रवा कप केक

Submitted by दिप्ती_३० on 30 March, 2021 - 09:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दही - १/२ कप
साखर - १/२ कप (गोड जास्त हवं असल्यास २ चमचे जास्त घालू शकता)
बारीक रवा - १ कप
दूध - ३/४ कप
वॅनिला इसेन्स - १/२ टी स्पून
बेकिंग पावडर - १ टी स्पून
बेकिंग सोडा - १/२ टी स्पून
लिंबाचा रस - २ टेबल स्पून
तेल - १/४ कप

क्रमवार पाककृती: 

कृती :
प्रथम मिक्सर च्या मोठ्या भांड्यात दही, साखर, बारीक रवा आणि दूध घेऊन ते ३०-४० सेकंद फिरवून घ्यावं. १०-१५ मिनिट तसेच ठेवावे. तोपर्यंत कढईच्या तळाला मीठ पसरवून कढईवर झाकण ठेवून ती प्री हीट करावी. ज्या मोल्ड मध्ये कप केक बनवायचे आहेत त्याला तेल किंवा तूप आतून चोळून घ्यावं. (मी मिसळीच्या डब्यातल्या वाट्या वापरल्या होत्या. )
आता मिक्सरच्या भांड्यातल्या रव्यात दही साखर आणि दूध छान मुरल असेल. त्यात वॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालावा. त्या बेकिंग सोड्यावर लिंबाचा रस टाकावा . छान फेस येतो एनोसारखा. तेल घालावे. आता मिक्सर चालू करून हे मिश्रण १०-२० सेकंद फिरवून घावे. (फक्त सगळं साहित्य एकजीव होण्यासाठी फिरवावे, जास्त फिरवू नये.) मिश्रण मोल्ड मध्ये ओतावे. मोल्ड कढई मध्ये ठेवून वर झाकण ठेवावे. झाकण काचेचे असल्यास उत्तम. २०-२५ मिनिटात केक तयार होतो. (मोल्ड्स मोठे असतील आणि मिश्रण जास्त असेल तर जास्त वेळ लागू शकतो.) त्याआधी झाकण काढू नये. मोल्डच्या मध्यभागी टूथपिक घालून पाहावे. टूथपिक स्वच्छ बाहेर आली म्हणजे केक आतपर्यंत शिजलाय. थंड झाल्यावर मोल्डमधून काढावा.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हेच प्रमाण वापरून मी वॅनिला मँगो टूटी फ्रुटी केक बनवला.
WhatsApp Image 2021-03-30 at 1.45.28 PM.jpegWhatsApp Image 2021-03-30 at 1.45.48 PM.jpeg

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Deepti moulds direct thewayche ka kadhait? Ki kahi ajun container wapraycha?

अरे वा छानच झाले आहेत. कप केक मोल्ड घेउन मग करून बघेन. परवाच असा रवा केक खाण्याची इच्छा झाली होती. आणि रेसेपी आली.

छान झालेत कप केक्स.

असे सोलर कुकर मध्ये पण करता येतात असे ऐकले आहे. सध्या ऊन मस्त पडतय. ट्राय करायला पाहिजे.

मस्तच झाले आहेत
अयंगार बेकरीत घी रवा केक खूप महाग मिळतो.
एकदा यावर नीट सराव करुन घरी चांगला बनला पाहिजे.

छान दिसत़ो !
कन्वेक्शन अवन मध्ये करायचा झाल्यास काय सेटिंग ठेवावे?

कालच कलिंगडाच्या पांढऱ्या गरांची टूटी फ्रुटी बनविली आहे. आता हा केक बनवून तिला न्याय मिळेल असे वाटते. Wink
रेसिपीसाठी धन्यवाद.

अमा, नताशा, अनू, रश्मी, भरत, वर्णिता, मेघा, फिल्मी धन्यवाद
Deepti moulds direct thewayche ka kadhait? Ki kahi ajun container wapraycha?>> कढईच्या तळाला मीठ पसरवून त्यावर एक ताट ठेवावे आणि त्यावर मोल्डस ठेवावेत.
छान आहे रेसिपी, कुकर मध्ये बेक केला तर चालेल का?> हो चालेल.
असे सोलर कुकर मध्ये पण करता येतात असे ऐकले आहे. सध्या ऊन मस्त पडतय. ट्राय करायला पाहिजे.>> try केले कि पोस्ट करा.
कन्वेक्शन अवन मध्ये करायचा झाल्यास काय सेटिंग ठेवावे?>> १८० डिग्री वर १५-२० मिनिट्स
कालच कलिंगडाच्या पांढऱ्या गरांची टूटी फ्रुटी बनविली आहे. आता हा केक बनवून तिला न्याय मिळेल असे वाटते. Wink>> wow... टूटी फ्रुटीची रेसिपी पोस्ट करा.