खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रजासत्ताकदिनाचे राष्ट्रीय खाद्य - फाफडा ॲण्ड जलेबी
सोबत महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य - मिसळपाव.. यम यम Happy

1611672478173.jpg
.
1611672525862.jpg
.
1611672550142.jpg

Va

मृणाली दुधी पराठे माझेही असेच होतात.
दुधी खिसुन घेतेस ना?
माझी मोठी बहीण दुधीचे थालीपीठ, आमचे मराठवाडा स्पेशल धपाटे वगैरे पण करते.
दुधी आणि गाजर हेही कॉम्बिनेशन छान लागते.

हो दुधी किसून घेते मग मिरची पावडर,हळद,धने पावडर,जीरे,गरम मसाला,मीठ,कोथिंबीर, गव्हाचे पीठ..
गाजर पण छान लागेल का??टाकेन पुढच्या वेळी..

ऋन्मेष ने मिसळपावचं दुकान बिकान टाकलं कि काय ? शेजारी फाफडा, जिलेबी मारवाडी दिसतोय. Happy
तोंपासु आहे पण या सगळ्यापासून लांबच Lol

अमुपरी, रानभुली थँक्स Happy

तोंपासु आहे पण या सगळ्यापासून लांबच Lol>>>>>>
सेम हियर.. फोटो पण अशे पळवून बघते Lol

पण ती मिसळ भारीच टेम्पटिंग आहे.. मी न बघणारी तीन वेळा बघितली..रविवारी करणार होते.. पण संकष्टी उपवास आहे.. बरे झाले.. पुढच्या रविवारपर्यंत नवीन काहीतरी पदार्थ दिसेल..

हो ना कसा मस्त रंग आलाय मिसळीला ...
ते जिलेबी फाफडा घरी बनवले कि जेठालालच्या घरून आणले Wink
(जलेबी फाफडा खाकरा म्हटलं कि मला जेठालाल गडा आठवतो )

Pages