होल व्हीट बनाना ब्रेड

Submitted by मेधा on 13 February, 2014 - 09:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दोन कप एकदम पिकलेली केळी, मॅश करुन.
पाऊण ते एक कप साखर
१/२ कप तेल - मी रोजच्या स्वैपाकातले कनोला किंवा ऑलिव्ह ऑइल वापरते.
२ मोठी अंडी
३ टेस्पून दूध ( कधी डेअरी फ्री हवा असेल तर पाणी घालते मी )
१ कप होल व्हीट पीठ
१ कप ऑल पर्पज पीठ
१ टेस्पून व्हनिला

१ टी स्पून बेकिंग सोडा
१/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ

१/२ कप अक्रोड / बदाम / पिकॅन ऐच्छिक

वरुन घालायला
२ टेस्पून साखर
१ टीस्पून दालचिनी पूड

क्रमवार पाककृती: 

केळी, साखर, दूध्, अंडी, व्हनिला एकत्र फेटून घ्या
त्यात दोन्ही प्रकारचे पीठ,मीठ, बेकिंग पावडर व सोडा मिसळून घ्या.
ड्राय फ्रूट्सचे तुकडे मिसळा
९ बाय ५ इंचाच्या लोफ पॅनला आतून तेल / बटर लावून त्यावर पीठ भुरभुरवून घ्या.
मिश्रण या पॅनमधे घाला.
वापरणार असल्यास साखर- दालचिनीपूड एकत्र करुन वरुन शिंपडा. मी हे वगळते बरेचदा.
३५० डि वर ६० मिनिटे बेक करा. ( ओव्हनप्रमाणे हा वेळ कमी जास्त लागू शकतो.

१० मिनिटे पॅनमधेच राहू द्या. मग सर्व बाजूंनी सुरी फिरवून ब्रेड एका कूलिंग रॅकवर काढून थंड होऊ द्या.
१६ स्लाइसेस

वाढणी/प्रमाण: 
खाल त्यावर अवलंबून
अधिक टिपा: 

केळी एकदम पिकलेली हवीत. बार्क्या सांगतो ' माय मॉम यूझेस ऑलमोस्ट रॉटन बनानाज'
मूळ रेसिपित एक कप ( ७ आंउस) साखर आहे. मी पाऊण कप वापरते.
अमेरिकेतली साखर साधारण बारीक रव्यासारखी असते. वरती शिंपडलेली मस्त क्रंची होते. भारतातल्या साखरेचा बहुतेक पाक होईल वरती शिंपडली तर.
ज्ये नांना दालचिनीचा स्वाद फारसा आवडत नाही.

माहितीचा स्रोत: 
किंग आर्थर ब्रेड फ्लावरच्या पाकीटावरुन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा आली रेसिपी. धन्यवाद Happy दोन कपाच्या प्रमाणात बराच ब्रेड होतो. एक कपाचा करून बघेन Happy

रच्याकने, भारतातली साखर पाक होइल असं वाटतं? इथे रॉ शुगर टॉपिंगमध्ये वापरतात की. मस्त क्रंची होते ती पण.

आजच केला हा ब्रेड. छान झाला आहे. मी २ कप होल व्हीट पीठ वापरले तरी मस्त स्पाँजी झालाय. रेसिपीसाठी धन्यवाद Happy

माझी हीच रेसिपी. अप्रतिम होतो.
रॉटन बनाना बद्दल अगदी अगदी. फक्त आमच्या कडे बारक्या हात पण लावत नाही त्यामुळे Sad

bb.jpg

कधी तरीच पूर्ण मैद्याचा करते. चांगलाच लागतो पण मन खाते. Happy

आत्ताच केला. अतिशय म हा न लागतोय. रेसिपीकरता धन्यवाद, मेधा.

पुढच्या वेळेला यात केळ्याच्या ऐवजी सफरचंद घालणार म्हणजे अ‍ॅपल पाय सारखी चव येईल.

350 डिग्री Fahrenheit म्हणजे १७६ डिग्री सेल्सियस होईल. मग या तापमानावर किती वेळ बेक करावा लागेल?
आणि लोफ पॅन ठेवताना सोबत पाण्याचे भांडे बाजूला ठेवावे ओवनमध्ये असे काही आहे का? कुठेतरी ऐकले आहे असे.

चवीचं ठाऊक नाही, पण हे पौष्टिक असेल का? कारण काही काळापूर्वी मला Electronic mail ने एक लेख forward करण्यात आला होता. त्यात असं लिहीलं होतं की फळे रिकाम्या पोटी खावीत. जेवणानंतर फळे खाऊ नयेत. विशेषतः ब्रेड खाल्यावर केळी खाऊ नयेत असाही उल्लेख त्या लेखात होता तसेच शिजविलेली फळे खाऊ नयेत हे देखील त्यात लिहीलेले होते. अर्थातच त्या लेखात मांडलेल्या मुद्यांच्या समर्थनार्थ माझ्यापाशी कुठलाही पुरावा नाहीये परंतू त्या लेखातील काही भाग मी इथे जसाच्या तसा उद्धृत करीत आहे. तज्ज्ञ मंडळी आपली मते व्यक्त करतीलच.

Right way to eat fruits

We all think eating fruits means just buying fruits,
cutting it and just popping it into our mouths. It's not as easy as you think
It's important to know how and when to eat...

What is the correct way of eating fruits?

IT MEANS NOT EATING FRUITS AFTER YOUR MEALS! -
FRUITS SHOULD BE EATEN ON AN EMPTY STOMACH.

If you eat fruit on an empty stomach,
it will play a major role to detoxify your system,
supplying you with a great deal of energy for weight loss
and other life activities.

FRUIT IS THE MOST IMPORTANT FOOD -
Let's say you eat two slices of bread and then a slice of fruit..
The slice of fruit is ready to go straight through the stomach
into the intestines, but it is prevented from doing so.

In the meantime the whole meal rots and ferments and turns to acid.
The minute the fruit comes into contact with the food in the stomach
and digestive juices, the entire mass of food begins to spoil.

So please eat your fruits on an empty stomach or before your meals
You have heard people complaining - every time I eat water-melon I burp,
When I eat durian (fruit from Asia with a foul smell yet delicious flavor)
My stomach bloats up, when I eat a banana I feel like running
to the toilet etc. - actually all this will not arise
if you eat the fruit on an empty stomach.. The fruit mixes
with the putrefying other food and produces gas
and hence you will bloat!

Graying hair, balding, nervous outburst, and dark circles
under the eyes all these will not happen if you take fruits
On an empty stomach.

There is no such thing as some fruits, like orange and lemon are acidic,
because all fruits become alkaline in our body,
According to Dr. Herbert Shelton who did research on this matter
If you have mastered the correct way of eating fruits,
You have the Secret of beauty, longevity, health, energy,
happiness and normal weight.

When you need to drink fruit juice - drink only fresh fruit juice,
NOT from the cans..
Don't even drink juice that has been heated up.
Don't eat cooked fruits
because you don't get the nutrients at all. You only get to taste.
Cooking destroys all the vitamins.

मस्त दिसतेय रेसीपी! एकदा केकच्या ऐवजी करून पहायला हवी (अर्थातच, घरच्यांनी)

चेतनराव, तुम्ही म्हणातायत ते बरोबर असावे. नाहीतरी आपली जुनी लोकं “फळं उपाशी पोटी कच्ची खावीत” असं म्हणायची. पण जेवणानंतर “मुखशुद्धी” म्हणून दुसरया कुठल्यातरी प्रांतातल्या चालीरीतीचे फॅशनीय अनुकरण झालेले असावे. त्यात पुढे शिकरण, मिक्स फ्रुट सॅलॅड अश्या पाककृती विकसीत झाल्या असाव्यात. आणि नविन पाकक्रिया या नावाखाली फळांत बरेच काही ऍड करणे सुरू झाले. पण आता फॅशन म्हटलं की कोण बघणार आहे “पौष्टिक अन्न, बाधक अन्न” असल्यागोष्टी ? आम्ही सुद्धा असलं बघत बसत नाही. अधून मधून योग येतात. फारशी काळजी न करता खातो. काही होत नाही.

अन काय हो, हा पाकक्रियावाला “चविष्ट” धागा आहे. यात “पौष्टिक/बाधक/पचनक्रिया” वैगरे असलं का मिक्स करताय ? रेसीपीचा निर्मळ आनंद घेऊ द्या की राव!

<< फारशी काळजी न करता खातो. काही होत नाही. >>

<< अधून मधून योग येतात. >>

काळजी न करता खाल्लं की मग असले योगही येऊ शकतात.

http://www.mediaandta.com/images/Dhouti_yog.jpg

तेव्हा काळजी घ्याच.

मस्त होतो हा केक. मी हा केक आणि खजुर लोफ असे दोन्ही आलटुन पालटुन करत असते.

मी खुप्दा कणिक वापरते पण त्यामुळॅ डेन्स होतो. मैद्याने खुप सुंदर होतो. अधुनमधुन मैदा खायला काहीच हरकत नसावी. Happy

मस्तच. परत करून पाहिन. मागच्या वेळी मी ट्राय केला पण मधे तो कच्चा राहिला होता. अगदी साफच कच्चा. काय चुकले? जास्त भरला का पॅन.

अव्हन पूर्ण ३५० डिग्रीज वर तापलेला असायला हवा. त्यानंतर ५५ ते ६० मिनिटे लागतात. पुढच्यावेळेस अव्ह्न टेम्प . ३७५ वर ठेवून साधारण ४० मिनिटांनी चेक करत रहा.