चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भडक अभिनय करणारे उठून दिसतात आणि लोकांच्या लक्षात राहतात>>>>> खरे आहे जसे शाहरुख खान, स्वप्नील जोशी, महागुरू वगैरे

ते स्टाईलिश आहेत
मात्र ईफेक्ट तोच, पडद्यावर आले की बाकींच्यापेक्षा यांचा प्रभाव जास्त असतो.

थलैवीच्या ट्रेलर मध्ये कंगना कंगनाच वाटते, याउलट अरविंद स्वामी अगदी एम जी आर वाटतात. जयललिता या अगदी सावकाश बोलणार्‍या वाटायच्या आणि त्यांना राग जरी आला तरी तो चेहर्‍यावर न दाखवणार्‍या. याउलट कंगना प्रत्येक सीन मध्ये रागावलेलीच वाटते. तिला का घेतलं असेल अजिबात कळले नाही.

धनी +१
जयललिता या अगदी सावकाश बोलणार्‍या वाटायच्या आणि त्यांना राग जरी आला तरी तो चेहर्‍यावर न दाखवणार्‍या. >>> याला अगदी अगदी झाल, बाकी त्यान्च चित्रपट करियर कधी फॉलो केलेल नाही त्यामुळे त्याबाबतित काहीच माहिती नाही.

पाहिला थलैवी चा ट्रेलर. कंगना मनकर्णिकामधे पण अशीच मिसमॅच वाटली होती तिच्या त्या विचित्र अ‍ॅक्सेन्ट मुळे. इथेही तसेच. जयललिता अजिबात वाटत नाही. यापेक्षा ती एक रम्या ची वेब सीरीज आहे त्यात ती मस्त वाटते जयललिता म्हणून.

जयललिता या अगदी सावकाश बोलणार्‍या वाटायच्या आणि त्यांना राग जरी आला तरी तो चेहर्‍यावर न दाखवणार्‍या. >> अगदी! सिमी गरेवाल एरवी आवडते पण जयललिता आणि रेखा दोघींना तिने फार भोचक प्रश्न विचारले. (अर्थात असे भोचक प्रश्न एरवीही त्यांना विचारले जात असतील आणि कदाचित त्यांनीच सिमीचा शो स्पष्टीकरणार्थ व्यासपीठ म्हणून वापरला असेही असेल.) पण काहीही असो अशा वेळी मृदू भाषेचा कस लागतो खरा.

कंगना उत्तम अभिनय करते. तिला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला( यावर्षी पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटासाठी मिळाला).

पंगा चित्रपट इतका खास नव्हता.
मणीकर्णिका मध्ये पण ती राणी लक्ष्मीबाई वाटली नाही
2019चे पुरस्कार 2020मध्ये पण दिले होते

रम्या ने खरच खूप संयत अभिनय केला आहे क्वीन वेब सिरिज मध्ये.. त्यात सिमी सोबत च्या शो मध्ये पण बोलताना बरीच जय ललिता सारखी वाटते..आणि उगीजच वजन वगैरे वाढवल..लावल नाहिये.. जशी आहे तशीच तिने व्यक्तिरेखे ला उंचीवर नेल आहे... कंगना बरीच आक्रमक आणि आक्रस्ताळलली वाटते..अन्याया विरुध्द आवाज करायचा म्हणजे असाच अभिनय करायचा हे तिच्या सध्या च्या बर्याच भूमिकेतून जाणवते.. आणि आपल्या bollywood वर प्रेम असणार्या लोकाना वासरात लंगडी गाय असल्या मुळे तिने फारच उच्च प्रतीचा अभिनय केलाय असं वाटतं

फॅशन,
क्वीन
तनू वेड मनू रिटर्न
पंगा

४ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या अभिनेत्रीच्या अभिनयावर शंका घेणे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार फिक्स असतात का?

पंगा चित्रपट इतका खास नव्हता.
मणीकर्णिका मध्ये पण ती राणी लक्ष्मीबाई वाटली नाही >>>>> अगदी सहमत आहे. क्वीन सोडता ती मला कोणत्याही मुव्हीमध्ये आवडली नाही. मणीकर्णिका तर अजिबात शोभली नाही. डायलॉग डिलिव्हरी तर धन्य. सगळ्या मुव्हिजमध्ये त्याच एका जड नशील्या आवाजात बोलते. तिचा आवाजच तसा आहे वगैरे ठीक पण राणी लक्ष्मीबाई अशा आवाजात बोललेल्या मला आवडलं नाही. एकुणच सिनेमा पण आवडला नव्हता.

बरेचदा एखादे ऐतिहासिक पात्र नेमके कसे बोलते, चालते, हावभाव, बॉडीलॅंगवेज याचे काहीही संदर्भ आपल्याकडे नसतात. त्यांचा फोटो, खरे तर फोटोही नाही तर चित्र जे काही काढलेले असते त्यानुसार आपण आपल्या मनात ते व्यक्तीमत्व रंगवतो. हे रंगवणे व्यक्तीनुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. दिग्दर्शकाने जे रंगवले ते बहुतांश लोकांना रुचले नाही. कारण कुठल्याही मर्दानी स्त्रीचे आपण जे टिपिकल चित्र रंगवतो त्यात ते फिट बसणारे नव्हते. दिग्दर्शक ईथे चुकलाच. किंबहुना कास्टींगच चुकली. बाहुबलीची देवसेना किंवा तिची सासू असे काहीतरी हवे होते. पीसी सुद्धा छान वाटली असती.

मी लहानपणी रेखाचा एक चित्रपट पहिला होता ज्यात ती नऊ वारी साडी घालून हातात तलवार घेऊन घोड्यावरुन येतेआणि व्हीलन ला मारते. का कुणास ठाऊक मला तिच झाशीची राणी वाटायची लहानपणी. तिचा अभिनय अतिशय आवडतो.

कंगना मणीकर्णिका मध्ये इंग्रज लोकांसारखी गोरी दिसते.(राणी लक्ष्मीबाई मराठी होत्या) तीचे मराठी डायलॉग गन्डलेले वाटतात. प्रियंका चोप्रा जास्त शोभली असती याला अनुमोदन.
प्रियंकाने मराठी उच्चारावर पूर्वी पण मेहनत घेतली आहे.

कंगना फक्त हरियानवी/ दिल्ली उच्चार असतिल तीच भूमिका शोभते(तनू वेडस मनू 1,2, क्वीन).

हो, रेखा अगदी अगदी !!
मला ती पुलिस ईन्स्पेक्टरच्या गेट अप मध्ये फार भारी आवडायची.

थलैवीच्या ट्रेलरमध्ये आपल्या स्मरणात असलेल्या शांत जयललिता दाखवल्याच नाहीएत. जे तरूणपणीचे सीन्स आहेत त्यात कदाचित जयललिता आक्रमक दाखवल्या असतील आणि ते खरंही असेल. मला माहित नाही. कंगणाचा प्रौढ जयललिता हा लूक फारच विनोदी वाटला होता टिझरमध्ये. सिनेमात पण तसाच असेल तर मग फार निराशा होईल. बाकी ट्रेलर चांगला वाटला. तमिळ संवाद जास्त चांगले वाटले सबटायटल्स वाचून. कंगनाचा मणिकर्णिका आणि पंगा दोन्ही पाहीलेले नाहीत.

मनकर्निका आणी पन्गा दोन्हि पाहिले नाहित पण फेशन, क्बिन, तनु वेड्स मनु दोन्हि पार्ट आवडलेत, दुसर्‍यातली दत्तो अफलातुन केलिये तिने, मेहनती आणी उत्तम अ‍ॅक्टर आहे , काहि गणीत फसतात काहि जमुन येतात अस अनेक मुव्हिज बाबतित होत तसच काहि भुमिका तिला सुट होतात काहि नाहि.
मधे मधे पुरस्कार वापसीच पेव फुटल।होत त्यामुळे जे पुरस्काराचा मान राखतिल त्यानाच देण्याचे नविन निकष लावले असतिल.

मणिकर्णिका बघितला नाही पण पंगा बघितलाय. त्यातला तिचा अभिनय अगदी ठाशिव, लक्षात राहील असा नव्हता जसा तो तनु मनू २ मध्ये होता. मणिकर्णिका बघितलेल्याना त्यात ती शोभलीच नाही असे वाटत आहे. त्यामुळे हे दोन्ही पुरस्कार पार्ट ऑफ दी डील वाटतात. मध्ये तिने जे काही गरळ ओकलं त्याबदल्यात दिल्यासारखे.

चंपा अनुमोदन. मला पण हेच वाटते पण उगाच राजकारणाचा मुद्दा आला की वाद होतात.

वैजयंती माला तमिळ असून तिने गंगा-जमुना मध्ये दिलीप कुमार बरोबर काम केले . ज्यात यूपी ची अवधी भाषा त्या काळात डबिंग न करता शिकली आहे. तो versatile पणा कन्गना मध्ये नाही. त्या मानाने आमिर खान,प्रियंका चोप्रा, रणवीर सिंह इ. लोक पात्राच्या भाषेवर मेहनत घेतात. हे मला वाटते.
भाषेवर मेहनत न घेतल्यामुळे अभिनय चांगला असला तरी पात्र खोटे वाटते. किंवा त्याच त्याच सारख्या भूमिका मिळतात.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या अभिनेत्रीच्या अभिनयावर शंका घेणे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार फिक्स असतात का?
>>> possible... 2004 मध्ये सैफ ला दिला होता बेस्ट ऍक्टर नॅशनल अवॉर्ड... हम तुम साठी...
नही जमा बॉस...

possible... 2004 मध्ये सैफ ला दिला होता बेस्ट ऍक्टर नॅशनल अवॉर्ड... हम तुम साठी...
नही जमा बॉस...
>>>>>

छान केलेले काम सैफने त्यात. छिछोरा पोरगा ते मॅच्युअर होत गेलेला पुरुष असा टप्पा चांगला रंगवलेला.

आणि कंगणाला एक दोन नाही तर चार राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. एवढे कसे ती फिक्स करू शकेल जे किंग खान ऑफ बॉलीवूडला सुद्धा नाही जमले.

राष्ट्रीय पुरस्कार वाटप कंगणाच्या पहिल्या पुरस्कारापासून बीजेपी करत आहे का?

बाकी किंग खान एवढ्यासाठी म्हटले की तो बर्षानुवर्षे फिल्मफेअर सेट करतोय की..

मी कंगनाचे तनु मनुला वेड लावते, रंगून आणि सिमरन हे तीन चित्रपट पाहिले आहेत. भूमिकेला साजेसा अभिनय वाटला.
(रंगून नीटसा आठवत नाही आता.)
मनकर्णिकाचा ट्रेलर पाहिला त्यावरून पहायची हिम्मत झाली नाही.

क्वीन तर स्त्रीप्रधान चित्रपट होता.
किंबहुना कंगणाचे सारेच तसे असतात. उगाच पुरस्कार मिळतात का..
पण क्बीनचा विषय पाहता बहुधा मायबोलीवर नक्कीच चर्चा झाली असेल. शोधायला हवे

Pages