पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, रोस्टेड मखाणे आवडतात. पण विकतचे. पण ही खीरीची रेसेपी बघितली होती ना. Lol
खिरीत घालायच्या आधी भाजले नव्हते.
सगळयांचे आभार. आता तुपावर परतुन मी मि जिपु

कमळ बीची लाही....

तुपावर परतून खूप छान लागतात. खाताना किती खातोय हे कळत नाही पण नंतर तोंड कोरडे पडते असा माझा अनुभव आहे. Lol उत्तरेकडे उपासाला चालतात. माझा एक कलीग उपासाच्या डब्ब्यात नेहमी तुपावर खरपूस परतलेले मखाणे आणायचा. त्याच्यामुळे मखाणे काय असतात हे कळले. महाग मिळतात.

मखाणे अवन मध्ये भाजून अतिशय छान लागतात. १८० डिग्रीवर ८-१० मिनिटं ठेवा, मधून एकदा हलवा. बाहेर काढल्यावर १० मिनिटांनी छान कुरकुरीत होतात. मग त्याला आवडेल तो मसाला लावायचा. लेक लहान असताना मी कॅरेमेल पॉपकॉर्न सारखे कॅरेमेल मखाणे बनवायची. गेले ते दिवस…

मखाणे मी आधी कोरडे भाजुन घेते कुरकुरीत होई पर्यंत . मग तेल तापवुन त्यात हळ्द , चाट मसाला आणि काळी मिरी पूड,मीठ घालुन त्यात मखाणे मिक्स करते.

मखाणे माझ्या मातोश्रीना आवडतात, मला फार नाही आवडत. बहिणीने लाडूत घातलेले भाजून तेव्हा टेस्टी लागले होते.

खोमट वास किंवा बुरसटलेल् दिसत असतील तर टाकून द्या. तुम्ही दमट हवामान असणार् ा ठिकांणी राहात असाल तर लवकर वस्तू खराब होतात.

माबोवर कुठे तरी वाचलं होतं. पण धागा सापडत नाही..
तांदूळ् आणि अजून कुठ्ले तरी धान्य आणि धणे, ईतर जिन्नस टाकून बवलेला डोसा.. त्याला काहीतरी साऊथ इंडियन नावही आहे..!

टर्निप जरा उग्र असतात. मीएकदा च आणले होते
त्यांना किसुन , भरपूर कांदा घालुन , चणा डाळ घालुन आणि भरपूर खोबर घालुन भाजी बनवली. मला चांगली वाटली पण नावर्याला नाही आवडली

मलापण आज टर्निप उर्फ शलगम मिळाले
20 रु ला 5 आले

भाजी किंवा भरीत करता येईल

ह्याचे कापे होतात का ?

पूर्ण शलगमची एखादी रेसिपी होईल का

मी शलगम सुक्या मासळीच्या किंवा कोलंबीच्या कालवणात घालते. फ्रेंच फ्राईज सारखे ओवनमधे तेलाचा हात लावून भाजलेले पण छान होतात. आवडत असेल तर मीठासोबत थोडी थाईम भुरभुरवायची.

Pages