खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मीसळ, पोळी चा चिवडा मस्त.
मला फोडणी च्या पोळी पेक्षा फोडणी ची शिळी भाकरी आवडते भरपुर तुप घालुन.

सर्वांना धन्यवाद !
इथे नवीन पाककृती सोबत वेगळी वेगळी नावेही कळत आहे जसे बरबटी म्हणजे चवळी , कूटके म्हणजे पोळ्यांचा चिवडा ..

आमच्याकडे फोडणीची चपाती , फोडणीची भाकरी म्हणतात . मलाही चपातीपेक्षा फोडणीची भाकरी जास्त आवडते .
चपाती बारीक करून गूळ , सुके खोबरे घातले तर मलिदा ...

पोळ्यांचा चिवडा मस्त , खरंच मिसळ अगदी काटाकिर्रर !!!

लावण्या, मस्त फोटो!
यातलं Taco नक्की कोणतं? भात कशा सोबत खायचा?>>> टॅार्टीया(पोळी) वर भात, काळे बीन्स, चिकन, साल्सा आणि चीझ असे सगळे थोडे-थोडे घ्यायचे आणि खायचे. ते टॅको. तसेच भात आणि बीन्स वेगळेही खाता येते.
हा जुना फोटो.....
160BE7AA-137D-4EDD-8908-213AB35C0F5A.jpeg

ओक्के, असं आहे होय. छान, पण जरा कोरडा प्रकार नाही वाटत का?
खाऊनच पाहायला हवं या करता.

..कोरडा प्रकार नाही वाटत का? >>>salsa आणि black beans मुळे नाही कोरडे वाटत. शिवाय sour cream, guacamole वापरूनही कोरडेपणा कमी करता येतो.

IMG_20210113_140407_0.jpg रोडगे , वांग्याची भाजी ......

वा सर्व पाने मस्त.
रोडगे म्हणजे काय सुर्यगंगा? कशा पासुन बनवतात

अमुपरी, रोडगे कणिकेपासूनच बनवतात, फक्त कणिक थोडी रवाळ दळतात व गोवर्यांचे जगरं करुन त्यात भाजतात.हे खुपच कौशल्याचे काम आहे नाहीतर रोडगे जळतात.IMG_20210113_140548.jpgहा रोडगे भाजतानाचा फोटो

वाह !! सगळ्यांची भोगीची ताटे मस्त ..
tacos भारी .. मी रेडिमेड टाको शेल्स वापरते .. मस्त लागतात ते पण !
रोडगे ताट मस्त .. हे बाटी सारखेच दाल मध्ये घालून खायचे कि नुसतेच ?

भोगीचे जेवण

image_72192707 (6).JPG

भोगीची सर्वच ताटं मस्त! रोडगा पाहून मन भरलं. मी पुन्हा फोकाचिया केला आणि आरेंज चॉकलेट चिप्स कुकीज़ पण. यम यम!
IMG_8266 copy.jpgIMG_8267 copy.jpg

वा..taco, भोगीचं ताटं छान दिसत आहेत
फोकाशिया पण मस्तच झालाय
आणि मेथीचे कडू लाडू माझे फेवरेट Happy

आमच्या घरी हे नसते. पण सासुरवाडीला न चुकता असते. बायको दुपारी जाऊन माझा वाटा घेऊन आली.
यातल्या कैक भाज्या मी कधीच आयुष्यात सुट्ट्या खात नाही. म्हणून मी उजवीकडच्या वाटीत रस्सा जास्त भाजी कमी असे काढून घेतलेय. पण एकूणच हे प्रकरण बाजरीच्या भाकरीसोबत चवदार लागते. सत्यनारायणाच्या प्रसादाला जशी आपली स्पेशल चव असते तशी भोगीच्या भाजीलाही असते. दरवेळी मी हे आवडीने खातो आणि ईतका तगडा शाकाहार मी कसा केला म्हणून माझी बायको अवाक होते Happy

IMG_20210113_233644.jpg

Pages