नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज या पद्धतीने चिकू चे केले ...खूप मस्त झालेय...अप्रतिम चव आलीये. सर्वाना आवडले घरी. खूप खूप थँक्स मुग्धा Happy

एक अगदीच बेसिक प्रश्न - icecream सेट करायला ठेवल्यावर त्यावर झाकण ठेवायचं का? की उघडं ठेवायचं?

काल शेवटी या कृतीने आईसक्रिम करायला मुहूर्त मिळाला. मस्त झालेय आईसक्रिम. धन्यवाद मुग्धा.
१/२ टीस्पून वॅनिला, २ १/२ टे. स्पून कोको, आणि १/४ कप चॉकलेट चिप्स , १/२ कपापेक्षा थोडी जास्त साखर, स्टोअर ब्रॅन्ड नॉन फॅट मिल्क पावडर, होल मिल्क , आणि हेवी विपिंग क्रिम वापरले .

मी गेल्या वीकेंडला करुन बघितले आइसक्रीम ही रेसिपी वापरुन
हापूसच्या फोडी घालून मॅंगो फ्लेव्हरचे केले होते!
चवीला छानच झाले होते पण का कुणास ठाउक मधूनमधून बर्फ लागत होता!
चितळ्यांच्या दुधात पाणी असेल का?
फोटो डकवतोय:
2018-05-27_14-07-01-790.jpg2018-05-27_23-23-20-730.jpg

ताडगोळा आईस्क्रीम (कार्नेशन मिल्क पावडर, हेवी व्हिपिंग क्रीम, दूध, कॅन्ड ताडगोळे, अंदाजे साखर)
ताडगोळे फ्लेवर कसा लागेल काय की म्हणून बॅकप म्हणून मँगो आईस्क्रीम केले. बट नो वरीज... Happy

icecream.jpg

आज पहिल्यांदा मुहूर्त लागला हे आईस्क्रीम करायचा. बटरस्कॉच-चॉकलेट फ्लेवर केला. मस्त झालं होतं आईस्क्रीम. घरी बनवलं आहे यावर विश्वासच बसेना नवर्‍याचा.

Pages