खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांना मकरसंक्रांती च्या शुभेच्छा
20210114_103532.jpg

PSX_20210114_143000.jpgPSX_20210114_143034.jpg
गुळपोळ्या
नैवेद्याचे ताट डावीकडून तूप, मेथीची भाजी, कढी, भात आणि गुळपोळी.
नैवेद्याचे ताट हे मी माझ्या हिशोबानी आणि मला जे पदार्थ करायला सोपे जातात आवडतात ते केलेले आहेत त्यात उगीच हेच नाही का तेच नाही का?
आमच्यात आमकच नसतं, तामकंच नसतं असले प्रतिसाद देणाऱ्यांना फाट्यावर मारण्यात येईल याची दखल घ्यावी.

20210114_194539.jpg
सगळ्या गुळपोळ्या मस्त.मला गुळपोळी कडक आणी खरपूस आवडते. वेज बिर्याणी yumm

काल संक्रांतीनिमित्त बायकोने केलेली आयुष्यातील पहिली पुरणपोळी
एवढी छान झाली होती की तरी आईच्या हातची सर नाही असा डायलॉगही मारता आला नाही Happy

1610729395131.jpg

आज वर्क फ्रॉम होम करता करता मला अचानक कडाडून भूक लागल्याने बायकोने फक्त १२ मिनिटात चाईनीज ईस्टाईल फोडणीचा भात केला Happy

1610729454311.jpg

.

1610729490267.jpg

पुरुषांना आईच्या हातच्या जेवणापेक्षा बायकोच्या हातचं जेवण आवडतं असं माझं आतापर्यंतचं निरीक्षण आहे. जरी आईच्या हातचं जेवण आवडत असेल तरी बायकोसमोर हे बोलण्याचं धाडस दाखवणारी पुरुष प्रजाती अगदीच नगण्य आहे.

बोकलत, पुरुष बायकांना घाबरतात हे एक मिथ आहे जे पुरुषांनीच मोठ्या खुबीने पसरवले आहे.
असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. काढूया कधीतरी. ईथल्या चमचमीत खाद्यपदार्थांना त्या चर्चेची झणझणीत फोडणी नको Happy

जेव्हा ब्रेकफास्ट बनवायचा कंटाळा येतो
शिल्ललक पीठाच्या मीनी इडली, जवसाची चटणी, वरून तीळाचे कच्चे तेलIMG_20210116_101748.JPG

Amupari Happy

सगळ्यांच्या तिळपोळ्या, बिर्याणीज, मटर टोस्ट, भात मस्त मस्त आहे..

इडल्या मस्त !
सॉफ्ट आणि fluffy (मराठी प्रतिशब्द सुचवा !) इडली करण्या साठी टिप्स आहेत का ?
गोटा उडीद हि एक माहित आहे पण अजून काही असतील तर नक्की सुचवा ...

https://www.maayboli.com/node/56005
या धाग्यावर रिसेंट बरीच चर्चा झाली आहे.. सॉफ्ट आणि स्पॉंजी इडल्या बनवण्यासाठी...शेवटची दोन पानं बघा.

Airbnb मधलं वास्तव्य आणि आम्ही बनवलेलं जेवण

कोकोनट राईस, लेमन राईस, पनीर मसाला
14937BC1-97BC-4391-95A7-10A8CC6FC943.jpeg

अवकाडो सॅंडवीच आणि बॅाइल्ड एग मेयो सॅंडविच
4D61E544-0DA8-4451-AD35-A2413F424C9B.jpeg

चिकन खीमा, पनीर फ्राय, भेंडीची भाजी आणि बंगाली पद्धतीची कोळंबी करी विथ राईस
2695849F-4978-4A04-87BB-0A6413AB72FF.jpeg

धन्यवाद स्वान्तसुखाय..
हो याचे वेगळे छोटे इडली पात्र आहे.. पाच मिनटांत बनतात त्यात इडल्या.

Mrunali मीसळ मस्त.
Shreya ड्राई गोबी मंचुरीयन yumm.
म्हाळसा मस्त आहेत सगळ्या च dish.

Pages