नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सगळे आता आईस्क्रीम खायला का नको म्हणत आहात?>>>आईस्क्रीम खाऊन एखादेवेळी घसा खराब झाला, सर्दी झाली तर उगाच कोरोना झालाय अशी भीती वाटेल म्हणून... आणि तसंही काही दिवस नाही खाल्लं आईस्क्रीम तर काय बिघडणार आहे....

आईस्क्रीम खाऊन आपल्याला कोरोना झालाय या भितीपेक्षा शेजार्यांनी खोकला ऐकून पोलिसात कळवणे हे जास्त तापदायक आहे.

सहेली जरा उलगडून सांगा ना अंजीर कसे घातलेत (भिजवून की कच्च आणि तुकडे कसे टाकले) आणि मध कोणत्या टप्प्यावर आणि किती.

मी फक्त क्रीम आणि दुध घालून (निम्मे निम्मे) आणि त्यात , केशर , वेलची आणि पिस्ते घालून कालच केल आईसक्रीम. अतिशय उत्तम आईसक्रीम झाल.
अंजीरची आयडीया आवडली. मला वाटत भिजवून थोडा पल्प आणि थोडे तुकडे अस केल तर छान होइल अस वाटतय.

काल चॉकलेट आणि केशर /मलई फ्लेवर करुन पाहिले.
चॉकलेट एकदम जगात भारी लागतेय. सगळे वरचे प्रमाण साखर सोडुन कारण मी जी स्टारबक्सची हॉट चॉकलेट पावडर वापरली त्यात बरीच साखर होती. ती मोठे ३ चचमे भरुन घातली. मस्त झालं एकदम. थँक्यू पुन्हा एकदा.

मलई/केशर : फक्त केशर आणि थोडा एवरेस्टचा दुध मसाला होता तो घातला. बाकी सगळं तुझ्या साहित्याप्रमाणे. हे पण भारी लागतेय.

choco.jpgmalai.jpg

मी काल ह्या पद्धतीने स्ट्रॉबेरीचं केलं. एकदम मस्त लागतय! पुढच्यावेळी स्ट्रॉबेर्‍या थोड्या जास्त घालेन. बाकी फ्लेवरपण करून बघू आता.

मँगो आईस्क्रीम केले.पण खूप घट्ट झाले आणि मिल्क पावडरचा वास येतोय.वर सगळ्या फोटोंत आहे त्याप्रमाणे सॉफ्ट झाले नाही. असं का?

अहो आइसक्रीम खाऊन घसा बिसा धरेल, सर्दी खोकला होईल म्हणून असेल हो. आणि घरचं असलं की जास्तच खाल्लं जातं ते वेगळंच.

मुग्धा, सध्या इकडे अजीबातच दिसत नाहीस पण
माझ्या एका मित्राने ह्या कृतीनुसार शहाळ्याचे आईसक्रीम बनवले त्याने तुझे मानलेले आभार पोचवण्याकरता म्हणून हा प्रतिसाद.

अहो आइसक्रीम खाऊन घसा बिसा धरेल, सर्दी खोकला होईल म्हणून असेल हो.
>>>>
आईसक्रीम खाल्यावर लगेच साधे पाणी प्यायचे. काही खोकला होत नाही की घसा धरत नाही.

हे आईस क्रीम करून बघितलं. चांगलं झालं. फळाचा गर नसल्याने ड्राय फ्रुट आणि नटेला घालून केलं. थोडा खारट पणा आला. पण प्रयोग यशस्वी झाला. फोटो केक सारखा दिसतोय पण आहे आईस क्रीमच. IMG-20200520-WA0012.jpg

देवकी & मनमिता - मी पण तुमच्या सोबत Happy
घरी कुणीच खाल्ले नाही.
२ वर्षांपूर्वी केले तेव्हा tender coconut & mango मस्त झालेले.
आज mango ice cream करणार आहे.
hoping for the best.

मुलींनो , मी वरती लिहिलय तस बिन मिल्क पावडर घालता करुन बघा . ऊत्तम होत. मिल्क पावडरचा वास मला आवडत नाही.

मीही केले छान लागते आहे पण टाळू तूपकट होते खाल्लेकी
मी दूधाऐवजी क्रिम टाकले , स्मुथ करण्याच्या नादात Sad
आदिश्री

आंबा आईस्क्रीम दिसतेय चांगले.जरा अगोड आहे.तो माझा दोष.माझा हात साखरेसाठी कnजूष आहे.
यावेळी दूध अटावले.whip kream ghatale.sagale प्रमाण इकडे तिकडे घेतले.पण मागच्यापेक्षा यावेळचे चांगले झाले.वरच्या फोटोत dakhavlyasarkhe नाही तरी बरेच बरे झाले.
मुग्धतली धन्यवाद!

5E7922E8-C6B9-4474-8AEC-681C40B3E854.jpeg

ही पाककृती करून पहायची खूप दिवस इच्छा होती. पण लाॅकडाऊनमधे क्रीम मिळत नव्हते. शेवटी आज मुहूर्त मिळाला. मॅंगो आईस्क्रीम करून पाहिले. छान झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोपी पाककृती. चुकायची शक्यता अगदी कमी. धन्यवाद.

ही पाककृती करून पहायची खूप दिवस इच्छा होती. पण लाॅकडाऊनमधे क्रीम मिळत नव्हते. शेवटी आज मुहूर्त मिळाला. मॅंगो आईस्क्रीम करून पाहिले. छान झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोपी पाककृती. चुकायची शक्यता अगदी कमी. धन्यवाद.>>>अगदी माझ्या मनातलंच लिहीलय. मी पण काल केलं मँगो आइसक्रीम

IMG-20200616-WA0023~2.jpg

मी या पद्धतीने मँगो आईस्क्रीम केलं काही दिवसांपूर्वी. खूप छान झालं होतं. सगळ्यांनी वाहवा केली तेव्हा बायको गप्प होती. एका शब्दाने कोणाला बोलली नाही की मी केलयं. नन्तर काही दिवसांनी एका वेगळ्या पद्धतीने केलं ते जरा बिघडलं तेव्हा बायकोने लगेच माझं नाव पुढे केलं.

बोकलत Lol

पहिल्या वेळी तुम्ही स्वत: सांगायचं की मी केलं आईस्क्रीम.

सगळे फोटो आहाहा.

Pages