खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मृणाली , लावण्या ..
ताटं मस्तच आहेत.
लावण्या, लाडू तर भारी दिसतायेतं..!!

लावण्या, ऋचा, मृणाली सगळेच पदार्थ मस्त.
लावण्या ते लाडू तर फोटो मधूनच खावेसे वाटत आहेत.
ह्या धाग्यावर आलं कि इतकी भूक चाळवते कि स्वयंपाक घरात एक फेरी होतेच. Lol Lol Lol

मृणाली रोजचे जेवण तरी येते ना Happy इकडे तीही बोंब आहे. एके दिवशी केलेल्या भाजीला दुसर्‍या वेळी तीच चव येइलच याची शाश्वती नाही Wink

सामो !
खूप हसले !! सेम पिंच ! माझीही हीच अवस्था आहे. कोणाला जेवायला बोलावले आणि काही काळाने जर कोणी त्या मेनूतल्या कुठल्या तरी पदार्थाची रेसिपी विचारली तर मला धडकी भरते कारण त्या वेळी काय केलं होतं ते अजिबात आठवत नाही. नित्य नवीन रेसिपी ! आजची चव उद्या नाही (च ) Happy
इथल्या सगळ्या उत्साही सुगरणींचे खूप कौतुक वाटते !

Pages