चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोंबिवली ट्रेलर बघून डोंबिवलीतील माणसं खूप घाबरली होती
मग मिर्जापूर बघून मिरज वाल्यांची काय हालत होती?

घाबरेल तो डोंबिवलीकर कसला. डोंबिवलीकर कोणाला घाबरत नाहीत. त्यांना वेळ कुठे असतो, सतत बिझी. लाईट जाण्याला घाबरत नाहीत, पाणी जाण्याला घाबरत नाहीत, लोकल गर्दीला घाबरत नाहीत ते भुताला काय घाबरणार.

आमच्या एरियापासून जवळ झालेला स्फोट, आमच्या गॅलरीतले collapsable निखळून पडलेले, लोखंडी ग्रीलमुळे अडकून राहिलं, नशीब त्यातल्या काचा फुटल्या नव्हत्या. तरी आम्ही 500 मीटर मधले नव्हतो, त्यामुळे आमच्या घरीच होतो. जवळ असलेल्या सर्वांना बाहेर काढलं, त्यांचं नुकसानही खूप झालं.

एनिवे झोंबीवली ट्रेलर बघितलं नाहीये अजून.

झोंबिवली ट्रेलर बघून डोंबिवलीतील माणसं खूप घाबरली होती >>>>> काहीही हा बोकलत
साला एक करोड मच्छर हमारा बाल बाका नही कर पाए वहा झॅाम्बीज क्या चीज है>> करेक्ट.

नाही, ती कंपनी जरा लांब आहे आमच्यापासून. आम्ही एम आय डी सीत रहात नाही पण फेज टू चा काही भाग आमच्याजवळ आहे (खूप नाही पण असं काही झालं तर थोडा त्रास होऊ शकतो आमच्या एरीयात). त्या कंपनीच्या मालकांच्या दोन्ही मुलांचा आणि एका सुनेचा दुर्दैवी मृत्यु झालेला त्या स्फोटात आणि काही कामगारांचाही.

असो या धाग्यावर विषय निघाला म्हणून खूप अवांतर लिहिलं. सुदैवाने आमचं फार नुकसान झालं नाही.

कुठं झाला होता स्फोट? घरडा?

MIDC मध्ये, २०१६ मे, आमच्या सगळ्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, बाथरूमच्या पण . चार दिवस ओढण्यांचे पडदे लावून ठेवलेले. परिसरातील सगळ्याच बिल्डिंगची सारखीच परिस्थिती होती, त्यामुळे काचा लावून देणा-यांना फारच भाव आलेला.

हो. आम्हालाही निखळून पडलेले ते सर्व परत बसवायला लागलं, बसवणारे फार भाव खात होते, लवकर येत नव्हते. पूर्ण युनिट निखळून पडले, बॉक्स ग्रील पॅकबंद होती म्हणून वाचलं नाहीतर सर्व खाली पडून तिथे काचा विखुरल्या असत्या आणि खालून कोणी जात असतं त्याच वेळी तर जखमी होण्याची शक्यता होती. तरी नशीब आमची मागची बाजू आहे. एकदम सकाळी मॉर्निंग वॉक साठी सोसायटीला राऊंड मारतात, तेव्हा असतात लोकं पण हे अकरा नंतर झालं.

काचा काय, लोकांचे कानपण फुटले म्हणे

मीपण 3 वर्षे डोंबिवली पूर्वमध्ये होतो , फार पूर्वी, ही त्याच्या नंतर ची घटना आहे

महेश मांजरेकरचा नवीन मुव्ही येतोय.. लैच डेंजर ट्रेलर आहे. भयंकर! कृपया आपापल्या जबाबदारीवर बघावे आणी हेडफोन लावून च ऐकावे. Uhoh

https://www.youtube.com/watch?v=eiOPArPe8-w

हो त्यानी आर रेटिन्ग मागुन घेतली होती यासाठी, बीबॉस मधे प्रमोट केला होता मुव्हि म्हणून कळल होत, लालबाग परळ मधले बरेच चेहरे दिसतायत
अर्थात स्टोरीचा बेसच तो आहे, थोडि बीए पास आणी लालबाग परळचा पुढचा भाग अस मिक्स वाटतय.

आईच्या गावात.. वरणभात लोणच्याच्या नावावर हा कोणचा पिक्चर बनवला मांजरेकरांनी..

हो माझे जीजू हा मुव्हीचे PR आहेत.. त्यामुळे गेल्याच महिन्यात बघितला
>> TV वर पहिला का डायरेक्त्त लाईव्ह Wink

नाव काय आहे?
>>> नाय वरण भात लोणचा, कोण नाय कोणचा

फारच घाणेरडे ट्रेलर होते. लहान मुलांसोबत असे अश्लील चाळे, रक्तपात दाखवणारे सिनेमे बघून संताप होतो. त्यात काम करणाऱ्या मुलांना नंतर थेरपी मिळते का नाही माहिती नाही.

मांजरेकर म्हणजे नंतरच्या काळातले रामगोपालवर्मा झाले आहेत..
बाकी बरेच वेबसिरीजने आधीच अश्लीलतेची मापदंडेच बदलून टाकलीत. अर्थात हे फक्त ऐकून वा ट्रेलर पाहून माहीत आहे.. प्रत्यक्षात मी आजवर एकही अशी सिरीज पाहिली नाही. वा असा चित्रपट पाहिला नाही.
अश्लील द्रुश्ये सोडा, नाहक शिव्यांचा भडीमार असलेल्या कलाकृतीही बघत नाही.. समाजाचे हेच चित्र आहे हा युक्तीवाद करून काहीही चित्रण कराल का..संस्कार सभ्यता नावाचा प्रकार आहे की नाही..

अस्मिता अगदी
एकवेळ अश्लील पण आता वेब सिरीज बघून सवय झालीय
पण लहान मुलांना अश्या सीन्स मध्ये बघून काहीतरी वाटतं. ट्रेलर अर्ध्यात बंद केला.

शूटिंग करताना सांभाळत असतील, थेट मुलांनीच ते प्रसंग केले नसतील अशी अपेक्षा आहे.
(दहावी फ या चित्रपटात प्रत्यक्ष मुलांकडून एकही काच फोडून घेतली नव्हती किंवा इतर तोडफोडही करून घेतली नव्हती. मुळात फुटलेल्या काचा वगैरेच वापरल्या होत्या. असं वाचल्याचं आठवतंय की कॅमेरामनने एकमेव दगड मारला होता. )
अर्थात इथे तसं असेल असं नाही.

त्या ट्रेलरखालच्या कॉमेंट कोणी वाचलेल्या का?
हे फक्त मांजरेकरच करू शकतात म्हणून दर दुसऱ्या कॉमेंटमध्ये कौतुक होते त्यांचे..
सध्याची वेबसिरीजमधील वाढती अश्लीलता बघूनही हेच वाटते की लोकांना हेच हवे आहे म्हणून ते दिले जाते..

Pages