नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवऱ्याने काल या पद्धतीने कंडेन्स्ड मिल्क ( दूध पावडर ऐवजी ) वापरून टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवले अतिशय उत्तम लागले. थोडे बर्फाचे खडे होते कदाचित साधे दूध वापरल्यामुळे असेल पुढच्या वेळेस फुल फॅट मिल्क वापरेन धन्यवाद

ही रेसिपी वापरून मी पपई, चिक्कू आणि tender coconut केले. सर्वच flavours अप्रतिम जमले... अनेक जणांना recipe दिली आणि अनेकांनी try केली. अतिशय सुटसुटीत, सोपी आणि हमखास जमणारी आहे. खूप धन्यवाद!
Screenshot_20210329-162038.jpgScreenshot_20210329-162226.jpgScreenshot_20210329-162242.jpg

दुध तापवलेले वापरायचं कि न तापवता वापरलेलं चालेल?
रिया,साय किंवा क्रिम न घालता ही छान बनलं का? बाकी साहित्य आहे घरात, चॉकलेट आईस्क्रीम बघते बनवून.

धन्यवाद मृणाली, अन्जू.
क्रीम न घालता मला पण try करायचं आहे.
मी दूध तापवून थंड झाल्यावर सायी सकट घातलं. आणि वर क्रीम घातलं.

काल chocolate flavour बनवलेलं पण ते खूप जास्त हार्ड झालं होत. आज शहाळ ट्राय करते ते बॅटर सॉफ्ट राहावं याकरता कस ठेवायचं..?
Freezer मधे ठेवल्यास एकदम हार्ड होतंय

हो साय/ क्रीम न घालता सुद्धा एकदम मस्त झालं. शिवाय त्यात बर्फ़ाचे खडे सुद्धा झाले नाहीत. मी फ्रोजन चिकू वापरले.

मला वाटतं उकळून गार केलेलं दूध वापरलेलं जास्त चांगलं. कच्च्या दुधाची टेस्ट विचित्र लागते मला.

बर ठीक आहे तस करून पाहते.. फ्रिझर मधे ठेवताना झाकून ठेवावे की ओपन..? काल ओपन ठेवलेलं..आज एअर टाईट बॉक्स मधे ठेवलंय

काल केलं आणि छान झालं.
या आधी केलेलं तेव्हा नेहेमी बर्फाळ झालेलं. यावेळी दूध (नेहेमीचं २/ ३.२५ %) न घालता १८% फॅट वालं टेबल क्रीम घातलं.

आज मी पायनाप्पल बनवले..चुकले..कडु झाले..
पण पायनाप्पल खाऊन बघितले होते,ठिक चव होती. बहुतेक मी ठिक कापले नसावे साईडचे डोळे किंवा ते मधला भाग पण थोडा वेगळा लागतो.
वाया गेलं आईस्क्रिम.साखर टाकून परत फिरवून परत सेट केलं तर होईल का दुरूस्त?

अननस कशातही वापरायचे झाले तर शिजवून घेऊन वापरावे, नाहीतर कडू लागते हे इथेच माबोवर कुठेतरी वाचले होते ते आठवले.

माझ्याकडे थोडे कंडेन्सड मिल्क शिल्लक आहे, दूध पावडरीऐवजी ते वाप्रायचे तर प्रमाण तेवढेच ठेवायचे का? साखर कमी लागेल.

अननस कशातही वापरायचे झाले तर शिजवून घेऊन वापरावे, नाहीतर कडू लागते हे इथेच माबोवर कुठेतरी वाचले होते ते आठवले.

माझ्याकडे थोडे कंडेन्सड मिल्क शिल्लक आहे, दूध पावडरीऐवजी ते वाप्रायचे तर प्रमाण तेवढेच ठेवायचे का? साखर कमी लागेल.

अननस कशातही वापरायचे झाले तर शिजवून घेऊन वापरावे, >>>>>> हे माहित नव्हतं.

हो ना.मी साखर घालून फिरवलं एकदा मिक्सरमध्ये,नाही गेला कडवटपणा.. फेकून दिलं मग.

उद्या नव्या फ्लेवरचे नवीन आईस्क्रीम Happy
अमुल 90%बीटर डार्क चॉकलेट आहे घरात.. ते टाकून केलं तर कडु होईल का? कारण चॉकलेट अतिकडु आहे।

Mrunal, लहान नैवेद्याच्या वाटीत करून पहा आधी. खूप कडू होईल नाहीतर. मी कडू चाॅकलेटचा एक लहान तुकडा गोड चाॅककलेटच्या मोठ्या तुकड्याबरोबर खाते Happy

पायनापल वापरायचे तर टिन मधले वापरावे. साखरेच्या पाकातले.
माझी चॉकोलेट आइस क्रीम ची कृती देते: मी हर्शीज चॉकोलेट पाव्डर डब्बा जो बिग बास्केट वर येतो ते वापरले. दोन टेबल स्पून, मिल्क पावडर दोन टेबल स्पून. तीन टे स्पून साखर हे साधारण २५० ग्राम दुधात घालून एकदा मिक्सर मधून फिरवले. ह्यात व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट काही थेंब व ब्रू कॉफी पाव्डर दोन छोटे चमचे घालून परत फिरवले. आणि गार केले.

डार्क चॉकोलेट आत घालू नका . वरील पद्धतीने करून घ्या आइसक्रीम व सर्व्ह करताना वरून किसून घाला. मध्यंतरी आम्हाला हर्शीज किसेस
प्रोमोशनल पॅक फुकट आले होते. ते बारक्या मोदकांसारखे असतात ते ही वरून ठेवता येतील. नाहीतर चॉकोलेट चिप्स किंवा रंगी बेरंगी बारक्य
स ळ्या नाहीतर सिल्व्हर च्या गोळ्या नी डेकोरेट करता येइल.

ह्याच चॉकोलेट पाव्डरचा साधा चॉकोलेट केक करायचा खाली एक स्लाइस केक मग एक स्कूप आइसक्रीम व वरून कॅडबरीची किंवा डार्क चॉकोलेट एक स्लाइस ठेवायची सर्व्ह करताना. मस्त दिसेल.

आज मी आमरस मागवला आहे त्यात फक्त दूध घालून गार करेन. रात्री बेरात्री उठून खायला मस्त होते.

पण मी।काय म्हणते मृणाल, पहिल्यांदा करणार आहेस तर चांगला ट्राईड अँड टेस्टेड फ्लेवर try कर की.

अमा, तुम्ही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले की त्या आनंदात आईस्क्रीम खा.

हे दुसर्यांदा होतं ना Happy
पहिल्यांदा दोन दिवसापुर्वी चिकु चे केले मस्त झाले..वर फोटो आहे बघ.

टेंडर कोकोनट करताना मलई कुठुन आणता? विकत मिळते की शहाळं पिऊन त्यातली घेता? ज्या प्रमाणात आइस्क्रिम बनवायचं आहे त्यासाठी ५०-५५ रुपयाचं एक प्रमाणे ४ तरी शहळ घ्यावी लागतील.

मी शहाळ घेऊन त्यातली मलई टाकतो. आमच्या इथे सकाळी येतो तो 50 ला दोन देतो. पण एकंदरीत हे आईस्क्रीम खर्चिक आहे.

Pages