिकेट चा समावेश केला होता. तेव्हा एक भारतीय संघ (तेंडुलकर होता त्यात) कॉमनवेल्थ साठी आणि दुसरा टोरांटो ला पाकिस्तान च्या विरूद्ध मालिका खेळायला पाठवला होता. त्या (दुसर्या - कॅनडाला पाठवलेल्या) संघात होता जतिन परांजपे. त्याआधी भारतात एक सामना खेळला होता बहुतेक. इतक्यात कधीतरी निवडसमितीचा सदस्य सुद्धा होता.
मलाही बरी वाटते '' साधा माणूस
मलाही बरी वाटते '' साधा माणूस' यांची टीम. फक्त, मीं सध्या तरी रहाणेला काढून विहारीला घेणयाबद्दल साशंक आहे.
रहाणेला बसवायचे नसल्यास चार
रहाणेला बसवायचे नसल्यास चार ऐवजी तीनच वेगवान खेळवून त्या जागी विहारी आत आणावा.
तीन वेगवानांसोबत जडेजा हे कॉम्बो गोलंदाजी कमकुवत करत असल्याने जडेजाच्या जागी विकेटटेकर आश्विन आणावा.
जडेजा चांगली फलंदाजी करत असला तरीही मागच्या क्रमांकावर त्याच्या फलंदाजीचा तितका फायदा होत नाहीये. त्याऐवजी सहा फलंदाज खेळवून पंत सातवा आल्यास आणि मागे आश्विन आठवा असणे चांगले.
सध्या असे झालेय की रहाणे फलंदाजीला ऊतरताच आपण शिल्लक घटका मोजायला सुरुवात करतो. तसेच ईंग्लिश गोलंदाजांनाही हुरूप येतो. विहारीने गरज पडल्यास दुसरा नवीन बॉल खेळायची जबाबदारी उचलल्यास चित्र बदलेल.
सा. मा. तुमची टीम चांगली आहे.
सा. मा. तुमची टीम चांगली आहे. पण भाऊ म्हणतात तसं लॉर्ड्स च्या दुसर्या इनिंगमधे ६०+ स्कोअर करून फॉर्ममधे परत येण्याच्या खुणा दाखवत असलेल्या रहाणेला बसवतील का ह्याबद्दल मलाही शंका आहे. उमेश ऐवजी ठाकूर ला बॅटींग स्किल्स मुळे प्राधान्य दिलं जायची शक्यता आहे असंही वाटतं.
अवांतर - रहाणे गेले काही काळ
अवांतर - रहाणे गेले काही काळ अपवाद वगळता जो सातत्याने खराब खेळ दाखवतोय त्याच्या निम्मा खराब खेळ जरी शर्माने केला असता तर एव्हाना आपण त्याला संघाच्या नाही तर ईंग्लंडच्या बाहेर सोडून आलो असतो
Pages