खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Jai. >>> Thank You !!!

Manav >>>> masalebhat mastach

Mazeman >>>>> Thai Pasta - Sundar distoy

सूरूवाती पासूनचे सर्वच पदार्थ यम्मी आहेत. झटपट किती तरी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत सर्वांनी. सर्वाचे अभिनंदन आणि धन्यवादही..

मस्त केक चिमू.
20210122_233343.jpg
मी ही एकदा नाचणी आणी खजुरा चा केक बनवला होता. 1 वर्षा च्या मुलाच्या बर्थडे ला. त्याला साखर द्यायची नव्हती म्हणून.

केक कसले मस्त दिसतायत.. रानभुली फारच छान झालाय. पिंक कलर क्युट !! मेथी गाजर.. interesting. करून बघते.
१ no केक चा शेप कसला परफेक्ट जमलाय.. आणि नाचणी गुळाचा रंग.. छानच दिसतात दोन्ही.
Amupari काल मी पण पावभाजी केलेली Happy
मासा अंडे looks so tempting.. yummmm!

Tacos चे फोटोज.. yummy !!
भोगीची ताटं छान दिसत आहेत सगळी..
फोकाशिया खूपच मस्त झालाय हं पार्वती.. कुकीज पण सही.. रेसिपी शेअर करता येईल का.. Happy

पावभाजी मस्तं दिसतीये. छानच झालीय अमुपुरी. असे फोटो पाहीले की की केली जाणारच Happy

चिमु - नाचणी आणि गुळाचा केक भारी. मला पण शिकव प्लीज.

अमुपुरी - नाचणी आणि खजूराचा केक तर एकच नंबर.

पिकु - मनापासून आभार. पण लहान बहीणीचा वाटा मोठा आहे यात.

चिमू केक मस्त.

मी ही एकदा नाचणी आणी खजुरा चा केक बनवला होता. >> अमुपरी, पाकृ लिहा ना वेगळा धागा काढुन.

मानव मी हेब्बर किचन ची रेसिपी follow केली होती. फक्त त्याच्या मध्ये 2 3 changes केले होते.
https://youtu.be/hHHoY_BasbE
जसे या मध्ये गव्हाचे पिठ वापरले आहे. मी नाचणि चे पिठ वापरले होते ते वापरताना अधि थोडे से तुपावर भाजले. म्हणजे थोडा चॉकलेटी चव येते. आणी 1 वाटी नाचणी पिठाला 5 चमचे रवा वापरला होता.

काल आमच्याकडे पण इडली सांबार होते.
मृणाली,जाडा तांदूळ आणि गोटा उडीद वापरून भन्नाट इडली बनली. आणि तू दिलेल्या रेसिपी ने सांबार . काल इतका गोंधळ होता की फोटो काढायचा राहिला.

छानच कि स्वस्ति Happy
तुम्ही एन्जॉय केलं ना इडली सांबर झालं तर मग फोटो पुढच्या वेळी..

Pages