पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढच्या चर्चांमध्ये इडलीच्या अजुन काही रेसिपी वाचल्या. धन्यवाद. तुम्ही सगळ्या कसल्या सुगरणी आहात.
साधना ताई आणि सियोना, सँडविच इडली आणि भाज्या घालुन रंगीत इडलीची सजेशन्स एकदम आवडलीच. नक्की करण्यात येतील.

फोडणीत अर्धा कप पाणी घालून मग ढोकळ्यावर ओतली तर ढोकळा आणखीन हलका होतो.
तलोदचे ढोकळा मिक्स पण चांगले आहे.

गिट्स चं पांढरं आहे ना ढोकळा मिक्स?त्याचे नीट होतात ढोकळे.>>> नाही. पिवळे होते.
..मधे हे मिक्स मिळाले तर ट्राय कर. >>> हो..
मैत्रेयी, मी-अनु धन्यवाद. पाककृतीसाठी धन्यवाद अमुपरी.

आक्खे उडीद म्हणजे काळ्या सालासकटचे आक्खे उडीद
बिनासालाचे आक्खे उडीद म्हणजे गोटा उडीद (हेब्बार्स किचन मधे ती नेहेमी फोडणीत हे वापरते)

पण मग उ. डाळ आणि गोटा उडीद यामधे दिसण्यातला फरक सोडता काय वेगळेपणा आहे?
तसेही ते भिजवून बारिक वाटायचे असते ना.... चवीत काही फरक पडतो का? मी कधी गोटा उडीद वापरले नाही म्हणून प्रश्न पडला आहे.

मी पुण्यात असताना उडिद डाळच वापरायचे इडली/डोश्यासाठी... पण इकडे आल्यावर पाहिले सगळे आख्खे उडिद वापरतात.. मग मी पण सुरू केले... आईकडे अजूनही उडिद डाळ वापरतात..चवीत आणि टेक्श्चरमधे फरक पडतो...

मी अनु , तुम्ही डोसा साठी जो रवा लिहिलाय , तो नेहमीचा बारीक रवा घ्यायचा ना ? तोही भिजवून घ्यायचा की वाटलेल्या डाळीत कोरडाच मिक्स करायचा ?

ईडली चर्चा मस्तच .
इकडे आल्यावर पाहिले सगळे आख्खे उडिद वापरतात.. मग मी पण सुरू केले... आईकडे अजूनही उडिद डाळ वापरतात..चवीत आणि टेक्श्चरमधे फरक पडतो... >>> माहीतीसाठी धन्यवाद . ईडली रवा मागवला आहे आता गोटा उडीद शोधायच्या मोहिमेवर निघावं हे उत्तम.
पुढच्यावेळी तुम्हा लोकांच्या टीपा वापरून ईडली केली की फोटु टाकेन .
मृ , तु दिलेल्या रेसीपीचा सांबार मसाला अजून शिल्लक आहे . दोन वेळा सांबार बनवून झालं , अधून्मधून मसालेदार भाज्या केल्या की तो वापरते . Happy

मी नॉर्मल आपण शिरा बनवतो तो घेते रवा. १:१
फक्त खूप आधी भिजवायचा नाही इतकेच. करायच्या थोडेच आधी. मस्त कुरकुरीत पेपर डोसा कोंपोनंट येतो.
इडली रवा डोसा पीठ मध्ये नाही वापरला डोसा मध्ये ईडली मध्ये पण कधीतरीच.
आम्ही १.५:३.५ इडीदः:(उकडा आणि साधा तांदूळ अर्धा अर्धा) आणि ५ मेथी दाणे घेतो. चांगल्या होतात ईडल्या.

साबा रेसिपी आहे.
त्या याला वन डे मॅच डोसा म्हणायच्या. म्हणजे सकाळी उडीद भिजवून दुपारी वाटून रात्री १:१ रवा मिसळून डोसा तयार. मी माहेरी होते तेव्हा इडली आणि डोसा चे एकच पीठ होते. पण डोसे हॉटेल सारखे बनायचे नाहीत. (हे वाक्य टेलिशॉपिंग च्या आवाजात वाचा). मग मी उडीद मध्ये तांदूळ घालता फक्त १:१ रवा घालायला चालू केले आणि मेरी जिंदगी बदल गयी Happy
टिपा काहीच नाही. जेव्हा शक्य तेव्हा उडीद भिजवायचे, नंतर कधीतरी लक्षात आले की वाटायचे आणि १-२ तास ठेवायचे, नंतर वेळ झाली की रवा शोधायला घ्यायचा. आणि मग रवा मिक्स करुन खास डोसा तवा म्हणून बाजूला ठेवलेल्या चांगल्या तव्यावर डॉसे घालायचे. आमच्याकडे या तव्यावर दुसरे काही केल्यास मारामारी व हिंसाचार होतो. (मीच करते)

मृणालिने जून्या प्रतीसादामध्ये इडली करिता अख्खे उडीद वापरत असल्याचे सांगितले होते , हा प्रयोग मी केला आणि मला प्रश्र्न पडला की मृणालीचे उडीद भिजतात कसे, ती सालं कशी काढते . कारण माझे उडीद ना निट भिजले न त्याची सालं निघाली. त्याचं उत्तर मला आता मिळालं. स्माईली :))

मृणाली मी तो प्रयोग महत्प्रयासाने का होईना पण यशस्वीपणे पुर्ण केला. इडल्या मात्र डोमड्या झालेल्या. स्माईली

https://www.maayboli.com/node/53914
मी ह्या रेसिपीने अनेकदा इडल्या केल्या आहेत, उत्तम होतात. मऊ, शुभ्र आणि हलक्या! निवडक दहामध्ये ठेवून दिली आहे.वरच्या चर्चेमुळे शेअर करावे वाटले.

पारंपरिक रवा डोसा रेसिपी आहे का?
इन्स्टंट वाली माहीत आहे. पण समहाऊ भारतात साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये जसा रवा डोसा मिळतो तसा तो होत नाही. खोबऱ्याचे काप वगैरे घातलेला रवाडोसा पुण्यात बहुधा वाडेश्वर मध्ये मिळतो.

मलाही रवा डोसाची रेसिपी हवी आहे. म्हण्जे युट्यूब वर पाहून अनेक ट्राय केल्यात पण रवा डोसा मऊ च होतो. रवा डोसा कडक हवा ..पेपर डोशा सारखा.. युट्यूब वर दिसतो, खुप सोपी वाटते कृती ..पण प्रत्यक्षात मात्र तसा होत नाही..
काही टिप्स असतील तरी सांगा..!

Pages