खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20210119_132724.jpgशेपूची भाजी, टोमॅटो सार

शेपुची भाजी मस्त. माझी पण आवडती आहे.
Mrunali पुरणपोळी yumm दिसत आहे.
मनिम्याऊ मस्त डिश. चावल के फरे मस्त दिसत आहेत.

१५ दिवसांपूर्वी सोयाबीन + भुर्जी असं मिक्स बनवलं होतं. फस्त झालं. संपत आल्यावर फोटो घेतला. नंतर टाकते अपलोड होईना.
डिशला नाव काय द्यावे?

मृणाली
तोंपासू. लोणचं बघून इतक्या सकाळी पण... Lol

रानभुली Happy केक भारीए..

म्हाळसा चिकन पिक्कल रेसिपी आहे.. पण डिटेलमधे जाउबाईला विचारावे लागेल...तीच बनवते नेहमी, आम्ही आयती बरणी घेऊन येतो..बनवताना पाहिले आहे मी पण बनवले नाही कधी..तीला विचारून टाकेन इथे..

IMG-20210117-WA0015.jpg

शनिवारचे होमवर्क : मेथी गाजर केक . मी केलाय. बेक नाही पण काचेचे झाकण असलेल्या कढईत. नंतर उलटताना तज्ञ मंडळींची मदत घ्यावी लागली. रेसिपी हेब्बर्स किचन अ‍ॅप मधून.
मस्त झाला होता. माझा मलाच खूप आवडला. तज्ञांनाही. Happy
पुढच्या वेळेस उलटल्यावर चीज टाकायचा विचार आहे.

मेथी चा तिखट केक इथे मायबोली वर पण एक रेसीपी आहे. मला ही करुन बघायचा होता पण काही जमले नाही.
https://www.maayboli.com/node/32046
हेब्बर कीचन ची रेसिपी पण छान आणी सोपी वाटत आहे.

Pages