क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

*आपण जेंव्हा ७-८ पासून चहल, यादव आणायचो तेंव्हा आपल्याला हे परवडणारे नव्हते* +1 .
*बाकी चर्चा चालत राहतील, पण जब तक सूरज चांद रहेगा धोनी तेरा फिनिशर नाम रहेगा* - +1. धोनीने भारतीय क्रिकेटला जें दिलंय तें बघतां त्याचे तथाकथित दोषही किरकोळच वाटतात. निदान, त्याच्या निवृत्तीनंतर तरी त्याची चांगली बाजूच लक्षात ठेवावी, इतकी तरी पुण्याई नक्कीच आहे त्याच्या खात्यात, असं मला वाटतं.

धोनीसारखा स्वार्थी क्रिकेटपटू मी आजपर्यंत पाहिला नाही. सुरवातीला चुकून लक बाय चान्स तो पाकिस्तान श्रीलंकेविरिद्ध चांगला खेळला. हे त्याच्याही लक्षात आलं त्यामुळे त्यानंतर त्याने टुकुटुकू खेळायला सुरुवात केली. संघाला कितीही गरज असू दे हा टुकूटुकू खेळायचा. त्याच काळात याने सिनिअर खेळाडूंची हालचाल मंदावले यावरून त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आणि त्याला त्या कामात यशही मिळालं. धोनी डर्टी पॉलिटिक्स करताना हे विसरला की तो बघताहा. आणि नियती खरोखरच त्याच्याकडे पाहत होती. शेवटी नियतीने त्याला तिथेच आणून सोडले जिथे त्याने दुसऱ्यांवर चिखलफेक केली. धोनी म्हातारा झाला, हालचाल मंदावली, रन्स होत नाही त्यामुळे सामने फुगायला लागले. पण त्याला काही मोह माया सुटत न्हवती. शेवटी बोर्डाला त्याला बाहेर काढावा लागला. एक वर्तुळ पूर्ण झाले आणि नियती गालातल्या गालात हसली. त्यामुळे आपण सगळ्यानी लक्षात ठेवायला पाहिजे ता बघताहा.

*सुरवातीला चुकून लक बाय चान्स तो पाकिस्तान श्रीलंकेविरिद्ध चांगला खेळला. * - इतकीं वर्ष, इतक्या मोठ्या जागतिक स्पर्धा , इतकं यश, सारं ' लक बाय चान्स ' ? तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक, ' राऊळाच्या कळसाला , लोटा कधीं म्हणूं नये '' ! आपणही टीका करताना लक्षात नको का ठेवायला -
* तो बघताहा. * !!! Wink

चार पाच जलद गतीने केलेल्या स्टंपिंग्स याच्या पलीकडे त्याने काहीही केलेलं नाही. जग त्याला फिनिशर म्हणून संबोधतं ते त्याने केलेल्या खेळीमुळे नाही तर भारतीय संघाला फिनिश केलं म्हणून. Csk खेळाडूंची खोगीर भरती करून कितीतरी चांगल्या खेळाडूंवर त्याने अन्याय केला. सुरवातीला त्याचे केस लांब होते त्यामुळे तो लोकांना जरा वेगळा वाटला आणि लोकांनी त्याला उचलून धरला होता. नन्तर हळूहळू त्याची बॅटिंग खुपच कमी झाली आणि पूर्वपुण्याई च्या जोरावर आणि टुकुटुकू खेळत उरलेली वर्षे भारतीय क्रिकेटचं नुकसान करत घालवली. शेवटी बोर्डाला त्याचा कावा समजला आणि बाहेर बसवला.

मान्य, शेवटी शेवटी धोनी संपला होता. त्याची जादू हरवत चालली होती. त्यावर शिक्कामोर्तब विश्वचषकाच्या सेमिफायनल मधे झाले. धोनीने तेंव्हाच निवृत्त व्हायला पाहिजे होते. अस जरी असल तरी त्याच्यावर येवढी जहरी टिका करण अन्यायकारक ठरेल. गांगुली नंतर धोनीची कारकिर्द भरतीय क्रिकेटचे जगात स्थान आणि दबदबा उंचावण्यात मोलाची ठरली यात काहीच शंका नाही. धोनी एक सुपर स्ट्रॅटेजिस्टही होता. शिवाय निर्विवाद पणे भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजही तीनही प्रकारात होता.

धोनी एक सुपर स्ट्रॅटेजिस्टही होता. शिवाय निर्विवाद पणे भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजही तीनही प्रकारात होता. >> +१ ह्याबाबत कोणाचेच दुमत नसायला हवे.

धोनी चांगला यष्टीरक्षक होता, व्हाइट बॉल क्रिकेट चा चांगला कर्णधार होता पण फलंदाज म्हणून ओव्हररेटेड होता असे माझे वैयक्तिक मत आहे

धोनी एक सुपर स्ट्रॅटेजिस्टही होता. शिवाय निर्विवाद पणे भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजही तीनही प्रकारात होता. >> +१

फक्त टेस्टमधे हा वासरात लंगडी गाय प्रकार आहे अस मला वाटत. धोनी टेस्ट मधे साधारणच फलंदाज होता. गिली किंवा फ्लॉवर लेवलचा नव्हता.

धोनी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे खेळाडू आणी कप्तान ह्या दोन्ही भुमिकांत (२०१७ पर्यंत) श्रेष्ठ होता. नंतर सक्सेशन प्लॅनिंग करायला टीम मॅनेजमेंट कमी पडली. २०१९ च्या वर्ल्डकप ला धोनी ला टीम मधे बसवण्यासाठी 'तो चौथ्या क्रमांकावर पण खेळू शकतो' वगैरे धडपड केविलवाणी होती. त्यामुळे जी वाताहत झाली ती सगळ्यांनीच पाहिली. (मान्य करणं, न करणं हा वेगळा मुद्दा आहे.) दोन वर्षांपासून ज्या खेळाडूंना त्या चौथ्या क्रमांकासाठी तयार केलं गेलं त्या सगळ्यांनाच शेवटी बाहेर ठेवलं गेलं. १९९६ च्या वर्ल्डकप ला पाकिस्तान ने जावेद मियांदाद ला खेळवण्यासाठी केलेल्या खटाटोपाची आठवण झाली.

टेस्ट मधे फलंदाज आणी कप्तान दोन्ही भुमिकेत धोनी साधारण होता. टेस्ट मधे जेव्हा काही घडायचं नाही किंवा एखादी पार्टनरशिप बिल्ड व्हायला लागायची तेव्हा तो लगेच डिफेन्सिव्ह मोड मधे जाऊन फलंदाजाकडून चूक व्हायची वाट पहायचा (आठवा: पहिल्या दहा ओव्हर्स मधे डीप पॉइंट, स्वीपर कव्हर मधे उभे असलेले क्षेत्ररक्षक). इंग्लंड मधे त्याला स्विंग बॉलिंगवर विकेटकिपींग करताना ज्या मर्यादा होत्या त्यामुळे तो थोडा जास्त मागे उभा रहायचा आणी त्यामुळे स्लिपपर्यंत कॅचेस पोहोचायचे नाहीत.

गांगुली-द्रविड-कुंबळे ह्यांचाकडून त्याला एक चांगली टीम मिळाली होती आणे त्याने त्या टीम चा चांगला उपयोग केला. मध्यंतरी सेहवाग ने एका मुलाखतीत सांगितलं होतं की नंबर-वन टेस्ट टीम ची व्हिजन कुंबळे ची होती. ज्या धोनी ने ज्येष्ठ खेळाडूंना संथ म्हणून टीममधून बाहेर काढलं, तोच धोनी स्वतः जवळ जवळ चाळीशी पर्यंत खेळत राहिला आणी शेवटी unceremoniously टीममधून बाहेर पडला हा काव्यात्मक न्याय होता.

धोनी एकदीवसीय क्रिकेटमध्ये येण्याआधी 'फिनिशर' ही टर्म फार अपवादाने वापरली जायची. मायकल बेव्हन, जडेजा, रॉबीन सिंग, मोईन खान, क्रिस केर्न्स ही काही नावे..पण त्यांच्यात धोनीएवढे सातत्य नव्हते. गांगुली, द्रविड, कुंबळे कॅप्टन असतांना आपली टीम जिंकत असली तरी बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होण्याचे आणि मोठ्या मार्जिनने हारण्याचे प्रमाण जास्त होते. धोनीच्या काळात हे कोलॅप्स होणे आणि मोठ्या मार्जिननचे हारणे प्रचंड प्रमाणात कमी झाले. पूर्वी आपण दहा पैकी ५ मॅचेस जिंकत असू २ कमी मार्जिनने आणि ३ मोठ्या मार्जिनने हरत असू तर हे गुणोत्तर धोनीने भारतात ७:३:० आणि भारताबाहेर ६:२:२ असे साधारण केले, कोहलीने हेच गुणोत्तर पुढे अजून सुधारले.
हे माझ्या मते धोनीचे भारतीय क्रिकेटला सगळ्यात मोठे योगदान आहे. टीम पर्फॉर्मन्स क्वोशंट सुद्धा धोनीच्या काळात खूप वाढला. पूर्वी भारताचा विजय वैयक्तिक पर्फॉर्मन्सेसवर जास्त बेतलेला असे.

बॅट्समन म्हणून धोनी भारतात आणि भारताबाहेर अनुक्रमे अबोव अ‍ॅवरेज आणि बीलो अ‍ॅवरेज होता. जास्त मॅचेस भारताबाहेर खेळल्याने तो स्कील लेवलवर बॅट्समन म्हणून अ‍ॅवरेजच राहिला. टी२० फॉर्मॅट नसते तर धोनी आज आहे तेवढा मोठा लीजेंड झाला नसता.
बॅट्समन म्हणून अ‍ॅवरेज राहिल्याने टेस्ट क्रिकेटवर तो फार प्रभाव पाडू शकला नाही. पुन्हा वन नेशन-वन कॅप्टन ही थिअरी त्याने रेटली पण त्याला फारसा बेस नाही. अनेक टीम्सने हे सिद्ध केले आहे, खुद्द धोनीचे टेस्ट आणि वनडे मधल्या यशातली तफावत त्याची ही थिअरी मोडीत काढते. पण त्याच्या ह्या थिअरीला कोणी अपोझ न केल्याने धोनी ऑलमोस्ट थोपवला गेलेला टेस्ट कॅप्टन झाला, असे म्हंटले तरी वावगे ठरू नये.
पण विकेट कीपींग आणि गेम अवेअरनेस मध्ये तो एकमेवाद्वितीय आहे ह्यात शंकाच नाही.

धोनी टेस्ट मधे जर वरच्या क्रमांकावर खेळला असता तर त्याने खोर्‍याने धावा काढल्या असत्या एव्हढी गुणवत्ता त्याच्यात होती . * हे तेंडूलकरचे मत आहे, माझे नाही. वरचे वाचून आठवले म्हणून नोंद केली

तेंडुलकर 'ऊपखंडातल्या पाटा विकेट्सवर' हे महत्वाचे डीटेल लिहायचा विसरला वाटते. ५० एक टेस्ट मध्ये धोनी भारताबाहेर गुणवत्ता दिसून येईल अशी एकही खेळी खेळल्याचे आठवत नाही, एकही १०० किंवा मॅच विनिंग खेळी तो करू शकला नाही, ऑस्ट्रेलियाच्या दोन दौर्‍यात मिळून फक्त एक ५०. SENA देशात त्याचा अ‍ॅवरेज २८-३० पेक्षाही कमी असावा.
कॅप्टन म्हणून विन-लॉस रेशो बाबतीतही गांगुली होम आणि अवे दोन्ही ठिकाणी धोनी पेक्षा नक्कीच वरचढ असावा.

धोनी बरोबर प्रत्यक्षात खेळलेल्या खेळाडू च्या मताला नि परत ते तेंडूलकर चे असल्यामूळे मी त्याला संशयाचा फायदा देऊन त्याचे मत अधिक ग्राह्य धरतो.

धोनी बरोबर प्रत्यक्षात खेळलेल्या खेळाडू च्या मताला नि परत ते तेंडूलकर चे असल्यामूळे मी त्याला संशयाचा फायदा देऊन त्याचे मत अधिक ग्राह्य धरतो. >> तेंडुलकरने कधी 'ह्या अमुक बॅट्समनमध्ये गुणवत्ता नाही' किंवा 'तमक्याने त्याच्या गुणवत्तेपेक्षा जास्त यश मिळवले' अशी अनबायस्ड मते नोंदवली असती तर मीही धोनीच्या बाबतीत त्याचे मत ग्राह्य धरले असते. Happy

अगदी असेच काही नाही. जिथे 'कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट' असतो तिथे आपण केलेले कौतुक आणि टीका दोन्ही अनबायस्ड आहेत हे पटवण्यासाठी जास्त मेहनत घेऊन तो बॅलन्स सांभाळावा लागतो. म्हणून मी समालोचक किंवा स्पोर्ट्स अ‍ॅनालिस्ट लोकांच्या परखड मताला जास्त किंमत देईन रिटायर्ड क्रिकेटर्सच्या शुगर कोटेड मतांपेक्षा.
ईफ्स अँड बट्स स्टेटमेंट करण्यासाठी जो काही आधार धोनीच्या खेळाच्या प्रदर्शनातून आणि आकडेवारीतून दिसायला हवा होता तो दिसत नाही.
ऊदा. राहुल ओपनिंगला खेळला तर तो ४ किंवा ५ नंबरवर पेक्षा जास्त ईंपॅक्टफुल खेळ करू शकतो हे म्हणणे रास्त आहे, सध्या फेल जात असला तरी आधी त्याने त्याच्या खेळातून हे दाखवले आहे. पण धोनी वरच्या नंबरवर आला असता तर त्याने खोर्‍याने वगैरे रन बनवले असते म्हणण्यासाठी लागणारे बेस मटेरिअल... स्कील, टेक्निक,नंबर्स असे काहीच धोनीच्या खेळातून कधी दिसले नाही. ते तेंडुलकरला नेट मध्ये वगैरे दिसले असेल तर त्यालाच माहिती.

ईफ्स अँड बट्स स्टेटमेंट करण्यासाठी जो काही आधार धोनीच्या खेळाच्या प्रदर्शनातून आणि आकडेवारीतून दिसायला हवा होता तो दिसत नाही. ऊदा. राहुल ओपनिंगला खेळला तर तो ४ किंवा ५ नंबरवर पेक्षा जास्त ईंपॅक्टफुल खेळ करू शकतो हे म्हणणे रास्त आहे >> I rest my case here. I assume you are impressed with his batting in England or for that matter in SriLanka Lol तू वर म्हणालास की "तेंडुलकर 'ऊपखंडातल्या पाटा विकेट्सवर' हे महत्वाचे डीटेल लिहायचा विसरला वाटते." कमीत कमी मग राहुल चे उदाहरण देण्या आधी त्याचे कमीत कमी तेच स्टॅट्स धोनीच्या त्या स्टॅट्स शी तुलना करून तरी बघायचे रे. म्हणजे राहुलच्या त्या स्टॅटस च्या जोरावर एव्हढे रास्त म्हणणे तुला मांडता येत असेल तर धोनी ओपनिंगला खेळता तर त्याने गावस्कर एव्हढे रन्स तरी कमीत कमी काढले असते असे तूच म्हणाला असतास बघ बाबा. Happy
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/422108.html?class=1;home...
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/28081.html?class=1;home_...

'कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट' तेंडूलकर नि धोनी मधे ? व्हेरी इंटरेस्टींग. ह्यावर एलॅबोरेट करशील का ? म्हणजे २००७ मधे धोनी ला कप्तान बनवा ह्यापलीकडे सचिनने काही अजून सांगितल्याचे मी वाचले नाहिये. दोघे वेगळ्या आयपील टीम कडून खेळत आले आहेत. मी दिलेले हे कोट्स धोनी टेस्ट मधून रीटाय्र्ड झाल्यावर तेंडूलकरने केले होते. तेंडूलकर त्या आधी निघाला होता. तुला जिथे नसलेल्या आकड्या तून राहुल चे ओपनिंग साठी आदर्श टेक्निक दिसतेय तर त्या बापड्या सचिनला , ज्याने "ह्याची देही ह्याची डोळा" धोनीची बॅटींग नेट मधेच नाही तर मैदानाबाहेर पण पाहिली आहे त्याच्या मताला दमडीची तरी किम्मत दे की. त्यालाही क्रिकेट मधले थोडेफार तरी समजत असेल असा संशयाचा फायदा त्याच्या एव्हढ्या चांगल्या कारकिर्दी नंतर देऊया का ? ( चांगल्या ह्या शब्द प्रयोगाची नोद घे : उत्क्रुष्ट किंवा दैदिप्यमान वगैरे म्हणत नाहीये - पण चांगल्या तरी निर्विवाद असेल असे धरतो कुठलेही आकडे कुठल्याही देशांमधले , कितीही आकड्यांच्या कसरती मधून बघितले तरी - त्यातून नवा वाद नको म्हणून )

भारताचा आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविड आहे.>> हा मी जोक म्हणून घेतो. Happy
केवळ टीममधे बसण्यासाठी तो किपींग करायचा.
धोनी फक्त फलंदाज म्हणून कधीच टीममधे बसला नसता. त्या फूटपट्टीने तो चांगला फलंदाज म्हणून कधी गणला जाणार नाही.
गिली तर आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज. पण एक फरूक इंजिनीयर आणि दुसरा पार्थीव पटेल सोडला तर इतर कुठला भारतीय धोनीच्या जवळपासही येणार नाही.

भारतात तरी सगळे माजी क्रिकेटपटू त्यांच्या सोबत खेळलेल्या खेळांडुंबद्दल चांगलेच बोलतात, पटत नसेल तर बोलत नाही पण सहसा टीका करत नाही. त्यामुळे तेंडुलकरनी धोनीचे कौतुक करण्यात फारसे आश्चर्य नाही, ऑस्ट्रेलिया सारखे विशेषतः इयान chappel सारखे परखड टीका करणारे आपले माजी खेळाडू नाहीत

*विशेषतः इयान chappel सारखे परखड टीका करणारे आपले माजी खेळाडू नाहीत* - गरजच काय त्याची , हा धागा असताना !! Wink

“केवळ टीममधे बसण्यासाठी तो किपींग करायचा“ - १९९९ वर्ल्डकप नंतर, २००२ मधे जेव्हा द्रविडने विकेटकिपींग चे ग्लोव्ह्ज घातले तेव्हा त्याचं टीममधलं स्थान अजिबात डळमळीत नव्हतं. तो टीमचा व्हाईस कॅप्टन होता. त्याने जॉन राईट ला कोच म्हणून आणण्यात महत्वाची भुमिका निभावली होती.

भारताचा आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविड आहे.
>>> हो आणि भारताचा सर्वात उत्कृष्ठ गोलंदाज कुंबळे आणि फलंदाज कांबळी आहे...

बोकलतानु अमानवीय वरच्या पुड्या इकडे सोडायला लागलात का Happy

भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज खरंच कुंबळे आहे. जगातला तिसर्या क्रमांकाचा विकेट-टेकर आहे तो. ९५०+ इंटरनॅशनल विकेट्स आहेत त्याच्या नावावर.

आपण एक विसरतो आहोत कुणी खेळायचे, किती वर्षे खेलायचे, कुणाला वय झाले तरी , फोर्म गेला तरी खेळवायचे हे निवड समिती ठरवीत नाही, बोर्ड ठरवीत नाही तर त्याण्चे जाहिरात दार ठरवतात . जोपर्यन्त जाहीरातीचे करार चालू आहेत तोपर्यन्त त्याला लॉबी इन्ग करून मैदानावर ढकलत राहायचे असे ही स्ट्रॅटेजी आहे. त्याने कामगिरी नाही केली तरी चालते, सामने हरले तरी चालते. क्रिकेट हे जाहीरातीण्साठी चालते. आता पहा ना , प्रेक्शक नसले तरी सामने होतातच ना? मुळात ते प्रेक्षकाण्साठी नसतातच, ते जाहीराती पाहणार्‍याण्साठी असतात . त्यानी सचिनला बळेच ढकलला, धोनीला ढकलला, आता पाळी विराटची असेल. नन्तर पन्त बिन्त असतील. जहीरात दाराना निवडसमिती , कप्तान, बोर्ड याण्ची " समजूत" काढायला शिकवावे लागत नाही Wink

धोनी फक्त फलंदाज म्हणून कधीच टीममधे बसला नसता.
>>>>>

अशक्य असहमत Happy
आपण दिनेश कार्तिक आणि नवखा पंत यांनाही वर्ल्डकप सेमीसारख्या महत्वाच्या सामन्यात निव्वळ फलंदाज म्हणून खेळवतो
आणि खुद्द धोनी फलंदाज म्हणून कधीच टीममध्ये बसला नसता असे तुम्ही म्हणत आहात.

अरे तो एक कमालीचा चपळ विकेटकीपर आहे, स्पिनरसमोर तर सर्वोत्कृष्टच, आणि सर्व आयसीसी चषक जिंकणारा भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि फिनिशर म्हणून ओळखला जातो म्हणून त्याच्या फलंदाजीला अंडरएस्टीमेट करत तेवढेच बघायचे का Happy

१०,७७३ धावा
५०.५७ सरासरी
८७.५६ स्ट्राईकरेट
१० शतके
७३ अर्धशतके
१८३ नाबाद सर्वोच्च

हा काय मजाक आहे का?

बर चेस करताना आपण जिंकलेल्या तब्बल ११६ सामन्यात ७५ इनिंगमध्ये
२८७६ धावा
१०२.७१ च्या सरासरीने .....


अश्या प्लेअरला फक्त एक वर्ल्डक्लास कीपर असल्याने फलंदाज म्हणून ईतके हलके लेखायचे Happy

Submitted by असामी on 1 April, 2021 - 18:22 >> एक मिनिट.
मी कुठेही धोनीची राहुलशी तुलना केलेली नाही. राहुलचे ऊदाहरण फक्त एकदीवसीय टीमच्या अनुषंगाने दिले होते. (तसे नमूद करण्याचे मी विसरलो हे मान्य) सध्या सगळीकडे चालू असलेल्या चर्चेनुसार राहुल शॉर्टर फॉर्मॅट मध्ये चार पाच नंबर वर येण्यापेक्षा ओपनिंगला आला तर जास्त ईफेक्टिव आहे हे त्याच्या स्टॅट्सवरून आपल्याला कळते.. (त्याला कारण असे की त्याने त्या पोझिशनवर खेळून दाखवले आहे)... तसे टेस्ट क्रिकेटमध्ये धोनी वरच्या नंबरवर आला असता तर त्याने खोर्‍याने रन्स बनवले असते हे 'द तेंडुलकर' म्हणाला म्हणून सिद्द् होत नाही. त्याला क्रिकेटमधले किती कळते वगैरे मुद्दा अस्थानी आहे.
ईफ्स अँड बट्स स्टेटमेंट्सना क्रिकेटमध्ये काहीही अर्थ नसतो. जो खेळाडू ऊपखंडाबाहेर एकही शतक बनवू शकत नाही.. अपवादाने का असेना ऊपखंडाबाहेर (आणि ऊपखंडात सुद्धा पाटा विकेट्सवरची दोन मोठी शतके सोडून) एकही सामना भारताच्या बाजुने फिरवू शकत नाही ते ही कॅप्टन असतांना...रन्स राहू दे पीच वर ऊभे राहून मॅच वाचवण्याचे कसबही ज्याच्या खेळात दिसले नाही... जो कॅप्टन चालू सिरीज अर्ध्यातून सोडून निघून येतो.. ह्या सगळ्या गोष्टी तो एक बीलो अ‍ॅवरेज टेस्ट बॅट्समन/कॅप्टन होता हेच सांगतात. तेंडुलकर पीआर साठी काहीही बोलला तरी त्याला डोळे बंद करून भजन ऐकल्यासारखे माना डोलावणे निदान मला तरी शक्य नाही.

मी फक्त टेस्ट संबंधी बोललो होतो Happy

Venue Inns NO 100s 50s 0s HS Runs Avg S/R Ca St
Home 61 9 5 15 3 224 2380 45.77 59.56 80 22
Away 83 7 1 18 7 148 2496 32.84 58.69 136 12
Overall 144 16 6 33 10 224 4876 38.09 59.11 256 38

धोनीचे कसोटीमधले आकडे वर आहेत , आता हे फलंदाजाचे आहेत की नाही ते प्रत्येकावर Happy

खाली गिलीचे आकडे आहेत , ते फक्त टेस्ट्मधे दोघे सहसा एका जागी खेळायचे म्हणून !

Venue Inns NO 100s 50s 0s HS Runs Avg S/R Ca St
Home 75 11 7 17 9 149* 2936 45.88 81.42 158 14
Away 62 9 10 9 5 204* 2634 49.70 82.57 128 11
Overall 137 20 17 26 14 204* 5570 47.61 81.96 379 37

गिली बॅट्समन-कीपर म्हणून संघात होता म्हणून त्याला चांगली बॅटिंग करणे भाग होते.
धोनी कॅप्टन-कीपर म्हणून संघात होता म्हणून त्याला चांगली बॅटिंग करण्याचे काही कंपल्शन नसावे. Proud

धोनीला जर सतत वरच्या नंबर वर बॅटिंग करायला पाठवले असते (कोण पाठवणार होते? कॅप्टन तर तोच होता, असा प्रश्न विचारू नका) तर आज आपण त्याच्या रेकॉर्डची गिली ऐवजी संगकाराच्या रेकॉर्डशी तुलना करत असतो. Wink

Pages