खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20210526_124832309~3.jpg

या मटर पनीर खायला. अस्मिता तुमच्या टीप्स वापरून केलंय बरं Happy
फक्त पनीर तळले नाही कारण बटर असणारच होते ‌.

कच्चे पपई फोडी करून अळूच्या भाजीत घातल्या

मस्त गुलाबी फोडी होत्या

पण सगळ्या विरघळून गेल्या

अजून अर्धा बाकी आहे

पपई सलाड

थोडी फोडणी करून त्यात पपई किस परतला

SAVE_20210526_203742.jpeg

हेच मटेरियल करून ते मॅश करून त्यात पीठ वगैरे घालून पराठे होतात.
1 हिरवी पपई अर्धी कापली तरी व्यवस्थित अजून एक दिवस टिकते

@ Blackcat
नाळे साठी घोडा चालत असेल तर गलौटी कबाब बनवा Proud

आंध्रा स्टाईल उर्गकाय पछडी- फ्फार सोपी रेसिपी दोन ओळीत.
1. मिक्सरच्या भांड्यात अर्धी कैरी बारीक कापून, दोन चमचे लाल मिर्च पावडर,4-5 लसूण पाकळ्या, मीठ रफली फिरवून घेणे.
2.फोडणी ला दोन चमचे तेलात मोहरी, एक चमचा चणाडाळ, एक चमचा उडद डाळ,कडिपत्ता मग वरील मिश्रण टाकून दोन मिनटं एकजीव करणे.जास्त शिजवायचे नाहीये.
कैरीची चटणी तयार.....गरमागरम भाताबरोबर फार यम्मी लागते Happy

व्हेज कबाब असतात का ? >>> मटण कबाब. रणवीर ब्रार ची रेसिपी आहे. त्याबद्दल सांगताना त्याने सांगितले होते की राजा-राजवाड्यांच्या जमान्यात शाही आचारी राजासाठी नेहमीच नवनवीन पदार्थ बनवत असत.म्हातारपणी राजाला दात नसल्यामुळे मटण वैगरे खाण्याचे वांदे होत असत. तेव्हा आचाऱ्याने कच्या पपईच्या किसात मटण मुरवून त्यात त्यांचे खास मसाले घालून जे कबाब बनविले ते अगदी माऊथ मेल्टींग झाले. तेच हे galaoti कबाब.
लखनऊ मधे म्हणे अगदी original मिळतात.

डोसे... यावेळी सालीची उडीदडाळ वापरून बघितली. नेहमी पेक्षा जरा चिकट वाटले पण छान जमले डोसे.

Screenshot_20210527-151535__01.jpg

आणि नवर्याने १०० पैकी १०० गुण दिलेली ( हा अत्यंत दुर्मिळ योग आहे) मिसळ

Screenshot_20210527-151446__01.jpgScreenshot_20210527-151434.jpg

कच्च्या पपईचे पराठे मस्त होतात

फोडणीत किस थोडासा परतून घेणे , मग त्यात कणिक , बाकी मटेरियल घालून त्याचे पराठे करणे , मस्त होतात

पिठातच सगळे मिसळणे
स्टफ पराठा नाही

Pages