खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Mru मस्त बेत !
वडे , वडे नारळाची चटणी , पुलाव, दहीभात, पोळी , कोशिंबीर, घट्ट वरण फोडणी घालून आणि वांग्याची भाजी
Screenshot_20210316-182009_Gallery.jpgScreenshot_20210317-180518_Gallery_0.jpgScreenshot_20210317-184642_Gallery.jpg

वडे , वडे नारळाची चटणी , पुलाव, दहीभात, पोळी , कोशिंबीर, घट्ट वरण फोडणी घालून आणि वांग्याची भाजी>>>>>>>>> सगळंच मस्त !!

वाचिका मला फोटो दिसतच नाहीये Wink पाण्याने गट्टू झालेली पुरी आणि शेव, कांदा, खजूराची चटणी मला दिसलेच नाहीत.

अंडाकरी मस्त!
पापु पाहून खूप त्रास होतो मला. आता खाल्ल्याशिवाय बरे वाटणार नाही.
बटाटावडे....
DD7221D7-EAE5-4AE5-A0B1-2086DE0B66BF.jpeg

पापु बघून मलाही खूप त्रास झाला मग तो कमी करायला शेवपुरी खाल्ली विकतची, बनवायचे कष्ट कोण घेणार म्हणून, तर आता बटाटेवडे ... छळ आहे नुसता
आता याची फर्माईश केली तर मम्मी माबो बंद करेल माझे

मी पण पाणीपुरी चाहती..आठवड्यात एकदा तरी नक्कीच खावी लागते..मी विसरले तरी मुलं देतात आठवण करून Happy

पाणीपुरी अॅडिक्टीव्ह असते.>>>>+ १२३४५६७८९
मी पण पाणीपुरी चाहती..आठवड्यात एकदा तरी नक्कीच खावी लागते..मी विसरले तरी मुलं देतात आठवण करून Happy >>> Lol

माझ्या प्रेग्नन्सीत सातवा महिना लागला आणि पाणी कमी झालं होतं. इतक्या लवकर व्हायला नको खरं तर... सगळे टेन्शन मध्ये. मीच जरा मूड बदलायला म्हटलं, की भरपूर पाणीपुरी द्या मला म्हणजे मी आणि बाळ खूष होऊन जाऊ!!

अतिकाळजीपोटी मला आधीपासूनच पाणीपुरी कमी खाऊ घातली होती. :भरतां करून रडणारी स्मायली:

शुक्रवारी परीचा म्हणजे माझ्या लेकीचा बड्डे होता. त्यानिमित्ताने तिच्या आईने घरीच फ्रोझन थीमचा केक आणि पोरांना वाटायला कप केक्स बनवले होते Happy

1616274897955.jpg

.

1616274944420.jpg

.

1616275009910.jpg

.

1616275051611.jpg

Pages