नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मस्त कलरेय जांभूळ आईसक्रीमचा...

मीसुद्धा घरचीच साय वापरते. आणि देवगड हापूस चा घट्ट गर. त्यामुळे जास्त क्रिस्टल्स होत नाहीत. उन्हाळा असल्याने दूध दोन-तीन वेळा तरी पूर्ण उकळले जाते. परवा अतीशय कंट्रोल करून आईसक्रीम पूर्ण सेट केले. मस्त मस्त मस्त.... नॅचरल्स ने त्यांचा एक लॉयल क्लायंट गमावला. Happy कमी खर्चात आणि कमी खटाटोपात आईसक्रीमप्रेमींसाठी उत्कृष्ट पर्याय!

फोटो मोबाईलमध्ये आहे. लवकरच पोस्टेन.

काल याच रेसीपीने मँगो स्मूदी केलेली... अप्रतिम!!! स्लर्प स्लर्प...

मला कुल्फी करून पाहायचेय... मँगो व्हॅनिला मिक्स किंवा मँगो पिस्ता मिक्स करून बघेन लवकरच...

वर्षा, मलाही आधी मि.पा.ची चव लागली, पण व्हॅनिला इसेन्स घातल्यावर नाही जाणवली.

६/७ तास ठेवल्यावर दगड झालाच>> सावली, दूध बदलून बघ. किंवा क्रिमचं प्रमाण वाढव.

मी आंबा केले होते. आता शहाळ्याचे करुन पहाते. थोडे व्हॅनीला ईसेंन्स घालेल त्यात Happy

दूधाची आटवून वापरलं तरी मिल्क पावडरची गरज पडेल का?>> वेल मी वापरले होते साय आणि मिल्क पावडर पण पल्प चे प्रमाण वाढवून यांचे प्रमाण थोडे कमी घेतले होते. त्यामुळे मँगो फ्लेवर सोबत मस्त काँबी झालेले क्रीमी फ्लेवरचे. फक्त साय वापरल्याने अगोड झालेले आणी आम्हा दोघांनाही गोड आईसक्रीम आवडत असल्याने साखर थोडी जास्त घातलेली. बाकीचे फ्लेवर्स अजून ट्राय नाही केलेत.

शनि वार मँगो आईसक्रीम केली एक्दम मस्त झाले. एकदम परफे़क्ट झाले . घ्ररचे एकदम खुष......

थन्क्यु dreamgirl , मुग्धटली

काल व्हॅनिला अणि गुलकंद करुन बघितले..मस्त चव आली होती.मी thickened क्रीम वापरले..अजिबात मिल्क पावडरची चव जाणवली नाही...धन्यवाद मुग्धा

अमुलचं फ्रेश क्रिम चं पॅक वापरुन चिक्कु आइसक्रिम केलेलं. क्रिम पातळ होतं, म्हणुन दुध टाकलंच नाही. तरिही मिश्रण थोडं पातळ वाटलं, म्हणुन अजुन मिल्क पावडर टाकली. चिक्कु गोड होते म्हणुन साखरेची गरज वाटली नाही.. आक्रि ठीक झालेलं असं माझं मत.. घरची साय वापरुनच करायला हवय. घरी मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश आहे. प्रमाण काय घेउ??

काल चिक्कु आइसक्रिम केलं.. चिक्कु पल्प थोडा जास्त घातला.. मस्त झालेलं आक्रि..... खुप खुप धन्यवाद मुग्धटली Happy

आज मँगो आइस क्रीम सेट करायला ठेऊन हपिसला जाणार. सोप्पी आहे ग रेसीपी. >>>>>>> अ.मा...थँक्यु... फोटो नक्की टाका हं

सगळ्यांचे आईस्क्रिम पाहून तो.पा.सु. धन्यवाद मुग्धटली. Happy
सावली, जांभळाच नक्की ट्राय करणार. मस्त वेगळा फ्लेवर मिळाला.

काल परत चिक्कु आणि मॅप्रो चं स्ट्रॉबेरी क्रश वापरुन आइसक्रिम केलं.. सगळ्यांना खुप आवडलय... Happy सध्या मोबाइल बिघडला असल्याने फोटो काढता येत नाहिये...

सिनि हे पहा

सीमा | 12 May, 2014 - 10:30
जाई , मी भरड वाटून घेईन किंवा सगळेच
मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवेन.

अस करून पाहा बर !!!

राखी फोटो नंबर वन! आंबा वापरलास का? की पल्प? प्रमाण सांगणार का? तुझ मेल्ट झालं नाहीये म्हणुन विचारतेय. दुध/क्रिम्/मिल्क पावडर कोणती वापरलीस?

मुग्धटली तुमची रेसेपी खरच छान आहे. मी पण १ तारखेला केला मँगो.खुप छान झाल होता,माझ्या नवरयाला तर फार म्हणजे फारच आवडला.सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे साखर घालायची विसरले पण आइसक्रिम अप्रतिम झाल होत...मी १ वाटी घेतला सगळ आंबा पण १..
धन्यवाद...

मुग्धटली, छान पा.कृ. आहे. मी परवाच आंब्याचे आइसक्रीम करून पाहिले, मस्त झाले. नेचरल आइसक्रीम सारखेच लागते.

Pages