व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>म्हणून signal वापरून बघणार आहे.<<
नविन अकाउंट्/रजिस्ट्रेशन अजुन केलं नसेल तर एक टिपः

सिग्नलचा एक अ‍ॅडवांटेज हा कि ते फोन नंबर घेतात, पण तो सेलफोनचाच असायला हवा हि सक्ती नाहि; विओआयपि (उदा: गुगल वॉइस) नंबर सुद्धा चालेल. हा नंबर केवळ रजिस्ट्रेशन करताना वेरिफिकेशन साठी वापरला जातो. तुम्ही सेलफोन ऐवजी, विओआयपि नंबर दिलात तर सर्वेलंसची समस्या उद्बवणारच नाहि...

धन्यवाद..
विओआयपि ने सुद्धा सेटअप करू शकतो हे माहीत नव्हतं.. घरातील इतर मंडीळींनी अजून रेजिस्ट्रेशन केलेलं नाहीए.. त्यांचं रेजिस्ट्रेशन विओआयपि वापरून करून बघेन.

सर्वांचे वेळोवेळी उत्तेजना देणारे प्रतिसाद बघुन खुप छान वाटल आणि अजुन प्रतिसाद लिहिण्यासाठी हुरुप आला. त्याबद्दल सर्वांचे आभार.

सद्ध्या कार्यमग्नतेमुळे सर्वांनाच किंवा सर्व प्रतिसादांनाचा उत्तर देता येणार नाही (तस नंतर करायचा आत्ता तरी मानस आहे).
तरी जे मला महत्वाचे वाटले त्यांना उत्तर देतो.

(डिस्केमरः कुणाचाही इथे अपमान करायचा उद्देश नाही. जर कुणाला काही भाग तसा वाटला तर त्यांनी तो माझ्या या मिडियम वरील संवाद कौशल्याचा अभाव समजुन सोडून द्यावा ही विनंती)
@ राज
>> गुड क्वेश्चन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्चं अंडरपिनिंग कॉज आणि कार्य सच्चं असेल तर देणग्या मिळतात. शिवाय ते स्पर्धेत टिकुन हि रहातात. सिग्नल या कसोटिला उतरली तर पैशाचा प्रश्न निकालात निघतो. देणग्यां व्यतिरिक्त रॉयल्टि (टेक नो-हौ) हि सुद्धा एक स्टेडि रेवेन्यु स्ट्रीम असु शकते
एक मिनिट थांबा हा प्रश्न निकालात काढायच्या आधी इथेच Happy
माझ्या मते हे ओव्हर सिम्लिफिकेशन आहे. आता मला तुम्ही (आणि या चर्चेत सहभागी झालेल्याझालेल्या) सांगा की तुम्ही विकिपेडियाला आत्ता पर्यंत किती वेळा आणि किती किती देणगी देलेली आहे? बर विकिपेडिया जाऊ देत, ईतर कुठल्या ओपन सोर्स ला दिलेली आहे?
(बोले तो सिंपल मराठी मध्ये पुटिंग योर मनी व्हेअर योर माऊथ इज :प)
चला मी सांगतो, मी गेल्या दहा वर्षात ७-८ वेळेला पंचवीस-पन्नास-शंभर करुन साधरणपणे ३००-४०० डॉलर्स दिलेले आहेत. हे मी स्वतःची टिमकी वाजवायची म्हणून नाही सांगत. ईन फॅक्ट मी जितके पैसे घातले त्याच्या कितीतरी अधिक पट व्हॅल्यु मला विकिपेडियाने वेळोवेळी दिलेली आहे आणि देत राहील. मुद्दा हा की तुमच्या कसोटीला विकिपेडिया तर खरा उतरतो याबद्दल कुणाच दुमत असु नये बरोबर? मग वेळोवेळी जेव्हा तो जिमि वेल्स पैशासाठी आवाहन करत असतो तेव्हा किती लोक स्वतःच्या खिशात हात घालतात? त्यातले भारतातील किती लोक असतील अस तुम्हाला वाटत?
"शिवाजी व्हावा पण दुसर्याच्या घरात" याप्रमाणे बरेचसे लोक हे बोलतात पण वेळ आली की डोनेट करत नाहीत. चला तुम्ही देणगी दिलेली असेल पण तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये किती लोकांनी दिलेली असेल अस तुम्हाला वाटत? याचा प्रत्येकानी स्वतःशीच प्रामाणिकपणे विचार करुन बघायचा आहे. मग हे जे सगळे लोक घोड्यावर स्वार होउन आपापल्या मित्रांना नातेवाईकांना सिग्नल वर घेऊन जात आहेत ते त्यांना तुम्हाला या प्लॅटफॉर्मला तुम्हाला वेळोवेळी देणग्या द्याव्याच लागतील असे सांगत असतील का? सगळे जण "चला हा नॉन प्रॉफिट प्लॅटफॉर्म आहे जो देणग्यांवर चालेल मला काय त्याच?" अस म्हणून जबाबदारी झट्कून टाकेल अस व्हायची शक्यता किती आहे?

वर @म्हाळसा ताईंनी सिग्नल चा स्क्रीनशॉट देणग्यांसाठीचा टाकला आहे. फार तर फार काही लोक सुरुवातीला देणग्या देतील. पण नियमितपणे न विसरता कोण करेल अस वाटत?

फार लांब कशाला, किती लोकांनी मायबोलीला देणगी दिलेली आहे आत्तापर्यंत?
(मी तरी कधीच नाही. शेवटी त्यांनीही जाहीराती सुरु केल्याच ना? मग मायबोली तुमचा डेटा चोरते म्हणायच आहे का तुम्हाला?)

म्हणून मी म्हणतो की हे ओव्हर सिम्लिफिकेशन आहे.

>> खर्च म्हणाल तर, हल्ली कोणिहि स्वतःचे डेटा सेंटर्स बाळगत नाहित. क्लाउड कांप्युटिंग लागेल तशी, तेव्हढि, तेंव्हा स्केलेबिलिटि (अप, डाउन; इन, आउट) पुरवते. सिग्नल सारख्या कंपनीचा कॅपेक्स नगण्य, आणि आपेक्स मिलियन डॉलर्स मधे असावा; बिलियन नाहि. तेव्हढा ज्युस मिळवणे, इज नॉट ए बिग डील.

आय वुड से ईट ईज अ बिग डिल! ईफ नॉट प्रुव मी राँग विथ अ‍ॅक्च्युअल नंबर्स फ्रॉम जेन्युईन रिसोर्सेस (म्हणजे रीसर्च पेपर्स किंवा तुमच स्वतःच ओरिजिनल अ‍ॅनॅलिसिस सायटिंग रिलायेबल रिसोर्सेस. उगाच एन डी टी वी किंवा लोकसत्तेचे कुणी सो कॉल्ड भारतातले आंतरराष्ट्रीय एक्स्पर्ट यांचे सेकंड हॅन्ड अ‍ॅनॅलिसिस -- ज्या ईतक्या जाहीरती भरलेल्या आहेत की पेज लोड व्हायलाच वेळ लागतो -- नकोय)
ही अशी "असावा" "नसावा" "असेल" "नसेल" अस नको. हे मी लिहित आहे कारण क्लाऊड प्रोव्हायडची कॉस्ट एक्झॉर्बिटंट असते (एस्पेशली जसजशी स्केल वाढत जाते तशी).

>> >>स्वगत: मला आता प्रायव्हसी या विषयावर एक लेख (किंवा लेखमाला) लिहावी लागणार बहुदा.<<
लिहा. इट सीम्स व्हेरी फ्यु केअर अबौट प्रायवसी, अँड पोटेंशियल इंपॅक्ट ड्यु टु लॅक ऑफ इट. एक चांगलं प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिलंत तर डोक्यात कदाचित प्रकाश पडेल... Wink

या सुचनेला त्रिवार अनुमोदन. चांगलं प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहाच आणि "प्रायव्हसी वर्सेस कन्विनियंस" मॉडेल पण चांगल क्लियर कराच!

@रीया ताई तुमचा प्रश्न मला तितकासा नीट कळला नाही. मी भारतातले पेमेंट प्रोसेसिंग कधीच वापरले नाहीये म्हणुन मला तितकिशी माहीती नाही. प्लिज तुम्ही थोडी अजुन बॅकग्राऊंड द्याल का?

@ व्यत्यय मी खाली जे लिहिणार आहे ते कदाचित तुम्हाला कॉन्ड्सेंडिग वाटेल पण तस नाहीये:
>> ओपन सोर्स डेव्हलपमेंट मॉडेल तांत्रिक दृष्ट्या उच्च दर्जाची प्रॉडक्ट्स का बनवु शकते या साठी एरिक रेमंड यांचा "The Cathedral and the Bazaar" हा निबंध मुळातुन वाचण्यासारखा आहे.
मी हा निबंध २००० च्या आसपास वाचला होता आणि तुमच्या सारख्याच भाबड्या आशावादानी प्रेरित झालेलो होतो एके काळी. मधल्या वीस वर्षात पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेले आहे. तुम्ही जसजशी सॉफ्टवेअर क्षेत्रात अधिक वर्षे काढाल तसेतसे तुम्हाला यातला भाबडेपणा का आणि कसा आहे हे कळू लागेल ही आशा.

>> "Given enough eyeballs, all bugs are shallow" हे या लेखातलं वाक्य खुप प्रसिद्ध झालं.
सर्व सॉफ्टवेअर क्षेत्राला हादरवून टाकणारा हार्ट ब्लीड बग हा एका ओपन सोर्स प्रोजेक्ट मध्येच ४-५ वर्षे तसाच होता आणि फारच साधा होता.
तुम्ही जे ओपन सोर्स ओपन सोर्स करत आहात त्याच दैवत (वन ऑफ द मेनी) लायनस टोरव्हाल्ड्स स्वतः म्हणतो की मी ओपन सोर्स किंवा क्लोज सोर्स पेक्षा "युजिंग राईट टुल फॉर द राईट जॉब" याला प्राधान्य देतो!

>> धंदेवाईक कंपन्यांची (फेसबुक, गुगल, माय्क्रोसॉफ्ट, अ‍ॅमॅझॉन अ‍ॅप्पल इ.) मोनोपॉली मोडुन काढण्यासाठी बाजारात उत्तम पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे.
या "धंदेवाईक कंपन्यांना" ओपन सोर्स प्रॉडक्ट्स पर्याय निर्माण होणे निव्वळ अशक्य आहे. म्हणुन म्हणतो की अजुन थोडा अनुभव घेतल्यावर तुम्हाला ही गोष्ट कळेल.

>> व्हॉट्सअ‍ॅपमुळे तुमच्या फोनवरच्या आर्थिक माहितीला धोका आहे ही अफवा मला गढीच्या बुडात असलेल्या खजिन्याच्या माहीतीसारखी वाटते. Happy
धिस इस अ डेस्पिकेबली डिसईंज्युनियस अ‍ॅटिट्युड!

>> Of all the biggies I have zero trust in Facebook.
मला हा @जिज्ञासा ताईंचा ईश्यु जेन्युईन वाटतो आणि याला प्रत्येकानीच आपापल्या परीनी उत्तरे शोधायची आहेत. पण फेसबुक किंवा गुगल किंवा अ‍ॅमेझॉन ई कंपनीवर विश्वास ठेवावा का नाही हे खरे प्रश्न आहेत. याविषयी मी अजुन सविस्तर जसा वेळ मिळेल तसे लिहिन.

@रानभुली तुमचा डेटा कुठुन तरी दुसर्या कुणीतरी मिळवला आणि तुम्हाला त्याचा त्रास झाला. तो झालेला त्रास पुर्णपणे मान्य. पण तुम्ही स्वतःच विचार करुन बघा की तुम्ही वड्याच तेल वांग्यावर तर नाही ना काढत आहे?
तुम्हाला मी वारंवार नक्की काय ईश्यु आहे हे तुमच्या शब्दात विचारत होतो कारण की बरेच वेळेला आपले काही गैरसमज किंवा बायेसेस आपण जेव्हा दुसर्याला सांगतो किंवा लिहुन काढतो तेव्हा आपले आपल्यालाच समजतात. दुर्दैवानी तुम्ही लिहिलेली मोठ्ठी पोस्ट मला तरी अजुनच कन्फुज करून गेली. फिजिसिस्ट रिचर्ड फाईनमन म्हणतो तस तुम्ही सोप्या शब्दात तुमचा प्रॉब्लेम नीट सांगितला (बाहेरच्या लिंक्स ची मदत न घेता) तर बरे होइल.

>>म्हणून मी म्हणतो की हे ओव्हर सिम्लिफिकेशन आहे.<<
असं तुम्ही म्हणतांय, कारण तुम्हाला वाटतंय कि तुमच्या सारख्यांनी देणगी दिली नाहि तर नॉट-फॉर-प्रॉफिट संस्था चालणार नाहित. बट रियॅलिटि इज डिफरंट. तुमचंच विकिपिडियाचं उदाहरण घ्या; मी विकि सहसा वापरत नाहि, डोनेशन दिलेलं नाहि. डिस्पाइट दॅट, आय थिंक दे आर स्टिल इन बिझनेस. वंडर व्हाय?..
बाय्दवे, मी गेल्या वर्षी सिग्नलला साइन-अप केलं तेंव्हा डोनेशनचा बॅनर न्हवता, हा दोन-चार दिवसांतल्या स्पाइकचा परिणाम असावा. थँक्स टु मस्क?! धिस एसओबि नेवर डिसअपाँय्ट्स... Proud

>>आय वुड से ईट ईज अ बिग डिल!<<
बर्डन इज ऑन यु, सिंस यु आर रफुय्टिंग माय पॉइंट. Wink बरेच फॅक्टर्स इथे ध्यान्यात घ्यायला हवेत. बट आय वोंट डेल्व इन्टु देम राइट अवे. मी म्हणतोय आपेक्स इज इन मिलियन डॉलर्स, तुम्ही म्हणतांय बिलिय्न. फेअर इनफ; शो मी द नंबर्स. सिग्नल नॉट-फॉर-प्रॉफिट असल्याने त्यांची बॅलंस शीट, टॅक्स फाइलिंग शुड बी अ‍ॅवेलेबल. पेनी फॉर योर थॉट्स...

तुर्तास एव्हढंच, वर व्यत्यय यांनी वॅलिड पॉइंट्स आणले आहेत; विल चाइम इन लेटर...

(माझे २ सेंट्स - १. इवन इन क्रायसेस, सिग्नल वुड सर्वाय्व ऑर इव्हन फ्लरिश, इफ दे फॉलो माझिला मॉडेल.
२. रीड मोर अबौट माझिला, अपाची...)

योगेश २९
मी हा धागा सोडून दिला आहे. आज सकरसंक्रांत आहे. तुम्हाला शुभेच्छा !
मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही माझा प्रतिसाद तुकडे पाडून प्रत्येक वाक्याचे संदर्भ घालवत त्याला उत्तर दिले. त्या आधी माझे याच धाग्यावरचे आधीचे प्रतिसाद वाचले होते का ? चोरी कसली झाली हा प्रश्न तुम्ही का विचारत होता ? शक्य झाले तर आधीचे प्रतिसाद वाचा आणि मग तुम्ही दिलेला प्रतिसाद वाचा. यापेक्षा जास्त इथे लिहीण्यात मला स्वारस्य नाही. ( फेक आयडीज किंवा मी मायबोली मागे सोडली तेव्हां शिवराळ आयडीं सोबत इथल्या काहींना त्रास देणारी एक महिला आयडी यांनी इथे येऊन ट्रोल म्हणावे आणि तरी या धाग्यावर रहावे इतकी काही वाईट परिस्थिती नाही आलेली). रिंग करून दुर्लक्ष करण्याच्या दिलेल्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आभार.

>> असं तुम्ही म्हणतांय, कारण तुम्हाला वाटतंय कि तुमच्या सारख्यांनी देणगी दिली नाहि तर नॉट-फॉर-प्रॉफिट संस्था चालणार नाहित. बट रियॅलिटि इज डिफरंट. तुमचंच विकिपिडियाचं उदाहरण घ्या; मी विकि सहसा वापरत नाहि, डोनेशन दिलेलं नाहि. डिस्पाइट दॅट, आय थिंक दे आर स्टिल इन बिझनेस. वंडर व्हाय?..

थॅन्क्स फॉर प्रूविंग माय पॉईंट Happy

>> बर्डन इज ऑन यु, सिंस यु आर रफुय्टिंग माय पॉइंट. Wink बरेच फॅक्टर्स इथे ध्यान्यात घ्यायला हवेत. बट आय वोंट डेल्व इन्टु देम राइट अवे. मी म्हणतोय आपेक्स इज इन मिलियन डॉलर्स, तुम्ही म्हणतांय बिलिय्न. फेअर इनफ; शो मी द नंबर्स. सिग्नल नॉट-फॉर-प्रॉफिट असल्याने त्यांची बॅलंस शीट, टॅक्स फाइलिंग शुड बी अ‍ॅवेलेबल. पेनी फॉर योर थॉट्स...

सो मी समजतो की आपण या हायपोथेटिकल सिनॅरिओ बद्दल बोलतोय की भारतातले सगळे लोक ज्यांच्या कडे आत्ता व्हॉट्सॅप आहे ते सिग्नलला स्विच करतील (कारण की विदाऊट डीप पेनीट्रेशन असा मेसेंजर काय कामाचा ज्यावर तुम्हाला हवे असलेले लोकच नाहीत?). आता मी जे क्लाऊडचे स्केल ईश्युज बोलतोय ते त्या स्केलसाठी. असे स्केल इश्युज असणार्या मोठ्या कंपनीजचा डेटा मिळणे अवघड असते कारण की कॉन्फिडेन्शियल असतो. पण लिफ्ट (जे की सिग्नल सारखे रिअल टाईम अ‍ॅप आहे) नी मध्यंतरी त्यांचा आयपीओ फाईल केला त्यात त्यांचे दरवर्षीचे क्लाऊड एक्स्पेंडिचर १०० मिलियन डॉल्र्स आहे. लिफ्ट फक्त एकाच देशात चालते आणि त्यांचे जेमतेम तेवीसच मिलियन कस्ट्मर्स आहेत.
("In January 2019, we entered into an addendum to our commercial agreement with AWS, pursuant to which we committed to spend an aggregate of at least $300 million between January 2019 and December 2021 on AWS services."
फ्रोमः https://www.sec.gov/Archives/edgar/data/1759509/000119312519059849/d6335...)

विचार करा की भारतातले मेजॉरिटी व्हॉट्सॅप वाले जर सिग्नलला स्विच झाले तर किती मोठी स्केल असेल.
आता तुम्ही द्या नंबर्स ...

>> (माझे २ सेंट्स - १. इवन इन क्रायसेस, सिग्नल वुड सर्वाय्व ऑर इव्हन फ्लरिश, इफ दे फॉलो माझिला मॉडेल.
२. रीड मोर अबौट माझिला, अपाची...)

निदान माझिलाच तरी उदाहरण देऊ नका. तोट्यात चालली आहे. मध्यंतरी त्यांनी २५० लोकांना काढुन टाकल.

योगेश२९, तुमचे विचार मला पटतायत. ओपन सोर्स ला देणग्या देणार्‍यांचं प्रमाण माझ्या ओळखीत तरी नाहीये.
प्रत्येक गोष्ट चालवायला एक किंमत लागते. ती किंमत जर देणग्या कमी पडत असतील तर स्वतःच्या खिश्यातून घालत राहण्याची इच्छा आणि क्षमता लागते.

[सिग्नल हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेयर आहे. ओपन सोर्स प्रॉडक्ट्स, स्वयंसेवकांच्या दानामुळे (श्रम + पैसे) चालतात. कित्येक दशकांच्या कालावधीत शेकडो ओपन सोर्स प्रॉडक्ट्सनी हे मॉडेल यशस्वी होऊ शकते हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे.]

हेच लिहिण्याचा विचार करत होतो, व्यत्यय यांनी लिहून टाकले त्या बद्दल आभार.

ओपन सोर्स चे सगळ्यात चांगले मोडुल म्हणजे द्रुपल सगळ्यांना समजेल असे, मराठी वेबसाईट त्यावरच आधारित आहेत, दुसरे उदा. वर्ड प्रेस. अशी शेकडो आहेत.

योगेश,
माहितीपूर्ण विश्लेषण आहे, लिहिते राहा.

राज. व्यत्यय काय म्हणतात हे समजायला इथल्या लोकांना १० जन्म घ्यावे लागतील. सगळ्या जगात क्राऊड फंडींग ने चाललेले उपक्रम सुरू आहेत.
सर्वात मोठे डोनर वॉरेन बुफे आहेत. त्यांनी त्यांची सर्व संपत्ती दोन वेळा दान केली होती. ते पुन्हा श्रीमंत झाले. बिल गेट्स यांनी त्यांची संपत्ती दान केली होती.
भारतात अझिम प्रेमजी यांनी पण ७०% संपत्ती दान केली होती.
आदर पूनावाला अशी उदाहरणे आहेत.
मला नाही वाटत म्हणत काही पण ग्यान झाडावं आणे बोकीच्यांनी त्याचं भजन करा.

>> मी हा निबंध २००० च्या आसपास वाचला होता आणि तुमच्या सारख्याच भाबड्या आशावादानी प्रेरित झालेलो होतो एके काळी. मधल्या वीस वर्षात पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेले आहे. तुम्ही जसजशी सॉफ्टवेअर क्षेत्रात अधिक वर्षे काढाल तसेतसे तुम्हाला यातला भाबडेपणा का आणि कसा आहे हे कळू लागेल ही आशा.

मुळ मुद्द्यांचा अजिबात प्रतिवाद न करता तुम्ही ही जी बगल दिली आहे त्यामुळे तुमचा प्रतिसाद तुमच्याच भाषेत सांगायचं तर कंडेसेंडींग झाला आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात मी २३ वर्ष काढली आतापर्यंत. त्यातली २२ ओपन सोर्स वापरत काढली Proud अर्थात अजुनही शिकतोच आहे.
माझा अनुभव असा आहे की गेल्या २० वर्षात ओपन सोर्स अक्षरशः फोफावलंय. मोठ्मोठ्या कंपन्या आपली प्रॉडक्ट्स ओपन सोर्स करताहेत. TensorFlow (Google) पासुन ते Cassandra (Facebook) आणि .Net (Microsoft) पर्यंत. अर्थात तुम्ही किंवा mi_anu सारख्या तज्ञांना हे नक्कीच माहीत असणार. मी ही नावं फक्त इथल्या टेक्निकल नसणार्‍या लोकांसाठी लिहित आहे. तसंच लहान फक्त Community driven ओपन सोर्स प्रॉडक्ट्स देखिल भरपुर आहेत.

मी म्हणतोय की विमान हवेत उडतं. तुम्ही म्हणाताय जड विमान, तेदेखिल माणसं आणि सामान भरलेलं हवेत उडेल अशी आशा करणं हा भाबडेपणा आहे. मी म्हणतोय की फक्त नजर उचलुन वर आकाशात बघा आणि तुमची शंका फिटेल. अक्षरशः शेकडो ओपन सोर्स प्रॉडक्ट्स आपल्या आजुबाजुला प्रत्यक्ष्/अप्रत्यक्ष रित्या वापरात आहेत, तुम्ही फक्त दखल घेण्याची गरज आहे. ज्यांना ओपन सोर्स बद्दल ओ की ठो काहीही माहीत नाही असेही लोक 7-zip, VLC, Notepad++, FireFox वगैरे आनंदाने वापरत असतात. डेव्हलपर्स साठी तर Java, PHP, Python, Eclipse, Git, Jenkins, Docker, Kubernetes, MySQL, Selenium आणि अनेकानेक कित्येक टुल्स ओपन सोर्स (आणि कमर्शिअलही) पॉप्युलर आहेत.

अशी शेकड्याने उदाहरणे असुनही तुम्हाला त्यामागचा कार्यकारणभाव उमगत नसेल तर तो ओपन सोर्सचा प्रॉब्लेम नाही. सुदैवाने कोणी विश्वास नाही ठेवला तरीही विमानं उडतंच रहातात आणि ओपन सोर्स फोफावतंच रहातं Proud

बिटकॉन पण ओपन सोर्स आहे. आता हे म्हणतील की क्रिप्टो करंसी वेगळं आणि व्हॉटस ऐप वेगळं. त्यांना पब्लिकला काय सांगायचंय यात इंटरेस्ट नाही. त्यांना म्हणणे खोडून काढणे आणि पॉईंट प्रूव करणे हवंय. ज्याला मीच शाना म्हणतात.

ओपन सोर्स ब्लॉक चेनने पुढे ऑनलाईन निवडणूक घेतील. आधाराचा डेटा कनेक्ट होईल.
ते जसजसे व्यापक होईल तसतसे रेवेन्यू मिळेल. काही सेवा तशा फ्री होतील. जसे मेसेंजर. त्यात डेटा चोरणे अशक्य असेल.

मला सांगा एक गोष्ट मगः
- लिनक्स हे ओपन सोर्स. सॉफ्टवेअर घेउन रेडहॅट ही कमर्शियल कंपनी का. उभी राहीली?
- गिट हे ओपन सोर्स. सॉफ्टवेअर घेउन गिटहब ही कमर्शियल कंपनी का. उभी राहीली?
- बिटकॉईन हे ओपन सोर्स. सॉफ्टवेअर घेउन कॉईनबेस ही कमर्शियल कंपनी का. उभी राहीली?

ह्या कंपन्या नक्की काय करत आहे जे ओपन सोर्स नाही करत आणि लोक त्यांना नक्की कशासाठी पैसे देत आहेत?

डेवलपमेंट मॉडेल ओपन सोर्स असणे वेगळे आणि कंपनी चालवणे वेगळे. तसे तर गुगल, फेसबुक आणि अ‍ॅमेझॉन पासुन कित्येक कंपन्या सॉफ्टवेअर ओपन सोर्स करतच आहेत की.

@मी अंबादानी मालक तुमचा
>> व्यत्यय, ते सर्वज्ञ आहेत. त्यांना काय गरज इतरांकडून ज्ञान घ्यायची?

सगळी खुंदक घ्या एकदाची काढुन.
सात तासांपुर्वी त्यासाठीच आयडी तयार केलाय ना? :ड

>> ओपन सोर्स ब्लॉक चेनने पुढे ऑनलाईन निवडणूक घेतील. आधाराचा डेटा कनेक्ट होईल.

म्हणजे नक्की काय होइल? नीट समजावून सांगा न जर तुम्हाला समजलय तर?
का हे कुणा लोकसत्तेनी ठरवलेल्या भारतातील आंतरराष्ट्रिय एक्स्पर्ट च मत आहे?

एनीवे चचा भरकटतीये.

- माझा ओपन सोर्स ला विरोध नव्हता आणि नाहीये. ऊलट तिथे जी डेव्हलमेंट होते ती. कित्येक कंपनीत वापरली जाते. पण त्याचा अर्थ ते मॉडेल कमर्शियल सेवा देणारे कंपनीज उभ्या नाही करु शकत.
- बिट्कॉईन आणि ब्लॉकचेन वगैरे कशाला मध्ये आणत आहात. त्याचा काय संबध?

आपण प्लीज मुळ मुद्द्याकडे येउ.

>> बिटकॉन पण ओपन सोर्स आहे. आता हे म्हणतील की क्रिप्टो करंसी वेगळं आणि व्हॉटस ऐप वेगळं.
आणि हो ते वेगळेच आहे. आता तुम्ही नक्कीच ट्रोलिंग करत आहात आणि नाव फेकुन स्मार्ट आहे अस दाखवण्याचा. प्रयत्न करत आहात.

>> राज. व्यत्यय काय म्हणतात हे समजायला इथल्या लोकांना १० जन्म घ्यावे लागतील. सगळ्या जगात क्राऊड फंडींग ने चाललेले उपक्रम सुरू आहेत.
>> सर्वात मोठे डोनर वॉरेन बुफे आहेत. त्यांनी त्यांची सर्व संपत्ती दोन वेळा दान केली होती. ते पुन्हा श्रीमंत झाले. बिल गेट्स यांनी त्यांची संपत्ती दान केली होती.
>> भारतात अझिम प्रेमजी यांनी पण ७०% संपत्ती दान केली होती.
>> आदर पूनावाला अशी उदाहरणे आहेत.
>> मला नाही वाटत म्हणत काही पण ग्यान झाडावं आणे बोकीच्यांनी त्याचं भजन करा.

जोरदार गोळीबार चालला आहे. बेटा क्या तुमने व्हाट्सॅप युनिव्हर्सिटी से डिग्री ली है?
चालु दे चालु. दे, एक्दाची सगळी खुंदक घ्या काढुन. आणि प्लीज अर्धवट माहीती वर काहीतरी पसरवु नका.

>> डेवलपमेंट मॉडेल ओपन सोर्स असणे वेगळे आणि कंपनी चालवणे वेगळे.
मुळात सिग्नल ही नॉन-प्रॉफिट संस्था आहे त्यामुळे त्याची रेडहॅट सारख्या फॉर-प्रॉफिट कंपनीबरोबर तुलना करणे चुक आहे. फार तर डेबिअन बरोबर तुलना करा आणि बघा.
ओपन सोर्स लिनक्सभोवती रेडहॅटने एक बिझनेस मॉडेल शोधुन काढलं आणि एक फॉर-प्रॉफिट कंपनी उभी केली. त्याने मुळ लिनक्सला फायदाच झाला. उद्या सिग्नलभोवती जर तुम्हाला छान बिझनेस मॉडेल सापडलं आणि तुम्ही वेगळी फॉर-प्रॉफिट कंपनी उभी करायचं म्हटलं तर तुमचंही स्वागतच आहे.

का हे कुणा लोकसत्तेनी ठरवलेल्या भारतातील आंतरराष्ट्रिय एक्स्पर्ट च मत आहे? >>> हा मी एका प्रतिसादात उल्लेख केला होता. तो फेक आयडीला का जोडलाय ? सकाळी मी तुम्हाला सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक प्रश्न विचारला. त्याला बगल देऊन हे उपद्व्याप कशाला ? मला ना ओपन सोर्स माहीत ना ब्लॉकचेन. मी फक्त त्या इसमाने फेसबुक कसे चोरी करते हे एक्स्प्लेन केले इतकेच सांगितले आहे.
आणि त्यांना लोकसत्तेने आंतरराष्ट्रीय एक्स्पर्ट नाही ठरवले. तो उल्लेख सहन झाला नसेल तर तेव्हांच सांगितलं असतं तर एडीट केला असता. आता अ‍ॅडमिनना सांगा.
ते आंतरराष्ट्रीय एक्स्पर्ट आहे हे ना मी न ठरवलंय ना लोकसत्तेनी. तुम्ही हुषार आहात. गुगल सर्च केल्यावर तुम्हाला कळेलच. सणाचा दिवस आहे. इतकेच.
मला पुन्हा इकडे लिहायला लावू नये ही विनंती. माझ्याबद्दल गैरसमज होतील असे प्रतिसाद टाळा. (आणि दिले तरी फरक पडत नाही).

How it started:
>> ओपन सोर्स डेव्हलपमेंट मॉडेल तांत्रिक दृष्ट्या उच्च दर्जाची प्रॉडक्ट्स का बनवु शकते या साठी एरिक रेमंड यांचा "The Cathedral and the Bazaar" हा निबंध मुळातुन वाचण्यासारखा आहे.
मी हा निबंध २००० च्या आसपास वाचला होता आणि तुमच्या सारख्याच भाबड्या आशावादानी प्रेरित झालेलो होतो एके काळी. मधल्या वीस वर्षात पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेले आहे. तुम्ही जसजशी सॉफ्टवेअर क्षेत्रात अधिक वर्षे काढाल तसेतसे तुम्हाला यातला भाबडेपणा का आणि कसा आहे हे कळू लागेल ही आशा.

How it's going now:
डेवलपमेंट मॉडेल ओपन सोर्स असणे वेगळे ......
माझा ओपन सोर्स ला विरोध नव्हता आणि नाहीये. ऊलट तिथे जी डेव्हलमेंट होते ती. कित्येक कंपनीत वापरली जाते.

हे ही नसे थोडके Happy

जोरदार गोळीबार चालला आहे. बेटा क्या तुमने व्हाट्सॅप युनिव्हर्सिटी से डिग्री ली है?
चालु दे चालु. दे, एक्दाची सगळी खुंदक घ्या काढुन. आणि प्लीज अर्धवट माहीती वर काहीतरी पसरवु नका. >>> तुम्हाला ही माहिती नाही Lol

इथे कुणीही शहाण्या माणसाने सांगावं की ही माहिती व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीची आहे. बेटा क्या आपने सॉफ्टवेअर इंजिनीयर नाम की कोई डिग्री व्हॉटस अ‍ॅप युनिव्हर्सीटीसे तो नही ली ना ? Lol
तुम्ही लॉजिकल प्रश्न विचारा तर उत्तर मिळेल. तिसरी फ वय असल्यासारखं नका करू.

व्यत्यय यांनी एका वाक्यात विकेट काढलीय तुमची.
कळलं की नाही ? Lol

लोकसत्तेनी ठरवलेल्या भारतातील आंतरराष्ट्रिय एक्स्पर्ट च मत आहे? >> Rofl
रेडहॅट, गिटहब ही उत्तम उदाहरणे दिलीत.
तुम्हाला पर्सनल वापरासाठी वर्जन कंट्रोल वापरायचा असेल तर गिट वापरा, जे ओपन आणि फुकट आणि सगळ्या सुविधांनी युक्त आहे. वन स्टेप अहेड क्लाउड बेस्ड जे टिपिकली एंटरप्राईजला लागतं आणि त्यासाठी पैसे लागतात तर तसं हवं असेल तर ते वापरायला पैसे द्या.
तसेच मेसेजिंग सिस्टिमचं होईल बहुदा. बेसिक सगळी फीचर्स (टी-१) फ्री असतील. मोअर अ‍ॅडव्हांस्ड फीचर्स (टी-२ बॅकप इ.) साठी सबस्किप्शन मॉडेल येईल. त्यात कोणी अ‍ॅडसपोर्टेड मॉडेल (टी १.५) काढेल. काही अ‍ॅडव्हांस्ड फीचर्स विथ मेटाडेटा शेअरिंग.
रेडहॅटचं ही तेच आहे. अशीच डेटाबेस इ. अनेक क्षेत्रात उदाहरणे मिळतील.

पैसे कमावणे हे अंतीम ध्येय असणारच आहे. त्याबद्द्ल दुमत असण्याचं कारणच नाही.

आता हे व्हॉअ‍ॅ ला करणं ही शक्य आहे, पण ते करणार नाहीत. कारण अ‍ॅड-बेस्ड रेव्हेन्यूचं गाजर दिसलं तर ते कुणाला सोडता सोडवत नाही. ती दुभती गाय आहे.
अ‍ॅडबेस्ड मॉडेल मला पर्सनली आवडते (रादर, अ‍ॅड मॉडेल एक्सप्लोर करणे शक्य असेल अशा स्टार्टअप मध्ये काम करायला आवडते, कारण ते युनिकॉर्न होण्याची शक्यता जास्त असते Wink ) पण अ‍ॅडसाठी किती कॉम्प्रोमाईज करावा याची मर्यादा ओलांडली की बॅकलॅश येतो.

व्यत्यय यांच्याशी सहमत.

<< अ‍ॅड-बेस्ड रेव्हेन्यूचं गाजर दिसलं तर ते कुणाला सोडता सोडवत नाही. ती दुभती गाय आहे. >>
Well said. मायबोली पण या गाजराच्या प्रेमातून सुटलेली नाही. इतर मराठी साईट जाहिराती न दाखवता तगून आहेत. योगेश यांनी या २ मॉडेलमधील फरक बघावा.

<< अ‍ॅडबेस्ड मॉडेल मला पर्सनली आवडते >> मला अजिबात आवडत नाही. माझे इतकेच म्हणणे आहे की पैसे देऊन सेवा घेण्याचा किमान पर्याय तरी लोकांना उपलब्ध असावा. असो, पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.

>> मुळात सिग्नल ही नॉन-प्रॉफिट संस्था आहे त्यामुळे त्याची रेडहॅट सारख्या फॉर-प्रॉफिट कंपनीबरोबर तुलना करणे चुक आहे. फार तर डेबिअन बरोबर तुलना करा आणि बघा.
>> ओपन सोर्स लिनक्सभोवती रेडहॅटने एक बिझनेस मॉडेल शोधुन काढलं आणि एक फॉर-प्रॉफिट कंपनी उभी केली. त्याने मुळ लिनक्सला फायदाच झाला. उद्या सिग्नलभोवती जर तुम्हाला छान बिझनेस मॉडेल सापडलं आणि तुम्ही वेगळी फॉर-प्रॉफिट कंपनी उभी करायचं म्हटलं तर तुमचंही स्वागतच आहे.

म्हणजे नक्की काय केले? अरे तुम्ही लोक साध्या सोप्य शब्दात ईतरांना कळेल अस का नाही लिहित. चुकला तर चुकल. लोक सांगतील की काय चुक आहे ते. उगाच गोल गोल फिरवण्यात काय फायदा. चला मी दाखवतो एक उदाहरण अ‍ॅनॅलॉजी देऊन. जर माझी चुक असेल तर सांगा. मी मान्य करायला एकदम तयार आहे.

(खालील उदाहरण हे समजण्यासाठी ओव्हर सिम्प्लिफाईड आहे हे लक्षात घ्या)

ओपन सोर्स म्हणजे काय?

समजा बजाज स्कुटर्स बनवते. पण त्यांचे डिझाईन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सिक्रेट आहेत. कारण त्यांना त्यातुन नफा कमवायचा आहे. आता काही ईंजिनियर्स तिथली नोकरी सोडतात. स्वतःच्या मेहनीतीने आणि पॅशन ने एक स्वतःची स्कुटर डिझाईन करतात. ती बनवतात. त्याचे डिझाईन एका पुस्तकात घालतात. पुर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसही लिहितात. आणि ते पुस्तक अप्पा बळवंत चौकात विकायला ठेवतात. आता व्यत्यय नावाचा नविन पॅशनेट ईंजिनियर जो की नुकताच ग्रॅज्युएट झालेला आहे आणि बजाज मध्ये लागलेला आहे तो त्याच्या सुपरव्हायजर कडे जाऊन म्हणतो की आपण स्कुटरच ईंजिन ४ ऐवजी ६ स्ट्रोक्स च करु त्याने गाडेचे मायलेज १०० ऐवजी २०० होइल. त्याच्या सुपरव्हायजरला ही रिस्क पसंत नाही आणि घ्यायची तयारीही नाही. तो त्याला तुला जे काम सांगितलय ते कर सांगतो. आता व्यत्यय हे फ्रस्ट्रेशन त्याच्या रुममेट बरोबर शेअर करतो. त्याचा रूममेट त्याला
अप्पा बळवंत चौकातले नविन पुस्तक सांगतो "स्कुटर बनवा घरच्या घरी". जरी व्यत्यय ईंजिन बनवण्यात एक्स्पर्ट असला तरी त्याला स्कुटर्च्या बाकी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बद्दल काहीही माहिती नाही. तो ते पुस्तक आणतो आणि त्याच्या फावल्या वेळात वाचायला लागतो. वाचता वाचता त्याला कळते की आपण आपली ६ स्ट्रोक्स ची आयडिया या स्कुटर मध्ये ट्राय करु शकतो. अर्थात हा सर्व राजी खुशी आणि फावल्या वेळेतल काम असल्यामुळे तो फक्त शनिवार रविवार किंवा सुट्टिच्या दिवशि किंवा काम संपवुन घरी आल्यावर जागुन करतो. या सगळ्यामुळे त्याला कंपनीत जे काम करयला २ महिने लागले असते त्याला हे काम करायला १६ महिने लागतात.

६-७ महिने झाल्यावर त्याचा रुममेट त्याला वेस्पा तील अजुन दोन ईंजिनियर्स अमितव आणि अंबादानी बरोबर ओळख करुन देतो. अमितव ला स्कुटरच्या बाहेरील डिझाईन बद्दल काहीतरी आयडियाज आहेत कि ज्याने तिचा विंड रेझिस्टन्स कमी होईल. अंबादानी ला अस वाटत की स्कुटरला बैलगाडीची चाक जोडली तर ती मस्त धावेल. व्यत्ययला अमितव ची आयडिया आवडते. तो म्हणतो की चल आपण एकत्र काम करु. त्याला अंबादानी च्या आयडियाज वेडगळ वाटतात कारण की त्याने स्कुटरजरी वेगात धावली तरी बसलेल्या माणसांना शॉक्स बसुन त्यांना कंफर्ट राहणार नाही. म्हणुन ते एकत्र काम करायचे नाही असे ठरवतात.

अंबादानी स्वतःच ते काम करायच ठरवतो. तो ही ते पुस्तक वाचतो. त्याला जी काय अर्धवट माहीती कळते त्या जोरावर तो काहीतरी बनवतो पण ते काही विषेश नस्ते आणि ते काही पुढे जात नाही. म्हणुन मग तो त्या विषयातला "एक्स्पर्ट" बनतो आणि जिकडे तिकडे मी कसा भारी आणि मीच स्कुटर शोधुन काढली वगैरे सांगत फिरतो. जे लोकांना त्यातल काही कळत नाही त्यांना हे ऐकायला खुप भारी वाटत आणि हळुहळु तो सकाळ ईत्यादी वर्तमानपत्रात एक "एक्स्पर्ट" बनतो आणि आपले नॉलेज वाटत फिरतो.

मीन्व्हाईल व्यत्यय आणि अमितव त्यांचे मिळून डिझाईन फायनलाईझ करतात. ते मेहनीतीने पार्ट्स बनवुन ती स्कुटर तयार करतात. त्यांना जितकी वाटली होती तितकी भारी नाही बनत ती. पण काही विशिष्ट कंडिशन्स मध्ये ती स्कुटर बजाज पेक्षा भारी चालते. फॉर एक्झॅम्प्ल अस कळत की पंजाब मधले रांगडे जवान फार जोरात स्कुटर्स चालवतात. आणि त्याना ती खुपच आवडते. आणि पन्नास लोक ती स्कुटर विकत घ्यायची तयारी दाखवतात.

आणि एक गोष्ट म्हणजे सिक्किम मध्ये नविन ट्रॅवल कंपनी निघालिये कि जी टूरिस्ट्ला सिक्किमच्या डोंगरांवर भन्नाट वेगात पळवून सिक्किम दर्शन करवु ईछितात. त्यासाठी त्यांना १००० स्कुटर्स हव्या आहेत.

१६-१८ महिन्यांच्या अफाट मेहनतीचा व्यत्यय आणि अमितव यांच्यासाठी द हॅपी एन्ड!

राईट?

खरा प्रॉब्लेम आता सुरु होतो. सिक्किम मध्ये जागोजागी पेट्रोल पंप्स नाहीयेत. म्हणुन त्यांना स्कुटरची टाकी २० लिटर आइवजी ५० लिटर हवी आहे. पण टाकी ५० लिटर केली तर वेग भन्नाट राहील का याची व्यत्यय आणि अमितव यांना पुर्ण कल्पना नाही. याशिवाय महत्वच म्हणजे त्या कंपनीला एका वर्षात सगळी डिलिवरी हवी आहे. आता व्यत्यय आणि अमितव यांनी स्कुटर बनवली तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड मधुन कुठुन तरी पार्ट्स बन्वुन घेतले. पण एका वर्षात जर १००० स्कुटर्स बनवायच्या असतील तर त्यांना पुर्ण एको सिस्टिम लागेल जी की त्यांना हवे ते पार्ट्स हव्या त्या वेळात सप्लाय करेल. बजाज कडे तशी सिस्टिम ऑलरेडी आहे (हा आहे स्केल प्रॉब्लेम).

मग आता व्यत्यय आणि अमितव "रेडहॅट" ही कंपनी काढतात. कंपनी सुरु झाली ओरिजिनल ओपन सोर्स "स्कुटर बनवा घरच्या घरी" प्रोजेक्ट वरुनच! पण एक कंपनी असल्यामुळे ते त्याला पुर्ण वेळ देऊ शकतात. याशिवाय ते जाऊन व्हिसिज कडून फंडिग घेतात आणि बजाज सारखी एको सिस्टिम तयार करायचा प्रयत्न करतात. आता लोक एका कंपनीशी डील करत असल्यांमुळे विश्वासहर्ता वाढते. ते वेळच्या वेळी डिलीवरी करु शकतील असा लोकांचा विश्वास वाढतो. म्हणुन अजुन ऑर्ड्र्स येतात. पण त्यांना कळत की सिक्किम मधली ऑर्डर पुरी करण्यासाठी जे डिझाईन केलय त्यानी पंजाब मधील ऑर्ड्र्स चा वेग कमी होईल. म्हणुन आता ते दोन वेगवेगळे डिझाईन्स तयार करतात. याशिवाय त्यांना कळत की दोन्हि डिझाईन्स मध्ये आरसा जो आहे त्याला खूप प्रॉब्लेम आहे आणि तो चालणार नाही. मग ते कल्पकता दाखवुन नविन आरसा तयार करतात. याच बरोबर ते ओरिजिनल पुस्तकाच्या लेखकांना त्यांच्या आरशाच्य आयडिया आणि डिजाईन बद्दल सांगतात. त्या लेखकांना पण ती आयडिया आवडते आणि ते ती त्यांच्या पुस्तकात घालतात. ते पुस्तक अप्पा बळवंत चौकात नविन सुधारित आव्रुती मध्ये विकायला येते. पण त्यात पंजाब आणि सिक्किम साठी केलेले डिझाईन नसते.

हळु हळु वेगवेगळ्या गोष्टींचे खर्च अजुन वाढत जातात म्हणुन व्यत्यय आणि अमितव ला अजुन फंडिग घ्यायला लागत. आता ज्यांच्याकडुन फंडिग घेतले आहे ते पैशासाठी मागे लागतात. आता व्यत्यय आणि अमितव यांना कळत की सिक्किम वाल्यांना जी ओरिजिनल प्राईस प्रॉमिस केलेली त्यात विकली तर तर कप्मनी तोट्यात जाईल आणि मुळ लोकांना पैसे ही परत करता येणार नाहीत. मग ते अजुन एक शक्कल लढवतात. सिक्किम मधल्या कंपनी शी करार करतात की ते त्यांना स्कुटर्स विक्णार नाहीत पण ५० वर्षांसाठी नेहमी ऑन रेंट देतील पण ड्रायव्ह्र्स ते मॅनेज करतील.. सिक्किम मधली कंपनी बघते की जर स्कुटर्स विकत घेतल्या तर दर पाच वर्षानी बदलायला लागतील. त्यापेक्षा हे खुप चांगले कारण त्यांना नेहमीच नविन स्कुट्र्स मिळतील आणि ड्राय्वर्स लाही ट्रेन नाही करावे लागणार. फक्त टुरीस्ट लोकांना आणावे लागेल.

व्यत्यय आणि अमितव ची "रेडहॅट" कंपनी ड्रायव्हर्सला ट्रेन करतात की जे स्कुटर चे ड्रायव्हर्स असतील ते लोकांना सिक्किम दाखवता दाखवता आसपासच्या हॉटेल्स किंवा कपड्यांच्या दुकानात ही घेऊन जातील आणि त्या बदल्यात १०% कमिशन घेतील.

हळु हळु स्कुटर्स ची डिलिवरी होते. हा बिझ्नेस अपेक्षेपेक्शा ज्यास्त नफा कमवु लागतो. "रेडहॅट" कंपनी स्वतःचीच एक दुसरी ट्रॅवल कप्मनी काढतात की ज्याच्या मध्ये ते अत्याधुनिक स्कुटरचे मॉडेल वापरतात. ऑरिजिनल ट्रॅवल कप्मनीला ते ते मॉडेल देत नाहीत कारण की तस बंधनकारक नसते. टुरिस्ट लोकांना अत्याधुनिक मॉडेल मध्ये ज्यास्त ईंटरेस्ट असतो. त्यामुळे मुळ ट्रॅवल कप्मनी डब्यात जाते आणि "रेडहॅट" ची ट्रॅवल कंपनी अजुन नफा कमवु लागते.

मीनव्हाईल अंबादानी ओपनसोर्स कस भारी याची बोंब जे ऐकेल त्याच्याकडे मारत फिरत असतो जेव्हा लोक ते मॉडेल वापरुन पुढे निघुन पण गेली आहेत. हळुहळु लोकांना त्यातील फोलपणा जाणवु लागतो. आणि त्याला कुणीही सिरिअसली घेत नाही.

सिक्किम मधले काही लोकल लोक जेलस होतात आणि ते म्हणतात की हे महाराष्ट्रातुन आलेले लोक इथे नफा कसे कमवतात. ते बजाज कडुन काही स्कुटर्स घेउन त्यांचे बिझ्नेस सुरु करतात. त्यांच्याकडे "रेडहॅट" सारखे भारी मॉडेल नसल्यामुळे त्यांचा बिझ्नेस यथातथाच चालतो. एक टुरिस्ट ज्यांच नाव "रा" पासुन सुरु होत त्या मकरसंक्रातीच्या सुट्टीसाठी सिक्किमला येतात आणि सुरुवातीला त्या लोकल टुरिस्ट वापरतात पण नंतर "रेडहॅट" चे ट्रॅवल वापरतात. लोकल बिझनेस मध्ये त्यांनी दिलेली माहीती चोरि होते आणि त्यांना वाटत की ती चोरि झाली "रेडहॅट" मधुन. त्यांना सिक्किम मधले बरेचसे लोकल एक्स्पर्ट्स "स्कुटर बनवा घरच्या घरी" च सिक्किमिज भाषेत नीट न झालेल भाषांतर सांगतात आणि "रेडहॅट" कशी वाईट ते सांगतात. त्या कधीच ओरिजिनल "स्कुटर बनवा घरच्या घरी" वाचत नाहीत. म्हणुन त्या सर्वांना "रेडहॅट" वाईट असे सांगतात आणि मकरसंक्रातीच्या शुभेच्छा ही देतात.

मीन्व्हाईल बजाजला कळत की आता बरेच लोक "रेडहॅट" मधुन स्कुटर्स घेत आहेत. मग ते ती विकत घेतात. व्यत्यय आणि अमितव खुप खुप श्रीमंत होतात. व्यत्यय आता पुन्हा नविन स्कुटर ची कंपनी चालु करतो जी की "स्कुटर बनवा घरच्या घरी" पाचवी आव्रुत्ती मध्ये आहे. पण जेव्हा लोक रीलायबली कसे काय सप्लाय करणार विचारतात तेव्हा काही नाही ही कंपनी देणग्यांवर चालेल म्हणुन फाट्यावर मारतात.

मधल्या मध्ये माझ्यासारखे मुर्ख लोक असे प्रतिसाद लिहायला एकेक तास घालवतात.

सगळ्यात महत्वाच ज्याला कोणीही ओपन सोर्स वाले उत्तर द्यायला तयार नाहीत.

लिफ्ट या रियल टाईम अ‍ॅप असलेल्या कंपनीची सगळी मदार क्लाऊड वर आहे. त्यांच्या कडे जेमतेम तेवीस मिलियन कस्ट्मर्स असताना त्यांचा क्लाऊड वर दर वर्षी खर्च होतो १०० मिलियन. आता भारताची लोकसंख्या १ बिलियन म्हणजे त्याच्या ५० पट तरी आहे. समजा त्यातील अर्ध्या लोकांकडे स्मार्ट फोन्स असतील (५०० मिलियन्स). समजा त्यातील २०० मिलियन लोक नविन "ओपन सोर्स" वापरू लागले. तर क्लाऊड चा खर्च दहापट ज्यास्त होणार (खरतर असे खर्च लिनियर्ली वाढत नाहीत, जशी स्केल वाढते तशा गोष्टी अजुन कॉम्प्लेक्स होत जातात म्हणुन खर्च अजुन पटींनी वाढत जातात, पण सिम्प्लिफिकेशन साठी धरुन चालुयात). तरी क्लाऊड ची किम्मत झाली की १ बिलियन पर वर्षी.
(यात ईंजिनियर्स ची किम्मत धरलेली नाही).

या शिवाय लिफ्टला कुठलीही गोष्ट लॉग ट्र्म स्टोअर करायला लागत नाही. आता मेसेंजर मधल्या एका ग्रुप मध्ये समजा २० लोक आहेत. त्यातल्या ४-५ लोकांनी त्यांचे मेसेजेस १०-१५ दिवस चेकच नाही केले तर ते स्टोअर करायचा खर्च अजुन वाढणार.

चला असु द्यात, या सगळ्यांवर हा माझा आता शेवटचा प्रतिसाद. या लष्कराच्या भाकर्या भाजत बसायच आणि अपमान करुन घ्यायचा याच्यासाठी आता अजिबातच वेळ नाही. जे काय करायच ते करा आणि ज्या काही अर्धवट माहीत्या पसरवायच्या त्या पसरवा.

Pages