व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> प्रशासनाने आयडी उडवला तरी प्रतिसाद आता 4 तास झाले असतील तर तसेच राहतील. ते उडत नाहीत.

तुम्हाला किंवा मला ऊडवता येत नाहीत पण प्रशासनाला डेटाबेस मधुन उडवण म्हणजे एक सिंपल क्वेरी एक्झिक्युट करणे होय.

बाकी ईतक्या वेळ स्वतःचा डेटा स्वतःचा असावा आणि ईतर प्राव्हसी बद्दल होणर्या चर्चेत मी केवळ माझ्या डेटावर ईथे माझा कंट्रोल नाही म्हणल्यावर लोक असे प्रतिसाद देत आहेत. हाऊ आय्रॉनिक!

@योगेश २९
तुम्ही पुन्हा अर्धवट कोट केलेत. यामुळेच लोक वैतागत नसतील ना तुम्हाला ? तुम्ही अर्धवट कोट केलेला माझा प्रतिसाद असा होता.

योगेश २९ यांच्या मते हे गौरव सोमवंशी आंतरराष्ट्रीय तज्ञ तर सोडाच व्हॉट्स अ‍ॅप युनिव्हर्सिटीच्या लायकीचेही नाहीत. आपण हे मत लोकसत्ताला कळवू हं ! त्यांच्या जागी यांची मालिका सुरू करा म्हणून सांगू.

तुम्ही त्यांची टर उडवली. टर उडवणारा मनुष्य ज्ञानाने १०० पट श्रेष्ठ असेल म्हणून मी तुमचा लेख लोकसत्तेने छापावा एव्हढीच अपेक्षा व्यक्त केली. त्याला सहानुभूती मिळवण्यासाठी अर्धवट कोट करून ट्रोलिंग करू नका. तुम्हाला बुलिंग, डॉक्सिंग वाटत असेल तर स्वतः काय केले हे निवांत वेळ काढून वाचा. राज, व्यत्यय , उबो यांना प्रतिसाद देताना आकांडतांडवर करण्याची गरज काय ?

आणि गौरव सोमवंशीचा लेख असंबद्ध असेल तर जाण्यापूर्वी तसे सिद्ध करून जा. तुम्ही म्हटले म्हणून मान्य करायला काही सबळ कारण आहे का ?
जरी त्या व्यक्तीला लंडनच्या पार्लमेंटने आमंत्रित केले असेल, कोलंबिया विद्यापीठाने सन्मानित केले असेल, बीबीसी ने त्यांची निवड केली असेल तरी ते तुमच्या पासंगालाही पुरणारे नसतील ही शक्यता उरू शकतेच.
फक्त ते टेक्निकली सिद्ध करा. ज्याला कळायचे ते कळेल.
ज्यांना टेक्निकल कळत नाही त्यांच्यावर इतका वेळ घालवला तर मग टेक्निकल आव आणणारे वृत्तपत्रात लेख लिहून समा़जाची दिशाभूल करत असतील तर ते एक्स्पोज होणे जास्त गरजेचे नाही का ?
मी लोकसत्ताला काही कळवत नाही. घाबरू नका.
तुम्हाला सार्किझम समजत नसावा. ब-याच गोष्टी समजत नसाव्यात. नुसता आडदांड दांडपट्टा फिरवायच्या आधी समोरच्याचा प्रतिसाद दारूसारखा निट रिचवायला शिका. नाहीतर त्याला सांगायचे असते दिल्लीला जायचेय आणि तुम्ही चेन्नईला जायचेय असा अर्थ काढून वाद घालत बसणार.

इथून पुढे टोन बदलून लिहा.
कुणी तुम्हाला टार्गेट करत नाही.
शुभेच्छा !

योगेश २९
मी या आधी चार पाच वर्षे मायबोलीवर काढलेली आहेत. त्यामुळे एखाद्याचे दुस-या धाग्यावरचे मत आवडले नाही तर त्याला अन्य ठिकाणी कसे चेचायचे (हाच शब्द आहे विपूत ) हा प्रकार इथे कसा चालतो हे मला ठाऊक आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटले नाही. अशा वेळी धाग्यात इंटरेस्ट नसलेले कसे उगवतात, कुणाचे काय ग्रह असतात, कुणाचे स्कोअर सेटलमेंट असतात हे सांगायची गरज नाही.
मी हा धागा सोडला कारण जिथे कुणाला ऐकायचे नाही तिथे जाऊ नये. मात्र माझा संताप विनाकारण नव्हता हे तुम्हाला कळूनही तुम्ही गप्प बसला हे खटकले. मला काल वेळ झाला नाही. आणि आता एव्हढे रणकंदन झाल्यानंतर, ड्युआयड्यांचा मुक्त वापर झाल्यानंतर पुन्हा इथे येणे याचे अर्थ काय होतील हे माहीत असूनही मला यायला लागतंय. कारण मला ती रूखरूख लागून जाईल.

तुम्ही माझ्या प्रतिसादाचे जे मातेरे केलेत त्या आधी तुमचा जो प्रतिसाद होता त्यात मला इंटरेस्ट नव्हता. त्यातलं शेवटचं वाक्य माझ्यासाठी नव्हतं. मी इथे तुमच्या प्रतिसादाच्या आधीपासून आहे आणि माझ्या भूमिकेत बदल नव्हता.

तुम्ही युट्यूब आणि मेसेंजर हे वेगळे प्लॅटफॉर्म आहेत असा जो प्रतिसाद दिला त्यानंतर मला तुमचा स्वभाव लक्षात आला. अशा व्यक्तींशी वाद घालून उपयोग नसतो. मी उदाहरणे , रूपक याबद्दल पुन्हा लिहीले. ते ही तुम्ही न समजल्यासारखे सोडून दिले. पुन्हा सवुस्तर प्रतिसाद दिला त्याने तुम्ही कन्फ्युज झाला असे स्वतःच म्हणताहात. हा माझा दोष आहे का ?

माझा इश्यू फक्त पेड सर्विस युट्यूब प्रमाणे असावी असा होता. मेसेंजरने युट्यूब प्रमाणे व्हिडीओ दाखवावेत असे त्या प्रतिसादात कुठे म्हटलेय ? तुम्ही अशा पद्धतीने माझ्या म्हणण्याचा पूर्ण विपर्यास केला.
तुम्ही चोरी कुणी केली अशा पद्धतीने विचारलेत की इथे जमलेले बिनाकारणच चोरी झाली असे समजून चर्चा करताहेत. बाकीचे तुमचे प्रतिसाद पाहून मी तुम्हाला विचारले की माझे आधीचे प्रतिसाद वाचलेत का ?
त्याला अद्याप उत्तर नाही मिळालेले. जर वाचले असते तर ?

मी माझा मुद्दा क्लीअर केला आहे हे मला कधीच समजले नाही. मी तुमचा मुद्दा वाचलाच नाही आणि तुम्हाला काही विचारलेच नव्हते. तुम्ही सोडून अन्य लोक आहेत की. इथे लिहीलेला प्रत्येक शब्द तुमच्या विरोधात आहे का ?

तुम्ही जो प्रतिसाद दिला होता त्याला उत्तर म्हणून एव्हढा मोठा प्रतिसाद टाईप करायचा कंटाळा आलेला होता आणि हास्यास्पद बनण्याची भीतीही.
आता हे ही नाही समजले तर माझा नाईलाज आहे.
मला जे सांगायचे होते ते सांगितले. आता स्कोर सेटल करण्यासाठी ( आणि ते का म्हणून हे ही कळालेले नाही) जे कुणी उगवणार आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि तुम्हालाही.
कालच्या संक्रांतीचे तीळगूळ अजून शिल्लक आहेत. गोड गोड बोला.

ऋन्मेषनी मजा आणली पण.... > Lol
चला आता पुन्हा पहिल्या पानापासून पुढे जाऊयात. उगीच नवीन धागा नको.

आता जरा पामरांंना काही समजेल असे सांगा.

@योगेश: Signal ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. सध्या त्यांचे जेवढे युजर्स आहेत त्यापेक्षा कैक पटींनी वाढले की त्याकरीता लागणारा वाढीव खर्च (क्लाउड होस्टिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअर्स इत्यादि) ते कसा संभाळणार हा तुमचा मुद्दा, ( हे बरोबर ना?). त्यासाठी पुढे जाऊन ते सुद्धा सध्या व्हॉट्सऍप फेसबुक जो डेटा गोळा करतात आणि ज्या पद्धतीने वापरतात (यात चोरून गोळा करणे, चिनी कंपन्याना तो डेटा विकणे, मुद्दाम लीक करून "बग होता, आता तो सिक्युरिटी इश्यू सोडवलाय" वगैरे सांगणे, वगैरे सगळे बाजुला ठेवू या.) त्या पद्धतीने Signal सुद्धा वापरेलच असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

@सगळे माहितगार: धाग्याच्या मूळ उद्देशाकडे येऊन:
गोळा केली जाणारी माहिती फक्त लोकांच्या आवडी-निवडी, गरज, आर्थिक स्तर, रहाण्याचं ठिकाण इत्यादि नुसार त्यांना जाहिराती दाखविणे एवढ्या करताच होतो, की अजून कसा होतो, त्याचा गैरवापर होऊ शकतो का? केला गेला आहे का?
होऊ शकण्याचा संभाव्य धोका आहे का?

उदा:
मला इन्शुरन्स घायचे आहे आणि ही माहिती सर्व इन्शुरन्स कंपन्याना शेअर करून मला धडाधड फोन कॉल्स येऊ लागणे किंवा माझा मेलबॉक्स त्यांच्या इमेल मेसेजेसने भरणे हा सुद्धा माझ्या मते गैरवापर आहे, मायबोलीवर किंवा इतर कुठे आता इतर जाहीराती ऐवजी इन्शुरन्स कंपनीची जाहिरात दिसु लागणे मी चालवून घेऊ शकतो.

जर मी काही वर्षांपूर्वीच घरासाठी कर्ज घेतलंय. आज करोनामुळे की आणखी कशामुळे माझी जर नोकरी गेली.
तर हा माणुस आता बेरोजगार झालाय, आता पर्यंतची याचे आर्थिक प्रोफाइल पहाता हा कर्ज फेडू शकत नसल्याने तातडीने घर विकण्याची शक्यता आहे ही माहिती सगळीकडे शेअर होऊ शकते का? म्हणजे सगळ्या ब्रोकर्सना माहीत होईल आता या माणसाला पाच दहा लाखांंनी सहज नागवता येईल.

मानवजी
मी तुम्हाला पण विनंती करेन की एकदा पुन्हा पहिल्या काही पानांवर नजर टाकून रिफ्रेश व्हा.
मी छोटे छोटे प्रतिसाद देऊन मुद्दा मांडत होते. मला टेक्निकल समजत नाही. पण जर माझा फ्लाईट प्रोग्राम पाहून मला हॉटेल्सची माहिती मिळत असेल ( हे कुणी वाचतं की आपोआप होतं हे मला कळत नाही ) तर मला भीती नाही का वाटणार ? नवीन शहरात हॉटेलचा पत्ता पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला (बॉट नसेल तर) माहीत असणे याचा अर्थ भयाण नाही का ?

अजून एक अनुभव.
मी कॅब साठी जर वेगळे अ‍ॅप वापरले (स्वस्त पडते) आणि कॅब बुक केली नाही तर मी नाव गाव दिलेले नसतानाही मला सजेशन्स येत राहतात. त्यात मी ज्या रूटसाठी , अंतरासाठी चौकशी केली ती माहिती असते. फ्लाईटच्या बाबत पण हे होते. आता ही माहिती कंपनीत काम करणा-याला उपलब्ध असेल तर ते किती धोकादायक आहे ?

Submitted by रानभुली on 15 January, 2021 - 13:41>>>
सहमत. प्रायव्हसी व्यक्तीसापेक्ष आहे. ज्याची मला चिंता असेल कदाचित इतर कोणाला नसेल आणि व्हाईस अ व्हर्सा.
ट्रॅव्हल प्लान, रहाणाऱ्या हॉटेलचे नाव पत्ता शेअर होणे ही अनेकांना चिंतेची बाब असू शकतेच, त्याचा गैरपावर होऊ शकतो, नसेल होत तरी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

अमुक दिवशी अमुक वेळेस कुठे होता या प्रश्नाला उत्तर न देण्याचा अधिकार न्यायालय सुद्धा मला देते, जर त्याचा सुरू असलेल्या तपासा विषयी संबंध नसेल तर.

जे काय करायच ते करा आणि ज्या काही अर्धवट माहीत्या पसरवायच्या त्या पसरवा.
जणू काय तुम्ही नसता तर आम्ही अजून गुहेत चित्रच काढत बसलो असतो. मला सगळ्यातलं सगळं काही कळतं, मी तुम्हाला माहिती देतोय म्हणजे तुमच्यावर उपकार करतोय type कॉमेंट्स डोक्यात जातात.

उद्बोधक चर्चा. धृव राठीचा व्हिडिओ पाहीला -
https://youtu.be/2yluL1DZ70U
तो सांगतोय की व्हॉट्सॲप वापरण्याशिवाय पर्याय नसेल तर VPN वापरा. माझा प्रश्न असा आहे की जर VPN वापरलं तर मग गुगलला पण आपल्याला ट्रॅक करता येणार नाही का? अजून एक साधा प्रश्न मी VPN on ठेवून गुगल मॅपवर पत्ता शोधू शकते का? म्हणजे IP address आणि GPS चा काही संबंध असतो का? इथे कोणी regularly VPN वापरता का?

>> VPN on ठेवून गुगल मॅपवर पत्ता शोधू शकते का? म्हणजे IP address आणि GPS चा काही संबंध असतो का?
हो, VPN on ठेवून गुगल मॅपवर पत्ता शोधायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. IP address आणि GPS चा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो.

>> जर VPN वापरलं तर मग गुगलला पण आपल्याला ट्रॅक करता येणार नाही का?
IP address हा तुम्हाला ट्रॅक करायचा एक मार्ग आहे. गुगल इतर प्रकारे (उदा. GPS वापरुन) तुमचं अधिक अचुक लोकेशन ट्रॅक करु शकते. VPN हा सर्व रोगांवर अक्सीर रामबण उपाय नाही. VPN सर्व्हिस प्रोव्हायडर तुमचा IP Address आणि तुम्ही कुठल्या वेबसाईटवर गेलात हे ट्रॅक करु शकतो. धृव राठीचा व्हिडीओ हा त्या VPN ने स्पॉन्सर केलेला आहे.

@मानव :
जाहिरातींशिवाय व्हॉट्सॅपकडे असलेल्या माहितीचा सरकारकडुन दुरुपयोग होऊ शकेल का अशी शंका मनात येते. लॉ एन्फोर्समेन्ट एजन्सीज अधिकृत रित्या कंपन्यांवर दडपण आणुन त्यांच्याकडची माहिती हस्तगत करु शकतात.

व्हिडिओ नाही बघितला. पण VPN काय करेल ? इथे समस्या वेगळ्या पातळी (लेअर) वर आहे ना? हे आग सोमेश्वर ... प्रकार वाटला. आय मे मी मिसिंग समथिंग.

आपल्या धाग्याचा विषय : व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

यात दोन प्रकारचे समांतर स्टेशन्स लागले आहेत.
१. एण्ड युजर ज्यांना या क्षेत्राशी घेणे देणे नाही.
२. एण्ड युजर + या क्षेत्रात कार्यरत.

पहिल्या वर्गातल्या लोकांनी आपल्याला येणा-या समस्या सांगितल्यात. इथेच नाही इतरही बरेच ठिकाणी अशा लोकांना दुस-या वर्गातले लोक येऊन दूषणे देतात. त्यातलं पहिलं असतं की प्रायव्हसी पॉलिसी वाचली नव्हती का ? दणादणा सगळ्याला परमिशन्स दिल्यावर नंतर ओरडण्याळा अर्थ नाही इत्यादी.

आपल्याकडे अवेअरनेस आत्ता आला. या माहितीचं काय काय होऊ शकतं हे आत्ता समजतं. ही माहिती प्रसारमाध्यमे पोहोचवतात. त्यासाठी ते जाणकार शोधतात. त्यांनी जी माहिती दिली ती ले मॅन एण्ड युजर ची स्वतःची माहिती बनते. त्या आधारे तो आता काळजी करू लागतो. यात चूक असे काहीही नाही.

दुसरे जे स्टेशन लागले आहे त्यात माहिती चोरलीच नाही असा पवित्रा घेतला जाऊ शकतो. ही मंडळी कंपनीच्या नफ्याच्या बाजूने विचार करतात. नफा कमावणे चुकीचे काय असा पवित्रा असतो. हे ही बरोबर.

पण बेसिक गोष्ट जी आहे ती कल्पना देऊन डेटाचा यूज करणे. यात कुणाला काय प्रॉब्लेम आहे ?
ज्याला कल्पना देऊनही डेटा द्यायचाय त्याने तो द्यावा. अगदी बारीक अक्षरातले लांबच्या लांब अ‍ॅग्रीमेंट प्रत्येक अ‍ॅपला युजर वाचत बसणार नाही हे मुळातच गृहीत धरलेलं असतं. जरी तसे नसेल तरी आपण कुठल्या कुठल्या परमिशन्स देतो हे स्टेप बाय स्टेप अलिकडे विचारले जाते. गुगल प्ले चा हा फॉरमॅट आहे. माईक, कॅमेरा इत्यादींचा वापर करण्यासंबंधी परवानगी विचारली जाते. त्यानंतर या परवानगीचा उपयोग कशा कशा साठी केला जाईल हे येत नाही. जीपीएस वापरायची परवानगी दिली तर तुमची लोकेशन ट्रॅक केली जाईल हे कुठे सांगतात ?

इथे फसवणूक होते.

ले मॅन ची अपेक्षा इतकीच की
अ) माझ्या माहितीचा वापर होऊ नये. त्यासाठी मी किती पैसे भरू ?
ब) चालेल. किंवा थोडीफार वापरा मी थोडेफार पैसे भरीन,

ले मॅनचे म्हणणे असे की कंपनीला नफा व्हावा म्हणून हे केलं जातं हे कारण लंगडं आहे. कारण आम्ही पैसे भरायला तयार आहोत. तुम्ही तो पर्यायच ठेवला नाही. आणि परवडलं नाही तर तुम्ही काहीही करा , आम्ही परवानगी देऊ. आम्हाला चालेल.

यात कुणाला काय प्रॉब्लेम आहे ?

आपला आपला चॉईस आहे...
ज्याला फरक पडत नाही त्याने द्यावी परमिशन..
मी केले ऍक्सेप्त... सगळे फॅमिली मेम्बर तिथे आहेत...
सिग्नल पण वापरून बघू...

>>गोळा केली जाणारी माहिती फक्त लोकांच्या आवडी-निवडी, गरज, आर्थिक स्तर, रहाण्याचं ठिकाण इत्यादि नुसार त्यांना जाहिराती दाखविणे एवढ्या करताच होतो, की अजून कसा होतो, त्याचा गैरवापर होऊ शकतो का? केला गेला आहे का?
होऊ शकण्याचा संभाव्य धोका आहे का?<<
हो, हो, आणि हो. फेसबुकचाच ईतिहास तपासा. कारण होतं काय, तुम्ही देता परमिशन (एक्स्प्लिसिटली/इंप्लिसिटली), त्यांना कळतं तुम्हि कोण आहात ते इ. पण ते तुम्हाला सांगत नाहित त्यांचे पेट्रन कोण आहेत, डेटा कोणाला दिला जाणार आहे. तुमचा डेटा कोणत्या संस्थेला/कंपनीला मूळात दिला जाउच नये याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाहि. तुम्ही वर दिलेली दोन्हि उदाहरणं प्रत्य्क्षात घडतात. तिसरं डेंजरस उदाहरण म्हणजे आता रिक्रुटिंग कंपन्या सुद्धा सोशल मिडियाला अ‍ॅप्रोच करतात, किवर्ड्स शोधण्याकरता. हे पुरेसं आहे का पायाखालची जमीन सरकवायला... Wink

छान चर्चा सुरु आहे. या निमित्ताने काही तांत्रिक बाबींचा हि उहापोह झाला आणि माहिती मिळाली जे कि या चर्चेचे बायप्रॉडक्ट म्हणता येईल.
बहुतांशी जनतेला पडलेला प्रश्न हा आपला डेटा फेसबुक कसा वापरणार? जाहिराती दाखवायाला कि कुठल्या इतर संस्थेला त्यांचे व्यावसायिक धोरण ठरवायला अथवा त्यांच्या वस्तू/सेवा विकायला? इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण एकदा का हा डेटा फेसबुक कडून दुसऱ्या कंपनी ला दिला गेला कि फेसबुक चे त्यावरील अधिकार संपतील आणि ती संस्था तिचा वापर कसा करेल हे संपूर्ण पणे त्या संस्थेच्या आधीन असेल. त्या माहितीचा गैरवापर होणार नाही ह्याची नैतिक जबाबदारी फेसबुक घेते का?

हा प्रश्न जगातल्या कुठल्याही माहिती गोळा करणाऱ्या आणि साठवणाऱ्या ऐप ला विचारला जायला हवा.

जाहिरातींशिवाय व्हॉट्सॅपकडे असलेल्या माहितीचा सरकारकडुन दुरुपयोग होऊ शकेल का अशी शंका मनात येते. लॉ एन्फोर्समेन्ट एजन्सीज अधिकृत रित्या कंपन्यांवर दडपण आणुन त्यांच्याकडची माहिती हस्तगत करु शकतात. >> हि शंका अगदी रास्त आहे. या धाग्यावर अजून केम्ब्रिज अनेलटिका प्रकरणाचा मुद्दा कसा चर्चेत आला नाही. तो याच विषयाशी संबंधित आहे.

सो त्या दिशेने विचार कार्याला आपल्याकडे उदहारण ऑलरेडी आहे.

>>...ह्याची नैतिक जबाबदारी फेसबुक घेते का?<<
फेसबुकच्या स्टेटमेंटनुसार आता ते डेटा फिजिकली ट्रांसफर करत नाहित, शेअर करतात (थर्ड पार्टी अ‍ॅक्सेस टु डेटाबेस), पुर्वि करायचे ज्याचा उल्लेख तुम्ही वर केलेला आहे. तरिहि इन्वेजन ऑफ प्रायवसी हा मुद्दा उरतोच...

प्रायव्हसी व्यक्तीसापेक्ष आहे. ज्याची मला चिंता असेल कदाचित इतर कोणाला नसेल आणि व्हाईस अ व्हर्सा. >>> मानव यांच्या प्रतिसादातले हे वाक्य मिलियन डॉलरचे आहे या धाग्यावर. प्रचंड आवडले आहे.

व्यत्यय, राज धन्यवाद.
इट इज स्केअरी.

मी माझ्यापरीने काळजी घेत असतो, कुठल्याही ऍपला गरज नसलेली परवानगी न देणे, त्याशिवाय ते चालतच नसेल तर डिलीट करणे. प्रत्येक ऍपच्या इतर परवानग्या तपासून गरज नसलेल्या परवानग्या नाकारणे. लोकेशन परवानगी गरज असेल तेव्हा सुरू करून नंतर बंद करणे (उदा. उबर, ओला), युट्युब गुगलसाठी वेगळे अकाउंट वापरणे वगैरे.
मला माहिती आहे की हे काही पूरेसे नाही, कुठून कशी माहिती जात असेल सांगता येत नाही.
पण म्हणुन स्वतःहुन सगळ्या परवानग्या देऊन त्यांचे काम सोपे आणि पॉलिसीज एक्सेप्ट करून ते वरून कायदेशीर तरी का करावे?

जर दुसरे पर्याय असतील तर ते वापरावे जसे की सिग्नल ऍप.
माझ्या यादीतील बरेच जण सिग्नल वर येत आहेत. बघतोय व्हॉट्सऍपला रामराम ठोकणे शक्य होईल का ते.

इथले किती मान्यवर, जेव्हा कोणत्याही प्रकारच्या टर्म्स आणी कंडिशन समोरच्या बॉक्स मधे टिक करायची वेळ येते तेव्हा इमाने इतबारे ते पुर्ण वाचुन स्मजुन व त्याचे आकलन करुनच टिक करतात. ( खाओ अपणे दिळपें हाथ्थ रखके क्सम......इब ते जुठ्ठ किस खात्तिर बोलण लागर्‍या)

Arnab Goswami's 500 Page Alleged WhatsApp Chat With Former BARC CEO Leaked On Social Media >> पण end to end encryption मधे असे मेसेजेस लीक होणं कसं शक्य आहे.. बॅकअप मधून लीक झाला असावा का?

Pages