चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच घाणेरडे ट्रेलर होते. लहान मुलांसोबत असे अश्लील चाळे, रक्तपात दाखवणारे सिनेमे बघून संताप होतो. त्यात काम करणाऱ्या मुलांना नंतर थेरपी मिळते का नाही माहिती नाही. >>> +१०००
चांदनी बार पण नको वाटला होता पण तिथे मॉरल कंपास हललेला नव्हता. बार डान्सरला तिच्या परिस्थितीवर मात करता येत नाही ह्या असहायतेला "नॉर्थ" मानून केलेला सिनेमा होता. ह्या "लोणचं"चा मॉरल कंपास काहीतरी भटकलेला वाटला. नक्की काय सांगता आलं नाही पण नकोसं वाटलं.

शूटिंग करताना सांभाळत असतील, थेट मुलांनीच ते प्रसंग केले नसतील अशी अपेक्षा आहे.>>>>>>>>>> तेच म्हणायचं होतं की मुलांकडून डायरेक्टली कसं असं काम करून घेतलंय. काहीतरी नॉर्म्स असतीलच.
अग्ली पेक्षाही भयंकर होता ट्रेलर. बरं झालंय काढला.

मला प्रौढांनी प्रौढांसाठी केलेल्या अश्लील दृष्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण हे कोण आईवडील आपल्या टिनेज मुलाला अशा सिनेमात काम करू देतात, जो बघण्याचं सुद्धा त्यांचं वय नाही ? संवाद कसे घाणेरडे होते आणि , मला लहान मुलांच्या बाबतीत अजिबात बेनेफिट ऑफ डाऊट देता येत नाही आणि कुणी देऊ नये असंच वाटतं. कारण त्यांचे निर्णय त्यांचे नसतात किंवा इतरांमुळे घेतलेले असू शकतात/योग्य वाटलेले असू शकतात.

नक्की काय सांगता आलं नाही पण नकोसं वाटलं.>>>>

हे नुसतंच अतिरंजित नाही तर सजेस्टिव पेडोफिलिया आहे शिवाय त्या मुलाला ते आवडतेय असा सूचक अर्थाचा संवाद आहे , किती चुकीचा संदेश जातो याने, फारच घाणेरडे व विकृत आहे.
मांजरेकर आवडत नाहीच आता मनातून अजून उतरला !!!

(सारीकाचा एक इंटरव्ह्यू होता की तिला चाईल्ड Actor म्हणून किती विचित्र प्रसंगांतून जावं लागलं , आणि गरीबीमुळे करावं लागलं , फार वाईट वाटतं हे ऐकून. लिंक मिळाली तर देते.)

मांज्या कुठल्या तोंडाने ए टीमला ओरडायचा बिग बॉसच्या घरात? नालायक माणूस निघाला. काही वर्षांपूर्वी त्याचा शिक्षणाच्या आयचा घो पिक्चर आला होता तेव्हा पण असाच वाद झाला होता. तेव्हाच या विकृत माणसाला महाराष्ट्रातून हाकलवला पाहिजे होता. सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्या व्हिडिओखाली असणाऱ्या कमेंट्स. कौतुक होत होतं या विकृत माणसाचं. काय त्या घाणेरड्या शिव्या लहान मुलांच्या तोंडात, त्यातली अश्लील दृश्य तर पार टोकाची होतीच पण स्वतः च्या सख्या काकीबरोबरची?????? Got च्या पण कानफटात मारेल असला किळसवाणा ट्रेलर होता.

मूळची जयंत पवारांची वरणभात कोनचा नावाची कथा अतिशय सशक्त आहे. मुंबईतल्या गिरणी संपाच वेधक चित्रण त्यात आहे.
मुळ गोष्ट जे काही सांगू पाहतेय त्या चर्चेपेक्षाही adult सीनचीच चर्चा होणारे हा ट्रेलर पाहून अस वाटतेय . महेश मांजरेकर असल्यावर अपेक्षितच. पुलंवरच्या सिनेमाची पण अशीच वाट लावलेली.
जयंत पवारांनी हे बघितलं असत तर त्यांना कितपत रुचल असत कोणास ठाऊक

ट्रेलर आपल्या जबाबदारीवर बघा वर लिहीलेलं त्यामुळे मी बघितलं नव्हतं, आता सर्व वाचून वाटतंय बरं केलं मी. मला झेपलं नसतं. मला वेबसिरीजमधले सीन्स, शिव्यापण झेपत नाहीत.

आज न्युजमधे ट्रेलर डीलीट केलं असं वाचलेलं.

मला प्रौढांनी प्रौढांसाठी केलेल्या अश्लील दृष्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही
>>>>

ईथे थोडेसे वेगळे मत राखतो.

प्रौढांनी प्रौढांसाठी केलेले असे काही नसते. टीनेजर देखील प्रौढांचे चित्रपट आणि वेबसिरीज बघतातच.
पॉर्न म्हणाल तर तो वेगळाच प्रांत झाला. पण मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि मालिकांतही अश्लीलता मोकाट सुटणे हे घातक आहे. कारण अध:पतन एकदा व्हायला सुरुवात झाली तर तो एक निसरडा स्लोप असतो. एक प्रेक्षक म्हणून आपण जे स्विकारत जाऊ त्याच्या एक पाऊल पुढे जात नेहमी आपल्याला मिळणार. आणि ते आपल्या अपरोक्ष आपली मुलेही बघणार.

क्या कूल है हम आणि ग्रांडमस्तीसारखे थर्डक्लास चित्रपट जेव्हा मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न चालू होता तेव्हाही मी विरोध दर्शवलेला. तसेच एआयबी रोस्ट सारख्या कार्यक्रमांनाही विरोध केलेला. त्याचे हेच कारण होते.
याऊलट बालक पालक या चित्रपटाचा विषयही लहान मुलांनी पॉर्न बघण्याबाबत होता. पण तिथे हाताळणी संयत होती. त्यामुळे तो चित्रपट आवडला होता. जर तोच चित्रपट आजच्या काळात प्रेक्षकांना खेचायला अश्लील द्रुश्यांचा भडीमार हवा या हिशोबाने काढला असता तर तो ही सेम असाच झाला असता.

लुप पलेटा ४ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर येतोय. ट्रेलर भन्नाट आहे. ट्रेलर बनवणं पण आर्ट आहे हल्लीच्या काळात.

सरांच्या अगं अगं म्हशी प्रॉडक्शन्स तर्फे बर्‍याच असल्या तसल्या गोष्टींवर मायबोलीवर धागे निघाले होते.

इथे त्या पिक्चर च्या नावाने आगपाखड करणारे आयडी स्वतः मात्र *** सुट्टा नावे पब्लिक धागा काढतात आणि शोधून त्यावर लिंक पण देतात. शेवटी काय - आपला तो बाब्या, दुसर्‍याचे ते कार्टे. Lol

लूप लपेटा रन लोला रन वर आधारीत आहे ना? की तो दुसरा कुठला?

इथे त्या पिक्चर च्या नावाने आगपाखड करणारे आयडी स्वतः मात्र *** सुट्टा नावे पब्लिक धागा काढतात
>>>>

धनि हा धागा का?
https://www.maayboli.com/node/80780

तुम्ही हा नीट वाचला तर लक्षात येईल की यात सिगारेट या व्यसनाचे कसे दुष्परीणामच सांगितले आहेत. कसे कॉलेजमध्ये आपल्याला क्रेझ असते आणि कसे नंतर हे व्यसन आपल्याला त्याच्या विळख्यात घेते.

आणि नंतर शेअर केलेले गाणेही बघा
त्यात मूळ गाण्यातीलच शिव्या आहेत. कारण विडंबन केले आहे. पण या गाण्याचा आशय बघा - लिरीक्स ऐका - सिगारेटने कशी एकेकाची आयुष्यभराची वाट लागते.
https://www.youtube.com/watch?v=YVvXdTCWrjw

कोणाला पटो न पटो - जिथे दारू सिगारेट या व्यसनांना विरोध करायचा असेल तिथे मी तुम्हाला सापडणारच. मग मला बाब्या म्हणा वा कार्टे Happy

हे पहा प्रश्न तुम्ही बरोबर असण्याचा नाहीये. प्रश्न सर कधीही चुकत नसण्याचा आहे. हे लक्षात ठेवले तर मग वाद होत नाहीत. पण मग सर अबोला धरतील. हे चालत नसेल तर तुम्ही खुशाल सरांना चूक म्हणू शकता.

https://youtu.be/ygfbYwAr0AU

Why I killed Gandhi

हा चित्रपट नसून चित्रमाहितीपट (docudrama) वाटतो आहे. गांधीहत्येबद्दल असल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहेच. बंदी वगैरे यायच्या आत ट्रेलर तरी बघून घ्या! अमोल कोल्हे जबरदस्त काम.

3 हिरो
देशप्रेम
व्हिलन इंग्रज किंवा पाकी
एखादा हिरो मरेल

कर्मा ची स्टोरी

Why I killed Gandhi

ट्रेलर मध्येच खोटारडेपणा !

..

https://youtu.be/cd8pWbogOHg
आपले मायबोलीकर धुंद रवी ह्यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेला , अंकुश चौधरी प्राजक्ता माळी, शुभा खोटे, संजय मोने, प्रिया अरुण आणि असे अनेक दिग्गज कलाकार असलेला "लकडाउन - बी positive" हा चित्रपट २५ फेब्रुवारी ला थिएटर मध्ये येतोय..

अच्छा हे नव्हते माहिती
मी आपला प्राजु साठी बघणार होतो

धुंद रवी यांचे लिखाण अतिशय धमाल होते
लुंगी खरेदी तर अफाट होता प्रकार

संजय भंसालीचा गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाची झलक पाहिली.
झलक आवडली पण आलियाच्या ऐवजी दुसरी कोणीतरी असायला हवी होती असे वाटले.(ती पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत सारखीच दिसते) विजय राझ, अजय देवगण यांचा दमदार अभिनय बघायला मिळणार.

संजय भन्साळी म्हटल्यावर इंटेरीयर, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज च्या जाहीरातींचा एक भव्य पट आपण पाहतोय असे वाटते. त्यासाठी एखादी कथा घेऊन ती या जाहीरातीत फिट्ट केली असते. कधीकाळी हा एक प्रतिभावान दिग्दर्शक होता.

मलाही आवडला ट्रेलर, खरतर आलिया एवढी पिटाइट आहे ना की तीला ही भुमिका कशी जमली असेल अस वाटल पण ट्रेलर मधे तरी ती प्रॉमिसिन्ग वाटलिये.

Pages