Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी फक्त gangster बघितला होता,
मी फक्त gangster बघितला होता, नंतर कुठलेच नाहीत. कारण काही नाही, चित्रपट कुठलेही बघायचा कंटाळा येतो. तिथे ती आणि आहुजा दोघेही आवडलेले.
मनकर्णिकाचा ट्रेलर पाहिला त्यावरून पहायची हिम्मत झाली नाही. >>> हो त्यात ती उगाच अति आरडाओरडा करते असं वाटलं मला.
काही पिक्चरमध्ये चांगलं काम केलं असावं, असं वाटतंय पण बघितले नाहीत.
QUEEN नावाच्या वेब सिरीज
QUEEN नावाच्या वेब सिरीज मध्ये RAMYA KRISHNAN ने केलेली जयललिता यांची भूमिका खरेच वाखाणण्या जोगी आहे कुठेही ओव्हर न्हवती
नाही पाहिला ट्रेलर व खर्या
नाही पाहिला ट्रेलर व खर्या व्यक्तिंवर आधारीत सिनेमे मलातरी विशेष पहावेसे वाटत नाहीत.
२-३ पाने मागे मी चुकुन वंदना गुप्ते लिहिलं होतं. हो हो, त्या सुहास जोशीच आहेत पण चुकुन लिहून गेले. त्या दोघीही मला अतिशय आवडतात व खूपवेळा मी माझ्या मनात त्यांची अदलाबदल होते.
"अजीब दास्तान्स" - ४ लहान
"अजीब दास्तान्स" - ४ लहान स्टोरीज आहेत असे दिसते. नेटफ्लिक्स वर एप्रिल १६:
https://youtu.be/EImTzMiVdzo
स्टार कास्ट पण बरीच आहे.
Fatima Sana Shaikh, Jaideep Ahlawat, Armaan Ralhan, Nushrratt Bharuccha, Abhishek Banerjee, Konkana Sen Sharma, Aditi Rao Hydari, Shefali Shah and Manav Kaul in Ajeeb Daastaans, premieres 16 April, only on Netflix.
नुकताच आर माधवनच्या rocketry
नुकताच आर माधवनच्या rocketry चा ट्रेलर पाहिला. promising वाटतोय.
https://www.youtube.com/watch?v=wwGbt878_g0
लेखक दिग्दर्शक माधवनच आहे.
लेखक दिग्दर्शक माधवनच आहे. ट्रू स्ट्रोरी वा त्यावर आधारीत आहे का?
शाहरूखही पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसला हे बघून बरे वाटले.
जेव्हा माधवन बॉलीवूडमध्ये नवीनच आलेला तेव्हा शाहरूखचीच डीडीएलजे टाईप्स स्टाईल मारायचा.
मात्र अभिनय होता त्याच्याकडे. पुढे त्याने तो दाखवून आपली जागा बनवली. फील गूड अॅक्टर आहे. आवडीचा.. चित्रपट चांगला असावा, बघायलाही आवडेल..
बॉलिवूड मध्ये शाहरुख ची कॉपी
बॉलिवूड मध्ये शाहरुख ची कॉपी करायचा पण प्रचंड ओव्हेरएकटिंग करायचा माधवन...
त्यामानाने त्याचे तमिळ सिनेमे चांगले होते मानिरत्नम बरोबरचे...
>> ट्रू स्ट्रोरी वा त्यावर
>> ट्रू स्ट्रोरी वा त्यावर आधारीत आहे का?
होय. आता सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन माती केलीय का ते सिनेमा पहिल्यावरच कळेल.
नेटफ्लिक्स वर - स्केटर
नेटफ्लिक्स वर - स्केटर गर्ल
https://youtu.be/-r2g0Ypjd3E
कदाचित टिपिकल असेल, खेडेगावतला/ली कुणीतरी अनोळखी खेळात प्राविण्य मिळवणे वगैरे. पण क्यूट वाटला ट्रेलर.
तूफान आ रहेला है - फरहान
तूफान आ रहेला है - फरहान अख्तर
बरेच नाटकीय आणि टिपिकल घडामोडी दिसत आहेत.
ट्रेलर बघून सलमानच्या सुलतानची आठवण झाली
https://youtu.be/4qalsBNwZds
चंदिगढ करे आशिकी
चंदिगढ करे आशिकी
झिम्मा चित्रपट बघायला गेलेलो तेव्हा याचा ट्रेलर पाहिला होता. ट्रेलरवरून तरी बिलकुल रुचला नव्हता. म्हणजे फार आगाऊ मॉडर्न अति वगैरे वाटत होता. आयुष्यमान खुरानाही फार बोअर वाटला ट्रेलरमध्ये. म्हणजे वाणी कपूरला मॅच करून टाकलेला त्याला. तीस चाळीस लोकांकडून चित्रपट चांगला आहे असे ऐकून खात्री पटली तरच बघण्यात येईल. वर उल्लेखलेल्या पॉर्न चित्रणाबाबत सहमत. ट्रेलर मध्येही काहीतरी बोल्ड सीन दाखवलेले वाटते. तेव्हा तर फुल्ली आणखी गडद झाली. अश्लील दृश्यांचा सहारा घ्यावा लागला तर तेव्हाच चित्रपटाबद्दल माझे मत प्रतिकूल होते.
झोंबिवली ... मागेच ट्रेलर
झोंबिवली ... मागेच ट्रेलर पाहिलेला.. भारी वाटलेला.. पण कोरोनात अडकलेला. आता ४ फेब २०२२ ला येतोय ..
अमेय वाघ, लल्लित प्रभाकर, सिद्धार्थ जाधव..
https://www.youtube.com/watch?v=vFTA6ijL2E0
आणि हे त्याचे गाणे... अंगात आलय.. अंगात आलय.. अंगात आलया..
https://www.youtube.com/watch?v=kZ5vmf9attc
झिंगाट ची कॉपी आहे
झिंगाट ची कॉपी आहे
ललित प्रभाकर आणि सिद्धार्थ
ललित प्रभाकर आणि सिद्धार्थ म्हणजे आटोपलाच कारभार... कोण बघणार यांना ..
सिद्धार्थला बघणार आपण...
सिद्धार्थला बघणार आपण... सोबत अमेय वाघ.. मग ललितला सहन करणार
बाकी झोंबीकथा काय आहे हे बघायची उत्सुकता आहेच.. सरधोपट नसून काही चमकदार कल्पना असली तर आवडेल
वा मस्त स्टारकास्ट. तिघेही
वा मस्त स्टारकास्ट. तिघेही झॉंबी शोभतील
८३ चा ट्रेलर तर भन्नाट आहे.
८३ चा ट्रेलर तर भन्नाट आहे. पण सिनेमा कसा असेल ?
निव्वळ खेळ या विषयावर असेल की मेलोड्रामा असेल ? देशभक्तीची फोडणी असेल ? त्या वेळी क्रिकेट म्हणजे देशभक्ती असेलच.
वर्ल्डकपच्या इतक्या मॅचेस होत्या. त्यातल्या निवडक घेतल्यात का ?
स्पॉईलर टाकू नका प्लिज.. मी
स्पॉईलर टाकू नका प्लिज.. मी 83 वर्ल्ड कप पाहिलेला नाहीय...
लकडाऊन - बी पॉझिटिव चा
लकडाऊन - बी पॉझिटिव चा चायनिज गोंधळ : https://www.youtube.com/watch?v=lj31B0779ZI
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं SSS (गीतकार: मायबोलीकर धुंद रवी)
मला आवडलं गाणं, पिक्चरायजेशन आणि सगळच.. मस्त टीपी आहे..
लय भारी...
लय भारी...
जमलय की गाण!
जमलय की गाण!
अन्कुश मधे काही बदल नाही फारसा, तसाच दिसतो अजुन
मस्तय लिरिक्स.. म्युजिक जरा
मस्तय लिरिक्स.. म्युजिक जरा लाऊड झालेय
अन्कुश मधे काही बदल नाही
अन्कुश मधे काही बदल नाही फारसा, तसाच दिसतो अजुन >>>> अगदीच, त्याला एम डी कॉलेजपासून ओळखतोय. आमची अर्धी अधिक चाळ तेव्हा तिथेच त्याच्यासोबत होती. तेव्हा जसा आजही तसाच वाटतो. नेहमीच एक आपलेपणा वाटत आलाय. त्यामुळेच कदाचित त्याला दुनियादारीत बघणे ईतके रिलेट झाले की शेवटी त्यानेच डोळ्यातून पाणी काढले..
भारी मस्तच.
भारी मस्तच.
RRR ट्रेलर आला
RRR रामम राघवम गाणे आले
रामम राघवम गाण्याबद्दल भक्तलोकांनी संध्याकाळपासून हवा करून ठेवली आहे
पण आता गाणे बघितले तर चक्क फ्युजन आहे , इतके आवडले नाही , ओ पालन हारे टाईप असेल अशी अपेक्षा होती
3 हिरो , गाणी , देशभक्ती , पाकी/ इंग्रज शत्रू , एखादा हिरो मरेल बहुतेक
ही तर कर्माची स्टोरी झाली

इंदू की जवानी असा अत्यंत
इंदू की जवानी असा अत्यंत फालतु अचाट मूवी अर्धा पाहिला आणि उरलेली रात्र पश्चातापात घालवली.
सुर्यवंशी असा दुसरा एक अचाट मूवी १० मिन्निटे फाफॉ करत पाहिला. तीन अतरंगी कारटी घेवून, पोलीस गणवेष घालून हवेत कार उडवल्या की झाला चित्रपट असे रोहित शेट्टीला वाटते. रणवीर सिंगला कॉमेडी रोल दिलाय. बाकी रोहित शेट्टीचेच तीन मूवी भेळ करून पाहिले की जे वाटेल ते आहे.
सिंघम, सिंबा आणि कुठलातरी एक.
सूर्यवंशी टाईमपास आहे.. मला
सूर्यवंशी टाईमपास आहे.. मला आवडला... बेटर than सिम्बा...
झोंबीवली ट्रेलर भारी आहे आणि
झोंबीवली ट्रेलर भारी आहे आणि अंगात आलया गाणं पण.
सिध्दार्थ जाधव मस्तच
झोंबिवली ट्रेलर बघून
झोंबिवली ट्रेलर बघून डोंबिवलीतील माणसं खूप घाबरली होती आणि शहर सोडून पळून जात होती पण जेव्हा त्यांना समजलं मी डोंबिवलीत राहतो तेव्हापासून सगळे शांत झालेत.
झोंबिवली ट्रेलर बघून
झोंबिवली ट्रेलर बघून डोंबिवलीतील माणसं खूप घाबरली होती >> तुम्ही इतक्यातच डोंबिवलीत आलेले दिसताएत.. तीथली लोकं मानपडा आणि बावन्न चाळीतले किस्से बघत ऐकत मोठी झालीएत.. तसंही साला एक करोड मच्छर हमारा बाल बाका नही कर पाए वहा झॅाम्बीज क्या चीज है
Pages