साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,
वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.
वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.
टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.
नवऱ्याने काल या पद्धतीने
नवऱ्याने काल या पद्धतीने कंडेन्स्ड मिल्क ( दूध पावडर ऐवजी ) वापरून टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवले अतिशय उत्तम लागले. थोडे बर्फाचे खडे होते कदाचित साधे दूध वापरल्यामुळे असेल पुढच्या वेळेस फुल फॅट मिल्क वापरेन धन्यवाद
ही रेसिपी वापरून मी पपई,
ही रेसिपी वापरून मी पपई, चिक्कू आणि tender coconut केले. सर्वच flavours अप्रतिम जमले... अनेक जणांना recipe दिली आणि अनेकांनी try केली. अतिशय सुटसुटीत, सोपी आणि हमखास जमणारी आहे. खूप धन्यवाद!
आईस्क्रीम एकदम भारी दिसतेय
आईस्क्रीम एकदम भारी दिसतेय प्राजक्ता!
रेसिपी पण सोपी आहे..करून बघते मी पण .
मी या वेळी स्ट्रॉबेरी, मँगो,
मी या वेळी स्ट्रॉबेरी, मँगो, चॉकोलेट व केशर पिस्ता बनवले आइसक्रीम.
प्राजक्ता, सर्व फोटो एकदम
प्राजक्ता, सर्व फोटो एकदम जबरदस्त आहेत.
मी पण चिकू आईस्क्रीम बनवलं.
मी पण चिकू आईस्क्रीम बनवलं. एकदम यम झालंय. साय किंवा क्रीम नव्हती म्हणून घातली नाही.
दुध तापवलेले वापरायचं कि न
दुध तापवलेले वापरायचं कि न तापवता वापरलेलं चालेल?
रिया,साय किंवा क्रिम न घालता ही छान बनलं का? बाकी साहित्य आहे घरात, चॉकलेट आईस्क्रीम बघते बनवून.
धन्यवाद मृणाली, अन्जू.
धन्यवाद मृणाली, अन्जू.
क्रीम न घालता मला पण try करायचं आहे.
मी दूध तापवून थंड झाल्यावर सायी सकट घातलं. आणि वर क्रीम घातलं.
ही रेसिपी मी सुद्धा ट्राय
ही रेसिपी मी सुद्धा ट्राय केली..सगळ्यांना खूप आवडली thank u..
Chocolate flavour
काल chocolate flavour बनवलेलं
काल chocolate flavour बनवलेलं पण ते खूप जास्त हार्ड झालं होत. आज शहाळ ट्राय करते ते बॅटर सॉफ्ट राहावं याकरता कस ठेवायचं..?
Freezer मधे ठेवल्यास एकदम हार्ड होतंय
हो साय/ क्रीम न घालता सुद्धा
हो साय/ क्रीम न घालता सुद्धा एकदम मस्त झालं. शिवाय त्यात बर्फ़ाचे खडे सुद्धा झाले नाहीत. मी फ्रोजन चिकू वापरले.
मला वाटतं उकळून गार केलेलं दूध वापरलेलं जास्त चांगलं. कच्च्या दुधाची टेस्ट विचित्र लागते मला.
अमृताक्षर, वरती चिनुक्स ने
अमृताक्षर, वरती चिनुक्स ने टीप दिलीये तसं ते हार्ड बॅटर मिक्सरला फिरवून बघ कसं होतंय.
बर ठीक आहे तस करून पाहते..
बर ठीक आहे तस करून पाहते.. फ्रिझर मधे ठेवताना झाकून ठेवावे की ओपन..? काल ओपन ठेवलेलं..आज एअर टाईट बॉक्स मधे ठेवलंय
काल गुलकंद flavour बनवले.
काल गुलकंद flavour बनवले. सगळ्यांना खूप आवडल. धन्यवाद मुग्धटली.
आज मी पण केलं चिकु आईस्क्रीम.
आज मी पण केलं चिकु आईस्क्रीम.... एकदम मस्त बनलं..घरात सगळ्यांना आवडलं..रेसिपी साठी धन्यवाद !
काल केलं आणि छान झालं.
काल केलं आणि छान झालं.
या आधी केलेलं तेव्हा नेहेमी बर्फाळ झालेलं. यावेळी दूध (नेहेमीचं २/ ३.२५ %) न घालता १८% फॅट वालं टेबल क्रीम घातलं.
मस्तच. खूप छान दिसतात नॅचरल
मस्तच. खूप छान दिसतात नॅचरल आईस्क्रीम्स.
आज शहाळे आणि गुलकंद बनवले
आज शहाळे आणि गुलकंद बनवले
शहाळे एकदम झक्कास झाले
गुलकंद ठिकठाक
आज मी पायनाप्पल बनवले..चुकले.
आज मी पायनाप्पल बनवले..चुकले..कडु झाले..
पण पायनाप्पल खाऊन बघितले होते,ठिक चव होती. बहुतेक मी ठिक कापले नसावे साईडचे डोळे किंवा ते मधला भाग पण थोडा वेगळा लागतो.
वाया गेलं आईस्क्रिम.साखर टाकून परत फिरवून परत सेट केलं तर होईल का दुरूस्त?
अननस कशातही वापरायचे झाले तर
अननस कशातही वापरायचे झाले तर शिजवून घेऊन वापरावे, नाहीतर कडू लागते हे इथेच माबोवर कुठेतरी वाचले होते ते आठवले.
माझ्याकडे थोडे कंडेन्सड मिल्क शिल्लक आहे, दूध पावडरीऐवजी ते वाप्रायचे तर प्रमाण तेवढेच ठेवायचे का? साखर कमी लागेल.
अननस कशातही वापरायचे झाले तर
अननस कशातही वापरायचे झाले तर शिजवून घेऊन वापरावे, नाहीतर कडू लागते हे इथेच माबोवर कुठेतरी वाचले होते ते आठवले.
माझ्याकडे थोडे कंडेन्सड मिल्क शिल्लक आहे, दूध पावडरीऐवजी ते वाप्रायचे तर प्रमाण तेवढेच ठेवायचे का? साखर कमी लागेल.
असा कडवटपणा साखरेने जाईल असं
असा कडवटपणा साखरेने जाईल असं वाटत नाही
अननस कशातही वापरायचे झाले तर
अननस कशातही वापरायचे झाले तर शिजवून घेऊन वापरावे, >>>>>> हे माहित नव्हतं.
हो ना.मी साखर घालून फिरवलं एकदा मिक्सरमध्ये,नाही गेला कडवटपणा.. फेकून दिलं मग.
उद्या नव्या फ्लेवरचे नवीन आईस्क्रीम
अमुल 90%बीटर डार्क चॉकलेट आहे घरात.. ते टाकून केलं तर कडु होईल का? कारण चॉकलेट अतिकडु आहे।
Mrunal, लहान नैवेद्याच्या
Mrunal, लहान नैवेद्याच्या वाटीत करून पहा आधी. खूप कडू होईल नाहीतर. मी कडू चाॅकलेटचा एक लहान तुकडा गोड चाॅककलेटच्या मोठ्या तुकड्याबरोबर खाते
येस मेधावी, आधी जरासंच करून
येस मेधावी, आधी जरासंच करून बघेन.
थँक्स
पायनापल वापरायचे तर टिन
पायनापल वापरायचे तर टिन मधले वापरावे. साखरेच्या पाकातले.
माझी चॉकोलेट आइस क्रीम ची कृती देते: मी हर्शीज चॉकोलेट पाव्डर डब्बा जो बिग बास्केट वर येतो ते वापरले. दोन टेबल स्पून, मिल्क पावडर दोन टेबल स्पून. तीन टे स्पून साखर हे साधारण २५० ग्राम दुधात घालून एकदा मिक्सर मधून फिरवले. ह्यात व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट काही थेंब व ब्रू कॉफी पाव्डर दोन छोटे चमचे घालून परत फिरवले. आणि गार केले.
डार्क चॉकोलेट आत घालू नका . वरील पद्धतीने करून घ्या आइसक्रीम व सर्व्ह करताना वरून किसून घाला. मध्यंतरी आम्हाला हर्शीज किसेस
प्रोमोशनल पॅक फुकट आले होते. ते बारक्या मोदकांसारखे असतात ते ही वरून ठेवता येतील. नाहीतर चॉकोलेट चिप्स किंवा रंगी बेरंगी बारक्य
स ळ्या नाहीतर सिल्व्हर च्या गोळ्या नी डेकोरेट करता येइल.
ह्याच चॉकोलेट पाव्डरचा साधा चॉकोलेट केक करायचा खाली एक स्लाइस केक मग एक स्कूप आइसक्रीम व वरून कॅडबरीची किंवा डार्क चॉकोलेट एक स्लाइस ठेवायची सर्व्ह करताना. मस्त दिसेल.
आज मी आमरस मागवला आहे त्यात फक्त दूध घालून गार करेन. रात्री बेरात्री उठून खायला मस्त होते.
पण मी।काय म्हणते मृणाल,
पण मी।काय म्हणते मृणाल, पहिल्यांदा करणार आहेस तर चांगला ट्राईड अँड टेस्टेड फ्लेवर try कर की.
अमा, तुम्ही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले की त्या आनंदात आईस्क्रीम खा.
हे दुसर्यांदा होतं ना
हे दुसर्यांदा होतं ना
पहिल्यांदा दोन दिवसापुर्वी चिकु चे केले मस्त झाले..वर फोटो आहे बघ.
टेंडर कोकोनट करताना मलई कुठुन
टेंडर कोकोनट करताना मलई कुठुन आणता? विकत मिळते की शहाळं पिऊन त्यातली घेता? ज्या प्रमाणात आइस्क्रिम बनवायचं आहे त्यासाठी ५०-५५ रुपयाचं एक प्रमाणे ४ तरी शहळ घ्यावी लागतील.
मी शहाळ घेऊन त्यातली मलई
मी शहाळ घेऊन त्यातली मलई टाकतो. आमच्या इथे सकाळी येतो तो 50 ला दोन देतो. पण एकंदरीत हे आईस्क्रीम खर्चिक आहे.
Pages