खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त उत्तप्पा रूचा
चटणी वगैरे असे फार लाड केले नाही Happy>>>>असं आम्ही पण करतो बर्याचदा सॉस किंवा कोरड्या चटणी सोबत खातो. Happy

आमच्याकडे बाहेर घरगुती तयार पीठ मिळते इडली डोशाचे ठिकठिकाणी. इडलीचे जसेच्या तसे वापरून इडल्या होतात. डोशाचे बरेचदा एकदा मिक्सर मधून काढून घ्यावे लागते.

बायको सोबत शेंगदाण्याची चटणी, कधी इडली सोबत सांबार, कधी डोशा सोबत बटाट्याची भाजी करते. ती फक्त सॉस सोबतही खाऊ शकते.
मी करतो तेव्हा फुटाण्याची चटणी दह्यात कालवून घेतो. सॉस सोबत दोसा उत्तप्पा खायला नाही आवडत मला.

अहा! लहानपणानंतर खाल्ल्याच नाही या विलायती चिंचा.>>+१
सगळे पदार्थ मस्त!
बै! आता शेवपुरी करून खावीच लागणार!

Pages