पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजगिऱ्याच्या अगोड पाकृ हव्या आहेत. युट्युब वरील बहुतेक पाकृ उपवासाच्या आहेत - त्यात बटाटा घालून, साखर घालून वगैरे. असे नसलेल्या पाकृ युट्युबवर फारच थोड्या आहेत.
ग्लुटन नसलेला, प्रथिने, खनिजे थोडे जास्त असलेला पर्याय म्हणुन त्याकडे बघत आहे. 3-४ वेगवेगळे पदार्थ कळले तर आलटून पालटून करता येतील कधी नाश्त्याला, कधी रात्री जेवणास.

राजगिरा पीठाची उकडपेंडी. (तुपावर मन्द भाजून, तिखट मीठ, मिरच्या घालून, थोडे थोडे पाणी घालणे ! )
राजगिरा लाह्या जिरे मोहरी हळद घालून चिवड्या सारख्या फोडणीला देणे.
राजगिरा पिठ, शिंगाडा पीठ व भगर (वरई) पीठ एकत्र करुन धिरडी.
राजगिरा पीठ उकडलेल्या बटाट्यात घालून तिखट मिठाच्या पुर्‍या

राजगिरा, फॉक्सटेल मिलेट आणि नाचणी समप्रमाणात मिसळून दळून साध्या भाकरी केल्या आहेत एक दोन वेळा. चांगल्या लागतात. फक्त ताज्या खाव्या लागतात. आम्ही दुपारी केलेल्या रात्री ऑफिस हून आल्यावर खात असल्याने त्या कोरड्या व्ह्यायच्या खूप. मग कंटाळून परत ज्वारी भाकरी कडे वळलो.

त्या साबुदाणा + बटाटा पापडात लाल तिखट किंवा हिरव्या मीरची ऐवजी काळी मिरी कूटून ती भरड वापरायची जास्त टेस्टी पापड होतात.
द्राक्षांचं सार नवीन कळालं. करून पाहायला हवं.

धन्यवाद आंबट गोड, एक एक करून बघेन.
धन्यवाद मी_अनु. भाकऱ्या जमत नाहीत, त्या ऐवजी थालीपीठ करून पाहीन.

राजगिरा पीठ व शिंगाडा पिठ दोन्ही मिसळून थालीपीठ करता येतात. दाण्याचा कूट, दही , आलं , हिरवी मिरची, जिरे, उकडलेला बटाटा व थोडे दही घालून तिंबून , थालिपीठं लावायचे. हे उपासाचेच आहेत पण गोड नाहीत. मी लिहिली आहे पाककृती. आम्ही हे नाश्त्याला खातो.

माझी आई हे राजगिरे ताकात घालते, थोडं दाण्याचं कूट आणि मीठ आणि मग वरून तूप, जिरे आणि मिरचीची फोडणी देते.

मला आवडतं

फक्त राजगिरा पिठाची चपाती पण करु शकता मिठ+ लाल तिखट घालुन थोडं कमी पाणी घालुन पिठ मळायचं, कमी तुप/तेल लावलं तरी चालतं. राजगिरा पिठाचे फुलके करायचा प्रयोग पण केलेला आम्ही एकदा.

धन्यवाद Shraddha. या पोळ्या कणेकेच्या पोळ्या प्रमाणेच लाटून करता येतात की काही वेगळे करावे लागते?

धिरडी पण चांगली होतील नॉनस्टिक वर.
आम्ही फुल डे उपासाला करतो संध्याकाळी.
तो 'उपास' हा विनोदी प्रकार असतो हे सोडा. पण धिरडी होतात व्यवस्थित. मिरची जिरे वाटून घालून.

नाही. दोन्ही एकाच फॅमिलीची वनस्पती म्हणतात तरी चव, रूप, शिजवण्याची पद्धत सगळेच वेगळे आहे.

मी बनवला काल quinoa मसाला डोसा.. अपेक्षेपेक्षा चांगला झाला होता.. पहिल्यांदाच आणि घाबरत घाबरत केला..

थालीपीठ बटाटा न घालता होईल का अस्मिता?>>>
हो मानवदादा होईल . एकदा केलं होतं ... कमी खुसखुशीत झाले होते पण चांगले झाले होते.

खूप सारी केळी एकदम पिकलेली असली तर काय करता येईल? घरी केळी कोणी फार खात नाही. बनाना ब्रेड नको आहे.
काही टिकाऊ पदार्थ करता येतात का?

सनव, तळकट पदार्थ चालतील का? मंगलोरी बन्स म्हणजे केळ्याच्या पुर्‍या आहेत नेटवर. २- ३ दिवस तरी टिकतील खाण्यासाठी.

https://www.maayboli.com/node/19456

https://www.maayboli.com/node/47600

https://www.maayboli.com/node/47678

सनव, तुपावर केळी, ओलं खोबरं परतून घ्यायचं मग त्यात गोडीनुसार साखर घालायची,अजून परतायचं. हवं असेल तर थोडी वेलचीपूड किंवा दाणे भरड कुटून घालायचे. Quick fix गोड तोंडीलावणं तयार होतं. पोळीशी छान लागतं. फ्रिज मध्ये दोन चार दिवस टिकेल.

आजकाल गोड फारसं कोणी खात नाही तरी केळी घालुन शिरा, सुधारस करता येईल. दिनेशजींची केळ्याच्या लाडुची रेसेपी होती. केळ्याची कोशिंबीर ( दही + मीठ + साखर ) अगदीच हिट म्हणजे केळ्याचे आईस्क्रीम. हे बाकी आईस्क्रीमच्या तोंडात मारेल इतके लाजवाब होते. मुग्धाच्या नॅचरल रेसेपीने करता येईल. नाहीतर प्रत्येकाला एकेक देऊन संपवायचे , हाकानाका.

केळीचे गाकर करा

कणिक आणि रवा समप्रमाणात घ्या , त्यात केली कुस्करून घाला

मीठ , थोड्या हिरव्या मिरच्या कुटून घाला , थोडी जिरेपूड आणि बडीशेप कुटून घाला

लागेल तसे पाणी घालून मळून , 1 तास ठेवा

त्याच्या जाड पोळ्या करा
तिखट गोड मस्त लागतात , खरपूस भाजल्या तर 2,3 दिवस टिकतात , सकाळी चहा बरोबरपण मस्त लागतात

डीप फ्राय करून पुर्यापण तळू शकता, पण पसारा फार होईल

धन्यवाद सर्वांचे. या गोष्टी करून बघेन. बनाना केक/ब्रेड शक्यतो नको आहे पण बाकीचे पर्याय ट्राय करेन.

खरं तर केळ्याचा एक घड या आठवड्यात व दुसरा घड पुढच्या आठवड्यात पिकेल या हिशोबाने आणले होते. पण दुसराही घड आधीच पिकला म्हणून प्रॉब्लेम झाला.

Pages