व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Whatsapp कडे तुमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर असतात च जे तुमच्या मोबाईल मध्ये आहेत.
तुम्ही कोणाशी काय बोलतय ह्या वरून प्रतेक कॉन्टॅक्ट शी असलेलं तुमचं नात त्यांना माहीतच असते.
तुमच्या आवडी निवडी माहीत पडतात.
तुमची मानसिकता माहीत पडते.
त्या नुसार Google chrome,Facebook, वर तुमच्या आवडीच्या बातम्या,जाहिराती ह्यांचा मारा तुमच्यावर करतील.
समजा तुम्ही सेक्स ह्या विषयावर व्हॉट्स ॲप वर कोणाशी संभाषण करत असाल तर .
सेक्स संबंधी समस्या निवारण करणारेचे तुम्हाला कॉल येतील.
किंवा बाकी त्याच प्रकारच्या उत्पादक कंपन्या तुम्हाला कॉल करत राहतील.
खासगी माहिती वर जे चलाक आहेत ते काही ही करू शकतात.

@ अभिनव,
मलाही असेच हसायला आले. कारण मी सभासद असलेल्या काही व्हॉटसपग्रूपवर तर अशी चर्चा चालू आहे जसे कोणी यांच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये कॅमेरे लाऊन यांचे वैयक्तिक चित्रण करणार आहे. जे तुमच्या फोनवर असेल किंवा जे तुम्ही ठेवाल तेवढेच लोकं चोरू किंबहुना बघू शकणार ना. ज्या वस्तू कोणाला समजू नये असे वाटते त्या मग दर्शनी भागात न मांडता तिजोरीत दडवून ठेवा.

हेमंत, जाहीरातींचा मारा होतो हे कबूल. पण ते काही ईतके मोठे वैयक्तिक नुकसान नाहीये. बरेचदा फायदाही होतोच. आणि काय घ्यायचे काय नाही याची अक्कल आपल्यालाच हवी ना. गाडीतून कुठे जाताना सिग्नलला गजरेवाली येते, भाऊ दोन गजरे घ्या, जर मी माळत नसूनही ते घेतले तर तो माझाच मुर्खपणा झाला.

@ अभिनव,
मलाही असेच हसायला आले. कारण मी सभासद असलेल्या काही व्हॉटसपग्रूपवर तर अशी चर्चा चालू आहे जसे कोणी यांच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये कॅमेरे लाऊन यांचे वैयक्तिक चित्रण करणार आहे. जे तुमच्या फोनवर असेल किंवा जे तुम्ही ठेवाल तेवढेच लोकं चोरू किंबहुना बघू शकणार ना. ज्या वस्तू कोणाला समजू नये असे वाटते त्या मग दर्शनी भागात न मांडता तिजोरीत दडवून ठेवा.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 16:03
>>
घोर अपमान. AI, machine learning, big data, smartphone OS, microphone, camera यांचा घोर अपमान. मी याचा निषेध करत आहे.
Rofl

हेमंत, जाहीरातींचा मारा होतो हे कबूल. पण ते काही ईतके मोठे वैयक्तिक नुकसान नाहीये.
गाडीतून कुठे जाताना सिग्नलला गजरेवाली येते, भाऊ दोन गजरे घ्या, जर मी माळत नसूनही ते घेतले तर तो माझाच मुर्खपणा झाला.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 16:03
>>
Rofl Rofl

तुम्ही अटी मान्य केल्यात, परवानगी दिली तर त्याला चोरी म्हणत नाहीत. नकळत डेटा कलेक्ट केला असता तर चोरी.

आणि प्रायव्हसी काय फक्त बाथरूममध्ये हवी असते का? मी कुठे गेले, मी कोणती जाहिरात पाहिली, मी शॉपिंग कार्टमध्ये काय ठेवलं, मी कोणाशी बोलले हे का बरं व्हाट्सअप्पने पहावं आणि सेव्ह करावं? माझ्या आवडीनिवडी पाहुन माझे डिटेल्स कंपनीजना विकणे, माझा फोन नंबर कंपनीजना विकणे याबाबत हरकत आहे. काल मला कोणी म्हणाल की ज्यांच्या अकाऊंटमधे करोडो पडुन आहेत त्यांनी चिंता करावी, तुझा annual इन्कम जर x0-x0 लाख असेल तर असल्या लोकांमध्ये फ्रॉडस्टर्सना काही इंटरेस्ट नाही. पण उद्या काही झालंच तर माझ्यासाठी माझी रक्कम मोठीच नाही का?

घोर अपमान. AI, machine learning, big data, smartphone OS, microphone, camera यांचा घोर अपमान. मी याचा निषेध करत आहे.
Rofl >>>> तुम्ही का हसला तेच कळलं नव्हतं माबो शाहरुख खानला Wink

मी कुठे गेले, मी कोणती जाहिरात पाहिली, मी शॉपिंग कार्टमध्ये काय ठेवलं, मी कोणाशी बोलले हे का बरं व्हाट्सअप्पने पहावं आणि सेव्ह करावं? माझ्या आवडीनिवडी पाहुन माझे डिटेल्स कंपनीजना विकणे, माझा फोन नंबर कंपनीजना विकणे याबाबत हरकत आहे.
>>>>>

तुमची हरकत मान्य आहेच. ती मी मूळ हेडरपोस्टमध्ये नमूद केलेच आहे.
मी तर माझे खरे नाव देखील माबोवर बदलून वावरतो / वावरायचो. क उगाच अनोळखी लोकांना सांगत फिरा.

पण मला पडलेला प्रश्न असा आहे की आपली किती माहीती सोशल करावी आणि किती नाही हा ज्याचा त्याचा विचार झाला. पण जर कोणाला यात हरकत घेण्यासारखे वाटत नसेल तर आणखी काही धोका आहे का ज्यात यामुळे माझे काही नुकसान होऊ शकते.

तुमचेच वाक्य कोट करतो
>>
काल मला कोणी म्हणाल की ज्यांच्या अकाऊंटमधे करोडो पडुन आहेत त्यांनी चिंता करावी, तुझा annual इन्कम जर x0-x0 लाख असेल तर असल्या लोकांमध्ये फ्रॉडस्टर्सना काही इंटरेस्ट नाही. पण उद्या काही झालंच तर माझ्यासाठी माझी रक्कम मोठीच नाही का?
>>>

प्रश्न हाच आहे की यामुळे त्या रक्कमेका धोका कसा होऊ शकतो ???
आणि हा प्रश्न सर्वांनाच आहे.

घोर अपमान. AI, machine learning, big data, smartphone OS, microphone, camera यांचा घोर अपमान. मी याचा निषेध करत आहे.
Rofl
Submitted by अभि_नव on 10 January, 2021 - 16:08
>>>>>>

मला कळले नाही. तुमचा फोन ईंटरनेटला कनेक्टच नसेल तरीही कोणी तुमचा डाटा चोरू शकते का?

बन्या, लिंक बद्दल धन्यवाद. थोडाच पाहिला. जास्त ईंग्लिश ऐकावे ईतके पेशन्स नाहीयेत माझ्यात Sad
पण सोशलमिडीयापासून लांब राहणे ईतके सोपेही नाही. आणि जर सगळे जगच तिथे असेल तर आपण वेगळे राहणे त्यात काही तोटे सुद्धा असू शकतातच. स्पेशली नवीन पिढीतला कोणी सुरुवातीपासूनच असा वागला तर वेगळा नाही पडणार?
त्यापेक्षा जर सोशलमिडीयावर राहूनही आपले मानसिक स्वास्थ्य जपता येत असेल तर तो सुवर्णमध्य साधता यायला हवे असे मला वाटते..

गूगल वर जी तबोडतोप कर्ज देणारी ऍप आहेत त्या ऍप चा फटका बसलेल्या एका व्यक्तींनी त्याची कहाणी सांगितली.
ती अशी
25000 रुपये कर्ज घेतले होते आणि त्याचे व्याजासहित 3 महिन्यात 1.5 लाख झाले .
ते वसूल करण्यासाठी त्यांचे कॉल येवू लागले
त्यालाच नाही तर त्याच्या व्हॉट्सॲप वर जेवढे नंबर होते त्या सर्वांना.
ही कॉन्टॅक्ट लिस्ट त्या कर्ज देवून फसवणाऱ्या fraud माणसाकडे गेली कशी.
खासगी माहिती साठवण्याची परवानगी गूगल असू नाही तर google ची पिल्ल ह्यांना कोणत्या सरकार नी दिली आहे.

सगळेच करतात स्पाईंग. युट्यूब वर प्रा. भा.त गाणे पाहिले की त्याच्याशी संबंधित गाणी दिसू लागतात.
फेसबुक जास्त स्पाईंग साठी बदनाम आहे. मोबाईल मधे फेसबुक असतंच. दोन व्यक्ती एकमेकांना पहिल्यांदा भेटले तरी ते एकमेकांकडे पाहत होते का, बोलत होते का हे फेसबुकला कळतं. मग ती व्यक्ती तुम्हाला अ‍ॅड फ्रेंड्स मधे दिसते.
यातून तुमच्या सीक्रेट अ‍ॅक्टीव्हिटीजवर अतिक्रमण होतं. एखाद्या /दीला त्याचं व्यावसायिक आयुष्य सोमि पासून दूर ठेवायचं आहे. पण त्या/तिला तसं करता येत नाही.
सध्या तरी आपल्याकडे कस्टमर म्हणूनच पाहिले जाते तोपर्यंत काळजीचे कारण नाही. त्यात गैर काही आहे असे वाटत नाही. कारण आपण काय खरेदी करतो, आपल्याला काय आवडतं हा डेटा संबंधितांना देऊन ते पैसे कमावतील तरच त्यांना हे साम्राज्य सांभाळणे आणि नफ्यात चालवणे शक्य आहे. ही काही समाजसेवा नाही.
पण अमेरिकेत फेसबुकने मतदारांचा डेटा विकल्याचे आरोप झाले होते. ते गंभीर वाटते.

गूगल pay नी वीजबिल भरले तर पुढचे बिल आल्यानंतर त्याचा msg येतो.
गूगल pay ला कसे कळत तुम्हाला हे बिल आले आहे म्हणून
म्हणजे वीज कंपनीचं deta पण हे वाचत असतात.

मला पडलेला प्रश्न असा आहे की आपली किती माहीती सोशल करावी आणि किती नाही हा ज्याचा त्याचा विचार झाला. पण जर कोणाला यात हरकत घेण्यासारखे वाटत नसेल तर आणखी काही धोका आहे का ज्यात यामुळे माझे काही नुकसान होऊ शकते. >>>> मान्य आहे मी जरा मोठमोठे प्रतिसाद टाइप करते, पण या प्रश्नाचे उत्तर द्यायला मुळ लेखापेक्षा मोठी पोस्ट टाइप करावी लागेल. त्याऐवजी BBC न्यूज मराठीचा व्हिडिओ पहायला सुचवु का? युट्यूबवर पहाता येईल. माहितीपुर्ण आहे. ज्यांना या विषयाची सखोल माहिती हवी असेल त्यांनी गुलशनकुमार बनकरचा BBC मराठी वरचा व्हिडीओ पहा.

सॉरी, मला फोनवरून लिंक देता येत नाही

तुम्ही तुमच्या पत्नीला/ मैत्रिणीला काय मेसेज,कॉल करता ही माहीती जर दुसर्या कुणाच्या हातात पडत असेल तर प्रायव्हसीला काही धोका नाही असे फक्त मुर्खालाच वाटू शकते.
सायबर सेन्सॉरशिप वाढत आहे.भारतात डेटा प्रोटेक्शन बिल येऊ घातले आहे हे एक बरे आहे.

>>>पुढचे बिल आल्यानंतर त्याचा msg येतो. गूगल pay ला कसे कळत तुम्हाला हे बिल आले आहे म्हणून
म्हणजे वीज कंपनीचं deta पण हे वाचत असतात.

हॅहॅहॅहॅ
अहो, संपूर्ण बिलिंग सायकल ची बिलं एकदमच निघतात. म्हणजे, सगळ्यांची बिल जवळपास सेम टायमाला निघतात.

व्हॉट्सअ‍ॅप मधे दोन प्रकारचा डेटा असतो:
१. आपला फोन नंबर, किती वेळ अ‍ॅप वापरले, कोणत्या डिव्हाइसवर वापरतो वगैरे वगैरे
२. आपले मेसेजेस

यातले "१" फेसबुक बरोबर ते शेअर करणार. "२" - म्हणजे मेसेजेस शेअर करणार असे मी तरी कोठेही वाचलेले नाही. कोणाला नक्की लिन्क दिसली तर टाका इथे. मुळात आपले मेसेजेस एकदा फोनवर रिसीव्ह झाले की त्यांच्या सर्व्हर्सवरून डिलीट होतात. ग्रूप मेसेजेस सर्वांच्या फोन वर रिसीव्ह होईपर्यंत राहात असावेत.

>>पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. <<
आधी पण (एक्स्प्लिसिटली) न्हवती, अ‍ॅपलने (आयोएस१४) दट्ट्या मारला म्हणुन आता मागावी लागली. पण तु घाबरु नकोस, परमिशन देउन टाक. मग सकाळी दात घासल्या पासुन रात्री झोपण्यापुर्वि दात घासे पर्यंत झकरबर्ग पांडुरंगा सारखा तुझ्या पाठिशी उभा असेल...

Whatsapp चा फक्त विचार करू नका फेसबुक पण त्यांचेच आहे.
ते आपसात माहिती शेअर नक्की करत असतील .
आपल्या कडे fb वर बार स्या पासून सुहाग राती पर्यंत सर्व फोटो टाकण्याची रीत आहे.
पाश्चिमात्य देशात fb वर जास्त शेअर करत नसावेत.

व्हॉट्स अ‍ॅप वर मुंबई कोलकाता फ्लाईट डिटेल्स शेअर केल्या की लगेचच कोलकत्यातली हॉटेल्स दिसू लागतात.
एकाने जीपीएस बंद करून टेलिग्राम वापरायला सुरू कर असं सांगितलंय. टेलिग्रामला फोन नंबर पलिकडच्याकडे जात नाही.

व्हॉट्स अ‍ॅप वर मुंबई कोलकाता फ्लाईट डिटेल्स शेअर केल्या की लगेचच कोलकत्यातली हॉटेल्स दिसू लागतात.
>>> हे सिरीयस आहे... व्हाट्सएप डेटा शेयर करत नाहीय... हे व्हायला नको...असे होत असेल तर तुमचा की बोर्ड अँप्लिकेशन डेटा चोरतोय का बघा.. किंवा तुम्ही फ्लाईट डिटेल्स गूगल किंवा जीमेल मधून उचलली का? गूगल डेटा बघते...

च्रप्स
व्हॉट्सअ‍ॅप वर एकदाच शेअर केलं होतं. त्यानंतर फेसबुकवर मला जाहीराती येऊ लागल्या.
थेट स्पाईस जेटच्या किंवा एअर इंडीयाच्या वेब साईटवर बुक केलं तर गुगल सर्च मधे जाहीराती पाठलाग करत नाहीत. पण थर्ड पार्टी ( बुकमायट्रीप इ) वापरले तर मग गुगल पाठलाग करत राहतं. एअर इंडीयाला काही कारणाने मेल केला तर जाहीराती दिसतात. हे अनुभवाचे बोल आहेत.

Pages