नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शुक्रवारी जाम्भळाचे केले आणि काल सफरचन्द चे केले दोन्हि छान झाले ... मोबाईल मध्ये प्रति आहेत पण
टाकता येत नाही.

मुग्धे गेलेल्या वीकेन्डला मी पुन्हा एकदा आक्री केलं. यावेळी ताजा हापूस वापरला

हे बॅटर

20140516_103824.jpg

आणी हे फायनल प्रॉडक्ट

20140516_231536.jpg

आईस्क्रिम बरंच घट्ट झालं कारण मी दूध अगदी नावाला घातलं होतं. नेक्स्ट टाईम अजून थोडं अ‍ॅड करीन.

हा आक्री काय आहे शॉर्टफॉर्म Happy एकदम आक्रित वगैरे सारखं वाटतं. तसंही खूप खाल्लं तर आक्रितच आहे म्हणा.
पण आईसक्रीम एक शब्द आहे म्हणुन ह्या शॉर्टफॉर्मचा उगम काय आहे ही शंका Happy

कुलू.. वाह..तू पण केलास तर प्रयोग... तुझं आंब्याचं आ क्री जांभळं का दिस्तंय रे?? किवी चं ते ग्रीनीश आहे ना??

मुग्धटले... क्या रेसिपी दी रे तूने... माझ्या आवडत्या दहात तर आहेच.. अप्रतिम बनलेय आईसक्रीम.. आंब्याचे... सुपर!!!

वर्षु जांभळ दिसतय ते Blueberry yogurt आहे Proud मी वरुन घातलं. ग्रीनीश दिसतय ते किवि + आंबा! Happy
"आईसक्रिम" ला शॉर्टफॉर्म शोधा! आईसक्रिम लिहायला अवघड शब्द आहे Proud

धन्यवाद जाई .पण मला हा प्रतिसाद नाहि दिसत .आता 16 May, 2014 - 06:44 चा दिसला .गावाला गेल्यामुळे एक आठवडा नेट नाहि म्हणुन उशिरा प्रतिसाद .आणिखुप खुप धन्यवाद मुग्धटली. आईस्क्रिम चे यमी फोटो टाकणारयांसाठि धन्यवाद.मी उद्या करणार आहे पिस्ता आईस्क्रिम, कसे झाले ते लिहेनच.

मी पण ह्या लाँग विकेंडला ३ वेगळे फ्लेवर ट्राय केले. सगळे मस्त झाले.
कॉफी-आमंड ह्यांत थोडा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट पण घातला. बदामाचे स्लाइसेस घातले होते
फिग-वॉलनट : सुकी अंजीरं मी अदल्या रात्री दुधात भिजवली होती.
गुलकंदः ह्यात साखर अजिबात घातली नाही. थोडे बर्फाचे क्रिस्टल्स लागत होते. कदाचित गुलकंदात पाण्याचा अंश असतोच म्हणून का?

मस्त सोपी रेसिपी. धन्यवाद!

या रेसिपीने आंब्याचं आइस्क्रीम करून पाहिलं. छान झालं. मात्र थोडे क्रिस्टल्स होतात. अर्धवट सेट झाल्यावर एकदा पुन्हा घुसळून काढावं लागेल. या वेळी कंटाळा केला, पुढल्या वेळी करेन.
पण चव मस्तच. धन्यवाद. Happy

दुध अमुल गोल्ड जरा आटवुन १ कप घातले नंतर १० मिनिटं मिक्सर वर फिर्वुन लगेच एयर टाइट डब्यात सेट करायला ठेवले .क्रिस्टल्स न होता छान पिस्ता आइस्क्रीम झाले .thanku या आइस्क्रीम lover कडुन .

बरं

उन्हाळा आला की हटकून या धाग्याची आठवण होतेच!! लवकरच ठरवते बेत!!

एभाप्र : डायबेटीक पेशंटसाठी शुगरफ्री आईसक्रीम करण्यासाठी काही टिप्स आहेत का?

https://in.pinterest.com/rollinskj/recipes-ice-cream-sugar-free/

इथे दिसल्या शुगरफ्री पाकृ. ड्रिमगर्ल, मला वाटत मुग्धाच्या रेसेपीत त्यावेळी साखर घालुच नये, कारण फळान्चा गोडवा ओके असेल डायबेटीक लोकान्करता.

मी हीच रेसिपी वापरुन चॉकलेट आइसक्रीम केले.

चॉकलेट बार डबल बॉयलर मेथड वापरुन वितळवून घेतले अणि बाकी सारे या पा. कृ. नुसार घातले.
ice cream.jpg

मी आज हे आइस्क्रिम केले. घरची मंडळी बेहद्द खूश. खूप छान झाले होते. आज सिझनमुळे आंब्याचे केले, पण आता कधी एकदा वेगवेगळे फ्लेवर ट्राय करते असे झाले आहे. अगदी सोप्या नो कटकट रेसिपीबद्दल मुग्धटली तुम्हाला मनापासुन खूप खूप धन्यवाद.

हामच्या कडे आम्बा आणि अंजीर असे ट्राय झाले . एक्दम यशस्वी. फोटो काढेपर्यन्त सम्पलेही . पुन्हा इथे फोटो टाकायला ते १५० केबी का काय त्याची अडचण.....

आशिका ,

आइसक्रीम बार डबल बॉयलर मेथड वापरुन वितळवून घेतले अणि बाकी सारे या पा. कृ. नुसार घातले. >>> चॉकलेट ना Happy

Pages