खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20210516_132608.jpg
अक्षय तृतीया - (नंतरच्या रविवारी बनविलेली आम रस पुरी आणि वांग + बटाटा + टोमॅटो ची सुक्की भाजी
IMG_20210524_084217.jpg
आजचा लंच मेनू : इडली, चटणी, (घरी बनविलेली) ,टोमॅटो सेव भाजी (कॅन्टीन च्या महाराज ची कृपा).
IMG_20210524_123149.jpg

नाही मानव जी , माझ्याकडे पांढरी उडदाची डाळ न्हवती, म्हणून अक्खे काळे उडीद काल भिजत घातले आणि जमतील तेवढी साले काढून मिक्सरला दळून घेतली म्हणून थोडा रंग उतरला इडलीत. (हा... हा.... हा ....) बॅटर रेशनचे तांदूळ, काळी उडदाची डाळ आणि मेथी दाणे यापासून बनविले होते, छान स्पंजी,जाळीदार बनल्या होत्या इडल्या .

इडल्या....भयानक सुंदर इडल्या आहेत सगळ्यांच्या! मला इडली आणि डोसे अतिशय आवडतात. ब्रेकफास्ट- लंच -डिनर -स्नॅक्स कधीही खाऊ शकते आणि कितीही दिवस सलग.
आता इडल्या करणं आलं Happy

रानभुली, सर्व पदार्थ बघून- लक्षात ठेवून कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद!

धन्यवाद !

बाजरी चे डोसे मस्तच दिसताहेत !! चटणी पण छान !!
रेसिपी सांगाल का दोन्ही ची ?>>>>

नवा पाककृती धागा काढलाय. इच्छुकांनी कृपया लाभ घ्यावा.
Lol

इडली, सांभार, आमरस पुरी.. भारी आहेत सगळे पदार्थ..!

मृणाली.. छान प्रयोग करतेस आहारात...
बाजरी डोसा रेसिपी मस्त..!

कुणी रेसीपी विचारली की पडत्या फळाची आज्ञा मानून लगोलग पाकृ विभागात पाकृ धागा काढुन लिहावी.

जास्त लोकांपर्यंत पोचते, मायबोलीच्या पाकृ ऍप मध्ये दिसते, शोधायला सोपी जाते.

कुणी रेसीपी विचारली की पडत्या फळाची आज्ञा मानून लगोलग पाकृ विभागात पाकृ धागा काढुन लिहावी.>>>>>>>
Lol
लिहिते नव्या धाग्यात.

अरेच्या इडली, डोसा ह्यांचेच जास्ती फोटू दिसतायेत.
प्राजक्ता माझही अगदी असंच आहे.
मी इडली, डोसा हे दिवसातल्या कोणत्याही वेळेस आणि कितीही खाऊ शकते.
मी गतजन्मी सौंद इंडियन होते की काय असा संशय येतो Happy

PSX_20210525_125447.jpg
कैरीच लोणचं.
हे वर्षभराच नाही घातलं.
तात्पुरतं घातलंय.

फालुदा मस्त

कैरीचे लोणचे तोंपासु... मला घरी बनवलेले च कैरी लोणचे आवडतं..सोपं आहे का बनवणे??असेल तर सांगा न रेसिपी.

लोणच , मस्त.
फालुद्याने डोकं खराब झाले... का आले मी इथे. Happy

कच्ची पपई आहे काय होईल ?>>>> कच्ची पपई किसून घ्या आणि थालीपीठ बनवा. कांद्या ऐवजी पपई घालायची.
भाजी पण बनवू शकता. जीर मोहरी मिरची आणि हिंग कढीलींबाची फोडणी.

लोणच, फालूदा मस्त !!!!!!!

काल नवीन आयटम ट्राय केला .. जेली केक
एक छोटीशी गडबड झाल्याने फिनिशिंग थोडी गंडली पण टेस्ट मात्र कमाल झालेली. कधी नाही ते मी गोड पदार्थ असून तुटून पडलो Happy

1621983495722.jpg
.
1621983511170.jpg

आणि हा वर आलेल्या ईडल्यांना आमचा झब्बू.. तसा माझा कमी आवडीचा प्रकार. मी ईंडलीपेक्षा घावणा डोसा लव्हर.. फक्त ईडली फ्राय तेवढी आवडीची. मात्र चटणी छान झाल्ली असल्याने सोबत चहाचा घोट घेत घेत खाल्या पोटभर Happy

IMG_20210526_044847.jpg
.
1621984408335.jpg

Pages