खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फाफडा, जिलेबी आणि पाव ऋन्मेषने घरी केले असे उत्तर दिले तरी माझा तरी विश्वास आहे त्याच्यावर. Happy

परवा पुलाव केला होता. संपताना बाऊल मधे भरून ठेवला. त्या वेळी फोटो काढायचं सुचलं. पण पुलाव इथे खाऊगल्लीत टाकावा का म्हणून राहीलं.

अच्छा असं होय श्रवु..मला वाटलं महाराष्ट्रात कि काय Lol

रानभुली खायच्या सगळ्या पदार्थांचे टाका फोटो Happy

२६ जानेवारीला फाफडा जिलेबी का आणि कधीपासून आणि कुठे कुठे खातात हा मलाही प्रश्नच आहे. नवीन धागा काढावा का? Happy
बाकी आमच्याकडे आणि माझ्या बायकोकडेही तिच्या लहानपणापासून हे आवर्जून खाल्ले जाते.
आणि हो, विकतच आणले ते. सकाळीच सकाळी झेंडावंदन करायचे आणि हे खायचे. तरच राष्ट्रीय सण साजरा होतो.
आणि, कोण म्हणाले वर ते मुंबईत गुज्जू म्हणून... तर हो, तथ्य असेल. मुंबईत सगळे जात धर्म प्रांत यांच्या आवडीनिवडी ईतरांना आवडल्या तर बेमालूमपणे एकमेकांत मिसळून जातात. मला वाटते यावर देखील एक धागा काढता येईल Happy

>>>>>>मुंबईत सगळे जात धर्म प्रांत यांच्या आवडीनिवडी ईतरांना आवडल्या तर बेमालूमपणे एकमेकांत मिसळून जातात. मला वाटते यावर देखील एक धागा काढता येईल Happy>>>> येस्स्स्स काढाच. मुंबई ती शेवटी मुंबईच. एकमेव!

कोल्हापूरमध्ये 26 जानेवारी आणि 15ऑगस्ट ला प्रत्येक घरी जिलेबी आणली आणि खाल्ली जाते. सगळीकडे जिलेबीचे स्टॉल लागतात. बहुतेक घरांमध्ये सणावेळी असतो तसा मेन्यु असतो.

मला दोन्ही पण नको.. मी आपल्या गपचूप सांबर राईस खाईन आणि लावण्याने बनवलेला घरचाच एखादा रव्याचा लाडू खाईन..

मी लहान असताना कुळथाच्या शेंगोळ्या खाल्लेल्या आहेत.. शेजारी देशस्थ होते त्यांनी दिलेल्या..

Submitted by कृष्णा on 29 January, 2021 - 11:17
>>>>
त्या पुरी रसमलाईच्या ताटात वाटीत पेठा आहे का? छान दिसतेय

कांद्यासारखीच लसणाची पात आणली

दही घालून कच्ची पात वापरून कोशिंबीर केली , खाताना भयानक उग्र लागली , तरी खाल्ली

दुसरा दिवस पोट भयानक बिघडले , लसणाच्या वासाच्या ढेकरा आणि अगदी पातळ संडास झाली

हा प्रकार इतका उग्र आहे , तर ह्याचे करतात तरी काय ?

Pages